-
Sale! Add to cart'शकुंतला परांजपे ! रँग्लर र. पु. परांजपे यांची कन्या. संततिनियमनाचे पायाभूत कार्य करणाऱ्या समाजकार्यकर्त्या. त्यांची दुसरी ओळख म्हणजे प्रख्यात नाटक-चित्रपटकर्त्या सई परांजपे यांच्या आई ! पण या पुस्तकातून दिसतात वेगळ्याच शकुंतलाबाई विविधछंदी, पशुप्रेमी, विचारवंत अशा बहुपेडी व्यक्तिमत्वाच्या त्यांच्या या बहुरंगी लिखाणात त्यांनी रंगवली आहेत परांजपे कुटुंबातली माणसं, शेजारीपाजारी, गडीमाणसं. उधार माल देणारे दुकानदार, वस्ताद टांगेवाले. बसमध्ये कंडक्टरशी भांडणारी पुणेरी माणसं. दिल्लीच्या संसदेत आरडाओरडा करणारे खासदार. मांजरं, शेळ्या, घोडे, बैल यांच्या गमतीदार कहाण्या. खुमासदार शैलीत रंगलेलं हे ताजंतवानं चित्र म्हणजेच निवडक शकुंतला परांजपे
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेNivdak Shakuntala Paranjape | निवडक शकुंतला परांजपे
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartनृत्य हाच श्वास... नृत्य हाच प्राण... तोच मार्ग आणि तेच गंतव्य.... असणाऱ्या कथक नृत्यांगना शमा भाटे यांच्या नृत्यमय जीवनाची ही गाथा ! आपल्या प्रतिभावान निर्मितीमधून आणि नृत्यतपस्येतून भारतीयच नव्हे, तर विदेशी नृत्यक्षेत्रातही आपली नाममुद्रा कोरलेlल्या श्रेष्ठ कलावतीच्या प्रौढ प्रगल्भ तरीही नर्मविनोदी शैलीतून ही गाथा वाचणं म्हणजे आपली रसिकता समृद्ध करणं ! लय-नाद-ताल यांच्यामध्ये सार्थक सापडलेल्या या कलावतीच्या आत्मचरित्रात आपल्याला गेल्या पाच दशकांची सांस्कृतिक स्पंदनेही जाणवतील. शमा भाटे यांचा 'नाद-रूप' प्रवास म्हणजे हे आत्मचरित्र ! नृत्यमय जग्... नर्तनाचा धर्म...
All BooksNrutyamaya Jag…Nartanacha Dharma… | नृत्यमय जग… नर्तनाचा धर्म…
₹750.00Original price was: ₹750.00.₹563.00Current price is: ₹563.00. Save ₹187 Add to cart -
Sale! Add to cart'गीता-ज्ञानेश्वरीतील काही विधाने आजच्या आधुनिक विज्ञानातील काही संकल्पनांशी आश्चर्यकारक साम्य दाखवतात. या विधानांना वैज्ञानिक आधार नाही, पण म्हणूनच ती अधिक कुतुहलजनक ठरतात. अध्यात्म विरुद्ध विज्ञान असे कृत्रिम द्वंद्व उभारून वितंडवाद घालत बसण्याऐवजी या विधानांचा वेगळ्या प्रकारे अभ्यास करता येईल का ? विज्ञानाने दाखवलेल्या मार्गाने भौतिकशास्त्रातील एका वैज्ञानिकाने घेतलेला गीता-ज्ञानेश्वरीत प्रतिपादन केलेल्या तत्त्वज्ञानाच्या काही अंगांचा वेध म्हणजे न्यूटनांते वाट पुसतु '
तत्वज्ञान / व / धर्मNutonante Vat Pusatu | न्यूटनांते वाट पुसतू
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'मराठवाड्यातील एक सर्वसामान्य हिंदू कुटुंबात जन्माला आलेली आणि निजामी राज्यात स्वकर्तृत्वाच्या जोरावर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदापर्यंत पोचलेली पहिली व्यक्ती म्हणजे केशवराव कोरटकर. त्यांचे हे छोटेसे चरित्र. काशिनाथराव वैद्य या एका निकटवर्तीयाने लिहिलेले. १९३३ साली त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी प्रसिध्द केलेले... न्या. कोरटकर यांच्या कार्याचे ऐतिहासिक मोल लक्षात घेऊन मुद्दाम त्या चरित्राची ही नवी संपादित आवृत्ती. नरेन्द्र चपळगावकरांच्या विवेचक प्रस्तावनेसह... '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेNyaymurti Keshavrav Koratkar | न्यायमूर्ती केशवराव कोरटकर
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartमानवी अस्तित्तवाचा मूलाधार कोणता, अशी जिज्ञासा दिव्रिटो यांच्या मनामध्ये जागी झाली आणि तिचा शोध घेण्यासाठी त्यांनी पश्चिमेकडे प्रस्थान केले. प्राचीन आणि अर्वाचीन यांचा संगम साधणा-या युरोपीय भूमीवर ते मुक्तपणे हिंडले. त्या परिक्रमेचा हा आशयगर्भ आलेख. भेटणा-या माणसांशी संवाद करताना दिब्रिटो तटस्थ, कोरडे रहात नाहीत. ते त्यांच्या व्यथावेदनेशी सहजपणेच समरस होऊन जातात. एवढे भावबळ फारच थोड्यांना लाभलेले असते. म्हणून हे पर्यटन हौसेमजेसाठी केलेली मुशाफिरी ठरत नाही. त्याला भावोत्कट यात्रेचे एक निराळेच परिमाण प्राप्त होते. फादर दिब्रिटो यांच्या व्यक्तिमत्त्वाची ही विशेषता इथे पानोपानी प्रत्ययास येते; वाचकाला खिळवून ठेवते.
