-
Sale! Add to cart'ही सारी सृष्टी केवळ माणसासाठी निर्माण झाली आहे, असं मानणं वेडगळपणाचं ठरेल. माणूस नसेल, तर हे विश्व जेवढं अपूर्ण आहे, तेवढंच एखादा कीटक नसेल, तरीही अपूर्ण आहे. या विश्वाची रचना ईश्वरानं सर्वांसाठी केली आहे. तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या, अशीच या विश्वाची धारणा आहे... आपल्या या अफाट देशात अनेक ठिकाणी घनदाट जंगलं आहेत, त-हेत-हेचे पशुपक्षी आहेत, डोंगरद-या आणि कोसळते धबधबे यांनी आपला निसर्ग संपन्न आहे. परमेश्वरानं आपल्याला दिलेली ही निसर्गसंपत्ती पुढच्या पिढयांसाठी नीट जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे... असं समजावून सांगणा-या एका अमेरिकन निसर्गमित्राची ही चरित्रकथा... पर्यावरणप्रेमी वाचकांना विचारप्रवृत्त करणारी आणि कार्याची प्रेरणा देणारी...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेNisargamitra John Myur | निसर्गमित्र जॉन म्यूर
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartनिसर्गातले अनेक सजीव एकमेकांच्या मदतीने जगतात. काही वेळा त्यांच्या नात्यात फक्त एकाचाच फायदा होतो; तर काही वेळा दोघांचा एकमेकांना उपयोग होतो. अथर्वला हे कसे समजले ? त्याने कुठले पक्षी, प्राणी, कुठली झाडे एकमेकांना सोबत आणि मदत करताना पाहिली ? चला, माहीत करून घेऊया निसर्गातले सखे-सोबती
All BooksNisargatle Sakhe-Sobati | निसर्गातले सखे-सोबती
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartपर्यावरणाची समस्या ही आज पर्यावरणाइतकीच सर्वव्यापी झाली आहे. निसर्गाशी लढा देऊन त्याच्यावर विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आपण त्याची खूपच हानी केली आहे. निसर्गाचं चक्र त्यामुळे भेदलं जात आहे. पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत - आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही ह्या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्या समोर उभ्या ठाकल्या आहेत. ही मनोवृत्ती जोवर बदलत नाही, तोवर ह्या समस्या सुटणार नाहीत. हा बदल कसा असला पाहिजे ? तो कशानं शक्य होईल ? आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान ह्यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक.
पर्यावरणNisargayan | निसर्गायण
₹290.00Original price was: ₹290.00.₹218.00Current price is: ₹218.00. Save ₹72 Add to cart -
Sale! Add to cartपर्यावरणाची समस्या ही आज पर्यावरणाइतकीच सर्वव्यापी झाली आहे. निसर्गाशी लढा देऊन त्याच्यावर विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आपण त्याची खूपच हानी केली आहे. निसर्गाचं चक्र त्यामुळे भेदलं जात आहे. पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत - आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही ह्या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्या समोर उभ्या ठाकल्या आहेत. ही मनोवृत्ती जोवर बदलत नाही, तोवर ह्या समस्या सुटणार नाहीत. हा बदल कसा असला पाहिजे ? तो कशानं शक्य होईल ? आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान ह्यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेNisargayan | रामानुजन – जिनीयस गणितज्ञ
₹110.00Original price was: ₹110.00.₹83.00Current price is: ₹83.00. Save ₹27 Add to cart -
