आम्ही 'राजहंसी'
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी १९५२ मध्ये स्थापन केलेली ‘राजहंस प्रकाशन ही मराठीतील प्रतिष्ठीत प्रकाशन संस्था आहे. मराठी साप्ताहिकांमध्ये वेगळी नाममुद्रा उमटविणाऱ्या माणूस साप्ताहिकाचे संस्थापक-संपादक श्री. ग. माजगावकर हे १९५७ साली राजहंसमध्ये आले आणि या दोघांच्या प्रयत्नातून ही प्रकाशनसंस्था आकार घेत गेली. पु. ल. देशपांडे यांनी गौरवलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘राजा शिवछत्रपती’ हे राजहंसी पुस्तक घराघरात पोहोचले. ‘राजहंस प्रकाशना’ चे संवर्धक श्री. ग. माजगावकर यांची सजग सामाजिक जाणीव, वैचारिक मोकळेपणा, निरनिराळ्या राजकीय आणि सामाजिक चळवळींबद्दलची आस्था या साऱ्यांचा ठसा ‘राजहंस प्रकाशना’च्या पुस्तकांवर पडला व तो आजही कायम आहे.
श्री.ग. माजगावकरांचे धाकटे बंधू दिलीप माजगावकर १९६६ साली ‘राजहंस’ मध्ये दाखल झाले. आता ते संस्थेचे संचालक म्हणून काम पाहतात. कालानुरूप विषयांची निवड, त्यासाठी योग्य लेखक, उत्कृष्ट निर्मितीमूल्ये आणि वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचविण्यासाठी राबविलेले अभिनव उपक्रम यातून दिलीप माजगावकर यांनी राजहंसचा पाया भक्कम केला. विषयांची विविधता वाढल्यावर उत्तम संपादन करणारे चिकित्सक संपादक मंडळ दिलीप माजगावकर यांनी उभे केले. विषयांचे वैविध्य, आशयाची समृद्धी अशी राजहंसची ओळख मराठी वाचकांमध्ये होऊ लागली, याबरोबर प्रकाशन संस्थेसाठी आवश्यक अशा वितरण आणि विक्री या घटकांवर योग्य भर देण्यास दिलीप माजगावकर यांनी सुरूवात केली. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि गोवा या ठिकाणी राजहंसच्या शाखा असून पुस्तक विक्रीचे जाळे उभे राहिले आहे.
प्रेरणादायी चरित्रे आणि आत्मचरित्रांचे समृद्ध दालन, राजकीय व ऐतिहासिक विषयांवरील व समाजकारणावरील प्रभावी पुस्तके ही ‘राजहंस’ची ठळक वैशिष्ट्ये. याचबरोबर विज्ञान, पर्यावरण, अंधश्रध्दानिर्मूलन, ललित साहित्य अशा विषयांवरील पुस्तके प्रकाशित करण्यात राजहंसने आघाडी घेतली. नवे विषय आणि नवे लेखक यांबाबत ‘राजहंस प्रकाशन’ नेहमी स्वागतशील असते. ‘राजहंस प्रकाशना’ ने वाचकांपुढे आणलेल्या अनेक लेखकांनी त्यांच्या क्षेत्रातील आपल्या कामाने आणि त्यासंबंधीच्या लेखनाने आगळेवेगळे स्थान उभे केले आहे. राजहंसच्या ग्रंथसूचीमध्ये सर्व वाड्ःमयप्रकार आहेतच, पण त्यातही चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, समाजकारण, राजकारण आणि विज्ञान ही ‘राजहंस प्रकाशना’ ची नाममुद्रा उमटलेली खास दालने आहेत. प्रकाशन संस्थेचे स्वत:चे संपादक मंडळ ही ‘राजहंस’ची भक्कम बाजू असून राजहंसच्या दर्जेदार निर्मितीमध्ये विविध विषयांवर प्रभुत्व असणाऱ्या जाणत्या संपादकांचे योगदान महत्वाचे आहे.
