-
Sale! Add to cartकेनेथ अँडरसन हा पट्टीचा शिकारी. मात्र त्याची बंदूक वेध घ्यायची ती फक्त नरभक्षक बनलेल्या वाघांचा अन् बिबळ्यांचा. जंगलाशी नाळ जोडली गेलेला हा शिकारी जंगल वाचायला तर शिकलाच; शिवाय जंगलात राहणाऱ्या वन्य जमाती, त्यांची जीवनशैली, रूढी अन् प्रथा, जगण्याची साधनं या साऱ्यांचंही त्यानं बारकाईनं निरीक्षण केलं. दक्षिण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी अवघ्या पंचक्रोशीत दहशत माजवणाऱ्या नरभक्षकांना हिमतीनं अन् हिकमतीनं टिपणाऱ्या या निष्णात शिकाऱ्यानं सांगितलेल्या स्वानुभवाच्या थरारक शिकारकथा नरभक्षकाच्या मागावर
कादंबरीNarabhakshakachya Magavar | नरभक्षकाच्या मागावर
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart'१८८४ साली प्रकाशित झालेली ही आहे मराठीतील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी. समकालीन वास्तवाचे वर्णन करणारी काल्पनिक कथा. तत्कालीन समाजातील सर्वसाधारण स्तरावर वावरणारी पात्रे. साधी, सोपी, निरलंकार तरीही सुंदर भाषा. ठाशीव व्यक्तिवर्णने अन् रेखीव व्यक्तिचित्रणे. सहज घडणारी तरी खटकेबाज संभाषणे. लौकिक आणि व्यावहारिक पातळीवरचेच, पण नाटयपूर्ण प्रसंग. अशा विविध वैशिष्टयांनी नटलेली ही कादंबरी म्हणजे जणू आजच्या कितीतरी लोकप्रिय कलाकृतींच्या मूळ छटा दाखवणारी साहित्यकृती. रसिक वाचकाला रिझवणारी, व्यासंगी अभ्यासकाची जिज्ञासा पुरी करणारी, एकोणिसाव्या शतकातील गाजलेली कादंबरी.
कादंबरीNarayanrav Aani Godavari | नारायणराव आणि गोदावरी
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartनरेंद्र दामोदरदास मोदी. सलग २० वर्षे सत्तेत असणारा लोकप्रिय नेता, टोकाची प्रशंसा व तीव्र टीकेचा धनी! ग्रेट डिव्हायडर अशी एकीकडे ओळख असणार् या या नेत्याने दुसरीकडे आधी भाजपाची कार्यसंस्कृती बदलली आणि प्रशासनाचीही! यशस्वी लसीकरण करून कोरोना महासंकटातही काम करणारी लोकशाही अशी भारताची नवी ओळख जगाला करून दिली, सरकारी योजना गरिबांच्या घरात थेट पोहोचवून आळशी लोकशाही कार्यान्वित केली, कणखर परराष्ट्रधोरणातून शत्रुराष्ट्रात धाक निर्माण केला, धाडसी निर्णय घेत अर्थव्यवस्था फॉर्मल केली आणि भारताच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाला अग्रस्थान देत सार्वभौम, हिंदू प्रजासत्ताका च्या दिशेने वाटचाल सुरू केली... पक्षात आणि भारतात नवी कार्यसंस्कृती रुजवणार् या संघटनानिष्ठ नेत्याच्या गुणावगुणांचे राजकीय चरित्र...
