-
Sale! Add to cartतो होता एक यशस्वी वैज्ञानिक. अणुबाँबच्या निर्मितीत त्याने हिरीरीने भाग घेतला, पण हायड्रोजनबाँबच्या निर्मितीला मात्र विरोध दर्शवला... मग राजसत्तेने त्याला शत्रू मानले, सरकारने त्याला जवळजवळ आयुष्यातूनच उठवले... जे. रॉबर्ट ओपेनहायमर त्याचे नाव ! तरल कल्पनाशक्ती आणि विकृत वासना, लौकिक संपन्नता आणि मानसिक विषण्णता... अशा अनेक विरोधाभासांचा धनी ठरलेल्या एका लोकविलक्षण माणसाची, त्याच्या गुणदोषांची, त्याच्या सुखदु:खांची ही शोकात्म संघर्षकथा.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेOpenhaymar | ओपनहायमर
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart'२६/११ ची काळरात्र. मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेला भीषण हल्ला. त्याच्या प्रतिकारासाठी सुरू झाला एक धाडसी लढा. कसाब जेरबंद झाला. बाकी दहशतवाद्यांचा बिमोड झाला. कसाबशी संबंधित न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली. कसाबच्या मानेभोवती फास आवळला गेला. आणि चार वर्षांनी 'ऑपरेशन एक्स' पूर्ण झालं. या मोहिमेचा पडद्यामागच्या तपशिलांसह साद्यंत आढावा
समाजकारण / राजकारणOperation X | ऑपरेशन एक्स
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartपृथ्वीवरच्या वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण असतं वीस टक्के. हे प्रमाण कायम राखण्यात वनस्पतींचा वाटा महत्त्वाचा. हे प्रमाण घसरू लागलं ! दहा टक्क्यांहूनही खाली घसरलं ! आणि जगात एकच हाहाकार माजला. या समस्येवरचा तोडगा काय ? तो शोधताना जगातील राष्ट्र दोन गटांत विभागली गेली. पंचेचाळीस प्रगत राष्ट्रांचा तोडगा होता झाडांविना जीवन. तर वृक्षसंपदेचं रक्षण करणारा राष्ट्रसमूह म्हणत होता, 'झाडांच्या सहवासात जीवन.' या झगड्यात भारताचं धोरण काय होतं ? जागतिक पातळीवर नव्याने स्थापन झालेल्या 'श्वास मंत्रालया'तर्फे पॉडच्या माध्यमातून बंदिस्त परिसंस्थेची निर्मिती करण्याची योजन नेमकी काय होती ही योजना ? 'ग्रीन ड्रीम' संघटनेचा या योजनेला विरोध का होता ? एव्हरेस्टची वाढणारी उंची अन् ऑक्सिजनच्या पातळीतील घट यांचा एकमेकांशी,पर्यावरणबदलाशी काय संबंध ? आजची काल्पनिका उद्याचे वास्तव ठरल्याची अनेक उदाहरणे विज्ञानाच्या क्षेत्रात सापडतात. या कादंबरीतून मांडलेली कल्पनाही भविष्यातील भयकारी वास्तव ठरेल का ? पर्यावरणाच्या व्यामिश्र समस्येशी थेट भिडणारी भविष्यवेधी ही कादंबरी!