आमचा दृष्टिकोन
- विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी असलेलं लेखन वाचकांपर्यंत पोहोचवणं.
- उत्तम संपादन व उत्कृष्ट निर्मितिमूल्यांवर भर देत महाराष्ट्रात सर्वत्र पुस्तकवितरणाची व्यवस्था करणं.
आमची उद्दिष्टे
- ग्रामीण लेखकांपासून नेते, अभिनेते यांच्यापर्यंत मान्यवर लेखकांचे विविध साहित्यप्रकारातले लेखन प्रकाशित करणं. छापील पुस्तकांसोबत किंडल एडिशन वाचकांना उपलब्ध करून देणं.
- वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी यूट्यूब, फेसबुक, इनस्टाग्राम या समाजमाध्यमांचा प्रभावी उपयोग करणं.
We Are Rajhansi
Founded in 1952 by Shivshahir Babasaheb Purandare, Rajhans Prakashan is one of the prestigious publishing houses in Marathi. Shri. G. Majgaonkar, the founder-editor of Manus, a weekly that created a distinctive identity among Marathi weeklies, joined Rajhans in 1957. Through the efforts of these two visionaries, the publishing house gradually took shape. Raja Shivchhatrapati, the celebrated book by Shivshahir Babasaheb Purandare, praised by P. L. Deshpande, reached households across Maharashtra and became one of Rajhans Prakashan’s most iconic publications.
The social awareness, intellectual openness, and keen interest in various political and social movements of Shri. G. Majgaonkar, who nurtured Rajhans Prakashan, left a lasting imprint on the books published by Rajhans—a legacy that continues to this day.
Shri. G. Majgaonkar’s younger brother, Dilip Majgaonkar, joined Rajhans in 1966. He now serves as the Director of the organization. Through the timely selection of subjects, identifying the right authors, maintaining excellent production values, and introducing innovative initiatives to take books to readers, Dilip Majgaonkar strengthened the foundation of Rajhans. As the range of subjects expanded, he established a discerning editorial team known for its expertise and high-quality editing.
Rajhans gradually became known among Marathi readers for its diversity of subjects and richness of content. Alongside publishing, Dilip Majgaonkar also placed due emphasis on distribution and sales, essential components of a successful publishing house. Today, Rajhans has branches in Mumbai, Nagpur, Aurangabad, Nashik, Kolhapur, Satara, Sangli, Solapur, and Goa, creating a widespread network for book distribution and sales.
An extensive collection of inspiring biographies and autobiographies, along with influential books on politics, history, and social issues, are among the distinctive features of Rajhans. The publishing house has also taken a leading role in publishing books on science, environment, eradication of superstition, and literary fiction.
Rajhans Prakashan has always welcomed new subjects and new authors. Many writers introduced to readers by Rajhans have established a distinctive position in their respective fields through their work and writings
The Rajhans catalogue encompasses virtually every genre of literature, with particularly strong collections in biography, autobiography, history, social issues, politics, and science—subjects that have become hallmarks of Rajhans Prakashan.
The publishing house’s in-house editorial team remains one of Rajhans’s greatest strengths. The contribution of knowledgeable editors with expertise across diverse subjects has played an important role in maintaining the high standards and quality of Rajhans publications.
Books published by Rajhans Prakashan have been honored with several prestigious awards from the literary world, including distinguished national honors such as the President’s Medal and the Sahitya Akademi Award. Explore the awards and accolades…
Our Approach
- To bring writing characterized by diverse subjects and rich content to readers.
- To establish a book distribution network across Maharashtra, emphasizing excellent editing and superior production quality.
Our Objectives
- Publishing works across various genres by distinguished authors, ranging from rural writers to political figures and actors.
- Making Kindle editions available to readers alongside printed books.
- Effectively utilizing social media platforms like YouTube, Facebook, and Instagram to reach readers.