Sale! Add to cartनितीन गडकरी म्हणजे केवळ एक राजकीय नेते' अशा नजरेने पाहिल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध विलोभनीय पैलू जाणवणार नाहीत. हे पैलू पारखले, तरच या नेत्याचे सर्वंकष व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यापुढे उभे राहील. आपल्या जीवनप्रवासात नितीन गडकरींनी कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवला आहे. सार्वजनिक आणि राजकीय जीवनात अनेक निर्णय घेताना त्यांनी काय पथ्ये पाळली, त्यांच्या विचारांवर आणि मनोभूमिकेवर कुणाकुणाचा कसकसा प्रभाव पडला, अनेक समस्यांवर मात करताना त्यांनी दाखवलेली धैर्य, इच्छाशक्ती आणि सकारात्मकता त्यांना कुठून मिळते - अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी नितीन गडकरींच्या जीवनाचा आढावा घ्यायला हवा. चौकटी मोडणारा धुरंधर नेता : नितीन गडकरी' हे पुस्तक वाचकांना अशी संधी उपलब्ध करून देत आहे. नितीन गडकरींनी अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीत आयुष्याच्या प्रवासाला प्रारंभ केला. आपल्या दृढनिर्धाराच्या बळावर त्यांनी आजचे असाधारण स्थान प्राप्त केले. ही सर्व वाटचाल काही सोपी आणि साधी सरळ नव्हती. त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला असणार, अनेक आव्हानांशी संघर्ष करावा लागला असणार. त्यांनी आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध आणि प्रगल्भ करण्यासाठी स्वत:च्या अंतर्मनातील एकाग्रतेवर भर दिला. आपल्या जीवनातील कक्षा व्यापक बनवण्यासाठी ज्या कौशल्यांची गरज जाणवली, ती कौशल्ये त्यांनी व्यापक व्यासंगाच्या आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अंगी बाणवली. आत्मव्यवस्थापन हा त्यांच्या आयुष्याचा मूलमंत्र ठरला. या मूलमंत्राच्या आधारे जीवनातील उच्च ध्येये आपण गाठू शकतो, हे नितीन गडकरींच्या प्रत्यक्ष उदाहरणाने वाचकांसमोर मांडणारे पुस्तक म्हणजे चौकटी मोडणारा धुरंधर नेता : नितीन गडकरी'.
All BooksNitin Gadkari | नितीन गडकरी
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartरूढ अर्थानं ज्यांना सेलिब्रिटी म्हणता येणार नाही, अशी अनेक मराठी मंडळी वेगळ्याच वाटेनं चालत असतात. प्रसिद्धी, मानसन्मान, त्यातून मिळणारा पैसा या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपल्या मनाला पटेल, आवडेल ते काम ही मंडळी स्वान्त सुखाय करीत राहतात. विश्वसंवाद या मराठीतल्या पहिल्या पॉडकास्टवर येऊन गेलेल्या अनेक पाहुण्यांपैकी काही निवडक पाहुण्यांशी झालेल्या गप्पांवर आधारित हे पुस्तक. पॉडकास्ट ते पुस्तक अशा माध्यमांतराचंही मराठीतलं हे पहिलंच उदाहरण. गेल्या चार-पाच वर्षात पॉडकास्टींग या माध्यमानं मराठीच नव्हे तर इतरही अनेक भारतीय भाषांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. मराठीमध्ये या माध्यमाची ओळख करून देण्यात विश्वसंवाद चा हातभार लागला याचा अतिशय आनंद वाटतो. हे पुस्तक वाचून आणि विश्वसंवाद च्या यू-ट्यूब चॅनेलवरील इतर मुलाखती ऐकून मराठी वाचकांमध्ये या माध्यमाची आवड निर्माण झाली, आणि त्याही पुढे जाऊन कुणी स्वतःचा पॉडकास्ट सुरु केला तर या धडपडीचं सार्थक झालं असं वाटेल.
All BooksNivadak Vishwasavaad | निवडक विश्वसंवाद
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartनिवडणुका कशा लढवाव्यात आणि जिंकाव्यात ? जनमत चाचण्या कशा कराव्यात ? आपलं राजकीय व्यक्तिमत्त्व कसं घडवावं ? आपली राजकीय प्रतिमा कशी उंचवावी ? जाहिरात, प्रचार कसा करावा ? कार्यकर्याँ कडून काम कशा प्रकारे करवून घ्यावं ? संघटनेची बांधणी कशी करावी ? निवडणुकीच्या युध्दातील पूर्वतयारीपासून अंतिम विजयापर्यंतची संपूर्ण व्यूहरचना शास्रशुध्द पध्दतीने उलगडणारे.
