-
Sale! Add to cart'पॉप, रॉक, जॅझ, कंट्री, डिस्को -- गेल्या पिढीनं नावंच ऐकलेले हे पश्चिमी संगीतप्रकार. आजची तरुणाई मात्र त्यांच्या धुंद सुरांवर डोलतीय, त्यांच्या झिंग आणणा-या तालावर थिरकतीय. पण हे संगीतप्रकार म्हणजे केवळ कानांवर पडणा-या (की आदळणा-या?) सुरावटी नाहीत. - पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रवासातील वेगवेगळ्या पाऊलखुणा म्हणजे हे संगीतप्रकार. - संगीताची समाजाशी असलेली सांगड दाखवणारे हे संगीतप्रकार. - बेदरकार जगणा-या अन् गाणा-या माणसांच्या प्रतिभेतून साकारलेले हे संगीतविशेष. या सा-या संगीतप्रकारांची केवळ माहिती नाही, तर अनुभव देणारं - जीवनशैली अन् संगीताचा अनुबंध उलगडणारं - मायकेल जॅक्सन - रिकी मार्टिनपासून मडोना - शकिरापर्यंतच्या कलाकारांच्या रंगीबेरंगी स्वरचित्रांना शब्दांतून रेखाटणारं लयपश्चिमा '
संगीतLaypashima | लयपश्चिमा
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cart'तरुण मित्र-मैत्रिणींनो, आपलं करिअर विज्ञान-संशोधनात करायचं ठरवताय? कोणते मार्ग अनुसराल? कोणते आनंद अन् निराशा तुमच्या वाटयाला येऊ शकतील? हे करिअर तुम्ही का निवडायला हवं? यश मिळवण्यासाठी काय करायला हवं? मुंग्या या विषयावर अत्यंत मूलभूत संशोधन करणारे जगद्विख्यात शास्त्रज्ञ : डॉ. एडवर्ड ओ. विल्सन या प्रतिभावान शास्त्रज्ञानं स्वत:च्या जीवनातील घटना, आगळेवेगळे छंद आणि संशोधनातील अनुभव यांच्या आधारे मित्राच्या जिव्हाळयानं तरुणाईशी साधलेला संवाद म्हणजे हे पत्ररूप मार्गदर्शन. '
विज्ञानLetters To A Young Scientist | लेटर्स टु अ यंग सायंटिस्ट
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cart' युगानुयुगे निद्रिस्त राहिलेल्या चिनी माणसाला सतत जागं ठेवण्यासाठी वारंवार क्रांतीचं धक्कातंत्र अनुसरावं लागतं... माओच्या या वचनाचा आधार घेऊन त्याच्या चिआंग चिंग या पत्नीनं आपल्या सहका-यांकरवी 1966 च्या सुमारास चीनमध्ये सांस्कृतिक क्रांती नावाची प्रचंड उलथापालथ घडवून आणली. त्या क्रांतीच्या वावटळीत हजारो निरपराध चिनी नागरिकांचे जीवन पार उद्ध्वस्त झालं. अशाच एका अभागी, पण जिद्दीनं परिस्थितीला सामो-या जाणा-या स्त्रीचं हे थरारक आत्मकथन म्हणजे काही वर्षांपूर्वीच्या चिनी समाजाचं एक विदारक चित्र आहे. हे आत्मकथन कोणत्याही सहृदय माणसाला मनाला घायाळ करील, इतकं प्रत्ययकारी आहे. तुरुंगाच्या खिडकीतून बाहेरच्या जगाचा वेध घेऊ पाहणा-या निएन चंग नावाच्या एका मातेची ही कथा आहे. ती जशी तिच्या हालअपेष्टांची कथा आहे, तशीच ती तिच्या हरपलेल्या मुलीचीही शोधकथा आहे. तिचं सर्वस्व हिरावून घेण्यासाठी टपून बसलेले विध्वंसक रेडगार्ड्स, त्यांना प्रोत्साहन देणारे मतलबी नेते आणि त्या नेत्यांच्या दडपशाहीला बळी पडून सग्यासोय-यांच्याच जिवावर उठणारे दीनवाणे सामान्यजन या सा-यांचे अत्यंत प्रभावी चित्र या पुस्तकात रेखाटलेले आढळते. सर्वसामान्य चिनी माणसाच्या व्यथावेदनांचा परिचय करून देणारे... ऊरबडवा आक्रोश न करतासुद्धा मरणप्राय यातनांना शब्दरूप देणारं... आणि लेखिकेच्या अनुभवांचा अस्सल प्रत्यय देणारं आगळं आत्मकथन म्हणून निएन चंगचं हे पुस्तक जगभर गाजलं आहे, ते या प्रभावी गुणवैशिष्ट्यांमुळेच !
