-
Sale! Add to cartएकटी राहणारी बाई म्हणजे समाजाच्या मनात प्रचंड शंका ! तिचं वर्तन, तिचा दिनक्रम,तिच्याकडे येणारे जाणारे लोक - सगळयावर समाजाची बारीक नजर ! जिला स्वेच्छेनं एकटेपणी जगायचंय किंवा जिच्यावर नाइलाजानं एकटं जगण्याची वेळ आलीय, अशा स्त्रीची मन:स्थिती समाजाला कशी कळणार ? बहुतेक स्त्रिया लग्न करतात, म्हणून प्रत्येकीनं लग्न केलंच पाहिजे, ह्या सक्तीच्या जीवनपध्दतीचं तिला ओझं होतंय, त्या विरोधात तिला काही म्हणायचंय, ते ऐकण्याची तयारी समाज केव्हा दाखवणार ? विधवेला,घटस्फोटितेला, अविवाहितेला सर्वांत अधिक दु:ख आपणच देतो, हे इतर स्त्रियांना कधी समजणार ? -एकटेपणी जगणा-या स्त्रियांच्या मनाचा विषण्ण करणारा शोध.'
समाजकारण / राजकारणHe Dukkha Kunya Janmache | हे दु:ख कुण्या जन्माचे
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartमनानं आणि शरीरानं विकसित व्हायचा काळ म्हणजे किशोरावस्था. आयुष्यातील एक अवघड वळण. काहीसं धोक्याचंही. स्वतःचीच एक नवीन ओळख व्हायला लागते एक स्त्री म्हणून, एक पुरुष म्हणून. स्वप्नरंजनाला सुरुवात होते. पण हे सगळं का आणि काय घडतंय, याचा अर्थ मात्र उमगत नाही. त्यामुळे स्वप्नांभोवती धास्तीची, काळजीची काळी किनार उमटते. ओढ-आकर्षणाचा नेमका अर्थ कळत नाही. कधी नको इतका संकोच, कधी आक्रमकता. या ओढीच्याही विविध छटा अनुभवाला येतात, पण त्यांच्यातला नेमका फरक तर उमगत नाही. भावनेच्या आवेगात आयुष्याचं तारू भरकटण्याची शक्यता निर्माण होते. झपाट्यानं बदलत जाणा-या स्वत:च्या शरीराबद्दल अज्ञान असतं. भिन्नलिंगी देहाबद्दल कुतूहल वा जिज्ञासा असली तरी संकोचही असतो. साहजिकच निर्माण होतात गैरसमज, संभ्रम, शंकाकुशंका. ते तसं होऊ नये म्हणून, किशोरावसथा ओलांडत असलेल्या अक्षरशः हजारो मुलामुलींना गेल्या पंचवीस वर्षांत ज्यांनी कलोचित मार्गदर्शन करण्याचं व्रत आचरलं, त्या साठे पतिपत्नींनी लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे वडीलधा-या हितचिंतकांच्या भूमिकेतून केलेलं मनमोकळं हितगूज. कोणताही आडपडदा न ठेवता मानवी देह-व्यवहाराचं त्यांनी केलेलं स्वच्छ शैलीतलं विवेचन असंख्य तरूण-तरूणींना सुखी जीवनाची अंकलिपी शिकवील, समाधानाचे आणि स्वास्थाचे धडे देईल. वाटेतल्या खाचखळग्यांबाबत सावधानतेचा इशारा देत असतानाच सुंदर सहजीवनाचं रहस्य उलगडून दाखवील. किशोरावस्था ओलांडत असताना प्रत्येकानं वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक त्या सर्वांना हव्याशा वाटणा-या माहितीची शिदोरी ठरेल, यात शंकाच नाही.
वैद्यकीयHe Sara Mala Mahit Hava | हे सारं मला माहीत हवं!
