-
Sale! Add to cartपेरू देश म्हणजे गूढ आणि रहस्यमय ठिकाणांची खाण. स्पॅनिशांनी आक्रमण करून या देशावर पाच शतके राज्य केले. पाषाणांच्या इमारतीवर अवाढव्य राजवाडे बांधले. आजही पाया खोदला, तर लाखो सांगाडे मिळतात. लिमा शहरामध्ये फिरताना पावलोपावली जुन्या काळाच्या खुणा आढळतात. हा देश पाहताना आपल्या मनात अनेक प्रश्नांचे मोहोळ उठते. परकास बेटावरील अवाढव्य त्रिशूल थेट रामायणाशी नाते सांगतो का ? विज्ञान, तंत्रज्ञान आणि तर्कबुद्धी यांना अद्याप ज्यांचे कोडे पूर्णपणे उलगडता आलेले नाही, त्या नाझ्काच्या रेखाकृती मानवनिर्मित आहेत की परग्रहवासीय एलियननी साकारलेल्या ? विस्तीर्ण पठारावर विसावलेल्या या प्राणी-पक्षी-मानवाच्या रेखाकृती म्हणजे जणू नोहाची नौकाच ! त्यांचे संपूर्ण दर्शन आधुनिक काळात मानवाला झाले, तेच मुळी विमानातून ! इतिहासाच्या पोटातील अशी अनेक गूढ रहस्ये आपल्या भूमीवर वागवणाऱ्या देशाची वेधक सफर.
All BooksRahasyamay Peru | रहस्यमय पेरू
₹330.00Original price was: ₹330.00.₹248.00Current price is: ₹248.00. Save ₹82 Add to cart -
Sale! Add to cartमानवी नीतिधैर्याच्या अंतिम विजयावर विश्वास ठेवून ब्रह्मदेशाचा इतिहास नव्यानं लिहू पाहणा-या एका तपस्विनीची संघर्षकथा
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेRajbandini (Aung San Syu Chi) | राजबंदिनी (ऑंग सान स्यू ची)
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart'जवळजवळ एक तप महाराष्ट टाइम्सचे विशेष प्रतिनिधी म्हणून राजधानी दिल्लीत काम करताना अशोक जैन यांनी अनेक राजकीय चढउतार पाहिले. जनता पक्षाची पडझड, इंदिरा गांधींचं पुनरागमन, जुन्या पक्षांची तोडफोड, नव्या पक्षांची स्थापना, इंदिरांजींची हत्या, राजीव गांधींची कारर्कीद -- या सर्व घडामोडीचे साक्षीदार असलेल्या जैन यांना कधी कोणाच्या नावाचा टिळा लावला नाही किंवा कोणत्याही पक्षाची पताका खांद्यावर घेतली नाही. एका तटस्थ पत्रकाराच्या भूमिकेतून त्यांनी अनेक नेत्यांची व घटनांची रोमहर्षक शब्दचित्र रेखाटून तो अवघा माहोल आपल्या रसरशीत शैलीत उभा केला. राजकारणाची व दिल्लीची स्पंदनं टिपणारं हे चटकदार लेखन जणू चकित करणा-या, चकविणा-या, चक्रावून टाकणा-या दिल्लीची आधुनिक बखरच ! धावती, ओघवती नि झगमगती ! '
समाजकारण / राजकारणRajdhanitun | राजधानीतून
₹480.00Original price was: ₹480.00.₹360.00Current price is: ₹360.00. Save ₹120 Add to cart -
Sale! Add to cart'पंतप्रधान इंदिरा गांधी अनेक वर्षे प्रकाशझोतात राहिल्या. साहजिकच त्यांची अनेक रूपे सर्वसामान्यांसमोर आली. तथापि त्या सर्व रूपांपेक्षा अगदी वेगळ्या रूपात त्यांना पाहण्याची, अनुभवण्याची दुर्मीळ संधी त्यांच्या स्वीय डॉक्टरना लाभली. त्या डॉक्टरना इंदिराजी कशा दिसल्या, किती भावल्या, हे त्यांनी या पुस्तकात मोठ्या रोचकपणे सांगितले आहे. दृष्टीआडच्या इंदिरा गांधी
रसग्रहण / समीक्षाRajeev Sane Yanchi Sulat Tapasani | राजीव साने यांची सुलटतपासणी
