-
Sale! Add to cartहिमालय अनेकांना वेड लावतो. का? कसं? एव्हरेस्टसारखं अत्युच्च शिखर सर केल्यानंतरही गिर्यारोहकांची पावलं पुन:पुन्हा हिमालयाकडे का वळतात? पर्वतराजीतील भव्यता आणि शांतता, रौद्रता आणि सात्त्विकता त्यांना भुरळ पाडत असते? की निसर्गाचा लहरीपणा त्यांच्यातील धाडसी आणि अपराजित वृत्तीला सतत आव्हान देत असतो? अशावेळी त्यांचे प्रियजन कशी साथ देत असतील? एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या अनावर ओढीपायी तीन पिढ्यांमध्ये निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष आणि परस्परांना समजून घेण्याचे प्रयास चित्रित करणारी - सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं याचा प्रत्यय देणारी - सत्यघटनेवर आधारित कादंबरी!
All BooksJyache Tyache Everest | ज्याचं त्याचं एव्हरेस्ट
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cart'केवळ अधिक पगाराच्या नोकरीची गरज म्हणून कुणी कैद्यांना फाशी देण्याचे काम स्वीकारेल, हे जरा अविश्वसनीयच. परंतु पोलीस खात्यात नोकरी करणाऱ्या जेम्स बेरी या एका ब्रिटिश नागरिकाने आर्थिक अडचणींवर उतारा म्हणून फाशी देणाऱ्या जल्लादाचे काम स्वीकारले... अन् त्याच्यापुढे एक अदृश्य, अज्ञात असे जग सर्व गुंतागुंतींसह उलगडू लागले. कसे होते हे जग ? या जगाचे अनेक विस्मयजनक पैलू उलगडून दाखवणारे एका जल्लादाचे आत्मकथन
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेJyachya Hati Fasachi Dori | ज्याच्या हाती फासाची दोरी
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cart८५ वर्षांच्या आपल्या अल्पशिक्षित आईलासुध्दा अल्पावधीत संगणक शिकवणा-या या जन्मजात लोकशिक्षकाचे संगणक शिक्षणाचे हे मजेदार पुस्तक आहे. एखाद्या विनोदी कादंबरीप्रमाणे एका बैठकीतच तुम्ही ते जेव्हा हातावेगळे कराल तेव्हा संगणकाबाबतची तुमची भीतीच गेलेली असेल असे नव्हे, तर तुम्हाला स्वत:मध्येही एक वेगळेपण जाणवेल. संगणक विषय सोपा करणारे अंक-लिपीपेक्षाही सोपे असे सचित्र पुस्तक.
विज्ञानKa..Ka.. Computercha | क.. क.. कॉम्प्यूटरचा
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreतुला राजकारणात दीर्घ काल टिकून तुझा उत्कर्ष साधावयाचा असेल तर मजप्रमाणे भुई धरून रहाणे शिकावे लागेल. राजकारणात भुई धरून रहाण्यास पर्याय नाही. राजकारण अनेक करतात परंतू कितीही विलंब लागला तरी जो धीर, पुढील नियोजन व प्रयत्न न सोडता व न कंटाळता संधीची वाट पहातो तोच अखेर यशस्वी संधिसाधू व राजकारणी होतो. आयुष्यात काय अथवा राजकारणात काय, कोणतीही संधी सहसा एकदाच येऊन संपत नसते ती परत येण्याची वाट पाहण्याचा पेशन्स संपल्याने आपण संपतो. संधी पुन्हा येते तेव्हा आपण नसतो. तर नगरपालपद मिळवण्याच्या हातघाईस तू आला आहेस व भलतेच काही तरी करीत आहेस, तसे करू नको. तू समजतो आहेस तसा, तू निवडलेला उ.पु. सेनेत जाऊन आपले अस्तित्व नगरास जाणवून देण्याचा शॉर्ट कट म्हणजे जवळचा मार्ग नगरपालपदाकडे जाणारा नसून तो प्रत्यक्ष दंगल न करता दंगलविरोधी कायद्याखाली तुरूंगात पोचणारा आहे. शहाणा राजकारणी सनदशीर राजकारणावर अविचल श्रध्दा बाळगणारा असतो. गरज पडल्यास तो दंगली व कत्तलीही घडवितो परंतू असे काही घडविल्याच्या आरोपातून नामानिराळा रहातो. घडवणारा तो व निषेध करणारा तोच अशी दुहेरी भूमिका जो कल्पकतेने बजावतो, तोच उच्चपदी पोचतो.
