-
Sale! Add to cartबिनचेहऱ्याच्या व्यक्तीने फेकलेले जाळे आणि त्याला लावलेली वेगवेगळी आमिषे. अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत अनेकजण यात सहजपणे अडकतात. लोन फ्रॉड, एटीएम क्लोन, ऑनलाईन गेमिंग, घसघशीत उत्पन्नाची लालूच दाखवणारे प्रीपेड टास्क, कार्ड फ्रॉड, फिशिंग, इन्व्हॉईस फ्रॉड... एक ना दोन, अनेक प्रकार. सायबर फ्रॉड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बनवाबनवीत आपले बँकखाते एका झटक्यात रिते होते. मोबाईलवरून किंवा सोशल मीडियातून मिठ्ठास संवाद साधून अनेकांना जाळ्यात अडकवणाऱ्या या ठकसेनांपासून स्वत:चा बचाव करायचा एकच मार्ग - सजग राहणे, या जाळ्यात न अडकणे. त्यासाठीच हे पुस्तक वाचायचे आणि त्यामधून योग्य ते धडे घ्यायचे, सावधपणे पुढच्या हाका आधीच ऐकायच्या ! आधुनिक तंत्रज्ञानाच्या मोहक मुखवट्याआडचा भेसूर चेहरा दाखवणारे - सायबर गुन्ह्यांबाबत सर्वांना सतर्क बनवणारे -
All BooksCyber Attack | सायबर ॲटॅक
₹290.00Original price was: ₹290.00.₹218.00Current price is: ₹218.00. Save ₹72 Add to cart -
Sale! Add to cartदिलीपकुमार म्हणजे शहजादा सलीम . दिलीपकुमार म्हणजे राम और शाम . दिलीपकुमार म्हणजे गंगा . दिलीपकुमार म्हणजे देवदास आणि आझाद ही. दिलीपकुमार म्हणजे असे अनेक नायक, अशा अनेक व्यक्तिरेखा. अभिनयाचा मानदंड प्रस्थापित करणारा हा अभिनेता केवळ त्याच्या चित्रपटांपुरता अन् त्याच्या भूमिकांपुरता उरला नाही. त्याच्या प्रत्येक भूमिकेत लसलसत होते भविष्यातल्या अभिनयाचे कोंब. गेल्या सत्तर-ऐंशी वर्षांत हिंदी सिनेमात वावरणाऱ्या कैक कलावंतांच्या अभिनयाला जीवनरस पुरवणारा जिवंत झरा म्हणजे दिलीपकुमार. स्वातंत्र्योत्तर आधुनिक भारताचं प्रतिनिधित्व करणारं सर्वांगसमृद्ध सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणजे दिलीपकुमार. अभिनयाच्या क्षेत्रात दिलीपकुमारपूर्वी आणि दिलीपकुमारनंतर असे कालखंड प्रस्थापित करणाऱ्या या प्रतिभावान कलावंताची नवरसांनी भरलेली चरितकहाणी.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDaastan – E – Dileepkumar | दास्तान-ए-दिलीप कुमार
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cart'एका हातात पिस्तुलाची जळती आग दुस-या हातात स्फोटक निखारा. वेदनांच्या अन् यातनांच्या, जळत्या लाव्हातून हे अग्निपुत्र सशस्त्र क्रांतीची वाट चालले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केल. अवघ्या अडीच वर्षांत ब्रिटीश साम्राज्याला विजचा तडाखा देणा-या हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा तेजस्वी इतिहास. '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDadasabeh Bidkar Vasa Adivasi Sevecha | दादासाहेब बिडकर वसा अदिवासी सेवेचा
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartजेरुशा - अनाथालयातली एक पोरकी मुलगी. तिची बुद्धिमत्ता पाहून एक दयाळू विश्वस्त तिचा कॉलेजशिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात. मात्र अट एकच. तिची प्रगती तिनं पत्रांतून त्यांना कळवत ठेवायची. जेरुशानं आपल्या अनामिक उपकारकर्त्याला एकदाच ओझरता पाहिलेला. लांब ढांगांचा उंच मनुष्य. म्हणून त्याचं नाव डॅडी लाँगलेग्ज ! आपल्या अनामिक वडलांना जेरुशानं पाठवलेली नितांत सुंदर पत्रं म्हणजे ही कादंबरी. एका तरुण, देखण्या अनाथ मुलीचं भावविश्व हळुवारपणे उलगडत नेणारी, मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करणारी...
