-
Sale! Add to cartकोणतेही अस्तित्व निखळ चांगले किंवा निखळ वाईट नसते. प्रत्येक अस्तित्वाचा काही उद्देश असतो. शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या हिंदुत्व परिवार आणि मार्क्सवादी परिवारावरसुद्धा चांगल्या वाईटाचे शिक्के बसले. स्वातंत्र्याचे उद्दिष्ट साध्य झाल्यावर काँग्रेस परिवार देशाच्या राजकारणात वैचारिक कोलांट्याउड्या मारत राहिला. काळाच्या ओघात काही पक्ष नाहीसे झाले, तर काहींचे अस्तित्व मर्यादित राहीले. अनेक चांगल्या संघटना आणि संस्था डबघाईला आल्या किंवा त्यांचे महत्त्व कमी झाले. पण हिंदुत्व परिवार आणि मार्क्सवादी परिवार यांनी त्यांची तत्त्वे आणि त्यांची कॅडर यांच्या बळावर ठाम उभे राहून, हातात सत्ता असताना व नसतानाही देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात महत्त्वाची भूमिका निभावली. हे दोन परिवार आणि भारत यांच्या राजकीय वाटचालीचा हा मागोवा.
All BooksHindutava, Marxvaad Ani Bharat | हिंदुत्व, मार्क्सवाद आणि भारत
₹1,000.00Original price was: ₹1,000.00.₹750.00Current price is: ₹750.00. Save ₹250 Add to cart -
Sale! Add to cartकोकणात आजोबांकडे राहणारी हिरा एक दिवस मुंबईला पोचली, रुपालीला सोबत करण्यासाठी. रुपालीची आणि तिची गट्टी जमली खरी, पण मुंबईतल्या बंदिस्त वातावरणात हिराचे मन रमेना. ती कोकणात परतली. पुढे काय झाले ? वाचूया - हिराची गोष्ट
All BooksHirachee Goshta | हिराची गोष्ट
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Sale! Add to cart`हिरवी पोर्ट्रेट्स' हा ललित लेखसंग्रह म्हणजे कोकणच्या अंत:स्पंदनांची रम्य स्मरणयात्रा. बेर्डेंमधला लेखक - दिग्दर्शक - चित्रकार - नेपथ्यकार - पार्श्वसंगीतकार - जाहिरात कलाकार - वाद्यवृंदकार कसा घडत गेला, नावारूपाला आला, याचीही प्रेरणादायक कहाणी या ललित गद्यामधून आपल्याला कळते. कोकणची भूमी अनेक कलावंतांची जन्मदात्री आहे. संगीत, नृत्य, अभिनय, दिग्दर्शन, चित्र, शिल्प अशा अनेकविध क्षेत्रांत कोकणपुत्रांनी व कोकणकन्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. स्वतंत्र प्रज्ञा, जिद्द, उद्यमशीलता, साहसीपणा, एखादं काम अत्यंत चिकाटीने पूर्णत्वास नेण्याची आकांक्षा, श्रद्धाशीलता या गुणांमुळे आपल्या कर्तृत्वाची नाममुद्रा राष्ट्रीय स्तरावर उमटविणारे अनेक गुणीजन कोकणभूमीत निर्माण झाले. आपले भूमिसंस्कार घेऊन स्वत: वाढत राहिले. राष्ट्र, समाज, संस्कृती, धर्म, विविध कला, क्रीडा, शिक्षण, संशोधन, राजकारण, व्यापार-उद्योग अशा विविध क्षेत्रांत या कर्तृत्ववान माणसांनी जे योगदान दिले; त्याचे `हिरवी पोर्ट्रेट्स'मधून अंशत: दर्शन घडते. हे लेखन केवळ `कोकण प्रशंसापुराण' नाही. त्यातील आत्मचिकित्सा, समाजचिकित्सा, अंतर्मुखता, वास्तव निरीक्षणे आणि समकाळाशी जोडून घेण्याची सकारात्मकता लक्षणीय आहे. `हिरवी पोर्ट्रेट्स'मधल्या व्यक्तिचित्रांना पुरुषोत्तम बेर्डे यांच्या सर्वस्पर्शी कलाभानामुळे दृश्यमानता लाभली आहे. `पोर्ट्रेट'मध्ये Location, Lighting, Composition, Emotion, Technical Settings हे पाच घटक महत्त्वाचे असतात. बेर्डे यांनी यात ध्वनी (Sound) हा आणखी एक घटक मिसळवून या सगळ्याचे एकजीव रसायन केले आहे आणि त्यामुळे ही व्यक्तिचित्रे जिवंत वाटतात. ही सगळी जमिनीशी जोडलेली माणसे आहेत. कोकणभूमीशी घट्ट नातेसंबंध असलेली आहेत. त्यांचे यथार्थ चित्रांकन करताना बेर्डे यांनी जे सामाजिक आणि सांस्कृतिक भान ठेवले आहे, त्यामुळे या ललित लेख / व्यक्तिचित्र संग्रहाची मूल्यात्मकता वाढलेली आहे. डॉ. महेश केळुसकर
All BooksHiravee Portrets | हिरवी पोर्ट्रेटस
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cartइतिहास आणि वर्तमान मांडतो ती मोठ्यांच्या युद्धाची कहाणी परंतु मुलांच्या नजरेतून पाहा. तीच दिसेल रक्तरंजित, नकोशी खरी कहाणी. जगातल्या चौदा देशांतला युद्धकाळ आणि मरणाच्या दारात उभी असलेली मुलं. त्यांच्या घुसमटलेल्या बाल्याच्या अन् दबलेल्या मनस्थितीच्या साक्षी अशा डाय-यांतले काही दिवस. परस्परांचे शत्रू असलेल्या देशातली मुलंसुद्धा टाहो फोडूनच एकच प्रश्न विचारतात- जगातली युद्ध संपणार काधी?