All BooksNarendra Modi : Navi Bhajapa, Badalta Bharat | नरेंद्र मोदी : नवी भाजपा, बदलता भारत
₹550.00Original price was: ₹550.00.₹413.00Current price is: ₹413.00. Save ₹137 Add to cart -
Sale! Add to cart'या पुस्तकाचा उद्देश तुम्हाला काही पटविण्याचा वा विकण्याचा नाही, तर काही विचार तुमच्यासमोर तपासायला ठेवण्याचा आहे. कोणत्याही विचारसरणीबद्दल तुम्हाला साशंक बनवण्याचा आहे. मग तो विचार विज्ञानातला असो वा देवाधर्माचा ! देव आणि धर्म याबाबतीत आधुनिक विज्ञानाने जे प्रश्न उपस्थित केले आहेत आणि अनेक क्षेत्रांमधील अनेक प्रश्नांची विज्ञानाने जी समर्पक उत्तरे दिली आहेत, त्यांचा गोषवारा वाचकापर्यंत पोहचविणारी तर्कवादाच्या दिशेने टाकलेली पाच पावले म्हणजे नास्तिकयात्रा'
समाजकारण / राजकारणNastikyatra | नास्तिकयात्रा
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
ललित लेखन
Natak Aani Mee | नाटक आणि मी
₹175.00Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक एकलव्यांना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेNate Ladakhshi | नाते लडाखशी
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Read more -
Sale! Add to cartअनेकदा गुंतागुंतीची परिस्थिती समोर ठाकते माणसाच्या आयुष्यात. ही गुंतागुंत मांडणं हे लेखक म्हणून मी माझं प्रथम कर्तव्य मानलं आहे. या परिस्थितीत माणसं कशी वागतात हे मी पाहते आहे. यातलं चूक बरोबर ठरवणं हे मीच नव्हे, तर कुणीच ते पाहताना तरी करू नये, असं मला वाटतं. कारण आधीच एखादी भूमिका घेतली, तर ही अभूतपूर्व परिस्थिती, आहे त्या नितळ स्वरूपात आपल्याला दिसणार नाही. अगदी नेमक्या याच परिस्थितीत आपण जर त्या माणसाचं जन्मापासूनचं संचित घेऊन उभे ठाकलो, तर आपण काय करू ? हा प्रश्न खूप कळीचा आहे. कदाचित आपण तेच करू जे त्यानं केलं. ज्या माणसांना आपण असं असं कधीच वागणार नाही, अशी खात्री वाटते त्यांचा मला हेवा वाटतो. आयुष्यातल्या अतर्क्य शक्यतांबद्दलची त्यांची कल्पना तोकडी पडतेय असं तर नसेल ?
कादंबरीNaticharami | नातिचरामि
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartमराठी माणसाला नाटक हा आणखी एक अवयव विधात्याने बहाल केला आहे. असे अनेक कलावंत आहेत की आपली वहिवाटीची वाट सोडून नाटकाच्या बिकट वाटेकडे वळले आहेत. म्हणूनच आपली मराठी रंगभूमी एक वेगळाच घाट घेऊन मानाने मिरवित आहे. रंगभूमीच्या या हद्य आठवणी अगत्याने सांगण्याचा हेतु इतकाच की, आजच्या पिढीला आपल्या पूर्वसुरींची ओळख व्हावी, आठवण रहावी नि त्यांच्याबद्दल सदैव कृतज्ञता वाटावी.
कलाविचारNatya Pandhari | नाट्यपंढरी
₹20.00Original price was: ₹20.00.₹15.00Current price is: ₹15.00. Save ₹5 Add to cart -
Sale! Add to cartनाटक म्हणजे अल्प रंगमंचसज्जा, सशक्त कथानक अन् सामर्थ्यवान भावदर्शी अभिनय यांच्या बळावर प्रेक्षकांना स्वतःचा, आसपासचा आणि व्यापक समाजाचा गंभीर विचार करायला लावणारं एक महत्त्वाचं माध्यम आहे, हे या नाट्यसंस्थेनं आपल्या नाट्यकार्यातून दाखवून दिलं. बृहन्महाराष्ट्रातील मराठी जनांची नाळ आजही मराठी भाषा आणि महाराष्ट्रीय संस्कृतीशी जोडलेली आहे, ही गोष्ट अधोरेखित करणारा इंदौरच्या रंगकर्मीचा सात दशकांचा सर्जन प्रयोग 'नाट्यभारती'.
All BooksNatyabharatee | नाट्यभारती
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cart'गेलेल्या माणसाबद्दल आठवणींचे पूर कधी आणि कसे येत राहतील सांगता येत नाही. एखादं नातं अवघड वळणावर असताना जर तो माणूस गेला; तर चांगल्या आठवणी पार मनाच्या तळाशी जाऊन बसतात, वाईट आठवणी वारंवार त्रास देतात. पण जसजसे दिवस आणि वर्षं जातात, तसतसं त्या नात्याकडे अलिप्तपणे बघायला जमतं. नात्यातले खरे जगलेले, कसोटीचे, अडचणीचे आणि अतीव आनंदाचे क्षण एकत्र जगलो होतो आपण, हे जाणवतं. त्या त्या वेळच्या आपल्या प्रतिक्रियांचाही नव्याने अन्वयार्थ सापडतो. आपण जगलेल्या सहजीवनाबद्दलचं हे चिंतन म्हणजे जीवनाच्या सगळ्या कडूगोड अनुभवांकडे निर्मळ मनाने पाहत घेतलेला स्वत:चा शोध!
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेNatyas Nav Aapulya | नात्यास नाव आपुल्या
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart
Skip to content