प्रवासOasischya Shodhat | ओऑसिसच्या शोधात
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartआकाश संपते, तिथे सुरू होते अथांग अंतराळ . या अंतराळात पसरले आहे आपले अफाट विश्व. कोट्यवधी दीर्घिका, अब्जावधी ग्रह-तारे न्युट्रॉन तारे, क्वेसार, कृष्णविवरे अशा अनेक घटकांनी बनलेले हे विश्व. आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशा चमत्कारांनी अन् घटनांनी भरलेले हे विश्व. या अनंत विश्वांचा वेध घेण्याचा अथक प्रयत्न जगभरचे खगोलशास्त्रज्ञ पिढ्यानपिढ्या करत आहेत. लहानथोरांच्या मनात एकाच वेळी कुतूहल अन् जिज्ञासा निर्माण करणार् या आणि त्याचवेळी त्यांना अचंबितही करणार् या या विश्वाचा सुबोध परिचय करून देण्यासाठी सुप्रसिद्ध खगोलतज्ज्ञ गिरीश पिंपळे यांनी रोखलेली दुर्बीण म्हणजे -
All BooksOlakh Aplya Vishvachiee | ओळख आपल्या विश्वाची
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartपक्ष्यांची रंगीबेरंगी पिसारी दुनिया आपल्या अवतीभवती उडणारी, बागडणारी, चिवचिवणारी, झेपावणारी या दुनियेचा वेध घेण्यासाठी नवी नजर देणारी ओळख पक्षिशास्त्राची
विज्ञानOlakha Pakshishatrachi | ओळख पक्षिशास्त्राची
₹175.00Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44 Add to cart -
Sale! Add to cartयापुढं कुठं असशील तू? तुला प्रतीकात्मक सांगू का रजत, आपला मुक्काम सोडच, रस्तादेखील ठाऊक नसतो आपल्याला. आपण घर बंद करून जायला निघतो, सारी आवराआवर झालेली असते, काही घ्यायचं विसरलेलं नाही, अशीही जवळपास खात्री असते. कारण जे घेतलेलं नसतं, ते तसंच सोडून द्यायचं असतं. तरीही आपण एक शेवटची म्हणून चक्कर मारतो घरात. आवश्यक असं काही अगदी चुकून नाही ना राहिलेलं ? नजरचुकीनं ? गावा-देशांची, जाति-धर्माची वेस ओलांडून माणसा-माणसांमधल्या नातेसंबंधांचा नेमक्या शब्दांत वेध घेणा-या सानियाच्या दीर्घकथा.
कथासंग्रहOmiyage | ओमियागे
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartफुलं झाडावर तर छान दिसतातच, पण जेव्हा ती एका ओंजळीतून दुसऱ्या ओंजळीत जातात, तेव्हा ती आणखी छान दिसतात. जी गोष्ट फुलांची, तीच विचारांचीही. मनात जेव्हा शुद्ध, सात्त्विक विचार उमलतात, तेव्हा ते त्या कुणा एका व्यक्तीला तर आनंद देतातच, पण जेव्हा ते शब्दरूप लेवून एका मनातून दुसऱ्या मनात शिरतात, तेव्हा ते अधिक प्रकाश पसरवतात, अधिक प्रेरणादायी ठरतात. जगातलं, निसर्गातलं सौंदर्य आपल्या आस्वादक नजरेनं टिपण्याची किमया साध्य झाली म्हणजे ते इतरांनाही दाखवण्याची असोशी जन्म घेते. अशाच असोशीतून एका रसिकाला स्फुरलेल्या काही ललित लेखांचं हे संकलन. हे छोटेखानी लेख म्हणजे जणू काही सोनचाफ्याची फुलंच. त्या फुलांचा सुगंध जसा मन मोहरवून टाकणारा असतो, तसेच हे लेखही सात्त्विक समाधान देणारे आहेत. चौफेर संचार करणारे, प्रेरणेच्या पणत्या पेटवणारे आणि भावविश्व समृद्ध करणारेही !
