-
Sale! Add to cartसनावली व घटनांच्या जंत्रीतून मांडलेला हा इतिहास नाही. भारताच्या इतिहासावर आपली ठसठशीत मुद्रा उमटवणा-या श्रीमती इंदिरा गांधी यांच्या अखेरच्या कालखंडाचा साक्षीदार असलेल्या लेखकानं झगमगत्या पर्वाचं घडवलेलं हे दर्शन आहे. पंतप्रधानांचे प्रमुख सचिव म्हणून काम करताना डॉ. पी.सी.अलेक्झांडर यांना इंदिराजींचे कितीतरी करारी व कोमल पैलू पाहायला मिळाले. नातवंडांत रमणा-या, गंमतशीर किस्से सांगणा-या, परदेश दौ-यात तळपणा-या, पंजाब प्रश्नानं सचिंत झालेल्या, राष्ट्रपतींच्या संबंधातील ताणतणाव सांभाळणा-या, मंत्रीमंडळ फेररचना अत्यंत गुप्तता बाळगणा-या व सहका-यांना सहसा न दुखावणा-या पंतप्रधान अशी त्यांची नाना रूपं इथं भेटतात. एकदा तर पंतप्रधापदाचा राजीनामा देऊन राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती असं अज्ञात असलेलं सत्य इथं सामोरं येतं. गंभीर-हस-या,पोलादी-प्रेमळ, मुत्सद्दी-मिश्किल अशा इंदिराजींच्या कितीतरी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. १९८० ते १९८४ या काळातील पडद्यामागील घडामोडींचा हा अस्सल, वस्तुनिष्ठ आलेख. जितका ऐतिहासिक तितकाच चकित करणारा.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेIndira : Antim Parva | इंदिरा : अंतिम पर्व
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cart'इंदिरा गांधी या कर्तबगार पंतप्रधानांचे हे सरळसाधे चरित्रकथन नाही; ते आहे त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत घडलेल्या अनेकानेक खळबळजनक घटनांचे विश्लेषण. बांगलादेश युद्धापासून ब्ल्यू स्टार मोहिमेपर्यंत, अंतर्गत आणीबाणीपासून खलिस्तानी चळवळीपर्यंत, बँकांच्या राष्ट्रीयीकरणापासून असंख्य घटनादुरुस्त्यांपर्यंत... इंदिराजींनी जी जी धोरणे अनुसरली, ती कितपत यशस्वी ठरली आणि किती फसली, याचे एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने केलेले हे समतोल मूल्यमापन जुन्या आठवणी जागवील आणि काही महत्त्वाच्या धड्यांची उजळणीही करायला लावील.
इतिहासIndira Gandhi : Ek Vadali Parva | इंदिरा गांधी : एक वादळी पर्व
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartबालपणापासुन ती होती अबोल, एकाकी. आईची आर्त व्याकुळता नि पित्याची तेजस्वी भव्यता यांचा नाद तिच्या मनात घुमत राहिला. स्वत:च्या घरी देशाचा घडत असलेला इतिहास ती लहानपणापासून पहात होती आणि पहाता पहाता तिनंही इतिहास घडविला. बांगला देश स्वातंत्र्यसंग्रामाच्या वेळी लखलखत्या दुर्गेचा अवतार धारण करून इतिहासाचं सोनेरी पर्व घडविणा-या इंदिरेनंच आणीबाणीचा काळाकुट्ट अध्यायही लिहिला. स्वयंभू,कठोर, खंबीर, प्रसंगी वादळ उठवणारी नि झेलणारी इंदिरा पुढे मात्र हळवी, परावलंबी, अंधश्रध्दाळू बनली. तिच्या मनातील आंदोलनाचा, स्वप्नांच्या उदयास्ताचा, तिच्या कोंडलेल्या श्र्वासाचा, खाजगी जीवनातील अज्ञात घटनांचा भारावून टाकणारा प्रवास.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेIndira Gandhi | इंदिरा गांधी