आमची वाटचाल
नेतृत्व व टीम

श्री. ग. माजगावकर
संचालक

दिलीप माजगावकर
संचालक

रेखा दिलीप माजगावकर
संचालक

डॉ. सदानंद बोरसे
संचालक आणि संपादक

शिरीष शेवाळकर
व्यवस्थापकीय संचालक
श्री. ग. माजगावकर
संचालक(१ ऑगस्ट १९२९ – २० फेब्रुवारी १९९७)
श्रीकांत माजगावकर (श्रीभाऊ वा श्री.ग.मा) हे ‘माणूस’कार श्री.ग.माजगावकर या नावाने ओळखले जाणारे महाराष्ट्रातले एक आदरणीय व्यक्तिमत्त्व. पत्रकार, लेखक, ‘राजहंस’ प्रकाशनाचे संचालक-संपादक आणि ‘माणूस’ या साप्ताहिकाचे संस्थापक-संपादक अशी त्यांची मोठी कारकीर्द होती. श्रीगमा यांनी आपल्या लेखनाद्वारे वैचारिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. त्यांनी आपल्या लेखनातून मराठी वाचकांना वैचारिक आणि सामाजिक भान दिले. नागरिकांचे विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्या विचाराने त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ साली देशावर लादलेल्या आणीबाणीविरुद्ध लढा दिला होता.
श्री.ग. माजगावकर यांच्या कार्याची सुरुवात ‘राजहंस प्रकाशन’ या संस्थेपासून झाली. १९५२ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर १९५७ मध्ये श्री.ग. माजगावकर यांनी ‘राजहंस’ मध्ये प्रवेश केला. १ जून १९६१ पासून त्यांनी ‘माणूस’ मासिकाचे प्रकाशन सुरू केले. ‘माणूस’ मासिकाचे ते संस्थापक – संपादक होते. कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना स्वत:च्या हिमतीवर अशाप्रकारे एक मासिक आणि प्रकाशनसंस्था चालवणे ही त्या काळात अतिशय धाडसाची आणि जिद्दीची बाब होती. ‘माणूस’च्या अंकांनी सुमारे २५ वर्षं महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जाणिवा समृद्ध केल्या. ‘माणूस’मधून वि. ग. कानिटकर, अशोक जैन, अरुण साधू, विजय तेंडुलकर, रवींद्र पिंगे यांच्यासह अनेक नामवंत लेखकांचे लेखन प्रकाशित झाले.
श्रीगमा यांनी ‘माणूस’च्या कामासोबतच ‘राजहंस’चा पाया भक्कम केला. त्यांची सजग सामाजिक जाणीव, वैचारिक मोकळेपणा, निरनिराळ्या राजकीय आणि सामाजिक चळवळींबद्दलची आस्था या साऱ्यांचा ठसा ‘राजहंस प्रकाशना’च्या पुस्तकांवर पडला व तो आजही कायम आहे. त्यांच्या कारकिर्दीत प्रकाशित झालेल्या ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’, ‘वोल्गा जेव्हा लाल होते...’, ‘टॉलस्टॉय’, ‘एक होता कार्व्हर’, ‘सांगते ऐका...’ यासह अनेक पुस्तकांनी मराठी साहित्यविश्वात मोलाची भर घातली आहे.
श्रीगमा यांच्या सामाजिक कार्याची स्मृती म्हणून त्यांच्या नावाचा ‘माणूस’कार पुरस्कार २०१९ पासून राजहंस प्रकाशन आणि रा. चिं. ढेरे संशोधन केंद्रातर्फे साहित्य क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो आहे. २०२९ मध्ये श्रीगमांच्या जन्मशताब्दी वर्षात या पुरस्काराची सांगता होईल.
लेखनसाहित्य:
- श्रीग्रामायन
- बलसागर
- निर्माणपर्व
पुरस्कार:
- ‘अॅग्रोफॉरेस्ट्री’ पुरस्काराने कृषीमंत्री शरद पवारांच्या हस्ते सन्मानित.
