-
समाजकारण / राजकारण
Navabharatmadhil Lekh | नवभारतमधील लेख
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cartडॉ. अनंत सरदेशमुख हे कामगार क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असून आपल्या प्रभावी नेतृत्व गुणामुळे कामगारांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांचे मार्गदर्शन कामगारांना, उद्योग व्यवसायिकांना व कायदेशीर सल्लागारांना अत्यंत उपयोगी आहे.
नवीन कामगार संहितामुळे नोंदणी परवाना ऑनलाइन सुविधा व उद्योगांचे नियमन सोपे झाले आहे. २९ कायद्यांऐवजी ४ संहितांमध्ये एकत्रिकरण झाल्यामुळे सुटसुटीतपणा आला आहे. असे केंद्रसरकारचे मत असले तरी कामगार चळवळीत मात्र सर्वांचे शंका समाधान झालेले नाही. या परिस्थितीत वस्तुनिष्ठ विश्लेषण व ठोस माहिती आवश्यक होती.
आता या पुस्तकामुळे कायद्यातील बदल सोप्या भाषेत समजून घेऊन त्याप्रमाणे लाभ मिळवणे कामगारांना सोपे झाले आहे व यासाठी श्री. अनंत सरदेशमुख यांनी अत्यंत मोलाचे कार्य केले आहे. सोप्या मराठीत एकत्रितरीत्या कायदा मांडणी केल्यामुळे सर्वसामान्य मराठी समजणाऱ्या कामगारापर्यंत कायद्याचे ज्ञान सुलभतेने उपलब्ध होत आहे.
कायदेशीर तरतुदी सोबत ऐतिहासिक पार्श्वभूमी, व्याख्या व नियम यांचे सोप्या भाषेत विवेचन सर्वांसाठी उपलब्ध झाले आहे. या पुस्तकाद्वारे पूर्वीच्या कायद्यातील झालेले बदलही तक्ता स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत.
कामगारांचा मूलभूत हक्क जपण्यासाठी व त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक ज्ञानाची शिदोरी श्री. अनंत सरदेशमुख यांनी सर्वांसाठी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिली आहे. त्या दृष्टीने सर्व कामगार, व्यावसायिक, उद्योजक व कायदेतज्ञ यांनी संग्रही ठेवण्यासारखे पुरतक आपल्याला उपलब्ध झाले आहे. या पुस्तकास माझ्या हार्दिक शुभेच्छा !
कायदाविषयक - अर्थव्यवहारNave Kamgar Kayade Ani Apan | नवे कामगार कायदे आणि आपण
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart५५ प्रश्नांची नेमकी उत्तरं, आणि आणखीही पुष्कळ... सरकारी धोरणं वेळोवेळी जाहीर होत असतातच की. मग नव्या शैक्षणिक धोरणाचा यंदाच एवढा गवगवा कशासाठी? ही फक्त सरकारी प्रसिद्धीची युक्ती? की त्यात खरंच आहे काही उपयुक्त? कुणाचा काय फायदा होणार यातून? शिक्षकांना काही लाभ मिळणार की कामंच वाढणार फक्त? आमच्या मुलांचं खरंच काही कल्याण होणारे का? भाषांची संख्या वाढवणार का? पदवी परीक्षा तीनऐवजी चार वर्षांची? कशासाठी? क्रेडिट पॉलिसी फार किचकट नाही का वाटत? मेजर, मायनर, कौशल्ये, व्होकेशनल' अशा वेगवेगळ्या श्रेणीत विषय विभागले आहेत ते का? १० २ ३ ऐवजी ५ ३ ३ ४ हा नवा पॅटर्न आणलाय. यातून गोंधळ वाढणार की काही पदरात पडणार? पालकांनी नक्की करायचं तरी काय? नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२०) यंदापासून अमलात येतंय, अशा वेळी शिक्षणातल्या सगळ्या घटकांना पडणा-या तब्बल ५५ प्रश्नांची नेमकी उत्तरं देणारं, शिक्षणतज्ज्ञांनी लिहिलेलं मोलाचं पुस्तक.