समाजकारण / राजकारणLife And Death In Shanghay | लाइफ ऍण्ड डेथ इन शांघाय
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartकुटुंबापासून दुरावलेली, ज्यू धर्म त्यागातूनही सदैव ज्यू ठरलेली जर्मनीतून हद्दपार झालेली, स्वीडनच्या आश्रयाला जाऊन राहिलेली एक ऑस्ट्रियन .... 'मला कायम निराश्रितासारखं वाटतं ' असं म्हणणारी, एकाकी लीझ माइट्नर. आईनस्टाईनसारखा शास्त्रज्ञ 'अवर मादाम क्युरी' असं जिच्याबाबत म्हणत असे, नोबेल पुरस्कारासाठी जिचं नाव पंधरा वेळा सुचवलं गेलं, पुरुषी अहंकारापायी जिचं वैज्ञानिक श्रेयसुध्दा सहका-यांकडूनच हिरावून घेतलं गेलं आणि तरीही किरणोत्सर्ग व अणुविखंडन या बाबतीतल्या संशोधनामधले जिचं अभिजात कर्तुत्व उपेक्षेच्या आणि वंचनेच्या सा-या वार-प्रहारांनंतरही टिकून राहिलं, टी विसाव्या शतकातली थोर मानवतावादी भौतिकशास्त्रज्ञ म्हणजे लीझ माइट्नर... वैज्ञानिक क्षेत्रातल्या अनोख्या सत्तासंघर्षाचं विस्मयकारी दर्शन घडवणारं, लीझ माइट्नरचं हे उत्कंठावर्धक चरित्र...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेLise Mainter | लीझ माइट्नर
₹190.00Original price was: ₹190.00.₹143.00Current price is: ₹143.00. Save ₹47 Add to cart -
Sale! Add to cart'माणसाची स्वत:ची कहाणी त्याच्या एकटयाची नसते. त्याच्या जीवनाचा भाग बनलेल्या व्यक्तींची अन् सभोवतालच्या परिसराचीही ती कहाणी असते. मराठवाडयात जन्मलेल्या, लहानाचा मोठा झालेल्या एका संवेदनशील वाङ्मय-अभ्यासकाची ही कहाणी. त्याची एकटयाची नाही, तर मराठवाडयाची अन् तिथल्या माणसांची कहाणी. एका बाजूला निजामी राजवटीचं मध्ययुगीन वातावरण, दुसरीकडे उर्वरित मराठी मुलखापासून नाळ तुटलेली. तरीही दीर्घ काळापासून चालत आलेल्या आपल्या सांस्कृतिक अन् वाङ्मयीन परंपरांचा वारसा अभिमानानं जपणारा मराठवाडा अन् तिथले मराठीभाषक. लेखकाच्या निमित्तानं साकारलेली त्याच्या जगाची ही कहाणी... लोभस एक गाव काही माणसं
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेLobhas Ek Gav – Kahi Mansa | लोभस एक गाव – काही माणसं
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreसर्वसमावेशकता हे या देशाचं वैशिष्ट्य आहे. देशातील सामान्य माणसावर माझा विश्वास आहे. हा सर्वसामान्य भारतीय माणूस भारतातील सर्व राजकारण्यांपेक्षा खूपच शहाणा आणि समजूतदार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय तो घेतो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जनतेचं एक सामुदायिक शहाणपण प्रत्ययाला येतं. हेच शहाणपण भारतीय लोकशाहीचा कणा आहे. त्याच्या भरवशावर या देशाचं भवितव्य सुरक्षित आहे. सा-या भारतभर त्याच्या या प्रगल्भ जाणतेपणाचा मी आपल्या सहा दशकांच्या सार्वजनिक जीवनात काम करताना वारंवार अनुभव घेतला आहे. या जनतेचा विश्वास मला छपन्न वर्ष लाभला, यापेक्षा अधिक काय असू शकतं? शरद पवार गेली सहा दशकं देशाच्या जडणघडणीत महत्वपूर्ण सहभाग असणा-या नेत्यानं घेतलेला आपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेLok Maze Sangati…(Rajakiya Atmakatha) | लोक माझे सांगाती…. (राजकीय आत्मकथा)
