-
Sale! Add to cart'नेहरू जेवढे लोकप्रिय, तेवढेच माणूसवेल्हाळ. त्यांच्या स्वभावाची ही दोन लोभस वैशिष्टये त्यांच्या सुरक्षा-अधिकाऱ्यांसाठी मात्र त्रासदायक होती. सुरक्षा-यंत्रणा झुगारून देत नेहरू विराट गर्दीत घुसत. उघडया टपाच्या गाडीतून प्रवास करत. कधी गाडीच्या बॉनेटवर बसून सफरचंद खात खात जमावाशी संवाद साधत. मधेच मागच्या-पुढच्या मोटारींचा ताफा थोपवून रस्त्याकडेचा वाहता नळ बंद करायला धावत. नेहरू लहरी होते, रागीट होते, अवखळ होते, प्रेमळ होते आणि रुसकेसुध्दा होते. नेहरूंचे सुरक्षा-अधिकारी केएफ रुस्तमजी यांनी आपल्या रोजनिशीमध्ये पंडितजींची अशी अनेक रूपे टिपून ठेवली आहेत. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवणारी त्या रोजनिशीतील काही निवडक पाने.
इतिहासNehrunchi Savli – Kf Rustamji Yanchya Rojnishitun | नेहरूंची सावली – केएफ रुस्तमजी यांच्या रोजनिशीतून (नेहरुंचे मुख्य सुरक्षा अधिकारी)
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartन्यूझीलंड या देशाची लोकसंख्या खूपच कमी असल्यामुळे न्यूझीलंड सरकारने परदेशी नागरिकांना स्थलांतरासाठी त्यांचे दरवाजे खुले केले. त्यामुळे गेल्या ५/६ वर्षांत भारतीयांचा ओघ अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पश्चिम आशियामधल्या देशांऐवजी न्यूझीलंडकडे वळला. न्यूझीलंडला स्थलांतर करण्याचा विचार करणा-यांना त्यांच्या निर्णयप्रक्रियेत मदत म्हणून व ज्यांचा हा निर्णय पक्का झाला आहे, त्यांना प्रस्थानापूर्वीची पूर्वतयारी म्हणून, हे पुस्तक खचितच उपयुक्त ठरेल.
प्रवासNewzeland Sathi Bharat Sodtana | न्यूझीलंडसाठी भारत सोडताना
₹60.00Original price was: ₹60.00.₹45.00Current price is: ₹45.00. Save ₹15 Add to cart -
Sale! Add to cart'निकोबार ! समुद्राच्या निळाईत उठून दिसणारी पाचूची बेटं. जणू भारतमातेची उजवी कर्णफुलं ! सोनेरी वाळूच्या किनाऱ्यांनी सजलेली... कल्पवृक्षांच्या विपुल वनराईने नटलेली... या बेटांवरच्या अपरिचित आदिम जमाती अन् त्यांच्या अनोख्या चालीरीती.... त्सुनामीने सर्वांत जास्त घायाळ केले ते निकोबारला, तरीही पुन्हा त्यावर उमेदीने वसवलेली वस्ती.... अशा या अस्पर्शित, काहीशा ज्ञात, खूपशा अज्ञात भूमीचा इतिहास, भूगोल आणि लोकसंस्कृती उलगडून दाखवणारे निकोबारची नवलाई.'
प्रवासNicobarchi Navalai | निकोबारची नवलाई
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartअग्नीवर मिळवलेले नियंत्रण हा मानवी संस्कृतीच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा. यानंतर हजारो वर्षांनी आलेला पुढचा टप्पा म्हणजे विद्युतशक्तीवर माणसाने मिळवलेले यशस्वी नियंत्रण. आधुनिक कालखंडातील विज्ञानाचे अन तंत्रज्ञानाचे अनेक दरवाजे उघडले गेले, ते केवळ या विद्युतशक्तीच्या शोधामुळेच ! आज तर आपण विजेशिवाय आयुष्य अशी कल्पनाही करू शकत नाही. विद्युतशक्तीच्या निर्मितीचे तंत्रविज्ञान विकसित करणाऱ्या वैज्ञानिकांमधला अग्रगण्य वैज्ञानिक निकोला टेस्ला ! विद्युतनिर्मितीची आजची सुलभ पद्धत शोधण्याचे श्रेय जाते निकोला टेस्लाकडे. आपले अवघे आयुष्य विद्युत तंत्रविज्ञानात झोकून देणाऱ्या या मनस्वी वैज्ञानिकाच्या विलक्षण आयुष्याचा वेध.