कादंबरीKadambari Don | कादंबरी दोन
₹175.00Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreस्त्री-पुरुष संबंधांचा तटस्थपणे वेध घेणारी कादंबरी... स्त्री-पुरुष नात्याचा एवढा धीट व नि:संकोच शोध मराठी कादंबरीत क्वचितच कोणी घेतला असेल. या नात्याची अपरिहार्यता, सनातन गुंतागंत, पुरुषाचा उर्मट, आक्रमक अहंकार व त्यातून स्पष्ट होणारे त्याचे जन्मजात दुबळेपण व अपुरेपण आणि त्याचबरोबर वरवर दुबळ्या व परावलंबी वाटणा-या स्त्रीचे संयत, स्वयंपूर्ण व स्वयंभू असे आंतरिक सामर्थ्य विजय तेंडुलकरांचे वैशिष्टय असे की, तत्त्वचिंतकाची भूमिका न घेताही सरळ, साध्या प्रसंगांच्या मालिकांमधून ते या नर-मादी संबंधातील आदिस्तर कधी हळुवारपणे, तर कधी प्रक्षोभकरीत्या उलगडत जातात. खरे तर ही कहाणी आहे एका चौकोनी कुटुंबाची; किंवा त्या कुटुंबाच्या कुटुंबप्रमुखाची, भूकंपाप्रमाणे गदगदून हलवणा-या त्याच्या वासनामय स्वप्नाची, त्याच्यातील हट्टी पुरुषाची. पण तेंडुलकरांच्या स्पर्शाने ही कहाणी होऊन जाते ती सर्वसर्जनशील अशा आदिम स्त्री-शक्तीची.
कादंबरीKadambari Ek | कादंबरी एक
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Read more -
Sale! Add to cartतुम्ही छोटया चिंटूचे आई - बाबा असाल किंवा मिनीच्या वर्गशिक्षिका असाल किंवा पप्पूच्या खेळांचे गटप्रमुख असाल तर तुम्ही घरच्या घरी मिळणाऱ्या बिनखर्ची काडेपेटया घ्या आणि या भन्नाट कल्पना वापरून सोप्या सोप्या चित्रमय सूचना वाचून मुलांसह मोठयांनाही गुंग करणा-या अनेक वस्तू बनवा.
मुलांसाठीKadepetyanchi Karamat Part 1 | काडेपेटयांची करामत भाग १
₹30.00Original price was: ₹30.00.₹23.00Current price is: ₹23.00. Save ₹7 Add to cart -
Sale! Add to cartफ्रांझ काफ्का हा विसाव्या शतकातील एक महत्त्वाचा लेखक. त्याच्या मेटॅमॉर्फोसिस चे भाषांतर उपलब्ध करून द्यावे, याकरता डॉ. सुहास भास्कर जोशी हे अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी केलेले भाषांतर सुबोध आहे. मूळ कथेची आकृती आणि प्रकृती भाषांतरात उत्तम रीतीने आली आहे. प्रस्तुत भाषांतर मराठी वाचकांना एका अपूर्व व महान साहित्यकृतीच्या वाचनाचे समाधान देणारे आहे. याशिवाय या ग्रंथात काफ्काचा जीवनपट आणि त्याचे लेखन, मेटॅमॉर्फोसिस चे आस्वादक विश्लेषण, त्याच्याशी नाते सांगणा-या साहित्यकृतींचा परामर्श यांचा समावेश केलेला आहे. थोडक्यात, या ग्रंथाचा पैस मोठा आहे. ग्रंथाच्या शेवटी सुहास भास्कर जोशी म्हणतात, काफ्का आणि आणि मेटॅमॉर्फोसिस ला मरण नाही, किंबहुना मेटॅमॉर्फोसिस चे गारूड अजूनही कमी झालेले नाही. सुहास जोशींनी अत्यंत परिश्रम घेऊन हे गारूड मराठी वाचकांसमोर उभे केले, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन ! वसंत आबाजी डहाके
All BooksKafkacha ‘Metamorphosis’ | काफ्काचं मेटॅमॉर्फोसिस’