₹130.00Original price was: ₹130.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹32 Add to cart -
Sale! Add to cart'फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप यांसारख्या सोशल मीडियावर स्वत:चे अकाऊंट चालवणे. परदेशांतील मुला-लेकरांबरोबर स्काईपवरून समोरासमोर संवाद साधणे. यूटयूबवर देशोदेशींचे नवे-जुने दर्जेदार सिनेमे विनामूल्य पाहणे. नवे-जुने सिनेसंगीत, नाटयसंगीत, शास्त्रीय संगीत ऐकणे. वीज, टेलिफोन, मोबाइलची बिले ऑन-लाइन भरणे. रेल्वे वा एस्टीची तिकिटे ऑन-लाइन आरक्षित करणे. घरगुती वस्तूंची ऑन-लाइन खरेदी-विक्री करणे. बँकिंगचे सारे व्यवहार इंटरनेटवरून करणे. स्वत:चा मराठी इंग्रजी ब्लॉग लिहिणे. गुगलवरून प्रश्नाचे उत्तर मिळवणे. हे सारे कमालीचे सोपे असते. यांतील ब-याच गोष्टी तर मराठीतूनही करता येतात आणि त्यासाठी कोणत्याही पूर्वज्ञानाची वा शिक्षणाची गरज नसते. हे सारे मला यायलाच हवे ! तर हे पुस्तक मला घ्यायलाच हवे !
विज्ञानHe Sare Mala Yaylach Have ! | हे सारे मला यायलाच हवे
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
ललित लेखन
He Sarva Kothun Yete | हे सर्व कोठून येते?
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'चार दशकांपूर्वी भारतातल्या धूळवाटांतून येऊन अमेरिकेतल्या गगनमहालाला गवसणी घालणा-या मराठी माणसाचे हे प्रांजळ आत्मकथन. वास्तुरचनेतून मानवी आयुष्य सुंदर, उन्नत करण्याचा निदिध्यास, कौटुंबिक एकात्मतेवर प्रगाढ विश्र्वास, स्वत:शीच चाललेला निरंतर संघर्ष, अविरत विश्र्वभ्रमण, उत्कट कलासक्ति, उदंड कर्तृत्व, दातृत्व यांची प्रतिबिंबं यात दिसतील. नामवंत आंतरराष्ट्रीय विद्यमान वास्तुरचनाकारांच्या मालिकेत अग्रभागी विराजमान झालेले अनिवासी भारतीय सुधीर जांभेकर. मराठी माणसाला अभिमान वाटावी, तरूणाईला प्रेरक ठरावी अशी एका मनस्वी वास्तुरचनाकाराची ही आगळीवेगळी कहाणी. वैयक्तिकतेकडून वैश्र्विकतेचा रोमहर्षक प्रवास....
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेHe Vishwache Angan Vasturachanakarachi Kahani | हे विश्र्वाचे अंगण वास्तुरचनाकाराची कहाणी
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cart'गिरीश टिळक हा एक यशस्वी हेडहंटर आहे. म्हणजे काय? तर, आजच्या कॉर्पोरेट जगात दोन प्रकारची माणसं लागतात. पहिली, सुमारे 90 टक्के - शरीराच्या हातापायांसारखी. आज्ञेप्रमाणे कामे करणारी. दुसरी, सुमारे 10 टक्के - मेंदू, हृदयासारखी. विचारपूर्वक, प्रसंगी भावनापूर्वक काम करवून घेणारी. हे 10 टक्के उच्चपदस्थ किंवा डिसिजन मेकर्स इतके महत्त्वाचे असतात, की ते सोडून गेले, तर त्या कंपनीच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहतो. ती शोधून देणं म्हणजे हेडहंटिंग! हा व्यवसाय युरोपात मोठा झालाय, मात्र आपल्या इथे अजून रांगतोय. गिरीशसारख्या एका सामान्य, आजारी मुलानं ही किमया कशी साधली त्याच्या धडपडीची ही कहाणी. वाचा सुमेध वडावाला (रिसबूड) यांच्या मनोरंजक शब्दांत- हेडहंटर.'
