-
Sale! Add to cartभारतीय इतिहासाला निर्णायक राष्ट्रीय वळण लावणारे महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! त्यांचे व्यक्तिमत्त्व समाजाला नेहमीच प्रेरणा देत आले. मध्यंतरीचा काही काळ सोडला, तर सतत त्यांची प्रतिमा देशीविदेशी कलाकारांना आव्हान देत आली, आवाहन करीत आली. असंख्य चित्रकारांनी छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातले अगणित चित्तथरारक, रोमहर्षक प्रसंग चितारले; तर कित्येक शिल्पकारांनी कधी अर्धाकृती, कधी पूर्णाकृती, तर कधी अश्वारूढ शिवाजी महाराज घडवले. त्यांच्या त्या त्या कलाविष्कारामागे दडलेल्या संघर्षकथासुद्धा तितक्याच लक्षणीय आहेत. कुणाची स्वप्ने साकार झाली, गौरवली गेली; तर कुणाकुणाची स्वप्ने भंग पावली, अधुरी राहिली. अशा असंख्य कथांचे आणि तशाच व्यथांचे हे अनोखे संकलन. सर्वांच्या केंद्रस्थानी आहेत, ते मात्र हिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ! भारतीय कलेतिहासाचे साहित्यिक जतन-संवर्धन करण्याचा ध्यास घेतलेल्या सुहास बहुळकरांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रकथी शैलीतले हे पुस्तक म्हणजे इतिहास, चित्रकला आणि शिल्पकला या तिन्ही क्षेत्रांतील असंख्य मान्यवरांच्या अतुलनीय कार्यकर्तृत्वाला दिलेली मानवंदनाच आहे !
All BooksKatha Shivchitranchya, Vyatha Shivasmarakachya ! | कथा शिवचित्रांच्या व्यथा शिवस्मारकांच्या
₹1,100.00Original price was: ₹1,100.00.₹825.00Current price is: ₹825.00. Save ₹275 Add to cart -
Sale! Add to cartअत्रे, पु.ल., पुरंदरे, भोसले आणि शेवाळकर हे मराठी वक्तृत्वाचे मानदंड ! ही सारी वक्तृत्वशिखरेच; पण एक शिखर दुसऱ्यासारखे नाही हे या शिखरांचे वैशिष्ट्य. प्रत्येकाची वक्तृत्वशैली निराळी, विचारप्रतिपादनाची रीत निराळी, आपल्या शब्दश्रीमंतीतून माय मराठीला ऐश्वर्य प्रदान करण्याचा बाज निराळा आणि हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचा वशीकरण मंत्रही वेगळाच. या वाणीच्या उपासकांनी वाग्देवतेच्या गाभाऱ्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. रसिक अन् चोखंदळ श्रोत्यांनीही आपल्या हृदयसिंहासनावर त्यांना दिले अढळपद. या पाच वक्तृत्वशिखरांचे विहंगम दर्शन कथा त्यांच्या वक्तृत्वाची
भाषाविचारKatha Tyanchya Vaktrutvachi | कथा त्यांच्या वक्तृत्वाची
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cart'भारताय जीवनधर्माचा प्राणस्वर स्खलनशील माणूस अन् चिरंतन मूल्ये यांचा संघर्ष मंगेश पाडगांवकर कथारूपात सांगत आहेत तीन हजार वर्षांची अदभुत रसयात्रा
तत्वज्ञान / व / धर्मKatharup Mahabharat (Khanda 1 Ani 2) | कथारूप महाभारत (खंड-१ व २)
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cart'हिमांशु कुलकर्णी की रचनाएँ उनके जज्बात और एहसासात का आइना है... उन्हें जब जहाँ जैसा दिखाई दिया है, उसे अपने शब्दों में बयान किया है। उनके इज़हार का फार्म गज़ल है। इन गज़लों में, परम्परागत मीनाकारी नहीं है, शब्दों की प्रचलित लयकारी से भी कहीं कहीं आज़ादी बरती गयी है, मगर जो विशेषता इन्हें रचनात्मक सौंदर्य से सजाती है, वह कवि की ईमानदारी है। उन्होंने जैसा जिया है, वैसा लिखा है। अपने अनुभवोंपर विश्वास और उनको बयान करने की निरन्तर प्यास ने साधारण लफ्ज़ोंको जगमगाया है। और पढने वालों में यह एहसास जगाया है... कि सोना खरा हो तो उसे किसी टकसाल की मुहर की ज़रूरत नहीं होती। मराठी और उर्दू के इस इंटरएक्शन ने न सिर्फ़ उनके अंदाज़ में ताज़ाकारी पैदा की है - एहसासातो जज्बात की ऐसी सूरतें भी कामयाबी से उभारी हैं... जो उनकी गज़लों की अलग से पहचान कराती हैं। निदा फ़ाज़ली
