-
Sale! Add to cartबाईचं मन... एक अथांग डोह... बाईपण सुरू होताना... बाईपण सिध्द होताना... बाईपणाचं सार्थक वगैरे होताना... बाईपणातून सुटताना... बाईपणाचं ओझं पेलताना... बाईपणाचा अभिमान मिरवताना... आधुनिक बाईच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावरचे तिचे मनोव्यापार रेखाटणारं पुस्तक काय तुझ्या मनात ? वाचायलाच हवं. प्रत्येक प्रौढ बाईनं. बाईच्या सहवासातल्या पुरूषानं.
वैद्यकीयKay Tuzya Manat? | काय तुझ्या मनात?
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Add to cart -
Sale! Add to cartही कथा आहे बॅ. एम. ए. जिना नावाच्या एका माणसाची ! हिंदू-मुसलमानांमधील तेढ कायमची संपवण्यासाठी केल्या गेलेल्या एका प्रयोगाच्या फसगतीची ही विचारप्रवर्तक कथा आहे... जन्मत:च दुभंगलेला पाकिस्तान नावाचा रक्तबंबाळ देश पदरात घेणा-या एका भारतीय देशभक्ताची ही दारुण शोकांतिका आहे...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेKayadeaazam | कायदेआझम
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cartया पानांमध्ये कविता नाही! एक ठणक आहे. एक ठणक निघते काळजातून अन् जाऊन बसते कागदावर तुम्ही कविता' म्हणता तिला...'' ही ठणक आहे माणसाला, माणूसपणाला कलंकित करणार् या घटना अन् प्रसंगांची! ही ठणक आहे जागतिकीकरणातून समोर ठाकलेल्या प्रश्नांची, मानवी जीवनव्यवहारातील मूल्यर् हासाची ! भयकंपित करणारे बदल अन् बाजारीकरणातून निर्माण झालेल्या शोषणाच्या नवनव्या तर् हांनी बरबटलेला जडशीळ भोवताल पेलता पेलता घायाळ झालेला समकाळ म्हणजे - खांदे सुजलेले दिवस
All BooksKhande Sujalele Diwas | खांदे सुजलेले दिवस
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'एक निसर्गरम्य खेडं. तिथं वाढणारा एक किशोरवयीन मुलगा. त्यानं पाळलेली खार. समृद्ध निसर्ग, पीकपाणी, रानमेवा, जनावरं, करामती मित्र यांत रमलेला, गुंतलेला मुलगा. एके दिवशी गावाच्या नदीवर धरण बांधणा-या मशिनरीची घरघर, थोड्याच दिंवसात अख्खा गावगाडा हलतो. नांदत्या वस्त्या उठतात. मुलगा कुटुंबासह गाव सोडतो. ती खार मात्र तिथंच राहते. उमलत्या हळव्या वयातल्या उलथापालथीची सहजपणे सांगितलेली खरी गोष्ट.
पुरस्कार प्राप्त पुस्तकेKharichya Vata | खारीच्या वाटा
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartमुलांबरोबर प्रत्यक्ष खेळण्याचा अनुभव म्हणजे नव्या नव्या कल्पनांचा खजिना लुटणंच आहे. या अनुभवाला बालविकासाच्या अभ्यासाची जोड दिली आणि त्यातून उपयुक्त मनोरंजक खेळांबद्दल माहिती तयार झाली. मुलांच्या बदलत्या गरजेप्रमाणे ह्या खेळांमध्ये बदलही सुचविले आहेत.
मुलांसाठीKhel Khelata ( Age 03 To 05) | खेळ खेळताना (३ ते ५ वयोगट)
₹12.00Original price was: ₹12.00.₹9.00Current price is: ₹9.00. Save ₹3 Add to cart -
Sale! Add to cartमुलांबरोबर प्रत्यक्ष खेळण्याचा अनुभव म्हणजे नव्या नव्या कल्पनांचा खजिना लुटणंच आहे. या अनुभवाला बालविकासाच्या अभ्यासाची जोड दिली आणि त्यातून उपयुक्त आणि मनोरंजक खेळांबद्दल माहिती तयार झाली. मुलांच्या बदलत्या गरजेप्रमाणे ह्या खेळांमधे बदलही सुचविले आहेत.