All BooksNave Shaikshanik Dhoran-Vidyarthi-Palakansathi Margadarshan | नवे शैक्षणिक धोरण
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart -
Sale! Add to cart'नवे आवाज, नवी गाणी, नवे प्रयोग, नवे सांगीतिक विचार, जोडीला नवं तंत्र अन् नवे मंत्र - या सा-यांनी गेल्या दहा-पंधरा वर्षांत पार बदलून टाकला चित्रपटसंगीताचा चेहरा. आपल्या आसपास रुंजी घालणा-या या नव्या तरुण गाण्याविषयी एका सर्जक रसिकानं मारलेल्या मनमोकळ्या गप्पा म्हणजे हे पुस्तक. नवं बदलतं संगीत ज्यांना ना समजतं, ना रुचतं; त्यांना ते समजून घ्यायला हे पुस्तक मदत करील. ज्यांना एव्हाना हे संगीत पचलं आहे, त्यांना त्यातले आणखी बारकावे हे पुस्तक दाखवील. आजच्या काळाचं संगीत गाणारं '
संगीतNave Sur An Nave Tarane | नवे सूर अन नवे तराणे
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartआपल्या खेळाची दुनिया अगाध आहे. प्रत्यक्ष मैदानात खेळणारे मूठभर. पण त्याबाबत लिहिणारे, बोलणारे, पैजा लावणारे, अफवा पसरवणारे, अनाहूत सल्ले देणारे, हजारो-लाखो नव्हे, सगळेच. दिलाप प्रभावळकरांची मर्मग्राही लेखणी या सर्वांचा मिस्कील वेध घेते तेव्हा निर्माण होते 'गुगली.' जिच्यात 'एकच चित्कार' हे क्रीडापाक्षिक कष्टपैलू संघाच्या खेळाचा आढावा घेत. ऑडीत बसून माहीममध्ये हिंडणा-या रवी शास्त्रीला लोक धीरूभाई शास्त्री म्हणायला लागतात. एखाद्या चाळकरणीचं मालकाशी पाण्यावरून भांडण झालं, की 'मी काही तुमची मांडलिकोव्हा नाहीये' असं ठणकावते. सोल ऑलिम्पिकनंतर मराठी रंगभूमीवर 'पातळमिठी' हे नवं नाटक आणण्याचा प्रस्ताव येतो. एखादे आजोबा आपल्या नातवाला बॅटिंगची प्रॅक्टिस देण्यासाठी सटासटा बटाटे टाकतात. रमण लांबा नव्याने उद्योजक झाल्यावर आपल्या हॉटेलमध्ये एक्स्टाकव्हर बॅंक्वेट हॉल , सिलीपॉईंट मीटिंग रूम' उघडतो. सगळे मिळून जगणंच खेळमय करतात. किती न्हाळावं.. किती बघावं..किती टाळ्या द्याव्या-घ्याव्यात असा प्रश्न पडतो. झकासपैकी गुगली बघताना तरी वेगळं काय होतं ?
ललित लेखनNavi Gugali | नवी गुगली
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartमोहम्मद रफींचं नाव घेतलं अन् त्यांची एकाहून एक सरस नि सुरस गाणी आठवली की सद्गुणांना सुगंधी स्वर लाभला होता असं वाटल्याशिवाय राहत नाही ! पुरुषी स्वर, पण त्याला होती जितकी ऐट तितकीच अदब.. प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता, उद्वेग, नटखटपणा, शुद्ध भक्ती आणि अशा असंख्य भावछटा, रफी-स्वरातून सारख्याच सहजपणे नि कुशलतेनं उमटल्या... रसिकांना नाना रसांच्या वर्षावात आजपर्यंत चिंब भिजवत राहिल्या.. म्हणून तर रफी ठरले नवरसांचे जादूगार ! संगीताच्या जाणकार नि प्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे या पुस्तकात सांगतायत, रफींच्या आवाजातल्या जादूचं रहस्य ! अन् त्यानंतर आहेत रफींची निवडक पंचवीस गाणी आणि त्यांचं रेशमी रसग्रहण... क्यूआर कोड स्कॅन करून ती गाणी लगेच ऐकायची सुविधाही आहे...