समाजकारण / राजकारणNivadnuk Jinknyasathi Sarva Kahi | निवडणूक जिंकण्यासाठी सर्व काही
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartगोमंतकाच्या हिरव्यागर्द शेताभाटांत वाढलेल्या; पावसापाण्यात, पागोळ्यांत मनसोक्त भिजलेल्या एका निसर्गवेड्या मनस्वी मुलीच्या जडणघडणीच्या आणि व्यावसायिक स्थैर्यापावेतोच्या प्रवासातील हे कडू-गोड जीवनानुभव.तिच्या त्या एकाकी धडपडीची, ध्येयाप्रत पोहोचण्यासाठीच्या जिद्दीची ते जाणीव तर करून देतीलच; परंतु अशा संघर्षाच्या वाटेवरून चालणाऱ्यांना प्रेरकही ठरतील.या लेखांतील हृदयंगम शब्दवैभव आणि लोभस लालित्य आपल्याला खिळवून ठेवील; शिवाय सखोल व्यासंग, वैचारिक परिपक्वता आणि भावनिक उत्कटता यांनी परिणत असे शाश्वत जीवनमूल्यांवरील श्रद्धा दृढ करणारे हे लेखन समकालीन मराठी ललित लेखनालाही निश्चितच नवी उंची देईल.लेखिकेच्या आजवरच्या आयुष्यातील नानाविध बऱ्यावाईट अनुभवांच्या तरंग आणि भोवऱ्यांचा भर ओसरल्यावर शेवटी ओंजळीत उरलेले हे निवळशंख पाणी...
All BooksNivalshankh Pani | निवळशंख पाणी
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'बाबूराव अर्नाळकर. मराठी रहस्यकादंब-या अन् रहस्यकथांचे अनभिषिक्त सम्राट. दीड हजाराहून अधिक कादंब-या लिहून आपलं नाव गिनीज बुक मध्ये नोंदवणारा विक्रमवीर. ज्याच्या पुस्तकांवर अक्षरश: लाखो वाचकांच्या वर्षानुवर्षं उड्या पडत राहिल्या, असा विलक्षण लोकप्रिय लेखक. नामांकित साहित्यिक अन् कलावंतांपासून सामान्य कष्टक-यांपर्यंत सा-यांनाच ज्याच्या लेखणीनं खिळवून अन् गुंगवून टाकलं, असा कलमबहाद्दर. बाबूरावांचं चरित्र, महेश एलकुंचवारांची प्रस्तावना, अनेक नामवंत साहित्यिकांचे अन् कलाकारांचे विशेष लेख, बाबूराव अर्नाळकरांच्या गाजलेल्या अकरा कादंब-या अन् पाच कथा यांनी सजलेला हा ग्रंथ म्हणजे मराठी रहस्यकादंब-यांच्या या बादशहाला मानाचा मुजरा ! निवडक बाबूराव अर्नाळकर
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेNivdak Baburav Arnalkar | निवडक बाबूराव अर्नाळकर
₹700.00Original price was: ₹700.00.₹525.00Current price is: ₹525.00. Save ₹175 Read more -
Sale! Add to cart'आपली सध्याची भेसळयुक्त भाषा.... आपली सध्याची माध्यमग्रस्तता...... आपली सध्याची शिक्षण (अ)व्यवस्था...... आपली सध्याची पालकनीती (?).... आपली सध्याची डगमगणारी......इ.इ. थोडक्यात, तुमच्या-आमच्या सध्याच्या जगण्यावरचा तिरकस पण हसरा कटाक्ष.. विचारगर्भ पण मिस्कील भाष्य... आणि खेळकर शैलीतील मार्मिक निरीक्षणं म्हणजे मंगला गोडबोले यांचं विनोदी लेखन ! गेली ३५ वर्षं सातत्यानं आपल्या प्रसन्न, नर्मविनोदी आणि झुळूकदार विनोदानं हसू फुलवणाऱ्या आणि विचारप्रवृत्तही करणाऱ्या मंगला गोडबोले यांच्या निवडक विनोदी लेखनाचा संग्रह......
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेNivdak Mangala Godbole | निवडक मंगला गोडबोले
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart
Skip to content