-
Sale! Add to cartबांधकाम क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणून कल्पकतेने ते यशस्वी करून दाखविणारे धडाडीचे उद्योजक म्हणून बी.जी.शिर्के हे महाराष्ट्रास सुपरिचित आहेत. शिर्के म्हणजे सिपोरेक्स हे समीकरण कोणास सांगावयास नको. परंतु या भव्य यशामागे केवढे अपार कष्ट, सततचे संघर्ष, उत्तमतेचा ध्यास, ध्येयसिध्दीची जिद्द, भ्रष्टाचाराची चीड व समाजसुधारणेची आच या गोष्टी दडलेल्या आहेत, हे अनेकांना माहीत नसेल. अनेक संकटांवर मात करीत व प्रतिकूल परिस्थतीशी झुंज देत स्थापत्य क्षेत्रात नवे तंत्र-मंत्र आणूनच शिर्के स्वस्थ बसले नाहीत; तर बांधकाम क्षेत्रातील गैरव्यवहार व देशाचे नुकसान करणा-या चुकीच्या पध्दती यांच्यावर ते घणाघाती हल्ले चढवीत आले. कधी शासकांचा तर कधी समव्यावसायिकांचा रोष पत्करून नुकसान सोसले; पण धडाडी, जिद्द व आशावाद सोडला नाही. म्हणून घरबांधणी क्षेत्रातील सर्व सुविधा एकाच छत्राखाली पुरविणारा जगातील एकमेव उद्योगसमूह म्हणून बी.जी.शिर्के आणि कंपनीने ख्याती मिळवली आहे. सातारा जिल्ह्यातील पसरणी या लहानशा खेडयात छोटया शेतक-याच्या घरात जन्मलेला बहुजन समाजातील हा मुलगा. शिक्षणाची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, उद्योजकतेची परंपरा नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीत साहसी जिद्दीने शिक्षण पूर्ण करून व्यवसायाचा ध्यास घेऊन त्यात यशस्वी झालेले हे विलक्षण उत्साही व्यक्तिमत्व. शिर्के यांच्या व्यक्तिगत, व्यावसायिक व सामाजिक संघर्षाची त्यांनीच आपल्या वैशिष्टयपूर्ण शैलीत सांगितलेली ही कथा उद्योजकतेची स्वप्ने पाहणा-या धाडसी मराठी तरूणांना स्फूर्तिदायक ठरेल, यात शंका नाही. त्याचबरोबर व्यवसायातील गैरप्रकारांचा त्यांनी केलेला दंभस्फोट वाचून अनेकांना धक्काही बसेल. अशी मराठीतील अपूर्व व्यावसायिक आत्मकथा, व्यक्तिगत जीवनातील संघर्षाचे संवेदवशील पदर असलेली एका उद्योगी माणसाची आत्मकहाणी.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेJiddha | जिद्द
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartजिगसॉबाबत पहिली गोष्ट म्हणजे अलीकडच्या काळात, व्यक्तिचित्रांच्याच नव्हे, तर इतर कोणत्याही पुस्तकानं मला इतकं गुंतवून ठेवलं नव्हतं. यातली बरीच माणसं माझ्या व्यक्तिविशिष्ट परिचयातली. त्यामुळे तीही उत्सुकता होती. पण लेख वाचल्यावर ह्या व्यक्तींची - अगदी जवळच्याही - नव्यानं ओळख होतेय, असं मला वाटलं. जी माणसं अपरिचित होती, तीही खूप जवळ, अगदी हस्तांदोलनाच्या अंतरावर आल्यासारखं वाटलं. ही तुमच्या लेखनाची करामत. ती मला खरोखरच थक्क करणारी होती. त्यात एक आनंददायक अपेक्षाभंग होता. इतकं अव्वल दर्जाचं लेखन तुम्ही करू शकता, हे मला माहीत नव्हतं. चित्रकार समोर ठेवलेल्या वस्तूचं वा दृश्याचं बारकाईनं निरीक्षण करतो आणि आपल्याला जाणवलेल्या रूपात, रंगात त्याचं चित्रण करतो - त्यात तटस्थता असते, पण त्रयस्थता नसते. निवड करताना त्या दृश्याशी तो एका भावबंधनाने जोडलेला असतो. विविध क्षेत्रांतील