मुलांसाठीKhel Khelata ( Age 06 To 12) | खेळ खेळताना (६ ते १२ वयोगट)
₹12.00Original price was: ₹12.00.₹9.00Current price is: ₹9.00. Save ₹3 Add to cart -
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Khelata Khelata Aayushya | खेळता खेळता आयुष्य
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Read more -
Sale! Add to cart१९७०च्या दशकात मी गोष्टी लिहिण्याच्या भानगडीत पडलो, त्याला कारणं दोन : एक : पुणे दोन : सत्यकथा. नाम्या ढसाळ, सुर्वे, तेंडुलकरांसारख्या माणसांनी पेटवलेली आग चोहीकडे पेटलेली आणि त्या गदारोळाच्या ऐन मध्यभागी मी ! शिवाय ज्यात त्यात लुडबुडणं ही माझी जन्मजात भोचक सवय ! - मग चित्रं काढता काढता डोक्यात चाळा सुरू झाला. जे दिसतं, वाटतं, जाणवतं, सापडतं; ते लिहून पाहावंसं वाटू लागलं; त्याच या गोष्टी ! - लिहिल्या त्याला पन्नास वर्षं उलटली, पण आजही कुचंबलेल्या माणसांच्या घुसमटीची कारणं आणि वेदनांचे बहाणे तेच आहेत. गोष्टी जशा सुचल्या तशा भराभर लिहीत गेलो. रचल्या नाहीत. सांगितल्या. या गोष्टींमधली माणसं अजून मला आजूबाजूला दिसतात !
All BooksKhidki | खिडकी
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartवास्तव, जादुई वास्तव, आणि अतिवास्तवाच्या मिश्रणातून आकाराला आलेलं एक धूसर जग. त्यात आदिम वासना आहेत. भावनांचा कल्लोळ आहे. कथानकात घुसखोरी करणारी अन् त्यातून बाहेर पडणारी पात्रं आहेत. त्यांच्या दोऱ्या कधीकधी आपल्या हातात आहेत, अशा समजात गुरफटलेला लेखक आहे. तरीही या मजकुराबाहेरचा लेखक म्हणतो, 'वरील सर्व मजकूर खोटा आहे. किंबहुना खोटा खोटा आहे. पण खरा वाटावा असा आहे. कारण खोटं हे दुहेरी सत्य असतं.' प्रत्यक्ष अन् कल्पनेच्या अजब सरमिसळीतून साकारलेली अनवट कादंबरी. खोटं खोटं खरं
All BooksKhota Khota Pan Khara | खोटं खोटं पण खरं
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart -
Sale! Add to cart'माणसाच्या शरीरातला किडनी हा एक महत्त्वाचा अवयव. दैनंदिन चयापचयापासून अनेक शारीरिक क्रियांमध्ये किडनीचा मोलाचा सहभाग असतो. या किडनीचे आरोग्य का बिघडते ? बिघडलेल्या किडनीमुळे आयुष्य धोक्यात का येते ? किडनीचे आरोपण म्हणजे काय ? ते कशासाठी करतात ? डायलिसीस कोणाला उपयोगी ठरते ? किडनीचे आरोग्य अबाधित ठेवायला कोणती काळजी घ्यावी ? सामान्य माणसाला पडणाऱ्या अशा अनेकविध प्रश्नांची उत्तरे साध्यासोप्या भाषेत वैज्ञानिक पद्धतीने उलगडून दाखवणारे किडनीविषयी बोलू काही...'
वैद्यकीयKidneyvishayi Bolu Kahi | किडनीविषयी बोलू काही…
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart
Skip to content