-
Sale! Add to cartमहाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राने आज डेरेदार वटवृक्षाचा नेत्रदीपक आकार घेतला आहे. सहकाराच्या कडव्या विरोधकांनाही हे मान्य करण्यावाचून आज गत्यंतर उरलेले नाही. या सर्वदूर प्रगतीमागील मूलभूत तत्त्वज्ञानाचा शोध-बोध घेण्यासाठी आज जपान, इस्राएल, आफ्रिका येथील शिष्टमंडळे महाराष्ट्रात उतरताहेत. वारणानगर, अकलूज, कोल्हापूर, इचलकरंजी व प्रवरानगर अशा येथील अनेक सशक्त सहकारी केंद्रांना ही शिष्टमंडळे अभ्यासू वृत्तीने भेटी देताहेत. सहकाराची डोळस कास धरून महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाने निःसंशयपणे शेकडो वर्षांची एक कळकट कात आता टाकली आहे. अद्याप खूप वाटचाल तर करावयाची आहेच. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या व कष्टकऱ्याच्या खडतर जीवनमानाला पत व अर्थ प्राप्त करून देणाऱ्या या सहकारी वटवृक्षाचे बीजारोपण इ. स. १८९७ सालीच, ऐन पारतंत्र्याच्या अंधारयुगातच झाले! त्या वर्षीच, भारतातीलच नव्हे, तर अखिल आशियातील सर्वसामान्यांचा पहिला सहकारी साखरकारखाना उठविणारा सहकाराचा सच्चा, जिद्दी, क्रियाशील व अपार कष्टाळू उद्गता जन्माला आला. कोठे? तर बुद्रुक लोणी या सर्वस्वी आडगावात! कोण? महाराष्ट्रात गेल्या पिढीत घडून गेलेल्या आर्थिक आघाडीवरच्या एका अटीतटीच्या, चिवट व अंती यशमय झालेल्या 'लढती'चा हा ललितसमृद्ध मागोवा! वातावरण, बोली-भाषा, व्यक्तिरेखांकन यांचा शिवाजी सावंत यांनी खास आपल्या शैलीत घेतलेला हद्य असा एक शोध-बोध.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेLadhat Part 1 | लढत – खंड १
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -

चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेLadhat Part 2 | लढत – खंड 2
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartबुद्धिमत्ता असूनही केवळ मुलगी म्हणून विज्ञान संस्थांमध्ये प्रवेश नाकारला जाण्याचा तो काळ होता. अशा परिस्थितीत माघार न घेता, अनेक अडचणींना तोंड देत, लढवय्या वृत्तीने पुढे जाणार् या कमला सोहोनी यांनी जैवरसायनशास्त्राच्या क्षेत्रात मूलभूत संशोधन केले. वाचू या, आजही प्रेरक असणारे त्यांचे चरित्र- लढाऊ वृत्तीच्या वैज्ञानिक कमला सोहोनी
All BooksLadhau Vrutteechya Vaidnyanik Kamala Sohonee | लढाऊ वृत्तीच्या वैज्ञानिक कमला सोहोनी
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartही काही कपोलकल्पित कथा नाही, काल्पनिक कहाणी नाही. ही आहे एक खरीखुरी गोष्ट. एक डॉक्टर, तिला झालेला ब्लडकॅन्सर अन् तिनं जिद्दीनं त्याच्याशी दिलेला लढा यांची अगदी कालपरवा घडलेली वास्तव गोष्ट. पारदर्शक साधेपणा, नितळ निवेदन अन् जीवनाबद्दलचा सकारात्मक विचार अशा तिहेरी पेडांनी विणलेला गोफ चितारणारे आत्मकथन
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेLadhle An Jinkale Mi | लढले अन् जिंकले मी
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart -
Sale! Add to cart'लग्न कशासाठी ? भावनांचं व्यवस्थापन... डेटिंग.... लिव्ह इन रिलेशनशिप... गृहव्यवस्थापन... व्यक्तिमत्व चाचणी आणि विवाह... मुलामुलींच्या लग्नाविषयी पालकांची भूमिका.. नात्यांचं व्यवस्थापन... लग्न करण्याआधी पत्रिका बघावी का? विवाहपूर्व समुपदेशन.. काळाची गरज... लग्न करण्यामागच्या कारणांपासून ते जोडीदार निवडीच्या निकषांपर्यंत, लग्न सोहळ्याच्या स्वरूपापासून ते स्वत:च्या आंतरिक ओळखीपर्यंत अनेक गोष्टींची तपासणी करण्यास प्रवृत्त करणारे पुस्तक लग्न जमवण्याआधी... '
मार्गदर्शनपरLagna Jamavnyaadhi.. | लग्न जमवण्याआधी…
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartपाचवीमधली मनू नव्या शाळेत गेली. भली मोठी इमारत, उत्तम ग्रंथालय, प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक असलेल्या शाळेत मनू रमली का ? वर्गात उंचीने सर्वात छोट्या असलेल्या मनूने शाळेत काय काय कामगिरी केली, जाणून घेऊ या - या पुस्तकात लहान माझी बाहुली
All BooksLahan Majhee Bahulee | लहान माझी बाहुली
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Sale! Add to cartहा विषय तसा नाजूक आणि स्फोटकसुद्धा. तरीही, लैंगिकता हा तुम्हां-आम्हां सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य पैलू आहेच. त्यामुळेच लैंगिकता या विषयाबाबतचे संकोच, दडपण, गाढ अज्ञान अन् गैरसमजही दूर व्हायला हवेत. म्हणून याबाबत योग्य काय आणि अयोग्य काय, हे सा-यांना समजेल, अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिलेलं, वाचावंच असं, एका अधिकारी तज्ज्ञाचं पुस्तक.
