-
Sale! Add to cartराधा डहाके नावाची एक मुलगी विदर्भातील सावतेली समाजात, आडबाजूच्या एका खेडेगावात, जन्माला आली. परिस्थितीचे टक्केटोणपे खात ती लंडनला पोहोचली. तिला तिथली भाषा येत नव्हती. माणसं-संस्कृती-परंपरा, इतिहास, काही माहीत नव्हतं. इथही ती निरक्षरच होती; त्यामुळं लंडन हे गावाचं नाव आहे की देशाचं, असा संभ्रमही बरेच दिवस तिच्या मनाला असायचा ! पण कालांतरानं ती लंडन शहरातील एक सन्माननीय व्यक्ती झाली. तिनं भरपूर पैसे मिळवले. भरपूर खर्चही केले. आपली माणसं, आपला धर्म, आपली जीवनपद्धती यांचं एक मूर्त चित्र स्वत:च्या आयुष्यात तिनं दाखवून दिलं... तिनं जीवनाचा निरोप घेतला तेव्हा तिच्या शवावर वाहण्यासाठी लंडनच्या गो-या मेयरनं मेयर ऑफ बारनेटनं फुलं पाठवली आणि लंडनमधल्या तिच्या भारतीय मुलांनी तिची शवपेटी प्रेमपूर्वक आपल्या खांद्यावर वाहून नेली !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेKahani Londonchya Aajibainchi | कहाणी लंडनच्या आजीबाईंची
₹270.00Original price was: ₹270.00.₹203.00Current price is: ₹203.00. Save ₹67 Add to cart -
Sale! Add to cartही कादंबरी वर्तमान राजकारणाच्या वास्तवाला सोलून काढते. स्वातंत्र्योत्तर राजकारण स्वप्नाळू होते, पण विषाक्त नव्हते. विद्यमान राजकारण हे जातीजातींत, धर्माधर्मांत तंटे-बखेडे निर्माण करणारे आणि अराजकतेच्या दिशेने वेगाने जाणारे आहे. त्यामुळे देश अन् समाजाच्या एकसंधतेला तडे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असे राजकारण भयावह होण्याची शक्यता बळावते. अभिव्यक्ती अन् मतस्वातंत्र्य नाकारले जाणे, ही हुकूमशाहीच्या पावलांची नांदी असू शकते. राजकुमार बडोले यांनी विद्यमान राजकीय पट सिद्धहस्त लेखकाच्या प्रज्ञेने मांडला आहे. प्रज्ञावंत हा जुलमी व्यवस्थेचा कधीही बटीक नसतो. मानवाच्या मुक्तीचे हुंकार त्याच्या अभिव्यक्तीत असतात. मानवी प्रतिष्ठेची जोपासना ही त्याची अभिलाषा असते. मनुष्याचे स्वयंभूत्व ही त्याची प्रार्थना असते. ही कादंबरी मानवमुक्तीचा गजर करते. राजकुमार बडोले यांनी प्रत्यक्षपणे अनुभवलेले सत्ताकारण आणि सामान्य माणसाला जाणवणारी भारतीय व महाराष्ट्रीय राजकारणाविषयीची संवेदनशून्यता ठसठशीतपणे या कादंबरीतून व्यक्त होते. डॉ. ऋषीकेश कांबळे
All BooksKahoor : Eka Vadalache | काहूर एका वादळाचे
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cart'कलम ३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक व अकल्पित निर्णयामुळे उठलेले वादळ अजूनही घोंघावत आहे आणि त्यात अनेक बाबी दृष्टीआड होत आहेत वा केल्या जात आहेत. १९४७-४८च्या काश्मीरमधील युद्धजन्य परिस्थितीपेक्षाही शेख अब्दुल्लांच्या दुराग्रहामुळे कलम ३७० राज्यघटनेत समाविष्ट करावे लागले. महाराजा हरिसिंग यांनी हिंदुस्थानात संमीलित होण्यास संमती दिल्यानंतरही काश्मीरच्या जनतेचे मत अजमावावे, हा काँग्रेसचा आग्रह होता; पण त्याची परिणती ३७०व्या कलमात होईल आणि शेख अब्दुल्लांच्या अवास्तव मागण्या भारताच्या राज्यघटनेचा विपर्यास करतील, ही कल्पनाही कोणी केली नव्हती. नेहरूंना माणसांची पारख नव्हती. काश्मीरसाठी वेगळी राज्यघटना, वेगळे नागरिकत्व, वेगळा ध्वज आणि सदर-इ-रियासत व पंतप्रधान ही पदे, अशा बहुतेक सर्व मागण्या दिल्ली करारान्वये मान्य झाल्या. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा प्रश्न लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारला विचारला होता. तोच प्रश्न तत्कालीन सरकारला विचारणे आवश्यक होते. गेली ७० वर्षे अनेक प्रयत्न करूनही काश्मीर प्रश्नाची सोडवणूक होऊ शकलेली नाही; कारण शेवटी सर्व चर्चा कलम ३७० वर येऊन थांबत असे. हे कलम रद्द केल्याने निर्माण झालेले प्रश्न वैधानिक व भावनिक आहेत. त्यांची सखोल चर्चा या पुस्तकात केली आहे.