समाजकारण / राजकारणHiravlele Awaj | हिरावलेले आवाज
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartएक होता, हुशार आणि कष्टाळू कोंबडा ! तो स्वत: तर काम करायचाच, पण बाकीच्यांनाही कामाला लावायचा. आयते खाण्यापेक्षा स्वत:चे अन्न स्वत: पिकवायची कला त्याने आपल्या मित्रांना कशी शिकवली, ते पाहू या, या मजेशीर गोष्टीत..
All BooksHushaar Kombada | हुशार कोंबडा
₹35.00Original price was: ₹35.00.₹26.00Current price is: ₹26.00. Save ₹9 Add to cart -
Sale! Add to cartकिती विचित्र घटना रात्रीतुन ह्या घडल्या। डोहात चांदण्या अश्या कश्या अडखळल्या। ओठात कळयांच्या मूक हुंदके विरले। अडकला चंद्र काटयात बाभळी रडल्या।
कवितासंग्रहHya Panpoeivar Milate Phakta Tahan | ह्या पाणपोईवर मिळते फक्त तहान
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartNo man is an island, says the poet John Donne. He is part of a vast community of people. He lives, grows up, interacts and matures within a community. After the mother's womb, it is the womb of the community which matters the most. The community accommodates us, shapes our personality. It teaches us the importance of sharing and social awareness. A life without a community is like a fish out of water. My family, my village, school, church, parents, siblings, friends, the priests I met, teachers, seminary, agitations, movements, the nature around me, trees, birds and animals, mountains, streams, the sea, they all surround me. So I am never alone...
All BooksI Am Not Alone | I am not alone
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Sale! Add to cartआय.टी. म्हणजे भारतीय उद्योग-व्यवसायाला सापडलेला एक समृद्ध खजिना. अब्जावधी रूपयांच्या या खजिन्याच्या गुहेची किल्ली शोधण्याचे सुरू होते एक स्वप्नरंजन - सर्वांचेच ! आय.टी. म्हणजे काय ? त्यासाठीचे अभ्यासक्रम कोणते ? प्रवेशपरिक्षा कशा असतात ? इंजिनीअर झाले, तरी कोणत्या चाचण्या व मुलाखतींना सामोरे जावे लागते ? आय.टी.तली मंडळी करतात तरी काय ? त्यातल्या संधी कोणकोणत्या ? अगदी सर्वसाधारण व्यक्तिला आय.टी.त जाता येते काय ? इथे अपयश का येते ? अशा सा-या प्रश्नांची नेमकी उत्तरे तीन तज्ज्ञ लेखकांनी त्यांच्या समृद्ध अनुभवांतून येथे दिली आहेत. जागतिक स्तरावरच्या आयफ्लेक्स व ओरॅकल या कंपन्यांचे बिग बॉस दिपक घैसास यांच्या नेटक्या प्रस्तावनेची त्याला जोड लाभली आहे.
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)I.T. Tach Jaychay | आय.टी.तच जायचंय
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartइलूला त्याचे घरटे आवडत नव्हते. त्याला वेगळे घरटे हवे होते, म्हणून तो इतर पक्ष्यांची घरटी पाहायला गेला. इलूला कुठले पक्षी भेटले, त्यांची घरटी कशी होती, इलूला शेवटी कुठले घरटे आवडले ? वाचूया- इलूचे घरटे
All BooksIlooche Gharate | इलूचे घरटे
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreपगारदारांनी आपला इन्कम टॅक्स कसा वाचवावा ? होमलोनच्या व्याजावर किती वजावट मिळते ? ती प्रत्येक सहमालकाला मिळते का ? सेकंड होम तुमचा इन्कम टॅक्स कसा वाचवते ? वीस हजार किंवा त्याहून अधिक रकमेचे कर्ज रोखीत का घेऊ नये ? घर, जमीन, दागिने विकून होणा-या कॅपिटल गेन्सवरील इन्कम टॅक्स कसा वाचवावा ? फ्लॅट विकताना बाजारभावापेक्षा कमी दराने विकला तर काय होते ? शेअर्स, म्युच्युअल फंडाची युनिट्स, बॉण्ड्सवरील उत्पन्नावर इन्कम टॅक्स कसा आकारला जातो ? कोणत्या नातेवाइकांकडून मिळालेली गिफ्ट करमुक्त असते ? टी.डी.एस. टाळण्याचे राजमार्ग कोणते ? पॅन असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरावेच लागते का ? अपंग नातेवाइकांच्या वैद्यकीय देखभालीच्या खर्चावर किती वजावट मिळते ? या आणि तुमच्या मनातील अशा अक्षरश: शेकडो प्रश्नांना सुंदर मराठीत उत्तरे देणारे हे पुस्तक करदाते, करसल्लागार व विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरेल.
कायदाविषयक - अर्थव्यवहारIncome Tax Vishayi Sare Kahi | इन्कम टॅक्सविषयी सारे काही
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Read more
Skip to content