All BooksOnjaliteel Chapha | ओंजळीतील चाफा
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमहाराष्ट्राला हिरे घराण्याची आणि हिरे घराण्याला महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण, संस्कृती याची एक दीर्घ परंपरा आहे. या परंपरेनं महाराष्ट्रातील खूप मोठा भाग शंभर-सव्वाशे वर्षांपासून विधायकतेनं व्यापला आहे. मराठी माणसाला या परंपरेचा स्वाभाविकच आनंद आहे. या परंपरेला बाजूला ठेवून आधुनिक महाराष्ट्राच्या व्यापक जडणघडणीचा इतिहास कोणी लिहू शकणार नाही. याच परंपरेतील एक महत्त्वाचे पाते म्हणजे डॉ. प्रशांत हिरे होय. केवळ राजकारणच नव्हे तर समाज, साहित्य, कला आणि संस्कृती यांना त्यांनी गच्च जोडून घेतलं आहे. या जोडलेपणातूनच ‘ओंजळीतले मोती’ हे व्यक्तिचित्रणपर पुस्तक जन्माला आले आहे. खूप वर्षांपासून प्रशांत गंभीर आणि ललित लेखन करत आहेत. मराठी साहित्यात एकेकाळी व्यक्तिचित्रणाची मोठी हुकमत होती. बराच कालखंड ही व्यक्तिचित्रणं मराठी साहित्यात झळाळत राहिली. काळाच्या ओघात अन्य काही साहित्य प्रकाराबरोबरच व्यक्तिचित्रणालाही ओहोटी लागली. अशा काळात प्रशांत हिरे यांनी लिहिलेलं महत्त्वपूर्ण व्यक्तिचित्रण वाचकांच्या हातात येत आहे. सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो. व्यक्तिचित्रणं वाचायला आवडत असली, तरी ती तशी लिहायला कठीण असतात. समाज व्यक्तींचा बनतो. एखादा माणूस समाजाला जसा घडवतो, तसा समाजही व्यक्ती घडवत असतो. आपल्या आयुष्यात कोणत्या-ना-कोणत्या कारणानं पायरव करणाऱ्या माणसांना आतून-बाहेरून समजून घेणं, आपल्या मनावर त्यांना कोरून ठेवणं आणि मग त्यांना समजून घेण्याचा, त्यांना मोठ्या समाजात सादर करण्याचा प्रयत्न होतो. माणूस तसा अनाकलनीय प्राणी. आत आणि बाहेर अशा दोन जगात जगणारा प्राणी. त्याला समजून घेण्याचा, शद्बबद्ध करण्याचा, त्याचा प्रत्येक पैलू हेरण्याचा प्रयत्न व्यक्तिचित्रण लिहिणारे करत असतात. प्रशांत हिरे यांनीही तसाच प्रयत्न केलाय. घडवून घडवून त्यांना मोती बनवलेत. अर्थात मोती बनवण्याची प्रक्रिया तर खूपच कठीण असते, पण प्रशांत हिरे यांनी त्यासाठी प्रयत्न केलाय. हे जे मोती दिसतात ते वेगवेगळ्या जीवनप्रवाहातून, घटकातून आलेले आहेत. जेव्हा या साऱ्यांची एक सुंदर माळच बनते, तेव्हा मानवी स्वभावातील विविध पैलूंचं सहज, सुंदर दर्शन घडत जातं. वाचकाला ते भावत जातं. व्यक्तीचं चित्रण म्हणजे चित्रच असतं. ते काढण्यासाठी प्रशांत हिरे यांनी अचूक आकृत्या, भावरम्य रंग वापरले आहेत. सहजता, सुलभता हा एक वैशिष्ट्यपूर्ण भाग मानावा लागेल. वरचे, तळातले, मधले, वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज, सामान्य, अधिकारी, नट, राजकारणी, महिला, योगी-महात्मे अशा कितीतरी व्यक्तींना माळेत गुंफण्यात आले आहे. चकाकणारे, लक्षवेधी, भावणारे असे हे मोती साहित्यातही चकाकत राहतील, अशी अपेक्षा आहे. व्यक्तींच्या चित्रणासाठी वापरलेला कॅमेरा जेवढा सुंदर आहे, तेवढाच कॅमेऱ्यामागचा डोळाही सुंदर आहे. व्यक्तिचित्रणासाठी आवश्यक असणाऱ्या दोन्ही गोष्टींचा मिलाम येथे आहे. या पुस्तकाला माझ्या शुभेच्छा.
All BooksOnjalitil Moti | ओंजळीतील मोती
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Read more
Skip to content