-
Sale! Add to cartइंजिनीयर होण्याची महत्त्वाकांक्षा पुरी करण्याची जिद्द. तत्त्वांशी तडजोड न करण्याची सचोटी. मिंधेपणा अव्हेरणारा स्वाभिमान. या बळावरच त्यांनी लढा दिला व्यवस्थेतील भ्रष्ट मानसिकतेविरुद्ध. आजही ही लढाई सुरूच आहे. आपल्या सहप्रवाशांच्या सहकार्याने ही भ्रष्ट मानसिकता कधी ना कधी नष्ट होईल, असा आशावाद जागवणारे आत्मकथन.
All BooksKalokhatoon Ujedakade | काळोखातून उजेडाकडे
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cart‘काळ्यानिळ्या रेषा' हे केवळ एका चित्रकाराचे आत्मकथन नाही, तर हा समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार आहे. राजू बाविस्करांनी आधी आपल्या अभिव्यक्तीसाठी रेषा वापरली, रंग वापरले आणि आता आपल्या अनुभवांना शब्दांमधून वाट करून दिली आहे. आपल्या वाट्याला आलेले गावकुसाबाहेरचे उपेक्षेचे जगणे आणि झगडणे समंजसपणे उलगडत ते वाचकांना आपल्या चित्रांच्या दुखऱ्या मुळांपर्यंत घेऊन जातात. एका सर्जनाची मुळे दुसऱ्या माध्यमातील सर्जनप्रक्रियेत गवसणे हा अत्यंत विरळा असा अनुभव त्यांना आला. व्यक्तिचित्रणाच्या अंगाने जाणाऱ्या या आत्मकथनातून आपल्यालाही त्यामुळे अंतर्मुख करणारा अस्सल वाचनानुभव मिळतो. प्रफुल्ल शिलेदार
All BooksKalyanilya Resha | काळ्यानिळ्या रेषा
₹690.00Original price was: ₹690.00.₹518.00Current price is: ₹518.00. Save ₹172 Add to cart -
Sale! Add to cartश्री.सप्रे हे एक कामगार क्षेत्रामधील मान्यता पावलेले प्रशिक्षक आहेत. त्यांना या क्षेत्रातील भल्याबु-या प्रवाहांचे जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळालेली आहे; तसेच त्यांचे या विषयावरील वाचन,मनन आणि चिंतनही प्रगाढ आहे. सप्रे यांचे हे पुस्तक अगदी वेगळे, काम या विषयाकडे अगदी भिन्न पातळीवरून बघणारे आहे. काम हे केवळ मोबदला मिळवण्याचेच साधन नव्हे, तर आत्मसंतुष्टीकरता करण्याचे योगसाधनही आहे. या मूलभूत पण नेहमी विसरल्या जाणा-या मूल्यांचे विवेचन त्यात आहे. या मूल्यांचे बीजारोपण व संवर्धन करण्याबाबतची जबाबदारी कुटुंबाची असते. याचे स्मरणही सप्रे या पुस्तकात घडवतात. हे पुस्तक कामासंबंधीचे नीतिशास्त्र आहे. सुरेश नाडकर्णी
मार्गदर्शनपरKamachi Kimaya | कामाची किमया
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Add to cart -
Sale! Add to cartएकोणिसाव्या शतकात कृपाबाई सत्यनादन यांनी इंग्रजी कादंबरी लिहिली, ही घटनाच महत्वपूर्ण. मुंबई इलाख्यातील धर्मांतरित जोडपे हरीपंत आणि राधाबाई. त्यांची कन्या कृपाबाई. विवाहानंतर कृपाबाई मद्रास प्रांतात राहिल्या. बुद्धीचे वरदान लाभलेल्या कृपाबाईंनी प्रकृती अस्वास्थ्याला तोंड देत लेखन केले. मुस्लिम शाळाही काढली. कमला या त्यांच्या पुस्तकरूपाने प्रकाशित झालेल्या पहिल्या कादंबरीचा हा अनुवाद. या कादंबरीत एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील कौटुंबिक - सामाजिक वातावरणाचे दर्शन घडते. पारंपारिक चौकटीतून बाहेर पडून नवे भान स्वीकारणारी ही नायिका ! रोहिणी तुकदेव यांच्या रसाळ शैलीमुळे सहज सुंदर झालेला हा भावानुवाद ....