आणि पातळयांवरील व्यक्तींच्या वृत्तींची आणि कृतींची अलगद हातानं उकल करण्यात तुम्ही अशीच आप्तसंबंधांचं भान ठेवणारी तटस्थता राखलेली आहे. कोठेही भावविवशता नाही, पण कोरडेपणाही नाही. पाणलोट नाहीत, पण अधिक हृद्य वाटणारा ओलावा आहे. प्रेमादर अंध नाही, डोळस आहे. पण त्या दृष्टीतही सर्वत्र आत्मीयतेचं मार्दव आहे. आणि मुख्य म्हणजे ह्या सर्वाला समर्थक अशी नितळ, सरळ पण प्रगल्भ अशी भावशैली आहे. तिला मेकअप करण्याचा प्रयत्न (आम्ही करतो तसा) कोठेही दिसत नाही. एवढंच सांगतो, कलमाई तुमच्यावर प्रसन्न आहे. ती अधिक काही मागते आहे. - वि. वा. शिरवाडकर
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेJigsaw | जिगसॉ
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'प्रिय दिलीप जिगसॉ, जिव्हाळा, माझं संकल्पित पुस्तक जिज्ञासा या तिन्ही पुस्तकांची प्रेरणा समान आहे. माझ्या वाढत्या वयापासून थोर प्रतिभावंत आणि विचारवंत यांच्याशी माझा संबंध येत गेला. आमच्या योग्यतेतील फरक लक्षात न घेता त्यांनी मला जवळ येऊ दिलं. आमच्यामधील संवाद -विसंवाद आणि तरीही स्नेहभावना यांचा वेध घेण्याचा माझा चाळा सुरू झाला. गेली पंचेचाळीस वर्षं तुम्ही माणूसमधून आणि त्यानंतर राजहंस प्रकाशनाच्या माध्यमातून माझ्या लेखनाचा पाठपुरावा करत आलात. मराठी प्रकाशनाच्या कामात माझा ज्यांच्याशी संपर्क येत गेला त्या गंगाधर गाडगीळ यांच्यापासून विश्राम आणि मालतीबाई बेडेकर यांच्यापर्यंत युगप्रवर्तक लेखकांविषयी लिहिताना छाती दडपून जाते. वसंत कानेटकर, दुर्गा भागवत, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, ग्रेस सारीच अद्वितीय माणसं. तारा वनारसे, ज्ञानेश्वर नाडकर्णी आणि श्री.पु. भागवत ही माझी अखंड मित्रमंडळी. या सा-यांबद्दल लिहिणं हे अत्यंत जबाबदारीचं. न लिहावं तर यांच्याशी दीर्घकाल जवळीक साधता आली ती इतरांपर्यंत न पोहचवण्याचा अप्पलपोटेपणा. ते सारं लिहून वाचकांपर्यंत नेण्यात जिव्हाळा हीच माझी प्रेरणा आणि जिव्हाळा हेच माझं समर्थन. -रामदास
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेJivhala | जिव्हाळा
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Read more -
Sale! Add to cart'या पुस्तकामधे सुयोग्य व्यवहारज्ञान आहे आणि तावूनसुलाखून जमा केलेल्या अनुभवातून आलेल्या शहाणपणाची चमकती रत्ने आहेत. ज्यांना आपले जीवन अधिक सुंदर करण्यासाठी बदलायचे आहे, त्यांना नायक यांचे हे पुस्तक म्हणजे एक अनमोल भेट आहे; तर इतरांना याचे वाचन एक रोमांचक, उल्हासदायी, आनंदी प्रवास वाटेल. मला वाटते, की हे पुस्तक कॉलेजातील तरुण विद्याथ्र्र्यांच्या अभ्यासक्रमात असावे अन् त्यांच्या पालकांनी, शिक्षकांनीही वाचावे; म्हणजे या पुस्तकातील सुंदर विचार, कल्पना अन् नीतिमूल्ये विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबून त्यांच्या मनोवृत्तीला योग्य दिशेने उत्तम संस्कार देता येतील. श्री. एस. आर. काकोडकर निवृत्त आय.ए.एस. अधिकारी
संकीर्णJivnat Aanand Fulva! | जीवनात आनंद फुलवा!
