Rajhans Podcasts
30. पं. जितेंद्र अभिषेकी यांचा जीवनप्रवास | Abhisheki
पं. जितेंद्र अभिषेकी. शिष्य, मैफलगायक, संगीतकार आणि गुरू ही त्यांची संगीतविश्वातील चार रूपं. स्वत:च स्वत:च्या तत्त्वांशी, ध्येयांशी, उद्दिष्टांशी स्पर्धा करत पराकोटीच्या तन्मयतेनं एकाच वेळी साकारलेल्या या चार भूमिका! त्यात आपण अव्वलच असलं पाहिजे, ही त्यांची आंतरिक उर्मी! अशा या प्रतिभावान, चतुरस्र कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाचा अन् संगीतकर्तृत्वाचा वेध घेणारा चरित्रग्रंथ.
29. पृथ्वी धुंडाळणाऱ्या शोधनायकांची गाथा!
प्रवास करायला उमेद हवी हे खरं असलं तरी अज्ञात प्रदेशांची मुलुखगिरी करायची म्हणलं तर या उमेदीला साहसाचीही जोड हवी. गेल्या दोन हजार वर्षांतील पृथ्वी धुंडाळणाऱ्या अशा असंख्य शोधनायकांची गाथा डॉ. अनुराग श्रीकांत लव्हेकर यांचं वसुंधरेचे शोधयात्री हे पुस्तक उलगडतं. या आगळ्यावेगळ्या ग्रंथाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.
28. आपण एका टकमक टोकाकडे चाललोय? | Atul Deulgaonkar |
कुठे कोरडा दुष्काळ, तर कुठे ओला. कुठे ढगफुटी, तर कुठे अवकाळी गारपीट. एकीकडे वारंवार वणवे, तर दुसरीकडे महापूर. सर्वत्र चर्चा एकच: हवामान कल्लोळ! यात दोष कुणाचा? निसर्गाचा नक्कीच नाही. माणसानं निसर्गाची हत्या चालवली आहे. पण निसर्गाची हत्या म्हणजे माणसाची आत्महत्या. कशी, ते सांगणारं निसर्गकल्लोळ हे पुस्तक घेऊन लेखक, पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर आले आहेत.