All BooksNikola Tesla | निकोला टेस्ला
₹270.00Original price was: ₹270.00.₹203.00Current price is: ₹203.00. Save ₹67 Add to cart -
Sale! Add to cartएअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर ह्यांचे हे आत्मनिवेदन अनेक कारणांमुळे वाचकाला खिळवून ठेवते. वायुसेनेत असताना त्यांनी ज्या जोखमी स्वीकारल्या, श्वास रोखून ठेवणाऱ्या साहसी वृत्तीने जी अचाट कामगिरी केली; त्यामुळे हे पुस्तक कमालीचे उत्कंठा वाढवणारे आहे. पण त्याहीपेक्षा वायुसेनेत असताना चौकशीच्या दुष्टचक्रातून ते ज्या निर्धाराने निष्कलंक सिद्ध होऊन बाहेर आले, त्यामुळे हे पुस्तक वायुसेनेतल्या रोमांचक तपशिलाचे फक्त राहत नाही, तर एक नैतिक भूमिका ठामपणे घेऊन प्रस्थापित व्यवस्थेशी एका दुर्मीळ दिसणाऱ्या धैर्याने लढणाऱ्या एका प्रखर स्वाभिमानी, सत्यासाठी सर्वस्वावर तुळशीपत्र ठेवायला न कचरणाऱ्या तेजस्वी तरुणाचे आत्मवृत्तही ठरते. ह्या निवेदनातला रोखठोक सरळपणा असायलाही एक वेगळ्या प्रकारचे धैर्य लागते, तेही चाफेकरांजवळ काठोकाठ आहे. कमालीचे प्रामाणिक, थेट, प्रवाही शैलीतले हे निवेदन मराठी साहित्यात, त्यातल्या वेगळ्या आशयामुळे व त्याला असलेल्या नैतिक परिमाणामुळे, मोलाची भर घालीत आहे. महेश एलकुंचवार
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेNilaichya Chhata | निळाईच्या छटा
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart'पोटात कसं शिरायचं, हे राहुलला छान जमलंय. त्यानं लिहिलेलं हे बाड वाचताना तो मनातही शिरला. त्याच्या या लिहिण्यामागचं कारण, या ना त्या कारणानं आयुष्यात आलेल्यांना विनम्रपणे स्मरण्याचं आणि त्यांचं ऋण मानण्याचं असावं. उगाचच शब्दांचं अवडंबर नाही, साधी सोपी भाषा, म्हणूनच ओघ आहे. आई, वडील आणि सगळ्या गणगोताशी असलेल्या भावनिक नात्याचा हा कॉलिडोस्कोप आहे. नाना पाटेकर हूड अन् उडाणटप्पूरपणापासून अत्यंत यशस्वी रेस्टॉरेंटियर बनण्यापर्यंतचा एका व्रात्य मुलाचा विलक्षण प्रवास निमित्त... जिप्सी शिवाजी पार्क
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेNimmitta…Gipsy Shivaji Park | निमित्त… जिप्सी शिवाजी पार्क
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart' सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हे डार्विननं सांगितलेलं तत्त्व कॉर्पोरेट विश्वालाही लागू पडतं. कोट्यवधी रुपये - डॉलर्सची उलाढाल करणाऱ्या या जटिल कॉर्पोरेट जगातली कामंही अजबच! कंपनीला जाहिरातीविना अधिकारी नेमायचा असतो. एखाद्या कंपनीतला प्लँट नव्याने उभारून तो कार्यान्वित करण्याची टोकाची तातडी असते. त्या प्लँटसाठी काम करणारी संपूर्ण टीम त्वरित नेमून देणारा कुणी हवा असतो. वर्क फ्रॉम होमच्या नव्या जमान्यात एखादा बनेल अधिकारी एकाच वेळी दोन कंपन्यांत बेकायदेशीरपणे नोकऱ्या करत असतो. अशा लबाड्या पकडणाऱ्याची गरज असते. अशी नानाविध कामं करणारा जादूगार : हेडहंटर! गिरीश टिळक या निष्णात हेडहंटरचे देशविदेशांतल्या कंपन्यांसाठी कामं करतानाचे वास्तव अनुभव इतके नाट्यमय, उत्कांठावर्धक आहेत की, काल्पनिक, रंजक कथाही फिक्या ठराव्यात!'