वैद्यकीयLaingikta Shikshan | लैंगिकता शिक्षण
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart'अशोक डांगे यांनी साकारली आहेत, ही त्यांच्या स्मरणसाखळीतली माणसं ! पन्नाससाठ वर्षांपूर्वीचं कोकणातलं खडतर जीवन..... त्यात आपापल्या कुवतीनुसार वाट शोधणारी माणसं. एकीकडे लंगडी दयाळू आजी ! दुसरीकडे क्रूर रावणमामा आणि शूर पाध्ये अण्णा ! बाकी मध्ये आहेत परिस्थितीनुसार वाकणारी माणसं कधी दुबळी ठरणारी, कधी स्वार्थी होणारी. पण स्वत:च्याच नादात चिवटपणे जगणारी ! हे पुस्तक म्हणजे दारिद्र्याच्या आटपाट नगरातल्या अगतिक माणसांची कहाणी. कोकणच्या ग्रामीण जीवनावरील ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी कथन केलेली !
ललित लेखनLangdi Aaji Aani Rawan Mama | लंगडी आजी रावणमामा
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Sale! Add to cartया पुस्तकात लंडननिवासी लेखक अरविंद रे लंडनचा एक वेगळाच, लपलेला कोपरा आपल्याला दाखवतात. इथं आहेत भारत, पाकिस्तान, पोलंड, ग्रीस, इस्टोनिया, इटली, बल्गेरिया, आफ्रिका अशा देशांतून लंडनमध्ये स्थलांतरित झालेली माणसं. मुकुंद दीक्षित या समंजस, सहृदयी इंग्रजी शिक्षकाच्या वर्गात ती माणसं दाखल होतात आणि आपल्यासमोर लंडन जीवनशैलीचे एकेक अनोखे पदर उलगडू लागतात. रक्तात भिनलेले स्वत:च्या मातीतले संस्कार विसरू शकतात का ही माणसं? वेळ आणि पैसा' ही ब्रिटिश संस्कृती कितपत आत्मसात करू शकतात ही माणसं? लंडनमध्ये स्थायिक होण्यासाठी राबराब राबणं.... पासपोर्ट्स जाळणं.... कागदी लग्न जुळवणं.... काय काय वाटा पळवाटा शोधतात ही माणसं ! लंडनमधील खाजगी इंग्रजी शाळा, त्यांचे लबाड संस्थाचालक ! शेअरींग हाऊसमध्ये दाटीवाटीनं राहणारे टेनंट्स, त्यांच्या व्यथा आणि कथा ! अरविंद रे ही सारी पात्रं, प्रसंग इतक्या चित्रमय, संवेदनशील, खेळकर शैलीत मांडतात की, हे पुस्तक उघडल्यावर पूर्ण केल्याशिवाय मिटणं अशक्य ! अ-निवासी भारतीयाची आपल्याला अंतर्मुख करणारी कहाणी.
All BooksLaplela London | लपलेलं लंडन
₹480.00Original price was: ₹480.00.₹360.00Current price is: ₹360.00. Save ₹120 Add to cart -
Sale! Add to cartव्यंगचित्रात भारतीय माणसं दाखवायची म्हणजे आर. के. लक्ष्मण यांना मोठा जमावच काढावा लागे. गुजराती, मराठी, केरळी, बंगाली, मद्रासी, पंजाबी अशी वेगवेगळया चेहरेपट्टयांची, पोशाखांची माणसं काढायला वेळ लागे. व्यंगचित्र सादर करण्याची वेळ गाठण्यासाठी हळूहळू या जमावातील एकेक मंडळींना लक्ष्मण चाट देऊ लागले. अखेर एकच जण उरला. टक्कल असलेला, फुगीर नाकाचा, आखूड मिश्यांचा, धोतर व चौकडीचा कोट घातलेला आणि सदोदित चेह-यावर भांबावून गेल्याचे भाव असलेला 'सामान्य माणूस' (कॉमन मॅन). या देशातील कोटयावधी मूक जनतेचं प्रतिनिधित्व तो करू लागला. लक्ष्मण यांच्या या आत्मकथेत त्यांचीही अवस्था कधी कधी या 'सामान्य माणसा'सारखी होते. कधी त्यांच्या व्यंगचित्रात आकडे लपले आहेत, असं समजून सट्टा खेळणारा व्यापारी त्यांना येऊन भेटतो, कधी न्यूयॉर्कमधील पार्क ॲव्हेन्यू भागात ते रेनकोट घेऊन गेल्यानं त्यांना चुकून मेक्सिकन समजलं जातं, तर एकदा मद्य पार्टीनंतर एवढी गाढ झोप त्यांना लागते की, आयुष्यातला एक दिवस कोरा दिवस ठरतो! जीवनाच्या कॅनव्हासवर लक्ष्मण यांनी रेखाटलेली शब्दचित्रं, टिपलेल्या घटना त्यांच्या व्यंगचित्रांइतक्याच मिश्कील, खटयाळ, खुसखुशीत आणि खुमासदार आहेत. उपहास, विडंबनाचा सूर पकडत जाणारी आणि सदोदित तजेल्याचं वरदान लाभलेली ही लक्ष्मणरेषा.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेLaxmanresha (Atmacharitra) | लक्ष्मणरेषा (आत्मचरित्र)
₹260.00Original price was: ₹260.00.₹195.00Current price is: ₹195.00. Save ₹65 Add to cart
Skip to content