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreलोकजीवनाचे आणि दैनंदिन व्यवहाराचे संपर्कमाध्यम असणारी कोणतीही भाषा गतिशील असते. तिचा इतर भाषांशी संपर्क येत असतो, ज्ञानविज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्यामुळेही अनेक नवनवीन संकल्पना शब्दरूप घेऊन तिच्यासमोर उभ्या राहात असतात. त्यांचे स्वागत आणि स्वीकार करून भाषा समृद्ध होत पुढे जात असते. गेल्या १०-१५ वर्षांत आणि येत्या १०-१५ वर्षांतही मराठी माध्यमातून शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या या व्यावहारिक शब्दार्थ कोशाची हीच भूमिका आहे. या पिढीला भाषेच्या शुद्धतेपेक्षाही तिच्या व्यावसायिक उपयुक्ततेकडे अधिक लक्ष द्यावेसे वाटते. आपल्या बोलण्यात सहज येणारा इंग्रजी शब्द त्यांना खटकत नाही. पण त्या तशा शब्दाचा नेमका अर्थ त्यांना माहीत असतोच, असे नाही. खुद्द मायबोलीतील परंपरेने आजतागायत चालत आलेल्या हजारो शब्दांप्रमाणेच या नव्याने लोकव्यवहारात रुळलेल्या पाहुण्या शब्दांचेही अर्थ समजावून देणारा हा कोश म्हणूनच नव्या पिढीला अत्यंत उपयुक्त ठरू शकेल. मराठी प्रेमी घराघरात आवर्जून ठेवला जावा, वापरला जावा, असा हा उपयुक्त शब्दार्थ कोश म्हणजे मराठीतील कोशवाड्.मयाचे दालन अधिक समृद्ध करणारा एक राजहंसी मानदंड आहे, यात शंका नाही.
भाषाविचारRajhans Vyavharik Marathi Shabdarth Kosh | राजहंस व्यावहारिक मराठी शब्दार्थ कोश
₹800.00Original price was: ₹800.00.₹600.00Current price is: ₹600.00. Save ₹200 Read more -
Sale! Add to cart'राजीव गांधी आणि सोनिया गांधी. अचानक उद्भवलेल्या दु:खद परिस्थितीच्या दबावामुळे वेगवेगळया वेळी भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी ढकलल्या गेलेल्या या पतिपत्नींची कथा आहे ही. एका उच्च, कर्तबगार सनदी अधिकाऱ्याने सांगितलेली... राजीव आणि सोनिया या दोघांच्याही आतल्या वर्तुळात वावरायची संधी मिळालेल्या राम प्रधान यांनी सांगितलेल्या या आठवणी... राष्ट्रीय राजकारणातल्या अनेक प्रसंगांमागच्या गुंतागुंतीच्या ऐतिहासिक घडामोडींची तपशीलवार नोंद घेणारे हे आत्मकथन राजीव-सोनियांबद्दलही बरेच काही सांगून जाते.
इतिहासRajiv Aani Soniya Yanchya Sahvasat | राजीव आणि सोनिया यांच्या सहवासात…
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartही कहाणी आहे किशोरवयापासून जपलेल्या एका स्वप्नाची. त्यासाठी केलेल्या अपार शारीरिक, शैक्षणिक आणि मानसिक तयारीची, कष्टसाध्य यशाची, निष्ठेची आणि कर्तव्यबुद्धीची. पण.... एका क्षणात ती होते, कहाणी स्वप्नभंगाची आणि यातनांची. त्याच वेळी सोशिकतेची, दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि समंजस स्वीकाराची. ही कहाणी केवळ आकाशात भरारी घेणारा वैमानिक कायमसाठी चाकाच्या खुर्चीत जखडबंद होतो त्याची नाही, तर पुनश्च राखेतून उगवतीकडे निग्रहाने झेपावतो, त्याची होय.
All BooksRakhetoon Ugavateekade | राखेतून उगवतीकडे
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cartफुलाफळांनी बहरलेलं रम्य काश्मीर. पण तेथे धार्मिक, आर्थिक, शासकीय, राजकीय गुंतागुंतीचं जाळं. या पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही काश्मिरी पंडितांच्या कुटुंबाची कहाणी ही पितापुत्रांची, जिवलग मित्रांची, उत्कट प्रीतीचीही कहाणी संपादक अभय प्रताप जिवाच्या भीतीने अनंतनागमधून कुटुंबासह बाहेर पडतात. जम्मूत बेघर पंडितांसाठी उभारलेल्या तंबूंच्या छावणीत हे कुटुंब दाखल होतं पुढे काय घडतं?