कादंबरीDady Longlegs | डॅडी लाँग लेग्ज
₹130.00Original price was: ₹130.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹32 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more..या सुमाराला मला दारावर थाप ऐकू आली. दिवसाउजेडी दार वाजणं म्हणजे काही अशुभाची चाहूल नव्हे, हे मला ठाऊक होतं. त्यामुळे कोण असावं, हे बघायला मी खाली आलो. पण या वेळी मात्र माझा होरा साफ चुकला. बाहेर सशस्त्र तरूण उभे होते. माझं काळीज लक्कन हललं. डायरीची पानं लपवायला मी आत धावलो आणि दारावरच्या धडकांचा आवाज माझ्या कानांवर आदळू लागला... २३ ऑगस्ट १९९०.
इतिहासDahshatichya Chayet : Dairy Eka Kashmiri Anamikachi | दहशतीच्या छायेत : डायरी एका काश्मिरी अनामिकाची
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Read more -
Sale! Add to cartपर्यावरणाच्या समस्या दिवसेदिवस वाढतच चालल्या आहेत. माणसाचा अतिरेकी उपयोग हेच त्यामागचं कारण आहे. त्यामुळे ह्या समस्या सुटायच्या, तर आपलं वागणं आपण बदलायलाच हवं. पण म्हणजे नेमकं काय करायचं ? काय टाळायचं ? दैनंदिन जीवनात करण्या/टाळण्याच्या अशा १०१ गोष्टींविषयी सांगणारं हे पुस्तक. स्वयंपाकघरात, न्हाणीघरात, प्रवासात, शाळेत, शेतात, कार्यालयात अशा सर्व ठिकाणी आपण 'पर्यावरणीय दृष्टी' ठेवून काय करू/टाळू शकू हे सांगणा-या ह्या कृति-कणिका आहेत. खुसखुशीत शैली, विनोदांची पखरण, हळूच काढलेले चिमटे ह्यांमुळे हे पुस्तक वाचनीय तर आहेच; पण 'हे सहज जमेल आपल्याला' असं वाटायला लावून ते आपल्याला कार्यप्रवृत्तही करतं.
पर्यावरणDainandin Paryavaran | दैनंदिन पर्यावरण
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartही आहे एक छान जुळलेली सुरेल मैफील. क्वचित कुणाच्या वाट्याला येणारी जन्मजात समृद्धी त्यांना लाभली, पण ते उतले-मातले नाहीत. नेकीने उद्योग सांभाळत, त्यांनी समृद्धीचे चीज केले. कापड उद्योगाच्या उभ्याआडव्या धाग्यांनी विणलेल्या त्यांच्या जीवनात रंग भरला क्रिकेटने. हौस म्हणून ते खेळाच्या प्रांगणात उतरले, पण मग हा क्रिकेटचा खेळच त्यांचा ध्यास बनला. संसार, व्यवसाय, छंद, सा-यांचा सुरेल नाद उमटवणारी छान जुळून आलेली जीवनमैफील दैवायत्तम्
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDaivayattam | दैवायत्तम्
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cart'नाटकाचं चित्रीकरण केलं, की सिनेमा होऊ शकेल, असं वाटण्याच्या काळात त्यांनी मूव्ही कॅमेरा बनवला, बोलका मराठी चित्रपट बनवला, तो सातासमुद्रापार नेऊन गौरवला, महाराष्ट्र्राचा मानबिंदू उभा केला... 'प्रभात फिल्म कंपनी'. 'प्रभात'चे चित्रपट सर्वदूर माहीत आहेत, पण दामलेमामांचा चरित्रपट ? त्यातलीच ही काही सोनेरी पानं...'