₹650.00Original price was: ₹650.00.₹488.00Current price is: ₹488.00. Save ₹162 Add to cart -
Sale! Add to cartइंका संस्कृती : गूढ, रहस्यमय, अनाकलनीय. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठे पाचशे वर्षांचे साम्राज्य. स्वत:ला सूर्यपुत्र समजणारी, निसर्गाला देव मानणारी, सोन्याचांदीच्या ढिगामध्ये लोळणारी, दो-याच्या गाठी मारून संदेश पाठवणारी, शेकडो टनांचे पाषाणखंड कापून अगम्य, अवाढव्य बांधकामे करणारी. पंधराव्या शतकात स्पॅनिश आक्रमकांनी इंका साम्राज्य धुळीस मिळवले, नंतरच्या चारशे वर्षांत इंका संस्कृती हळूहळू नष्ट झाली. पण एके दिवशी स्पॅनिशांच्या तावडीतून वाचलेले इंकांचे गुप्त शहर सापडले - माचूपिच्चू ! अवघे विश्व चकित झाले, पाषाणखंड हळूहळू बोलके झाले, इंका चा सप्तरंगी झेंडा गौरवाने आकाशात फडकायला लागला, सोने लुटून संपले होते, पण अजस्र पाषाणखंडांना सोन्याचे मोल आले, त्याचीच ही कहाणी -
प्रवासInka’chi Devdari | इंका ची देवदरी
₹320.00Original price was: ₹320.00.₹240.00Current price is: ₹240.00. Save ₹80 Add to cart -
Sale! Add to cart'दारिद्र्यात पिचत असलेली मुस्लीम वस्ती. पैशाचा अभाव, शिक्षणाचा अभाव! अज्ञान, अस्वच्छता, व्यसनाधीनता यांनी ग्रस्त जीवन. एके दिवशी ती वस्ती ढवळून निघाली. वस्तीतल्या पोरांची धरपकड झाली. जुनैद घरी आलाच नाही, पकडलेल्या पोरांमध्येही तो नव्हता. कॉलेजमध्ये शिकणारा सरळ मुलगा! अभ्यासू, कविताप्रेमी! का झालं असं? का? का? का? त्या शहरातले हिंदू-मुस्लीम नेते, कार्यकर्ते, राजकारणी या सर्वांना चित्रित करत पुढे पुढे जाणारी कादंबरी. इन्शाअल्लाह'
कादंबरीInshaallah | इन्शाअल्लाह
₹425.00Original price was: ₹425.00.₹319.00Current price is: ₹319.00. Save ₹106 Add to cart -
Sale! Add to cartइंटरनेट ही सा-या जगाला हाकेच्या अंतरावर आणणारी मानवी बुध्दीची स्तिमित करणारी झेप आहे. मानवी भावविश्वाचा कायापालट करणारी ती अपूर्व किमया आहे. शिक्षण, संशोधन, मनोरंजन आणि व्यापार चर्चा, गप्पा आणि इलेक्ट्रॉनिक पत्रव्यवहार शॉपिंग, परिसंवाद बातम्या आणि ज्ञानभांडार ग्रंथ,कोश, काल्पनिक विश्वातील सफर आणि वैद्यकीय उपचार. इंटरनेटवर काय नाही ? सारं सारं काही इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. सारी मानवजात इंटरनेटच्या जाळ्यात अडकत चालली आहे. अशा या महान क्रांतीकारी इंटरनेटची ही नुसती झलक आहे. एकविसाव्या शतकातील मानव इंटरनेटमध्ये पूर्ण गुरफटेल. इंटरनेट त्याचं सारं जीवनच पार बदलून टाकील. हा चौखूर उधळलेला विज्ञानवारू मानवाला कुठे बरं नेईल ?