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart'दिलीप प्रभावळकर म्हणजे अभिनयनिपुण सव्यसाची कलावंत! हा कलावंत एक सिद्धहस्त लेखकही आहे, हे त्यांचं लेखन वाचल्यानंतर प्रकर्षानं जाणवतं. प्रभावळकरांचा विनोद हा गुदगुल्या करणारा, गालातल्या गालात हसवत प्रसन्न करणारा आहे. या विनोदाचं वैशिष्ट्य हेच की, तो कुठलीही झूल अंगावर घेत नाही की, विदूषकी पोझ घेत नाही. स्वत: प्रभावळकरच एका मुलाखतीत म्हणाले होते की, मी जेव्हा नाटकात काम करतो, तेव्हा नेहमीच्या जगण्यातले मुखवटे काढून बाजूला ठेवतो. त्यांच्या लेखनाबद्दलही हेच म्हणता येईल. ते जेव्हा लिहितात, तेव्हा मुखवटेरहित होऊन लिहितात. सामान्य माणसाला थेट भिडण्याचं सामर्थ्य आणि प्रांजळपणा हे प्रभावळकरांच्या विनोदाचं बलस्थान आहे. - जयन्त पवार साहित्य परिषदेचा चिं. वि. जोशी पुरस्कार'
ललित लेखनKagdi Ban | कागदी बाण
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartहे पुस्तक वाचायला घेताना कोणत्याही पूर्वकल्पना मनात न ठेवलेल्या बर् या, कारण यातली सगळी स्फुटं तशी एकमेकांशी जोडलेली असली, तरी स्वतंत्र आहेत. त्यांचा एखादा विशिष्ट असा ढाचा नाही. आयुष्य सजगपणे आणि भरभरून जगताना मनात आलेले विचार, भावना, कल्पना, कधी घेतलेले काही निर्णय, अवतीभोवतीची माणसं, त्यांचं वागणं, वेगवेगळी परिस्थिती असं सगळंच दिसतं यात. त्यांचं एक मिश्रण, नव्हे, रसायन बनतं. आपली आयुष्यं असतात तशी बहुरंगी, बहुढंगी. आपण त्याकडे जाणीवपूर्वक बघत असलो, तर खूप काही हाती गवसतं. मला जे गवसलं, ते मला मांडावंसं वाटलं. असंच अनेकांनी लिहिलं, तर घरगृहस्थी' नावाचं एक भव्य कोलाज सहज बनू शकेल आणि ते अतिशय वेधक अन् रंजकही होईल. हे वाचून वाचणारे लिहिते झाले, तर मला भरून पावलं, असं मी म्हणेन. सरोज देशपांडे
All BooksKahani Ghargruhasthichee | कहाणी घरगृहस्थीची
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणा-या कोयना धरणाची ही कथा आहे. एका आधुनिक तीर्थक्षेत्राच्या उभारणीची ही कथा प्रकल्पासाठी जमीन देणा-या शेतक-याचीही आहे आणि धरण बांधून वीजिनिर्मिती करणा-या कल्पक अभियंत्याचीही आहे. एका तांत्रिक प्रकल्पाची उभारणी होत असताना कोणकोणते समरप्रसंग उभे राहतात, निसर्ग रचनेत फेरफार केले जात असताना कोणकोणती संकटं सामोरी येताता आणि जिद्दी माणसं त्या सर्व आव्हानांवर मात करून कशी पुढं जातात, याची ही अत्यंत साध्या सोप्या भाषेत करून दिलेली ओळख आहे. सामान्य वाचकांनाही सहज समजेल पण जिज्ञासूंचं कुतूहलही जागं करील, अशी ही मानव आणि निसर्ग यांच्यातील नव्या नात्याची, जिव्हाळ्याची आणि रुसव्याफुगव्याचीही एक कथा आहे.
स्थापत्य आणि नगररचनाKahani Koynechi | कहाणी कोयनेची
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart
Skip to content