- उत्कृष्ट संपादक म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते सन्मान.
दिलीप माजगावकर
संचालकजन्मतारीख: ११ नोव्हेंबर, १९४३
राजहंस प्रकाशनाचे संचालक दिलीप माजगावकर हे प्रकाशक, संपादक, उत्तम वक्ते आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘राजहंस प्रकाशन’ ही मराठी पुस्तक विश्वात अग्रगण्य प्रकाशन संस्था बनवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
दिलीप माजगावकर यांनी १९६६ मध्ये ‘राजहंस प्रकाशन’ आणि ‘माणूस’ साप्ताहिकात प्रवेश केला. सुरुवातीला थोरले बंधू ‘माणूस’कार श्री.ग.माजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संपादनापासून मुद्रण-वितरणापर्यंत सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या.
१९८४ पासून त्यांनी ‘राजहंस प्रकाशना’ची सूत्रे हाती घेतली. विषयांची उत्तम निवड, उत्तम संपादन करणारे चिकित्सक संपादक मंडळ याबरोबर प्रकाशन संस्थेसाठी आवश्यक अशा वितरण आणि विक्री या घटकांवर त्यांनी योग्य भर देऊन ‘राजहंस’चा विस्तार केला. सामाजिक बांधिलकीचे त्यांना असलेले सजग भान, राजकारण-समाजकारण-अर्थकारणापासून ललित साहित्यापर्यंत आणि संगीत-नृत्य-नाटय-चित्रपट-चित्रकला-शिल्पकला यांपासून तत्त्वज्ञान-विज्ञान-पर्यावरणापर्यंत अनेक विषयांमध्ये रस असल्याने या साऱ्यांचे ‘राजहंस प्रकाशना’च्या पुस्तकांमध्ये प्रतिबिंब पडलेले दिसते.
नव्या, ताज्या दमाच्या लेखकांना प्रोत्साहन देऊन दिलीप माजगावकर यांनी कायम नव्या विषयांचा शोध आणि हाताळणी केली आहे. वाचकांच्या आवडीची त्यांना असलेली उत्तम जाण आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रमाणभूत मानलेल्या निर्मितीमूल्यांची त्यांनी घातलेली सुयोग्य सांगड यामुळे ‘राजहंस’च्या पुस्तकांचे वाचकांकडून भरभरून स्वागत होत आले आहे.
पुस्तक प्रकाशनासोबतच दिलीप माजगावकर यांनी ‘राजहंस प्रकाशना’च्या कायमस्वरूपी प्रतिनिधींची महाराष्ट्रात विविध ठिकाणी नेमणूक करून पुस्तक वितरणाचे महाराष्ट्रभर जाळे उभारले. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि गोवा या ठिकाणी राजहंसच्या शाखा उभारण्याच्या त्यांच्या योजनेने राजहंसची पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचली आहेत.
लेखनसाहित्य:
- पत्र आणि मैत्र
- वाणी आणि लेखणी
पुरस्कार:
- राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘सिनेमाची गोष्ट’ या पुस्तकासाठी राष्ट्रपती पुरस्कार (१९९३).
- द फेडरेशन ऑफ पब्लिशर्स अंड बुकसेलर्स असोसिएशन, नवी दिल्ली यांच्यातर्फे सुवर्ण पुरस्कार (सप्टेंबर २०२२).
- ‘फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स’, नवी दिल्ली यांच्यातर्फे दिला जाणारा ‘डिस्टिंगविश ॲवॉर्ड’ (२००८).
- आखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे तर्फे जीवन गौरव पुरस्कार (२०२०).
- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार (२०१३).
- महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ; म.सा.प. जीवन गौरव पुरस्कार (२०१९).
- लोकमत जीवन गौरव पुरस्कार (मार्च २०२६).
- प्रकाशन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘मुंबई मराठी साहित्य संघा’चा ‘वि.पु.भागवत पुरस्कार’ (१९९१).