All BooksNavrasancha Jadugar – Mohammad Rafi | नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreएक्सेल संगणकाच्या विश्वातला तत्पर मदतनीस त्याची कार्यक्षमतेचा अफाट. किचकट आकडेमोड क्षणार्धात पुरी करणारा. नेमकी उत्तरं झटपट देणारा. तुमचा आज्ञाधारक साहाय्यक. कोणताही शास्त्रीय वा तांत्रिक बागूलबुबा उभा न करता एक्सेलच्या सगळ्या करामतींचा साध्या-सोप्या उदाहरणांद्वारे हसत-खेळत करून दिलेला परिचय. 'क-क-कॉम्प्यूटरचा' या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक रवींन्द्र देसाई यांनी जवळच्या मित्राच्या भूमिकेतून केलेलं सुबोध मार्गदर्शन.
मार्गदर्शनपरNavya Swarupat Excel | नव्या स्वरूपात एक्सेल
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Read more -
Sale! Add to cartनाझी भस्मासुराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता अशाकरिता आहे की, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख सर्वांनाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशय्येवर कशी जाते ? हुकुमशहा सत्तेवर कसे येतात? राजकारणातले यश नेहमीच डागाळलेले का असते? युद्धाने प्रश्न सुटतात का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या इतिहासाची मदत होईल.
इतिहासNazi Bhasmasuracha Udayast | नाझी भस्मासुराचा उदयास्त
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cartऑल्बर्ट आइन्ष्टाइन म्हणजे विसाव्या शतकावर आपला आणि आपल्या वैज्ञानिक सिद्धांतांचा अमिट ठसा उमटवणारा जगावेगळा महापुरुष. त्याने मांडलेल्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचे महत्त्व वादातीत असले, तरी प्रत्यक्ष त्या सिद्धांताबद्दल सामान्य वाचकांमध्ये गैरसमज पुष्कळ आढळतात. विनाकारण उदभवलेल्या त्या गैरसमजांचे धुके बाजूस सारून स्वच्छ सूर्यप्रकाशात त्या सिद्धांताचा सुबोध परिचय करून देणारे हे पुस्तक. अत्यंत क्लिष्ट मानला जाणारा सापेक्षतावाद आपल्यालाही सहज समजला, अशी अनुभूती मिळवून देणारे लक्षवेधी पुस्तक...
समाजकारण / राजकारणNeelchi Shala : Sameerhill | नीलची शाळा : समरहिल
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart -
Sale! Add to cart'जवाहरलाल नेहरू. गरीब, अर्धशिक्षित, धर्मपरायण देशाचे धनाढय, उच्चविद्याविभूषित, निरीश्वरवादी पंतप्रधान. नेहरू म्हणजे एक विलक्षण रसायन. आधुनिकतेची आस, परंपरांबद्दल आस्था. मायभूमीवर निस्सीम प्रेम, इतर राष्ट्रांच्याही भल्याची आच. भावुक अन् उमदे. कविमनाचे अन् साहित्यिक पिंडाचे. बुध्दिप्रामाण्यवादी अन् वैज्ञानिक प्रगतीची ओढ असलेले. अलिप्त राष्ट्रांची चळवळ, पंचशील तत्त्वे, सुनियोजित विकासप्रकल्प, औद्योगिकीकरणाचा मजबूत पाया असे भरीव कार्य करणारे नेहरू; पण त्यांनी काश्मीर-प्रश्न राष्ट्रसंघात नेऊन देशाला एक भळभळती जखम करून ठेवली. चीनवर भाबडा विश्वास टाकून देश युध्दाच्या खाईत लोटला. नेहरूंवर अलोट प्रेम करणारी जनताही त्यांच्या या चुका नजरेआड करू शकत नाही. अनेक रसायनांच्या मिश्रणाने बनलेल्या या नवभारताच्या शिल्पकाराचे एम. जे. अकबर लिखित चरित्र आता मराठीत.
इतिहासNehru : Navbharatache Shilpakar | नेहरू : नवभारताचे शिल्पकार
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart
Skip to content