₹650.00Original price was: ₹650.00.₹488.00Current price is: ₹488.00. Save ₹162 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमान्यवरांचे काही अभिप्राय या ग्रंथाद्वारे डॉ. मोरे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि लोकव्यवहाराचा सर्वांगीण आंतरविद्याशाखीय वेध घेतला आहे. अनेक अभ्यासकांनी एकत्र येऊन करायचे कार्य त्यांनी एकटयाने पार पाडले, ही बाब खचितच गौरवास्पद आहे. - य. दि. फडके राजकीय इतिहासचित्रणाचा एक नवा आदर्श निर्माण करणा-या या ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्टय आहे ते पुराव्यांच्या बहुसंदर्भीय पध्दतीच्या मांडणीत ! - दिलीप पुरुषोत्तम चित्रे भारतीय इतिहासातील एका तेजस्वी पण तणावग्रस्त कालखंडावर प्रकाशझोत टाकताना एक पूर्णपणे नवा 'पॅरेडाइम' देणारा हा महाग्रंथ फक्त प्रबोधनच करीत नाही, तर विचारी वाचकाला अंतर्मुखही व्हायला लावतो. - कुमार केतकर मानवी जीवनाप्रमाणेच बहुमिती असणा-या इतिहासाचे सर्वांगीण दर्शन घडवणा-या या विशाल ग्रंथाचा आवाका थक्क करून सोडणारा आहे. प्रा. सदानंद मोरे यांनी स्वातंत्र्यलढयातील निर्णायक कालखंडाची मौलिक चिकित्सा करून विलक्षण कामगिरी पार पाडली आहे. - प्रा. जे. व्ही. नाईक 'लोकमान्य ते महात्मा' हा समग्रलक्षी महाग्रंथ म्हणजे सर्वंकष सांस्कृतिक महाचर्चा असून तिला पुराव्यांची भक्कम चौकट लाभली आहे. महाराष्ट्राच्या प्रज्ञेला आणि प्रतिभेला अभिमान वाटावा, अशी ही महान साहित्यकृती आहे. - रा. ग. जाधव महाराष्ट्राच्या आधुनिक राजकीय इतिहासाची लखलखीत सप्रमाण मीमांसा करताना डॉ. सदानंद मोरे यांनी गुंतागुंतीच्या आंतरप्रवाहांची उकल व त्यांचा अनुबंध यांचा सूक्ष्म वेध घेतला आहे आणि महाराष्ट्रात गांधी हेच टिळकांचे राजकीय वारसदार ठरले, ही गोष्ट महाराष्ट्रधर्माला साजेशी व कालसुसंगत झाली, असा निष्कर्ष काढला आहे. - सदा डुम्बरे
समाजकारण / राजकारणLokamanya Te Mahatma (Part 1 Ani 2) | लोकमान्य ते महात्मा (भाग १ व २)
₹1,500.00Original price was: ₹1,500.00.₹1,125.00Current price is: ₹1,125.00. Save ₹375 Read more -
Sale! Add to cartलोकधुनेत जी स्वरावली आहे, जे स्वरसंवाद आहेत, ते musically genuine असले; तर रागात प्रमाण होतात. लोकसंगीतात केवळ रागनिर्मितीचीच बीजे आहेत, असे नसून त्यांत शक्यताच शक्यता बीजरूपाने किंवा रोपट्याच्या रूपाने अस्तित्वात आहेत, त्या रोपांचा बगिचा करायला हवा. लोकसंगीत सहज आहे, तर रागसंगीताला बौद्धिक आधार आहे; भावना-संवेदना दोन्हीकडे आहेत. लोकधुनेची काही अंशी व्याख्या करणारे आणि कलासंस्कृतीत तिची भूमिका दाखवून देणारे लिखाण सौ. साधना शिलेदारांच्या हातून घडले आहे. निर्मितीचे एक-एक टप्पे समजून घेऊन त्या प्रक्रियेला मान्यता देऊन त्याप्रमाणे रागनिर्मितीचा रीतसर प्रयत्न कुमारजींनंतर सर्वप्रथम साधना शिलेदार यांनी केलेला आहे. पं. मुकुल शिवपुत्र
संगीतLokdhunantun Ragnirmitee | लोकधुनांतून रागानिर्मिती
₹130.00Original price was: ₹130.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹32 Add to cart -
संकीर्ण
Lokmata Godavari | लोकमाता गोदावरी
₹750.00Original price was: ₹750.00.₹563.00Current price is: ₹563.00. Save ₹187 Add to cart -
Sale! Add to cartसर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार हा देशासमोरचा ज्वलंत प्रश्न. अस्तित्वच गिळू पाहणारा... लोकपाल विधेयक संसदेने पारित केले की, जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे भ्रष्टाचाराचा भस्मासुर वठणीवर येईल, अशी आपली भोळ्याभाबड्या जनसामान्यांची समजूत... ती निराधार आहे. राजकीय इच्छाशक्ती नसेल, तर अशी कितीही वैधानिक आयुधे परजली, तरी भ्रष्टाचाराचे निर्मूलन होऊ शकणार नाही, हे सर्व संबंधितांनी नीट समजून घेतले पाहिजे. एका ज्येष्ठ मुरब्बी सनदी अधिका-याने मूळ समस्येचे केलेले हे परखड विश्लेषण वाचले म्हणजे मग कुणालाही भ्रमनिरासाचा धक्का बसणार नाही.
कायदाविषयक - अर्थव्यवहारLokpalachi Mohini | लोकपालाची मोहिनी
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Add to cart
Skip to content