कवितासंग्रहKatra Katra Gam | कतरा कतरा गम
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartविज्ञानात कुणी छोटा-मोठा, खालचा-वरचा नाही. नवीन कल्पनांचा झरा कुठेही फुटू शकतो. न सुटणारी कोडी एखादा पोरच सोडवून जातो. विज्ञानाचा प्रवाह कुठूनही कुठेही वाहू शकतो. वैज्ञानिकांनी, प्राध्यापकांनी, विज्ञानलेखकांनी विज्ञानशिक्षण शिकवायचं, लोकांसमोर मांडायचं आणि विद्यार्थ्यांनी, सामान्य वाचकांनी त्यांच्यापासून फक्त शिकायचं या समजुतीला जोरदार तडा देणा-या अनुभवांचं हे कथन. विद्यार्थी, गृहिणी, शेतकरी, आदिवासी, अशिक्षित माणूसही संशोधन करू शकतो, ज्ञान-विज्ञानात मोलाची भर टाकू शकतो. हे केवळ इतिहासातच घडलं आहे असं नाही; तर आजही नित्य नेमानी घडू शकतं, घडत आहे. मोठमोठ्या उपकरणांनी समृद्ध प्रयोगशाळा असतात विद्यापीठे अन् संशोधनसंस्थांमध्ये. सामान्य माणसाची प्रयोगशाळा आहे कट्टा . प्रत्येकाला सर्वकाळ आणि सर्वत्र उपलब्ध असलेली. अशा कट्टा प्रयोगशाळेतून विज्ञानक्षेत्र अधिक निकोप आणि लोकाभिमुख करणारे
All BooksKatta Model | कट्टा मॉडेल
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cartसवंग सुख ही संस्कृती, अधिकाधिक सत्ता हे साध्य, नीतिनिरपेक्ष स्पर्धा हे साधन अशा कोलाहलाने भरलेल्या वर्तमानात वैचारिकतेचा संकोच होतोय. मुक्त विचारांशी शत्रुत्व म्हणजे हुकूमशाहीला अन् झुंडशाहीला आमंत्रण. ही वेळ आहे विचारांचे जागरण करण्याची. म्हणून वेद-उपनिषदांपासून फुले-आगरकरांपर्यंत, सॉक्रेटिस-प्लेटोपासून चॉम्स्की-डेरिडापर्यंत पूर्व-पश्चिमेतील प्रमुख विचारवंतांचा अन् त्यांनी मांडलेल्या विचारधारांचा वेध.
ललित लेखनKavita Mahajan
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart -
Sale! Add to cartहिमांशुंच्या कवितेत, पळसपानांचे द्रोण, प्राजक्त, रातराणी, फुलपाखरं जशी येतात तसंच सलाइन आणि स्कॉचच्या बाटल्या येतात, इन्फ्रारेड डोळे येतात आणि सेपीया रंग येतात. अर्मानीसारख्या उंची, अभिनव सुगंधाचा उल्लेख येतो आणि केसांचा नायगारा येतो. ह्या सगळयांना संदर्भ असतो कवीच्या एका वेगळ्याच उत्कट, जिवंत अनुभवाचा. मला ह्या कविता फार आवडल्या म्हणून कौतुकाचे, आशीर्वादाचे हे चार शब्द लिहिले, इतकंच. इंदिरा संत
कवितासंग्रहKavita Udhwasta Ratrinchya | कविता उद्ध्वस्त रात्रींच्या
