-
Sale! Add to cart'अरब जग म्हणजे इस्लाम अन् पेट्रोडॉलर. अरब जग म्हणजे वाळवंट अन् मरूद्यानं. अरब जग म्हणजे खजूर अन् उंट. अरब जग म्हणजे अमाप श्रीमंती अन् उन्मादी दहशतवाद. नानाविध समज अन् गैरसमजांच्या बुरख्याआड दडलेलं हे जग आहे तरी कसं ? इतिहास - राजकारण - समाजकारण - धर्मकारण - अर्थकारण -लोकजीवन अशा अनेक धाग्यांचा धांडोळा घेत वाळवंटातल्या या वेगवेगळया पाऊलखुणांचा शोध म्हणजे धागे अरब जगाचे
इतिहासDhage Arab Jagache | धागे अरब जगाचे
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartमाहेर सासर... दोन्ही ठिकाणी वयांतलं आणि कर्तृत्वांतलं धाकटेपण
मनमुरादपणे उपभोगणा-या गृहिणीचं हे साधंसुधं आत्मकथन.
तिचे थोरले भाऊ ‘माणूस’कार श्री.ग.माजगावकर,
थोरली बहीण समाजकार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे,
मेहुणे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
यांच्या सहवासात तिचं बालपण समृध्द झालं.
कोणाही चारचौघींसारखी ती संसारात रमली होती.
पण दैवाच्या अनपेक्षित आघातानं खचली. सैरभैर झाली.
जीवनसाथी वासुदेव गोडे आणि बरोबरीचाच भाऊ दिलीप माजगावकर
यांनी विश्र्वासपूर्ण साथ दिली.
ती सावरली. पाय रोवून उभी राहिली.जेव्हा ती हे सर्व कथन करते, तेव्हा सामाजिक व्यासपीठावर दिसणा-या
माजगावकर-पुरंदरे कुटुंबियांचं गृहजीवन आपोआपच सामोरं येतं
आणि जोडीला ‘राजहंस’-‘माणूस’च्या वाटचालीचं
ओझरतं दर्शनही होऊन जातं.
कधी शाळकरी मुलीच्या कोवळ्या नजरेतून;
कधी अनुभवी गृहिणीच्या चष्म्यातून!
त्यामुळे हे आत्मकथन आगळंवेगळं झालं आहे.चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDhakatya Najaretun | धाकटया नजरेतून
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartमूठभर धान्य पेरावं तर मालकीची जमीन नाही. तरीही आम्ही गाववाले. भुमिपुत्र. आमचा गाव. आमचा देव. आम्ही पाटील, आम्ही देशमुख. दारूच्या नादात बडेजाव. जवळ नाही आटा अन् टेरीला उटणं वाटा अशी गत. भैताडांना हे कळंना की कुठं राहिलाय तुमचा गाव ? गैबान्यांनो, होतं ते विकून बसलात, आता पार्टीच्या जिवावर उड्या मारताय, त्यांच्या हातचं बाहुलं झालाय. उद्या खेळ संपेल. बाहुलं फेकलं जाईल. पार सांदी कोपऱ्यात ! तुम्हाला या मातीत पाय ठेवता येणार नाही. आज पार्टीवाला देवाचा भंडारा करतोय. पैसा देतोय. उद्या तो तुमच्या देवालाही जुमानणार नाही.
कादंबरीDharankala | धरणकळा
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartएखादा धरणप्रकल्प साकार होताना नेमकं काय घडतं? त्या ठिकाणी तज्ज्ञ इंजिनियरांपासून रोजंदारीवरच्या मजुरापर्यंत शेकडो माणसं कसा हातभार लावतात ? या सगळ्यांच्या एकत्र जगण्यातून कोणतं जीवननाट्य उलगडत जातं ? विस्थापितांना कोणत्या मरणयातनांना सामोरं जावं लागतं ? धरणउभारणीत किती व्यामिश्र तांत्रिक बाबी गुंतलेल्या असतात ? एकापाठोपाठ एक महत्त्वपूर्ण धरणांची उभारणी करणाऱ्या एका कुशल इंजिनियरच्या नजरेतून धरणप्रकल्पाशी नाळ जोडलेल्या एका आगळ्यावेगळ्या जगाचा अन् संस्कृतीचा वेध घेणारी अनोखी कादंबरी.