मार्गदर्शनपरHeadhunter | हेडहंटर
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartहेडलीचं व्यक्तिमत्व आकर्षक. वागणं सभ्य अन् सुसंस्कृत. स्वभाव नम्र, ऋजू, मनमिळाऊ. स्वत:च्या वडलांकडून मायेचा ओलावा न मिळालेल्या राहुलला हेडलीता सहवास म्हणजे मनाला उभारी देणारं हक्काचं विश्रांतीस्थान वाटू लागलं. पण हेडलीच्या चेह-यावरचा हा दिखाऊ मुखवटा जेव्हा दूर झाला, तेव्हा- २६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील हल्लाचं नियोजन करणारा भेसून सैतानी चेहरा राहुलसमोर आला तेव्हा-
इतिहासHedly Aani Me | हेडली आणि मी
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart -
Sale! Add to cartजनुकीय विज्ञानात महत्त्वपूर्ण संशोधन करणारी एक नामांकित कंपनी, सदर्न जेनेटिक्सचे सर्वेसर्वा हर्ष मित्तल आपल्या संशोधनाच्या गुप्ततेसाठी विलक्षण जागरूक असतात. त्यांनी या संशोधनाच्या सुरक्षिततेची जबाबदारी 'एआय'वर कृत्रिम बुद्धिमत्तेवरसोपवली. अभेद्य वाटणारी ही सुरक्षाव्यवस्था कोणी मोडली ? हर्ष मित्तल यांच्या हत्येतून सुरू झालेली दुर्घटनांची साखळी कोणत्या दिशेने गेली ? एआय अयशस्वी ठरण्यामागे कोणाचा हात होता ? कोणी केली एआयवर मात करणारी खेळी ? मानव आणि एआय यांच्यात निर्माण होत असलेल्या गुंतागुंतीच्या नात्यातील विविध पैलूंचा वेध घेणारी 'अनपुटडाउनेबल' थरारक कादंबरी.
All BooksHee Medha Kon? | ही मेधा कोण ?
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartही आहे हेन्रीऐटा लॅक्स. शंभर वर्षांपूर्वी जन्मलेली, ऐन तारूण्यात कॅन्सरला बळी पडलेली अमेरिकेतील एक कृष्णवर्णीय स्त्री. पण स्वत:च्याही नकळत तिने संपूर्ण मानवजातीला एक अमूल्य देणगी दिली हेला पेशींची ! कॅन्सरपासून कोविडपर्यंत अनेक आजारांवरील औषधांच्या संशोधनात उपयुक्त ठरलेल्या हेला पेशी. या पेशी जगभरात पसरल्या, अगदी अंतराळात पोहोचल्या. पण हेन्रीएटा मात्र उपेक्षेच्या अंधारात राहिली. एकीकडे संशोधनातील यशाची शिखरे, अब्जावधी डॉलरची उलाढाल; तर दुसरीकडे सामाजिक उतरंडीतील गोरा वर्चस्ववाद, कृष्णवर्णीयांना मिळालेली अमानुष वागणूक. ज्ञानाची क्षितिजे, नीतिमत्तेच्या चौकटी, वैद्यकसत्ता अन् मानवी प्रवृत्ती या साऱ्यांचा वेध घेणारी अमर्त्य पेशींची खरीखुरी कहाणी
विज्ञानHelapeshi : Kahani Amartya Peshinchi | हेलापेशी: कहाणी अमर्त्य पेशींची
₹170.00Original price was: ₹170.00.₹128.00Current price is: ₹128.00. Save ₹42 Add to cart -
Sale! Add to cartThe mere mention of the word teenage puts a rosy blush of memories on our cheeks and a naughty smile on our face. However, when it comes to parenting these same amazing teenagers, our stomach twists into a knot, forehead wrinkles with frowns, and eyes cloud with concern. Though most parents understand what should be done to deal with the tender age of their teenage child, it is the implementation that puzzles them. Help! Teenager at home... gives handy and practical tips to deal with many sensitive issues such as dialogue with teenagers, their discipline, career, virtual world, diet, relationships, responsibilities, college-life and much more. Written by a paediatrician and an adolescent practitioner, this book will help make your parenting journey mindful, satisfying and joyful !
All BooksHelp – Teenager At Home … | HELP!
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart
Skip to content