- ‘मराठवाडा साहित्य परिषदेचा’ रा.ज.देशमुख पुरस्कार (२००७).
- ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’, पुणे व ‘राजेंद्र बनहट्टी पुरस्कृत’ कै.पुष्पा पुसाळकर पुरस्कार (२०१२).
रेखा दिलीप माजगावकर
संचालकजन्मतारीख: १४ नोव्हेंबर १९५३
शिक्षण: बी.ए. (अर्थशास्त्र, संस्कृत)
कार्य:
- २००८ पासून ‘राजहंस प्रकाशना’च्या संचालक म्हणून कार्यरत.
- ‘राजहंस’च्या लेखक.
- २७ वर्षे देना बँकेत नोकरी.
- १० वर्षे गरवारे बाल भवन (Recreation Centre) मध्ये सामाजिक काम.
- वाचनाबरोबरच चित्रकला, संगीत या कलांचा छंद. वॉटर कलर पेंटिंगमध्ये विशेष रुची.
पुस्तके:
- काडेपेट्यांची करामत - भाग १ & २
- Fun with Matchboxes – Part 1 & 2
डॉ. सदानंद बोरसे
संचालक आणि संपादकजन्मतारीख: १ जानेवारी १९५८
शिक्षण: एम.बी.बी.एस. एम.एस. (बी.जे.मेडिकल कॉलेज, पुणे)
कार्य:
- २००५ पासून ‘राजहंस’चे संचालक.
- ‘राजहंस’चे लेखक आणि अनुवादक.
- १९८५ पासून ‘राजहंस प्रकाशना’साठी संपादकीय कार्याला सुरुवात. साहित्य, विज्ञान, संगीत, नाट्य-चित्रपट या क्षेत्रांमध्ये रस. या विषयांशी संबंधित राजहंसच्या पुस्तकांचे संपादन.
- १९७७ पासून ‘माणूस’ साप्ताहिकामध्ये स्तंभलेखन.
- ‘राजहंस ग्रंथवेध’मध्ये ‘भाषा-विचार’ सदरलेखन.
- वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून स्फुटलेखन.
पुस्तके:
- मंडेला
अनुवादित पुस्तके:
- ठाकरे विरुद्ध ठाकरे
- भगतसिंगाचा खटला
- वीरप्पन विरुद्ध विजयकुमार
- रोश विरुद्ध अडॅम्स
- योद्धा सर्जन
- देश माझा, मी देशाचा (मा. लालकृष्ण अडवाणी यांच्या आत्मचरित्रातील भागाचा अनुवाद)
शिरीष शेवाळकर
व्यवस्थापकीय संचालकजन्मतारीख: १३ डिसेंबर १९६१
शिक्षण: बी. ई. (मेकॅनिकल), कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे
कार्य:
- ‘राजहंस’मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत.
- बजाज ऑटो, जॉन्सन कन्ट्रोल्स, लिअर कॉर्पोरेशन, इंगरसोल रॅंड, अॅडिएंट, टाटा फिकोसा अशा नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, व्हाईस प्रेसिडेंट, संचालक पदांवर काम.
- चीन, इंडोनेशिया आणि थायलंड या देशांमध्ये कामाचा अनुभव.
आनंद वासुदेव हर्डीकर
संपादकजन्मतारीख: २९ सप्टेंबर १९४७
शिक्षण: एम. ए. (इतिहास)
कार्य:
- २००३ पासून ‘राजहंस प्रकाशना’त संपादक म्हणून कार्यरत. १८० पेक्षा जास्त पुस्तकांचे संपादन.
- संपादनकार्यासाठी २०२६ मध्ये ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’तर्फे ‘रा. अ. कुंभोजकर स्मृती पुरस्कार’.
- ‘राजहंस’चे लेखक.
- १९६९ पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात विविध वृत्तपत्रांमधून व नियतकालिकांमधून सुमारे २३०० लेख प्रसिद्ध.