कादंबरीDharansukta | धरणसूक्त
₹380.00Original price was: ₹380.00.₹285.00Current price is: ₹285.00. Save ₹95 Add to cart -
Sale! Add to cart'जगातल्या प्रत्येक धर्माचा दावा असतो - माणसाचं आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नयन हेच आमचं उद्दिष्ट! मात्र आज धर्म या शब्दानं अत्यंत शक्तिशाली अशा स्फोटकाची जागा घेतली आहे. हिंदू, मुसलमान, ज्यू, खिश्चन... हे शब्दोच्चारही परस्परांच्या मनात दहशत निर्माण करत आहेत. कल्याणकारी रूप अपेक्षित असलेल्या धर्माशी जोडल्या गेलेल्या या भयभावनेचा उगम नेमका कुठे आहे? धर्माच्या नावाखाली चाललाय उद्विग्न करणारा उच्छाद. घरापासून रस्त्यापर्यंत चाललेल्या हिंसेला जबाबदार ठरतोय धर्म. गलिच्छ राजकारणासाठी, सत्ताप्राप्तीसाठी, स्त्रीच्या उपभोगासाठी, दलितांच्या खच्चीकरणासाठी, दुर्बलांच्या पिळवणुकीसाठी तो बिनदिक्कतपणे वापरला जावा? आणि आपण फक्त हतबलतेनं बघत राहावं? धर्म अशी राखरांगोळी करून टाकतो माणसाची? धर्मशास्त्रातली वचनं म्हणजे शेवटी माणसानंच बनवलेली विधिनिषेधांची नियमावली! ती काही काळ्या दगडावरची रेघ नव्हे, की जी पुसताच येत नाही. आणि जर ती काळ्या दगडावरची रेघ असेल, तर असा दगडच नाकारण्याची तयारी ठेवायला हवी. माणसाचं माणूसपण आणि त्याच्या जीवनातील धर्माचं स्थान याचा मुळापासून वेध घेणारा ग्रंथ. धर्म आणि हिंसा'
समाजकारण / राजकारणDharma Aani Hinsa | धर्म आणि हिंसा
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartऑल्बर्ट आइन्ष्टाइन म्हणजे विसाव्या शतकावर आपला आणि आपल्या वैज्ञानिक सिद्धांतांचा अमिट ठसा उमटवणारा जगावेगळा महापुरुष. त्याने मांडलेल्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचे महत्त्व वादातीत असले, तरी प्रत्यक्ष त्या सिद्धांताबद्दल सामान्य वाचकांमध्ये गैरसमज पुष्कळ आढळतात. विनाकारण उदभवलेल्या त्या गैरसमजांचे धुके बाजूस सारून स्वच्छ सूर्यप्रकाशात त्या सिद्धांताचा सुबोध परिचय करून देणारे हे पुस्तक. अत्यंत क्लिष्ट मानला जाणारा सापेक्षतावाद आपल्यालाही सहज समजला, अशी अनुभूती मिळवून देणारे लक्षवेधी पुस्तक...
विज्ञानDharmanirpekshetechya Drushtitoon, Hindutva Vicharanchi Fermandani | धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीतून हिंदुत्वविचाराची फेरमांडणी|
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartत्याच्याजवळ ना पैसा होता, ना कुणाचे पाठबळ. हातावरचे पोट असलेले आईवडील अन् गरिबीच्या उन्हात उभे राहिलेले घर. पण तो फक्त नावापुरता 'ज्ञानेश्वर' नव्हता. आपल्या बुद्धिमत्तेला त्याने चिकाटीची धार चढवली. विलक्षण जिद्द अन् अभ्यासाच्या सातत्यातून तो प्रख्यात शल्यविशारद झाला. हा अवघड वळणाचा प्रवास सांगणारी एका समर्पित सर्जनची संघर्षकहाणी...
All BooksDhulakshare Te Shalyakaushalya | धुळाक्षरे ते शल्यकौशल्य
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartअहिल्याबाई होळकर ! जन्म ३१ मे १७२५. मृत्यू १३ ऑगस्ट १७९५. ती सत्ताधारी होती, पण ती सिंहासनावर नव्हती. ती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती. ती पेशव्यांशी निष्ठावंत होती. पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती. ती व्रतस्थ होती, पण ती संन्यासिनी नव्हती. जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता, हुकमत हा सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले. तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळांचे रूप घेतले. तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरामंदिरांतून घुमले. मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती. तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या. अठराव्या शतकातल्या मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDnyat – Adnyat : Ahilyabai Holkar (Lokavrutti) | ज्ञात-अज्ञात : अहिल्याबाई होळकर(लोकावृत्ती)
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cart'आपल्या लाडक्या सचिन वा सानियाच्या तब्येतीबद्दलचे अनेक प्रश्न घेऊन पालक बालरोगतज्ञांकडे येत असतात. तपासणीच्यावेळी बहुतेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न डॉक्टर करतातच, पण अनेक उपप्रश्न अनुत्तरित राहतात. अशा सा-या बाबींचा परामर्श घेऊन सोप्या भाषेत बाल-आरोग्यासंबंधीची शास्त्रीय माहिती आणि तीही महाराष्ट्रातील २६ नामांकित बालरोगतज्ञांकडून करून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.
वैद्यकीयDoctor Ek Vicharu? | डॉक्टर एक विचारु?
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cart' निदान चुकणे हा प्रत्येक डॉक्टरच्या खोलीतील एक मोठा अदृश्य हत्ती आहे. तो हाताला तर लागतो, पण दिसत मात्र नाही. असे असूनही निर्णय तर घ्यावेच लागतात. ते लांबणीवर टाकता येत नाहीत. निदानाबाबतची अनिश्चिती फार त्रासदायक असते. कदाचित ती टाळण्यासाठीच आम्ही डॉक्टर लोक त्या अनिश्चितीच्या जागी एखादे भ्रामक का होईना, परंतु निश्चित असे निदान गृहीत धरतो. मग उपचार करताना त्यालाच चिकटून बसतो. वैद्यकीय उपचारांच्या अपयशाचा गाभा हाच असावा. - ही आहे एका अनुभवी बालरोगतज्ज्ञाची प्रांजळ कबुली. तीस वर्षांच्या वैद्यकीय कारकिर्दीत डॉक्टर सुलभा यांना डॉक्टरची कर्तव्ये आणि मनुष्यस्वभावीतील गुंतागुंत यांविषयी अनेक पेच पडले; पण याच व्यवसायाने त्यांची उकलसुद्धा केली. लेखिकेला पडलेले प्रश्न आणि तिने शोधलेली उत्तरे म्हणजे तिचे हे आत्मकथन डॉक्टर म्हणून जगवताना '
वैद्यकीयDoctor Mhanun Jagavtana | डॉक्टर म्हणून जगवताना
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart
Skip to content