इतिहासKalam 370: Aagraha Ani Duragraha | कलम ३७० : आग्रह आणि दुराग्रह
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreकलावंत काय आणि विचारवंत काय ते प्रतिभावंत असतातच. पण बरेचसे अहंमन्य, त-हेवाईक, विक्षिप्त, व्यसनी, दुबळे ! ते स्वत:तच मश्गुल असतात. ते प्रेमात होरपळून निघतात. दारिद्रयात पिचून जातात. आपल्या उत्कट प्रतिभेशीच त्यांच्या अनावर निष्ठा असतात. आपल्या प्रतिभाशाली निर्मितीतून ते जगाच्या इतिहासात आपलं नाव लखलखत ठेवतात. पण जगाच्या व्यवहारात मात्र ते नगण्य ठरतात. वेदना आणि संवेदनांच्या वावटळीत सापडलले हे प्रतिभेचे प्रेषित कधी आकाशाएवढे प्रचंड भासतात; तर कधी खसखशीच्या दाण्याएवढे छोटे वाटतात. त्यांच्या समग्र जीवनाचे, त्यातल्या जीवघेण्या संघर्षाचे, त्यांच्या उत्तुंग झेपांचे आणि एक सर्वसामान्य माणूस म्हणून त्यांच्या वाटयाला आलेल्या सुखदु:खाचे चित्रण करणारे पुस्तक कलावंत आणि विचारवंत
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेKalawant Aani Vicharvant | कलावंत आणि विचारवंत
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Read more -
Sale! Add to cartद बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल ही भारतीयत्वाने प्रेरित कलाचळवळ १९२०च्या सुमारास सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये अस्तित्वात आली. बंगाल रिव्हायव्हलिस्ट स्कूल या गाजलेल्या कलाचळवळीच्या तुलनेत मुंबईतील ही कलाचळवळ दुर्लक्षित राहिली. प्राचीन काळापासून ते भारतीय आधुनिक कलाप्रवाहापर्यंतचे या चळवळीचे एकमेकात गुंफलेले धागे चित्रकाराच्या मर्मदृष्टीने आणि कलाअभ्यासकाच्या वस्तुनिष्ठतेने सुहास बहुळकरांनी उलगडून दाखवले आहेत. ब्रिटिशांच्या आगमनानंतरची भारतातील वास्तववादी कला आणि आधुनिक कला यांच्यातील दुवा म्हणूनही या कलाचळवळीकडे त्यांनी पाहिले आहे. कला आणि संस्कृतीच्या सर्वच अभ्यासकांना आणि जिज्ञासू वाचकांना यातून बरेच काही मिळेल.
All BooksKaleteel Bharatiyatvachi Chalval | कलेतील भारतीयत्वाची चळवळ
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'आता, मघाशी, आज-काल-उद्या पासून इ.स.पूर्व ५३२ वर्षे तीस लाख सात कोटी दोन अब्ज वर्षांपर्यंत अनेक परिमाणे, अनेक पध्दती. सा-यांचा उद्देश एकच काळाचे मोजमाप. व्यक्तीच्या जन्ममृत्युला कवटाळणा-या, समाज अन् संस्कृतींच्या उदयास्ताला साक्षी असणा-या अन् या सा-याच्या अल्याडपल्याड दशांगुळे उरणा-या काळाचे मोजमाप. कसा झाला काळाच्या संकल्पनेचा उदय? कशा बदलत गेल्या त्याच्या मोजमापाच्या रीती? या सा-यांचा रंजक मागोवा.'