- विमुक्त पत्रकार या नात्याने विविध नियतकालिकांप्रमाणेच सुमारे १०० स्मरणिकांचे संपादन.
- महाराष्ट्रात विविध ठिकाणी अनेक विषयांवर व्याख्याने.
पुस्तके:
- कायदेआझम. २००५ (राजहंस प्रकाशन)
- लोकोत्तर जीवनव्रती. १९९८ (अमृतसिद्धी प्रकाशन)
- शापित पंजाब. १९८५ (चंद्रकला प्रकाशन)
- काळा हिटलर. १९७८ (श्रीविद्या प्रकाशन)
- अंतहीन संघर्ष. १९७४ (श्री प्रकाशन)
- जय बांगला, सोनार बांगला. १९७२ (विजयंता प्रकाशन)
- गांधी, अशोक आणि राष्ट्राघात. १९६९ (विजयंता प्रकाशन)
अनुवादित पुस्तके:
- दि आर.एस.एस.स्टोरी (मूळ लेखक: के.आर. मलकानी)
- हिंदू कलादृष्टी (संस्कार भारती कशासाठी? - मूळ लेखक: दत्तोपंत ठेंगडी)
- कारगिलचे अपराधी कोण? (मूळ लेखक: अधीशकुमार)
- देश माझा, मी देशाचा (मूळ लेखक: लालकृष्ण अडवाणी - पुस्तकातील एक भाग)
विनया खडपेकर
संपादकशिक्षण: एम. ए. (मुंबई विद्यापीठ)
कार्य:
- २००३ पासून ‘राजहंस’मध्ये संपादक म्हणून कार्यरत.
- ‘राजहंस’च्या लेखक.
- रिझर्व्ह बँकेत १९७१ ते १९९३ नोकरी.
- स्त्रीवादी चळवळीत १९८५ ते १९९३ पर्यंत सहभाग.
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यकर्ती म्हणून १९६६ ते १९७२ पर्यंत काम.
- १९९४ ते २००२ पुण्यात जाणीव, चाणक्य मंडळ, साहित्य प्रेमी भगिनी मंडळ या संस्थांशी संबंधित काम.
पुस्तके:
- विवाह नाकारताना (राजहंस)
- ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई होळकर (चरित्र) २००७ (राजहंस)
- स्त्रीस्वातंत्र्यवादिनी (सामाजिक इतिहास) १९९१ (राजहंस)
- भिंती (लघुकादंबरी) १९८४
- प्रतिसाद (लघुकथासंग्रह) १९९६
- मातृसेवा संघ (संस्थापरिचय) २०००
अनुवादित पुस्तके:
- एक होती बाय (राजहंस)
- सूत्रचालक
करुणा गोखले
संपादकजन्मतारीख: ५ ऑक्टोबर १९५८
शिक्षण: बी.एस.सी. (मायक्रोबायोलॉजी - मुंबई विद्यापीठ), एम.ए. (रशियन भाषा - पुणे विद्यापीठ), पी.एच.डी. (अल्बर्टा - कॅनडा विद्यापीठ)
कार्य:
- १९९६ पासून संपादक म्हणून कार्य.
- ‘राजहंस’च्या संपादक, लेखक आणि अनुवादक.
- मुंबई विद्यापीठात भाषाशास्त्र विभागात काही काळ अध्यापन.
- १९९० सालापासून स्त्री चळवळीत सक्रिय सहभाग.
पुस्तके:
- बाईमाणूस
- चालता-बोलता माणूस
- प्रामाणिकही, सुंदरही
- ऐसपैस गप्पा निलमताईंशी
- तारुण्यभान (सहलेखक)
अनुवादित पुस्तके:
- नेहरू-नवभारताचे शिल्पकार
- सुखी माणसाचा सदरा
- द सेकंड सेक्स
- पळभरही नाही हाय हाय...