विज्ञानInternet : Ek Kalpavruksha | इंटरनेट : एक कल्पवृक्ष
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartईशावास्य उपनिषद् म्हणजे सर्वांत महत्त्वाचं उपनिषद्. बाकी सर्व धर्मग्रंथ अचानक नष्ट झाले आणि केवळ या उपनिषदातला पहिला मंत्र हिंदूंच्या स्मरणात राहिला, तरी हिंदू धर्म चिरंतन टिकेल, असं महात्माजींनी म्हटलं होतं. त्या उपनिषदाचा सखोल अर्थ समजून घेण्यासाठी एका संवेदनशील कवयित्रीनं केलेल्या वैचारिक प्रवासाचा आलेख... ईशावास्यम् इदं सर्वम्... एक आकलन-प्रवास '
तत्वज्ञान / व / धर्मIshawasyam Idam Sarvam…Ek Aakalan Prawas | ईशावास्यम् इदं सर्वम्… एक आकलन-प्रवास
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'ही आहे एक धमाल कहाणी. ती घडते देवनगरीत म्हणजे तुमच्या आमच्या सभोवती. आपण डोळे उघडून बघायला मात्र हवं. देव, धर्म, संस्कृती अन् परंपरेच्या व्यापारीकरणात हृदयातला ईश्वर हृदयातच हरवतो. उत्तर आधुनिक काळात तरी आपण विवेक हा तारणहार, समता हा ईश्वर अन् प्रेम ही सर्वात टिकाऊ परंपरा ही त्रिसूत्री मानणार आहोत का ? निकोप समाजजीवन अन् विवेकशील नागरिकत्व डोळसपणे अंगात मुरवणार आहोत का ? गमतीजमतीतून नवोत्तर युगातील धर्मचिकित्सा करणारी हसत-हसवत, गुदगुल्या करत वाचकांना विचारप्रवण करणारी कांदबरी
कादंबरीIshwar Dot Com | ईश्र्वर डॉट कॉम
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart“…(R)arer still is the example of a Hindu writer, who has approached Islam with scholarly detachment… Against this background, the publication of Prof. Sheshrao More’s Muslim Manacha Shodh’ in Marathi is a landmark event…. Prof. More took it upon himself to offer a fair and lucid account of the three main founts of Islam : The life of Prophet Muhammad, the Holy Quran and the Hadis.” - From the column by Dileep Padgaonkar former Editor of ‘The Times of India’ dt. 3-11-2002. “No author of average capabilities would ever have been able to write So scholarly a book on religion with which he bears little or no association. Not a single line in the book has been penned without supportive evidence or reference…. The present work commands historiacal importance. So deep and thorough a study of the Quran and the Hadis - In other words, of Islam itself – had not previously been presented for our Hindu brethren by any Hindu thinker. Prof. More’s work is truly commendable… This book, which Sheshrao has authored after meticulous and thorough study, is an important an unprecedented achievement. It is an invaluable contribution to literature on Islam. An erudite work of this degree of excellence is exceptional… The work will inspire- as well and more thorough inquiry into Islam. If we want non-Muslims to study Islam, we must welcome, appreciate and encourage well-researched works like this publication, irrespective of all differences of opinion… The contents of most of the book are in conformity with the perspective assumed by the Quran, the Hadis and Islam itself.” - From the ‘Foreword’ by five Muslim scholars. “Prof. Sheshrao More is a well-known author and research scholar in Marathi literature. At present his book ‘Muslim Manacha Shodh’ is being Widely discussed in Maharashtra. In this book the author has objectively Presented the truth about Islam and Muslims.” - From the Editorial titles as ‘An Unknown (Ajnabi) Voice from Maharashtra’,Radiance’ (Urdu), Delhi, dt. 11-11-2002
इंग्रजी पुस्तकेIslam – Maker Of The Muslim Mind | इस्लाम-मेकर ऑफ द मुस्लिम माईंड
₹800.00Original price was: ₹800.00.₹600.00Current price is: ₹600.00. Save ₹200 Add to cart
Skip to content