All BooksOxygen | ऑक्सिजन
₹360.00Original price was: ₹360.00.₹270.00Current price is: ₹270.00. Save ₹90 Add to cart -
Sale! Add to cartया कवीचा भर आदिम काळापासून आजवर चालत आलेल्या ओझोनच्या सावलीतील मानवी अस्तित्वशोधावर आहे. माणसामधील आदिम प्रेरणा व संस्कार, अस्तित्वाची अनाकलनीयता व निरर्थकता, मानवी संबंध अशा अनेक अंगांचा शोध ही कविता घेऊ पाहते. कवी वासुदेव यांच्या अस्तित्वशोधाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या शोधाला असलेला काळाचा संदर्भ होय. अमूर्त काळापासून ते वैज्ञानिक काळापर्यंतची काळाची वेगवेगळी रूपे ही कविता आविष्कृत करू पाहते. काही कवितांमध्ये काळाचे चेतनीकरणही केले जाते. काळाचे व काळाच्या संदर्भातील मानवी अस्तित्वाचे उत्कट चिंतन ही कविता व्यक्त करू पाहते. त्याप्रमाणेच जागतिकीकरणाच्या संदर्भातील समकालीन जगण्याचा, त्यातील अनेकविध प्रश्नांचा, अंतर्विरोधांचा शोध ही कविता घेऊ पाहते. त्याप्रमाणेच जागतिकीकरणाच्या संदर्भातील समकालीन जगण्याचा, त्यातील अनेकविध प्रश्नांचा, अंतर्विरोधांचा शोध ही कविता घेऊ पाहते. या जीवनातील स्पर्धा, त्यातील रितेपणा, आधुनिक माणसाची अमर्याद भोगलालसा, त्याची प्रवाहपतितता या कवितेतून व्यक्त झाली आहे. प्रेम व निसर्ग हे अनुभवही या कवितेचे आस्थाविषय आहेत. येथे या अनुभवातील तरलता, धूसरता अनेकविध प्रतिमा-प्रतिकांच्या साहाय्याने, प्रामुख्याने रोमँटिक काव्यशैलीत आविष्कृत केली जाते. या काव्यशैलीत नव्या- जुन्या काव्यशैलींचे ताण अनेकदा दिसत असले, तरीही ही कविता कोणत्याही एका काव्यशैलीच्या आहारी मात्र जात नाही. डॉ. वसंत पाटणकर
कवितासंग्रहOzonchya Savlit | ओझोनच्या सावलीत
₹60.00Original price was: ₹60.00.₹45.00Current price is: ₹45.00. Save ₹15 Add to cart -
Sale! Add to cartइंदिरा गांधींच्या यशस्वी काळातील भारतातील कदाचित सर्वात प्रभावशाली व बलशाली वरिष्ठ सनदी अधिकारी आणि ज्यांनी इंदिरा गांधींची प्रतिमा उंचावणे व ती निष्ठेने जपणे ही आपली जबाबदारी मानली, अशा पी.एन. हक्सर यांचे हे पहिलेच विश्वासार्ह चरित्र. बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांचे तनखे व इतर सवलती बंद करणे, भारत-रशिया करार, बांगलादेशची निर्मिती, शेख अब्दुल्लांशी समझोता, पाकिस्तानशी सिमला व नवी दिल्ली येथे केलेले करार, शेती, अंतराळ आणि अणुक्षेत्रातील देशाची प्रगती व नंतर सिक्कीमचे भारताबरोबरचे एकीकरण अशा इंदिरा गांधींच्या मोठ्या कामगिऱ्यांमध्ये हक्सर यांचे महत्त्वाचे योगदान होते. भारताच्या धर्मनिरपेक्ष परंपरांचे रक्षण, सार्वजनिक क्षेत्राला बळकटी, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि तंत्रज्ञानासंबंधीच्या स्वयंपूर्णतेत वाढ यांसारख्या राष्ट्रीय चळवळींचे ते आश्रयदाते होते. इंदिरा गांधीनंतर आलेले पंतप्रधानही त्यांचा सल्ला घेत असत. विस्मरणात जाऊ पाहणाऱ्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचे सरकारी कागदपत्रे, टिप्पणे, टाचणे व पत्रे या सर्वांच्या साहाय्याने केलेले यथातथ्य चित्रण.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेP.N. Haksar Ani Indira Gandhi: Don Ayushyanchi Gunfan | पी.एन. हक्सर आणि इंदिरा गांधी: दोन आयुष्यांची गुंफण
₹650.00Original price was: ₹650.00.₹488.00Current price is: ₹488.00. Save ₹162 Add to cart -
Sale! Add to cartविलास शेळके.
एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व.
शिक्षणाने आणि पेशाने अभियंता.
संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक.
सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार,
अशा व्यक्तीचे बोट धरून
आपण या अक्षरप्रवासाला निघालो की,
ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो,
सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो.
त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी
आपणही समृद्ध बनतो.
विलास शेळके आपल्या अनोख्या नजरेतून
घडवत आहेत उगवत्या सूर्याच्या दिशेला
वसलेल्या सहा देशांचे दर्शन.All BooksPachimayan | पश्चिमायन
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Sale! Add to cartपाश्चात्य लेखकांचे लेखन तर सोडाच, कित्येकांच्या नावांशीही आपण परिचित नसतो. पण रवींद्र पिंगे त्यांची अशी काही ओळख करून देतात की, हे सारे सारस्वत आपल्या आसपासचेच वाटू लागतात. शेक्सपिअर-थोरो-डिकन्स-हार्डीपासून हेमिंग्वे-डोरा रसेल-नायपॉल-कार्टलँडपर्यंत अनेक पाश्चात्य प्रतिभावंतांची रास मांडणारी- पश्चिमेची धनदौलत
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेPachimechi Dhandoulat | पश्चिमेची धनदौलत
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartहे नेहमीच्या अर्थानं प्रवासवर्णन नाही. निरनिराळ्या देशांचा वर्तमान आणि भूगोल यांतून इतिहासाचा वेध घेत केलेला हा मनोज्ञ लेखनप्रपंच. आपली अनुभवश्रीमंती वाचकांमध्ये वाटून घ्यावी एवढयाच उद्देशाने साधलेला हा सहजसंवाद.
प्रवासPahilele Desh, Bhetleli Manse | पाहिलेले देश भेटलेली मानसं
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartपाऊणशे वर्षांचा टप्पा ओलांडल्यानंतरही एखाद्या देशाला आपल्या अस्तित्वाच्या अर्थाचा प्रश्न पडावा का? पण, पाकिस्तानला तो पडतोय. पाकिस्तान का मतलब क्या?' हा प्रश्न आजही तेथे विचारला जातो; उत्तरासाठी इस्लामचा आधार घेतला जातो; मात्र तेथेही उत्तर मिळत नसल्याने कडवा भारतविरोध जोपासला जातो. धर्म आणि भारतविरोध यांच्या चौकटीतच आपले अस्तित्व टिकविण्याच्या नादात पाकिस्तानची फसगत झालीय. धार्मिक ओळख कमी करावी, तर वेगळेपण काय राहील याची भीती आणि भारतविरोधाची धार सौम्य करावी, तर मग भारतापासून वेगळे का झालो हा प्रश्न. आपल्या अस्तित्वाला या दोन घटकांभोवती केंद्रीत करण्याच्या नादात पाकिस्तान एका चक्रव्यूहात फसला आहे. अस्मितेच्या वावटळीत फसलेल्या देशाच्या आजवरच्या प्रवासाचा वेध.
All BooksPakisthan Ka Matlab Kya ? | पाकिस्तान का मतलब क्या?
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartभारताचा कडवा द्वेष किंवा इस्लामबद्दलचे कर्मठ प्रेम यापैकी कशाभोवतीही पाकिस्तानचे राष्ट्रजीवन धड उभे राहू शकलेले नाही. आपल्या अस्तित्वाचा मूलाधार काय असायला हवा, याचे उत्तर त्या देशाला साठ-बासष्ट वर्षांनंतरही सापडू शकलेले नाही. अराजकाच्या भोव-यात सापडलेल्या आपल्या शेजा-याची ही शोकात्म फजिती किती धोकादायक ठरू शकते, हे सप्रमाण दाखवून देणारे लक्षवेधी पुस्तक.
इतिहासPakisthan …. Asmitechya Shodhat | पाकिस्तान… अस्मितेच्या शोधात
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart
Skip to content