कादंबरीRaktagulab | रक्तगुलाब
₹330.00Original price was: ₹330.00.₹248.00Current price is: ₹248.00. Save ₹82 Add to cart -
Sale! Add to cartस्वातंत्र्य-समतेची घोषणा करणारे नव्या समाजाचे संविधान अस्तित्वात आले. पण त्यातून नवी समाजरचना अस्तित्वात आली का? संविधानातील उद्दिष्टांचे अस्तित्व समाजमनाचा अविभाज्य भाग झाला का? या प्रश्नांची उत्तरे कवी नोमेश नारायण शोधू लागतात, तेव्हा त्यांच्या हाती उत्तरे येतात - कधी खैरलांजी', तर कधी रोहित वेमुला'! मग अशावेळी या कवीने काय करावे? कवीच्या हाती काय असते? कवीची ताकद कशात असते? या प्रश्नांची उत्तरे मात्र या कवीकडे निश्चितच आहेत, असे या संग्रहातील कवितांमधून दिसते. कवीच्या कवितांत प्रथमच विद्रोहाच्या ज्वाळातून तावून सुलाखून निघालेले फिनिक्स पक्ष्यासारखे सळसळते मन दिसते. नवनव्या प्रतीकांमधून व प्रतिमांमधून हा कवी विद्रोही कवितेच्या साचेबद्धपणातून मुक्त होताना दिसतो. ही कविता बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या स्वप्नातील नव्या संस्कृतीचे जणू संविधान आहे. ती वैश्विक मानवी मूल्ये समाजमनात रुजविण्याचा आशावाद व्यक्त करते. व्यापक जीवनभान देण्याचा प्रयत्न करते. या कवितेतील शब्दप्रतिमा आणि प्रतीकांचे नावीन्य एकूणच आंबेडकरी मराठी कवितेला व रसिकांना पृथकअनुभूतीविश्वात घेऊन जाते. कवी मानवी संवेदना विशिष्ट चाकोरीतून वा विशिष्ट तत्त्वज्ञानातून व्यक्त करीत नाहीत, तर समग्रलक्ष्यी जीवनमूल्यांची व तत्त्वविचारांची पखरण करून मानवी संवेदना कवितेतून शब्दबद्ध करतात. आशय, अभिव्यक्ती व भाषा अशा काव्याच्या अंगांनी समृद्ध असलेली ही कविता केवळ आंबेडकरीच नव्हे तर समकालीन मराठी कवितेची कक्षा विस्तारणारी कविता आहे ! डॉ. प्रमोद मुनघाटे
All BooksRaktaphulnche Tatawe | रक्तफुलांचे ताटवे
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartकामातून शिक्षण घेणे आणि शिक्षणातून काम उभारणे हा गांधींचा शिक्षण विचार डॉक्टर राम ताकवले बालपणापासून जगत आले. याच विचाराच्या आधारे त्यांनी हरगुडे गावात शेती काम, ते तीन विद्यापीठांचे कुलगुरूपद हा वैयक्तिक प्रवास संपूर्ण समाजासाठी फलदायी आणि शिक्षण क्षेत्रासाठी पथदर्शक केला. जीवनशिक्षणाच्या कुठल्याही वाटेवरून चालणाऱ्या कष्टकऱ्यास विद्यापीठातील उच्च शिक्षणाचा मार्ग खुला हवा हा ध्यास घेऊन ताकवले सरांनी मुक्त विद्यापीठांद्वारे शिक्षणगंगा घरोघरी आणि खेडोपाडी नेऊन पोचवली. विद्यापीठांनी भविष्यलक्ष्यी राहून नवनवी ज्ञानक्षेत्रे कवेत घ्यावीत यावर त्यांचा कटाक्ष होता. म्हणूनच ललित कला, कृषिविज्ञान, ते संगणक शास्त्र अशा अनेक विद्याशाखा त्यांनी विद्यापीठांच्या कक्षेत आणल्या. सामान्यातील असामान्यत्व जागे करण्याची ताकद शिक्षणात असते हे ओळखून ते सर्वांना उपलब्ध व्हावे यासाठी झटणाऱ्या एका साधकाची ही शिक्षणयात्रा-जेवढी उद्बोधक, तेवढीच प्रेरणादायी...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेRam Takavle – Parivartanshil Kulaguru | राम ताकवले
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart
Skip to content