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreनवकवी मानल्या जाणा-या विंदा करंदीकरांनी अन्य नवकवीपेक्षा वेगळी अशी विज्ञाननिष्ठ वास्तववादी कविता प्रथमच लिहिली. 'इहवादाचा स्वीकार आणि पारंपारिक आध्यात्मिक मूल्य व्यवस्थेला दिलेले प्रामाण्य यांत आपले जीवन दुभंगलेले आहे. आपल्या अनेक समस्यांचा उगम या दुभंगलेपणातच आहे. म्हणून पारंपारिक आध्यात्मिक मूल्यांना नाकारून इहवादाबरोबरच इहवादी मूल्य व्यवस्थेचा स्वीकार केल्याशिवाय आपले जीवन सुसंगत आणि अर्थपूर्ण बनणार नाही,' या जाणिवेतून त्यांच्या सामाजिक कवितेचा जन्म झालेला आहे. वैज्ञानिक इहवादी भूमिकेतून लिहिलेली स्त्रीपुरुषांमधील शृंगारसंबंधाविषयक कविता हे विंदांच्या कवितेचे खास वैशिष्ट्य. त्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोणाच्या आधारे स्त्री आणि पुरुष यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या नैसर्गिक जीवनोद्दष्टींचा वेध घेतला आहे. विंदा स्त्रीकडे विश्वातील सर्जनशक्तीचे प्रतीक म्हणून पाहतात. या जगतात स्त्रीचे अस्तित्त्व हेच प्राथमिक असून तिच्या अस्तित्त्वामुळेच पुरुषालाही 'पुरुष' म्हणून अस्तित्त्व लाभले आहे. विंदांच्या कवितेमुळे मराठी कवितेत या जाणीवा प्रथमच साकार झाल्या, त्यामुळे त्यांच्या कवितेला असाधारणत्व लाभले आहे. आततायी अभंग, संहिता, मुक्त सुनीते, तालचीत्रे, सूक्ते, गजल, निर्वाणीची गजल, विरूपिका असे काव्यारुपांचे अनेक प्रयोग विंदांनी केले, त्यामुळे मराठी काव्याक्षेत्र समृद्ध झाले आहे. विंदांच्या काव्य वैशिष्ट्यांची सांगोपांग आणि मार्मिक मीमांसा करणारा, काव्यरसिकांना, काव्याच्या अभ्यासकांना निश्चितच उपयुक्त ठरणारा ग्रंथ -
All BooksKavitayan | कवितायन
₹490.00Original price was: ₹490.00.₹368.00Current price is: ₹368.00. Save ₹122 Read more -
Sale! Add to cart'The Woods are lovely dark and deep But I have promises to keep And miles to go before I sleep And miles to go before I sleep पं. जवाहरलाल नेहरूंच्या टेबलावर कायम असणाऱ्या या ओळी. त्या ओळींचा कवी होता रॉबर्ट फ्रॉस्ट. जागतिक साहित्यात आपला ठसा उमटवणारा हा प्रतिभावान अमेरिकन कवी एकीकडे अमेरिकेचा सर्वात लाडका आणि सर्वश्रेष्ठ कवी मानला गेला, तर दुसरीकडे त्याच्यावर पराकोटीची - अगदी आग पाखडणारी टीकाही झाली. मग खरा रॉबर्ट फ्रॉस्ट होता तरी कसा ? कवीचं जीवन अन् त्याची कविता यांच्या परस्परसंबंधाचा वेध घेणारे कवितेच्या शोधात
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेKavitechya Shodhat | कवितेच्या शोधात
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartआपल्या मुलांशी बोलत असताना, तसंच त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना, आजही पालकांची गाडी एका विशिष्ट, नाजूक पण महत्त्वाच्या मुद्दयाला अडते लैंगिकतेच्या. म्हणजे या बाबतीत बोलायला हवं, हे त्यांनाही जाणवत असतं; पण अडचण असते ती काय सांगू , कसं सांगू! याची. त्याचवेळी याबाबत कोणाशी बोलावं, हेही कळत नाही. हे जाणूनच, गेली पंचवीसहून अधिक वर्षं लैंगिकता शिक्षणाबाबत काम करणा-या साठे पतिपत्नींनी मोकळेपणानं, पण संकोच जाणवणार नाही अशा सहज भाषेत साधलेला हा संवाद, आजच्या पालकांच्या मनामधील अनेक संदेह दूर करेल आणि पालकत्वाच्या त्यांच्या या वाटचालीत त्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल. केवळ आई नंच नव्हे, तर बाबा नंही वाचलंच पाहिजे, असं हे पुस्तक !
मार्गदर्शनपरKay Sangu? Kasa Sangu ? | काय सांगू? कसं सांगू?
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart
Skip to content