मार्गदर्शनपरNipun Shodh | निपुण शोध
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartनिसर्ग हा एक अद्भुत खजिना आहे. लहान-मोठे, उडणारे-सरपटणारे, पाण्यातले-हवेतले... अक्षरश: लाखो प्रकारचे सजीव निसर्गात आहेत. हे सजीव आणि त्यांचा परिसर यांची अनेक गुपिते आपल्याला ठाऊक नसतात. चला, माहिती करून घेऊ या यातली काही मजेदार गुपिते निसर्ग गुपिते
All BooksNisarga Gupite | निसर्ग गुपिते
₹60.00Original price was: ₹60.00.₹45.00Current price is: ₹45.00. Save ₹15 Add to cart -
Sale! Add to cart'खरा प्रतिभासंपन्न गणिती आहे, निसर्ग. पानांत आणि फुलांत, पशूंत आणि पक्ष्यांत, मानवांत आणि फळाफुलांनी डवरलेल्या सृष्टीत, जिथे पाहावं, तिथे निसर्गानं गणित कोरलं आहे. निसर्गाचं गणित शुष्क नाही, नीरस नाही, रटाळ नाही आणि क्लिष्ट तर नाहीच नाही. निसर्गाचं गणित सौंदर्यानं ओतप्रोत भरलेलं आहे. निसर्गाच्या गणितात एक दिमाख आहे, सौष्ठव आहे. एका साध्या संख्याशृंखलेतून त्याचं प्रत्यंतर येतं. त्या शृंखलेच्या गुणधर्मात आपलं मन हरवून जातं. असं काही असू शकेल, याचं आपल्याला आश्र्चर्य वाटतं, फुलांच्या पाकळ्यांत, वनस्पतींच्या पानांत, सुंदर सुंदर कलाकृतींत आणि मानवाच्या आकारांत, भूमितीच्या आकृत्यांत आणि साध्या साध्या खेळांत, ही संख्याशृंखला प्रकटते, सा-या सा-या निसर्गात. अशा या अद्भुत शृंखलेचे विविध आविष्कार हाच निसर्गाचे गणित या पुस्तकाचा विषय आहे. '
विज्ञानNisargache Ganit | निसर्गाचे गणित
₹110.00Original price was: ₹110.00.₹83.00Current price is: ₹83.00. Save ₹27 Add to cart -
Sale! Add to cartकुठे कोरडा दुष्काळ, तर कुठे ओला. कुठे ढगफुटी, तर कुठे अवकाळी गारपीट. एकीकडे वारंवार वणवे, तर दुसरीकडे महापूर. सर्वत्र चर्चा एकच : हवामान कल्लोळ! यात दोष कुणाचा? निसर्गाचा नक्की नाही. तो तर पोरका होतोय! बेसुमार वृक्षतोड, बेफाम खाणकाम. अनिर्बंध बांधकाम आणि अविचारी पाडकाम. मानवाने निसर्गाची हत्या चालवली आहे. पण निसर्गाची हत्या म्हणजे माणसाची आत्महत्या. कशी, ते सांगत आहे...
All BooksNisargakallol | निसर्गकल्लोळ
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart
Skip to content