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartआता माझं मला भरभर वाचता येतं. खूपखूप गोष्टी सांग, नाहीतर छानछान पुस्तकं वाचून दाखव, अशी कटकट मी आजीकडे करत नाही. तर नवीनवी पुस्तकं आणून द्या, अशी भुणभुण आईबाबांकडे लावते.
मुलांसाठीJoynache Rang | जोयनाचे रंग
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cart'टाटा समूहात आता जेआरडींची सत्ता नसून आपली आहे, हे सर्वांना दाखवून देण्याचं रतन टाटांनी ठरवलं असावं. जेआरडींनाही पटलं नाही, तरी आपलाच शब्द अंतिम राहील, हेही त्यांना दाखवून द्यायचं होतं. जेआरडींच्या मर्जीतल्या दिग्गजांच्या दृष्टीनं त्याचा अर्थ, जेआरडींनीच त्यांना देऊ केलेलं सर्वकाही गमावणं असा होता. या संदर्भात रतन टाटांनी पहिला प्रयोग माझ्यावर केला. मला वाटतं, रतन टाटा इतक्या तातडीनं आपल्या हाती प्रत्यक्ष कारभाराची सूत्रं घेतील, याचा अंदाज जेआरडींना आला नसावा... '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेJrd – Mi Pahilele | जेआरडी- मी पाहिलेले
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart -
Sale! Add to cartJui wrote a letter for the first time. To whom ? She liked her visit to the post office. She has also received a reply to her letter. What does it say ? Let's read. Jui s Letter
All BooksJui’S Letter | Jui’s Letter
₹60.00Original price was: ₹60.00.₹45.00Current price is: ₹45.00. Save ₹15 Add to cart -
Sale! Add to cartजुईने पहिल्यांदाच पत्र लिहिले आहे. ती पोस्ट ऑफिसातही जाऊन आली आणि तिने लिहिलेल्या पत्राचे उत्तरही तिला मिळाले. वाचू या. जुईचे पत्र
All BooksJuiche Patra | जुईचे पत्र
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Sale! Add to cartइतरांची आत्मसंतुष्टता अणि अल्पसंतुष्टता लेखकाला भेटू शकत नाही. इतरांसारखे मन:स्वास्थ त्याच्या वाट्याला असत नाही. अज्ञानात सुख असेल, तर लेखक बहुतेक, आयुष्य दु:खात आणि तापात काढतो. प्रिया ही दु:खे शोधत जाते. तिचे आतापर्यंतचे छोटे आयुष्य म्हणजेच दु:खांच्या शोधातला एक प्रयोग किंवा अनेक प्रयोगांची मालिका आहे. शब्द देता येतात. लिहिण्याची हौसही देता येईल. शैली तर दिली घेतली जातच असते. परंतु जगण्याचा आशय देता येत नाही. हा आशय ज्याचा त्याने कमवावा लागतो, तो मिळवण्याची ईर्षा मुळातच असावी लागते. या अर्थाने प्रिया तेंडुलकर हिचे या पुस्तकातील लेखनकर्तृत्व तिचे स्वत:चे, स्व-कमाईचे आहे.
कथासंग्रहJyacha Tyacha Prashna | ज्याचा त्याचा प्रश्न
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart
Skip to content