- स्मरणयात्रेच्या वाटेवर
- व्हिक्टोरिया आणि अब्दुल
- एक झुंज शर्थीची
- हिरावलेले आवाज
शिरीष सहस्रबुद्धे
संपादकशिक्षण: एम.ए. इंग्रजी, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट
कार्य:
- सकाळ पेपर्स प्रा.लि आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर या नामांकित संस्थांमध्ये अधिकार पदावर काम.
- २००६ पासून सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या इंग्लिश लँग्वेज टीचिंग इन्स्टीट्यूट ऑफ सिंबायोसिस आणि सिंबायोसिस इन्स्टीट्यूट ऑफ फॉरेन अँड इंडियन लँग्वेजेस या दोन संस्थांचे संचालक म्हणून काम.
- ‘राजहंस प्रकाशना’मध्ये संपादक म्हणून कार्यरत.
- ‘राजहंस’चे लेखक आणि अनुवादक.
- माणूस, किर्लोस्कर आणि मनोहर अशा नामांकित नियतकालिकांमध्ये लेखन.
पुस्तके:
- वाट चुकलेली माणसं
- लघुउद्योग मार्गदर्शक
- सेन्ट्रल एक्साइज आणि लघुउद्योग
- बखर कॉंग्रेसची
अनुवादित पुस्तके (मराठीतून इंग्रजी):
- George Carver – The Magician
- The Miracle of work
- The Road
- The Soldier
- National Ideologies and Politics
अनुवादित पुस्तके (इंग्रजीतून मराठी):
- धर्म आणि राजकारण
- भारतातील वाद-वादळे
- जमशेटजी टाटा यांचे भारतप्रेम
- जेआरडी-मी पाहिलेले
- ठाकरे विरुद्ध ठाकरे
- हॅरी पॉटर आणि शापित पुत्र
- व्यक्ती, संस्था, प्रक्रिया
डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर
‘ग्रंथवेध’ या गृहमासिकाच्या संपादकजन्मतारीख: १६ डिसेंबर, १९८०
शिक्षण: एम. ए., डी. एड., एम. फिल., पीएच. डी (मराठी), नेट आणि सेट (मराठी)
कार्य:
- ‘राजहंस’च्या ‘ग्रंथवेध’ या गृहमासिकाचे डिसेंबर २०२४ पासून संपादकीय काम.
- सेवासदन प्रशाला येथे माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत.
- ‘राजहंस’च्या लेखक आणि काही पुस्तकांचे संपादन.
- विविध वृत्तपत्रे तसेच ललित, जीवन शिक्षण, भाषा आणि जीवन यांच्यासह इतर नियतकालिकांमधून शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक विषयांवर स्फुट लेखन.
पुस्तके:
- त्र्यं. वि. सरदेशमुख : आत्मनिष्ठ लेखकाची बखर (राजहंस)
- गोंदणखुणा (राजहंस)
विशाखा पाटील
सल्लागार - संपादकजन्मतारीख: ९ सप्टेंबर, १९७२
शिक्षण: एम. ए. (इंग्लिश)
कार्य:
- अलिबाग येथील वरिष्ठ महाविद्यालयात आणि बहारीन येथील विद्यापीठात इंग्लिशचे अध्यापन.
- ‘राजहंस’च्या लेखक आणि काही पुस्तकांचे संपादन.