विज्ञानKalganana | कालगणना
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Read more -
Sale! Add to cart'भारतीय शास्त्रीय संगीत के क्षेत्र में अपनी बहुमुखी प्रतिभा से कभी न मिटनेवाली नाममुद्रा अंकित करनेवाले युगप्रवर्तक संगीतकार, वाग्गेयकार, गायक पंडीत कुमार गंधर्व की नब्बेवी जन्मजयंती के उपलक्ष्य में कालजयी कुमार गंधर्व यह ग्रंथ दो भागों में संपादित किया गया है। पंडित कुमार गंधर्व की प्रखर प्रतिभा, प्रयोगशीलता के संदर्भ में उनकी सांगीतिक विचारशीलता का मर्म समझाने का प्रयास इन ग्रंथो में किया गया है। हिंदी-अंग्रेजी(संयुक्त) एवं मराठी भाषाओं में छपे यह दोनों ग्रंथ स्वतंत्र हैं। इनमें समाविष्ट किये गए लेख भाषांतरित न होकर भिन्न भिन्न है। कभीभी, किसीभी पृष्ठ को खोलकर पढने का आनन्द पाठकों को इन संग्राह्य ग्रंथों के माध्यम से मिल सकेगा ।
संगीतKaljayi Kumar Gandharva (Hindi-English) | कालजयी कुमार गंधर्व (हिंदी-इंग्रजी)
₹1,000.00Original price was: ₹1,000.00.₹750.00Current price is: ₹750.00. Save ₹250 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'भारतीय शास्त्रीय कंठसंगीताच्या क्षेत्रामध्ये आपल्या बहुमुखी प्रतिभेची कधीही न पुसता येणारी ठाशीव मुद्रा उमटविणारे श्रेष्ठ वाग्गेयकार, संगीतकार व गायक म्हणजे कुमार गंधर्व ! त्यांच्या चैतन्यपूर्ण अस्तित्वाचा, प्रयोगशीलतेचा आणि वैचारिकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न कालजयी कुमार गंधर्व या मराठी आणि हिंदी-इंग्रजी (संयुक्त) अशा द्विखंडात्मक ग्रंथामध्ये केला आहे. प्रत्येक खंड स्वतंत्र आहे. यामध्ये समाविष्ट केलेले लेख वेगवेगळे आहेत. भाषांतरित नाहीत. कोणाही रसिकाला कधीही, कोणतेही पान उघडून वाचावासा वाटेल, असा हा संग्राह्य ग्रंथ आहे.
संगीतKaljayi Kumar Gandharva (Marathi) | कालजयी कुमार गंधर्व (मराठी)
₹1,000.00Original price was: ₹1,000.00.₹750.00Current price is: ₹750.00. Save ₹250 Read more -
नाटक / नाट्यविषयक
Kalmudra- Marathi Natyasrushti | कालमुद्रा- मराठी नाट्यसृष्टीतील
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Read more -
Sale! Add to cartश्रीनिवास रामचंद्र उपाख्य अण्णासाहेब बोबडे यांची कविता विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली. १८८९ ते १९३४ असे अवघ्या चव्वेचाळीस वर्षांचे आयुष्य त्यांना मिळाले. केशवसुतांचा मोठा प्रभाव असणारा हा काळ! मात्र याच काळातली असली तरी वीर आणि शृंगार अशा दोन्ही रसांचा प्रमत्त आविष्कार करणारी त्यांची कविता स्वतंत्र प्रतिभेची कविता आहे. विविध ज्ञान विस्तार; किंवा वागीश्वरी सारख्या नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या, तरी वाङ्मयविश्वातील झगमगाटापासून ते स्वाभाविकपणे दूर होते. त्यांच्या कविता संग्रहरूपाने प्रथम प्रकाशित झाल्या १९३७मध्ये. म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी. एकीकडे संस्कृत काव्याचे संकेत सांभाळणारी आणि दुसरीकडे पोवाडे आणि लावण्यांची कास धरणारी, एकीकडे हरहर महादेव चा घोष घुमवत वीरश्रीला आवाहन करणारी आणि दुसरीकडे पहिल्या चुंबनाचा आनंदानुभव सांगत प्रेमाच्या वृंदावनात रास रचणारी बोबडे यांची कविता आहे. समरांगणात आणि रतिरंगणात ती सारख्याच चैतन्याने चमकते. ओळख झाली ज्यास स्वत:ची वेद तयास कळो न कळो रे असे अंतर्लीन माणसाला अभयाचे मौलिक आश्वासन देणारी ही कविता खरे तर मराठी वाङ्मयाभिरुचीच्या प्रवासातली एक लक्षणीय कविता आहे. अरुणा ढेरे
All BooksKalo Na Kalo Re | कळो ना कळो रे
₹380.00Original price was: ₹380.00.₹285.00Current price is: ₹285.00. Save ₹95 Add to cart
Skip to content