कादंबरीKamala | कमला
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartस्नेहाची आजी कोकणात राहते. पहाटे पाचपासून रात्री दहापर्यंत ती सतत कामात बुडालेली असते. आजी कोणकोणती कामे करते आणि कोकणातला निसर्ग कसा आहे, ते वाचू या, या पुस्तकात. कामसू आजी
All BooksKamasoo Aaji | कामसू आजी
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cart'अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजांपैकी वस्त्रांची गरज भागवण्यासाठीचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे कापूस. या कापसाचा रंग पांढरा असला, तरी त्याच्या पेरणीपासून व्यापारापर्यंत अन् सरकीपासून सुतापर्यंत तो अनेक रंगांमध्ये रंगून जातो. या सगळ्या रंगीबेरंगी धाग्यांचा माहितीपूर्ण आढावा घेणारे हे पुस्तक. दैनंदिन जीवनात अंगावर वागवण्याचे कपडे एवढेच या कापसाचे स्थान नाही, तर सामान्य नागरिकापासून देशाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत अनेक बाबींवर परिणाम करणारा घटक म्हणजे हा कापूस. सुमारे चार दशकांहून अधिक काळ कापसाच्या विविध धाग्यांशी घट्ट बांधले गेलेले कापूसतज्ज्ञ राजीव जोशी सांगत आहेत कापसाची बहुपदरी अन् बहुरंगी कथा.
कृषिविचारKapus – Sarkipasun Sutaparyant | कापूस
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartआयुष्याचे ध्येय ठरवताना... कधी कधी स्वतःची आवडच ठाऊक नसते. नव्या संधी कुठे उपलब्ध आहेत, हेही ठाऊक नसते. त्यामुळे आपले ध्येय काय आहे, हेही स्वतःला ठरवता येत नसते. या उलट... कधी कधी स्वतःची आवड स्वतःला पक्की ठाऊक असते. नव्या संधी कुठे खुणावत आहेत, हेही ठाऊक असते. आपले ध्येय काय आहे हेही मनाशी पक्के ठरलेले असते. पण ध्येयप्राप्तीचा नेमका मार्ग मात्र ठाउक नसतो. अशा वेळी गरज असते अनुभवी मार्गदर्शकाची. अशा वेळी गरज असते या पुस्तकाची. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करणारे हे पुस्तक त्यांच्या पालकांनाही नव्या वाटा दाखवील.
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Kariyar Kase Nivdave? | करिअर कसं निवडावं?
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartही केवळ कर्करोगाची जुजबी माहिती पुरवणारी तोंडओळख नाही, तर ही आहे कर्कविज्ञानातील काही निर्णायक क्षणांची रोमांचक गाथा ! या क्षणांनी, या घटनांनी अन् त्या घडवणाऱ्या कर्तबगार संशोधकांनी माणसाच्या जगण्याला सुखकारक वळण दिले. कर्कविज्ञानाशी संबंधित संकल्पना अन् उत्क्रांतिकारी शोध सुबोध अन् रंजक भाषेत मांडणारे हे पुस्तक वाचून प्रत्येकाचे कर्करोगाबद्दलचे आकलन विस्तारेल. सर्वसामान्यांच्या मनाला भेडसावणाऱ्या अनेक शंकांच्या योग्य निरसनाने गैरसमज दूर करणारी - या समस्येचे यथातथ्य रूप नजरेसमोर आणून समंजस अन सकारात्मक भाव जागवणारी -
वैद्यकीयKarkavidnyanachi Goshta | कर्कविज्ञानाची गोष्ट
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartभारतीय विद्यापीठातून विज्ञान विषयातली डॉक्टरेट मिळवणाऱ्या या पहिल्याच महिला. ज्या काळात विद्यापीठातल्या प्रयोगशाळांमधल्या सुविधा अपुऱ्या होत्या, त्या काळात अपार कष्ट घेत आणि स्वत: पदरमोड करून त्यांनी औषधी वनस्पतिशास्त्राच्या क्षेत्रात महत्वपूर्ण संशोधन केले. या भारतीय महिला वैज्ञानिकेची ही प्रेरक कहाणी. कर्मयोगिनी वैज्ञानिक असीमा चटर्जी
All BooksKarmayogini Vaidnynik Asima Chataraji | कर्मयोगिनी वैज्ञानिक असीमा चटर्जी
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartया पुस्तकातल्या कलाकृतींसाठी खालील गोष्टींची आवश्यकता आहे. मुलांची कल्पनाशक्ती, थोडासा फावला वेळ, हौस आणि धडपड. पालकांची कल्पकता, मुलांना वेळ देण्याची तयारी आणि चिकाटी. याबरोबरीनं फक्त कागद, कात्री आणि सुईदोरा.
मुलांसाठीKarun Tar Paha | करून तर पहा
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart
Skip to content