-
Sale! Add to cart'प्रकृतीची काही तक्रार नाही. ना कसली प्रापंचिक वा मानसिक चिंता. आर्थिक अन् सामाजिक दृष्ट्याही उत्तम स्थैर्य. अशा आपल्या समृद्ध, सार्थक जीवनावर स्वेच्छेने मरणशिळा ठेवून मृत्यूचा स्वीकार करणाऱ्या - मरण म्हणजे जीवनाचा नैसर्गिक शेवट आहे याची जाणीव ठेवून त्याच्याकडे धीटपणे वाटचाल करणाऱ्या - मुलखावेगळया स्त्री-पुरुषांची सत्यकहाणी. विलक्षण बाब म्हणजे हे सारे एकाच कुलकर्णी कुटुंबाचे सदस्य होते !'
समाजकारण / राजकारणJagna Premacha Ani Maranahi | जगणं प्रेमाचं अन् मरणंही!
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartजैववैविध्य आणि अभयारण्ये तुम्ही कधी एखाद्या जंगलाला भेट दिली आहे का ? आपला मोगली, सिंबा आपल्याला आवडतो ना ? मग प्रत्यक्षातले बगिरा, सिंबा, भालू यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही फक्त सरकारची नाही. आपणही त्यासाठी काही करू शकतो. त्यासाठी जैववैविध्य म्हणजे काय, ती नष्ट होण्याची कारणे काय, अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानांची आवश्यकता काय, हे माहिती करून घ्यायला हवे. चला, त्यासाठी हे पुस्तक वाचू या. जैववैविध्य आणि अभयारण्ये
All BooksJaivavaividhya Ani Abhayaranye | जैववैविध्य आणि अभयारण्ये
₹65.00Original price was: ₹65.00.₹49.00Current price is: ₹49.00. Save ₹16 Add to cart -
Sale! Add to cartसमुद्र पिऊन टाकणा-या अगस्ती ऋषींच्या जिद्दीनं सहा सागरांना जिंकणारी एवढीशी पोर ! रौंद्र लाटांत, जीवघेण्या थंडीत मासोळी होऊन समुद्र पार करणारी ही सागरकन्या ! तिची आणि तिच्या आईवडलांच्या खडतर तपश्चर्येची ही अजब कहाणी.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेJal Aakramile | जल आक्रमिले
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreश्री. म.वा. धोंड हे कायम प्रवासात असतात. मुंबईतील साहित्य सहवास मधल्या आपल्या घरातल्या खुर्चीत बसून ते एक गाडी पकडतात. पिपात मेले . आनंदी गोपाळ . पोत . स्वीमी . लता मंगेशकरांनी गायिलेले तुकारामाचे अभंग. बालकवींची रमाई नाहीतर नाच ग घुमा . मूळ गाडी मर्यादित धावेची असली तरी धोंड ती आपल्याला हव्या त्या वेगाने फिरवतात. हे करताना त्यांचे दिशेने भान चुकत नाही. गाडीवरचे नियंत्रण सुटत नाही. अपघात घडत नाही. गाडी मोडत नाही. कोणत्याही कुशल ड्रायव्हर प्रमाणे या सगळ्याचे पक्के भान ते ठेवतात. पोचण्याचे ठिकाण ठरलेले असते पण वाटते जे जे भेटते ते स्वतंत्रपणे मन गुंतवणारे, चकित करणारे, दाद द्यावी असे असते. अशी कितीतरी ठिकाणे जागोजाग ते आपल्याला भेटवतात. यामुळेच हे प्रवास सरळ रेषेतले आणि कामापुरते नाहीत, हे मुक्त आणि मजेचे आहेत. वाचकाला बरोबर घेऊन या पुस्तकात श्री.धोंड यांनी असे एकुण अकरा प्रवास केले आहेत. त्यांची लेखनशैली व्यासंगी तितकीच ससीली, कधी गंभीर, कधी मिष्किल, कधी रंगेल आणि कधी चावटदेखील. गरजेनुसार यात उपरोधाची धार. अभ्यासाने सामान्य पंडितांना येते ते जाड्य या पुस्तकात औषधालाही सापडणार नाही. विजय तेंडुलकर
रसग्रहण / समीक्षाJalyatil Chandra | जाळयांतील चंद्र
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Read more -
Sale! Add to cartजेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ हा मराठ्यांचा आद्य इतिहासकार म्हणून ओळखला जात असला, तरी त्याच्याबद्दल अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत. मराठ्यांचे राज्य लयाला गेल्यानंतरच्या काळात सातारला त्याने बजावलेली प्रशासकीय कामगिरी तर दुर्लक्षितच राहिलेली आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द इंग्लंडमधील अस्सल कागदपत्रांचा धांडोळा घेऊन लिहिलेले हे त्याचे चरित्र खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे. मराठ्यांचा इतिहास लिहिण्यामागच्या डफच्या मूळ प्रेरणा, तो इतिहास लिहिताना त्याला आलेल्या अडचणी, साधनसामग्री गोळा करण्यासाठी त्याने घेतलेले अपार कष्ट आणि तरीही प्रशासकीय जबाबदारी सांभाळताना इतिहासकार म्हणून त्याच्या लेखनाला पडलेल्या मर्यादा व राहिलेल्या उणिवा... हे सारे काही स्पष्ट प्रकाशझोतात आणणारे हे चरित्र मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आस्था असणा-या सर्वांनीच अवश्य वाचले पाहिजे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेJames Kaningham Grant Duf (Marathyancha Itihaskar-Prashasak) | जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ (मराठ्यांचा इतिहासकार-प्रशासक)