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDamlemama | दामलेमामा
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'विहिरीत अंधार आहे. डोकावून पाहिलं तर भोवळ वगैरे येईल इतपत अंधार. अंधारात काहीही असू शकतं; काहीहीम्हणजे काहीही. पण ते काहीही म्हणजे नेमकं काय? हे आत उतरल्याशिवाय कळणार नाही. आजवर आयुष्यातल्या अप्रिय, असह्य, नको असणाऱ्या गोष्टी मी विहिरीत टाकल्या. अगदी अडगळीत टाकाव्या तश्या टाकल्या. पण विहीर म्हणजे अडगळ नाही. विहिरीत आई आहे, अण्णा आहेत. विहिरीत काकूचं बाळ आहे, नंदाकाका आहे. विहिरीत दमी, तायडी आणि सुपडीही आहे. विहिरीत अनेक उत्तरं आहेत. अशा प्रश्नांची उत्तरं जे प्रश्न मला कधी पडलेच नाहीत; किंवा जे प्रश्न मी स्वत:ला कधीच पाडून घेतले नाहीत; किंवा असे प्रश्न ज्यांची उत्तरं मी कधी शोधलीच नाहीत. विहीर माझ्या आयुष्याचा रहस्यभेद आहे, जो अनेकदा शक्य असूनही मी आजवर कधीही केलेला नाही. विहिरीत उतरणं हे माझं प्राक्तन नाही. विहिरीत उतरणं हा मी राजीखुशी निवडलेला एक पर्याय आहे. बाहेरच्या वास्तवाला तोंड देण्यापेक्षा विहिरीत लपून बसणं कधीही सोपंच.'
कादंबरीDanshakal | दंशकाल
₹550.00Original price was: ₹550.00.₹413.00Current price is: ₹413.00. Save ₹137 Add to cart -
Sale! Add to cart'जगातलं सगळं विज्ञान, कला अन् शास्त्रं अखेरीस माणूसशास्त्रापुढे विनम्र असतात. शेवटी हातचा एक उरतो तो माणूसच. हे पुस्तक माणसांचं आहे. तऱ्हेवाईक, प्रामाणिक माणसं. मानी, दिलदार, लहरी...अन् तालेवार, गुणी माणसं. माणुसकीपर्यंत पोहोचण्यासाठी नित्य धडपडणारी माणसं. प्रत्येकाच्या जगण्याला आत्मभानाचा उग्रमधुर सुवास... माणसं एकाच मापा-आकाराची नसतात. इथंही तशी ती नाहीत. महात्मा गांधी, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, विख्यात पत्रकार-संपादक रुसी करंजिया, फिअरलेस नादिया, कथाकार इस्मत चुगताई, गीतकार-कवी शैलेंद्र, संगीतकार मदनमोहन, सर लॉरेंस ओलिव्हिए-विवियन ली यांसारखे मनस्वी प्रतिभावान इथं आहेत. त्याचप्रमाणे काही साधी माणसंदेखील आहेत. गवताच्या पात्याप्रमाणे लवलवणारी. अज्ञात, अयाचित, आनंदी अन् अवध्य. या माणसांचा अंतर्वेध घेताना, त्यांच्या जगण्यातलं सत्त्व-तत्त्व मनें मौआलें वेचताना लेखकाची वृत्ती तटस्थ अन् संवेदनशील आहे. लिखाणातला मैत्रीचा सूर सच्चा अन् संथखोल आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDarawale Ithe Suvas | दरवळे इथे सुवास
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart
Skip to content