पुस्तके:
- धागे अरब जगाचे
- जॉर्ज ऑर्वेल
- कल्चर शॉक – आखाती देश
- सावध ऐका... चीन – पाकिस्तान युती : एक आव्हान
- Improve Your English Writing

आनंद वासुदेव हर्डीकर
संपादक

विनया खडपेकर
संपादक

करुणा गोखले
संपादक

शिरीष सहस्रबुद्धे
संपादक

डॉ. प्रिया प्रदीप निघोजकर
‘ग्रंथवेध’या गृहमासिकाच्या संपादक

विशाखा पाटील
सल्लागार -संपादक
पुरस्कार व सन्मान
| Year | Book title | Author | |
|---|---|---|---|
| • | १९९२ | झाडाझडती | विश्वास पाटील |
| • | २०११ | बोक्या सातबंडे भाग ४ | दिलीप प्रभावळकर |
| • | २००६ | बोल माधवी | आसावरी काकडे |
| • | २०१२ | पांथस्थ | शारदा साठे |
| • | २०१३ | सुबोध बायबल | फादर फ्रान्सिस दिब्रेटो |
| • | २०१७ | खारीच्या वाटा | ल. म. कडू |
| • | २०१७ | गौहरजान म्हणतात मला | सुजाता देशमुख |
| • | २०२२ | मी संदर्भ पोखरतोय | पवन नालट |
| • | २०२३ | ब्राम्होस | अभय सदावर्ते |
| • | २०२४ | विंदांचे गद्यरूप | सुधीर रसाळ |
| • | २०२५ | काळ्या निळ्या रेषा | राजू बाविस्कर |
| Year | Book title | Author | Trust/Co | |
|---|---|---|---|---|
| • | 2026 | पाकिस्तान मतलब क्या ? | श्रीधर लोणी | मराठी ग्रंथोत्तेजक संस्था |
| • | 2026 | गोष्ट रिझर्व्ह बँकेची | विद्याधर अनास्कर | - |
| • | 2026 | दौशाड | डॉ. नंदकुमार राऊत | मराठी भाषा संवर्धन संस्था राज्यस्तरीय |
| • | 2026 | मी... अल्लादियाखां | अश्विनी भिडे देशपांडे | शब्द सारथी संस्था, पुणे |
| Year | Book title | Author | Name of award | Trust/Co | |
|---|---|---|---|---|---|
| • | 2026 | पाकिस्तान मतलब क्या ? | श्रीधर लोणी | आद्य सरसंचालक डॉ. हेडगेवार ग्रंथगौरव | उत्कर्ष मंडळ विलेपारले |
| • | 2026 | गोदणखुणा | डॉ. प्रिया निघोजकर | स्व. विमलताई देशमुख | पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर |
| • | 2026 | आबाली | प्रमोद धायगुडे | स्व. शांताबाई शेकदार | पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर |
| • | 2026 | वस्त्रगाथा | विनय नारकर | श्री के क्षीरसागर पुरस्कार | यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार |
| • | 2026 | माझे शाळेतले प्रयोग | स्मिता गौड | कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार | यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार |
| • | 2026 | १६९५ स्मार्ट रोबो | सुरेश वांदिले | साने गुरुजी पुरस्कार | यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार |
| • | 2026 | चारा खा आणि पाणी प्या | डॉ. उमेश करंबेळकर | यदुनाथ थत्ते पुरस्कार | यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार |
| • | 2026 | - | डॉ. उमेश करंबेळकर | कादंबरीकार ना. ह. आपटे | श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज नगर |
| • | 2026 | गोदणखुणा | डॉ. प्रिया निघोजकर | - | महिला विकास मंडळ, कुलाबा सन्मान |
| • | 2026 | दौशाड | डॉ. नंदकुमार राऊत | दया पवार पुरस्कार | आशादीप उत्कृष्ट |
| • | 2026 | सोबत सांजवेळची | पद्मजा मेहेंदळे | - | मराठी ग्रंथोत्तेजक संस्था |
| • | 2026 | - | दिलीप माजगावकर | जीवनगौरव साहित्य पुरस्कार | दै. लोकमत |
| • | 2026 | नृत्यमय जग... नर्तनाचा धर्म | शमा भाटे | - | लोकमत साहित्य पुरस्कार |
| • | 2026 | काळ्यानिळ्या रेषा | राजू बाविस्कर | - | साहित्य अकादमी, नवी दिल्ली |
| • | 2026 | १६९५ स्मार्ट रोबो | सुरेश वांदिले | - | मराठी भाषा संवर्धन संस्था राज्यस्तरीय |
| • | 2026 | एक उलट एक सुलट भाग २ | अमृता सुभाष | - | अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था |
Skip to content