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartआनुवंशिकता म्हणजे काय ? नात्यातले लग्न करू नये असे का म्हणतात ? घराण्यात डायबेटीस असल्यास तो पुढच्या पिढीत टाळता येतो का ? रक्तगट आणि आजारांचा संबंध असतो का ? कोड, स्किझोफ्रेनिआ आनुवंशिक आहेत का ? स्टेम सेल्स असतात कोठे आणि करतात काय ? आनुवंशिक आजारांवर उकाचार शक्य आहेत का ? जीन थेरपी म्हणजे काय ? आनुवंशिकतेबद्दल सामान्य माणसाच्या मनात उदभवणा-या अनेक प्रश्नांची सोप्या भाषेत उकल करणारे पुस्तक जनांसाठी जेनेटिक्स
वैद्यकीयJanansathi Genetics | जनांसाठी जेनेटिक्स
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartजनहितयाचिका म्हणजे काय ? अनधिकृत बांधकामे करणा-या बिल्डर्सच्या मनमानी कारभाराला आळा घालता जावा, असे वाटत असल्यास... नदीच्या पाण्यात घातक रसायने सोडणा-या बेजबाबदार कंपन्यांना अद्दल घडावी, असे वाटत असल्यास... एखादा चित्रपट वा दूरचित्रवाणी मालिका आक्षेपार्ह असल्यामुळे त्यांच्या प्रदर्शनावर बंदी आवश्यक वाटत असल्यास... तुरुंगातील कच्च्या कैद्यांना न्यायाच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे खितपत पडावे लागू नये, असे वाटत असल्यास... महिला कर्मचा-यांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून लैंगिक छळाला तोंड द्यावे लागू नये, असे वाटत असल्यास... कुणाही भारतीय नागरिकाला वा संघटनेला जनहितयाचिकेद्वारे अशा प्रकरणांत उच्च न्यायालयांत किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. वैयक्तिक स्वार्थासाठी जरी अशी कोणतीही याचिका करता येत नसली, तरी सार्वजनिक हितरक्षणासाठी मात्र हा मार्ग कुणालाही अनुसरता येतो. जनहितयाचिकेच्या या अभिनव मार्गाची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. त्याबद्दलच्या कायदेशीर तरतुदींपासून संभाव्य दुरुपयोग टाळण्यासाठी घ्यावयाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती असंख्य उदाहरणांसह देणारे हे संग्राह्य पुस्तक...
कायदाविषयक - अर्थव्यवहारJanhityachika Manvi Hakkasampadanacha Ek Prabhavi Marg | जनहितयाचिका मानवी हक्कसंपादनाचा एक प्रभावी मार्ग
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'गाडगीळ - गोखल्यांची नव-कथाही जुनी वाटावी इतक्या नव्या आणि अनपेक्षित वाटांनी मराठी कथा गेल्या काही वर्षात पुढे निघाली आहे. हे नावीन्य घाटाचे, तंत्राचे किंवा शैलीचे म्हणजे वरवरचे नसून गाभ्यातले, अनुभवाचे आणि त्या अनुभवाकडे बघण्याच्या निडर दृष्टीचे आहे. मराठी साहित्यात आजवर अ-स्पर्शित असे हे जीवनानुभव ही ज्यांच्या लेखनाची खासीयत त्या कथाकारात प्रिया तेंडुलकर यांचा समावेश केला जातो. त्यांच्या एका कथा-संग्रहाची ही नवी आवृत्ती.
कथासंग्रहJanmalelya Pratyekala | जन्मलेल्या प्रत्येकाला
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Read more -
Sale! Add to cart' जनसंहार शब्द उच्चारताच सर्वप्रथम डोळ्यांपुढे येते दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरने लक्षावधी ज्यूंची केलेली अमानुष हत्या. पण दुसऱ्या महायुद्धापूर्वी आणि नंतरही मानवी इतिहासात अशी भीषण हत्याकांडे अन् असा क्रूर जनसंहार घडलेला आहे. माणसाच्या मनात दडलेली क्रौर्यभावना या जनसंहाराला कारणीभूत ठरते का ? जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या कारणांनी भडकणाऱ्या या भयंकर वणव्याचा अभ्यासपूर्ण वेध.
इतिहासJansanhar | जनसंहार
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartबुध्दिमत्तेच्या जोरावर माणूस चंद्रावर जाऊन पोहोचला, पण भूतलावर आनंदाने जगण्यासाठी त्याला बुध्दिमत्तेस भावनिक संतुलनाची जोड द्यावी लागते. आयुष्यात लौकिकार्थाने यशस्वी होण्यासाठी कदाचित केवळ बुध्दिमत्ता उपयोगाला येत असेलही, परंतु सुखी होण्यासाठी मात्र भावनिक बुध्दिमत्ताही जोपासावी लागते; स्वत:ची त्याचप्रमाणे आपल्या मुलांचीही. त्याविषयी महत्वाचे काही.
वैद्यकीयJave Bhavnanchya Gava | जावे भावनांच्या गावा
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart
Skip to content