-
Sale! Add to cartदुबई म्हणजे वाळवंटात निर्मिलेले जणू नंदनवनच ! जिद्द, मेहनत आणि दुर्दम्य आशावाद या त्रिगुणांच्या जोरावर अरबी माणसाने सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. पाण्याच्या चार घोटांसाठी वणवण करणारा हा अरब आज सेंट्रली एअरकंडिशन घरातील सुखासीन आयुष्य जगतोय. हा बदल 'याचि देही याचि डोळा' अनुभवणाऱ्या मेघना अशोक वर्तक. १९७६ ते २०२५ या कालखंडात मेघनाताईंनी आपले पती श्री. अशोक वर्तक यांच्याबरोबर दुबईत वास्तव्य केले. मेघनाताईंच्या नजरेला बदलणारी दुबई जशी भावली, तशी त्यांनी ती शब्दांकित केली. दुबईच्या जीवनशैलीच्या प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण कंगोऱ्याचे कालानुरूप बदलते रंग आपल्याला आलेल्या अनुभवांसहित त्यांनी रेखाटले आहेत. आणि म्हणूनच स्थानिक वाचक दुबईच्या भूतवर्तमानाशी समरस होतील, त्यांना ही आपलीच गोष्ट वाटेल. दुबईचे यथार्थ दर्शन घडवणारे आणि दुबई-दर्शनाची ओढ लावणारे दुबई काल आणि आज
All BooksDubai : Kal Ani Aaj | दुबई : काल आणि आज
₹480.00Original price was: ₹480.00.₹360.00Current price is: ₹360.00. Save ₹120 Add to cart -
Sale! Add to cartदुर्दम्य म्हणजे नेमकं काय? जिगरी दोस्त मन्नू रावतचा फोन आला, हाऊ आर युअर लेग्ज, पंकज?'' नेहमीच्या टोलेजंग हास्यानिशी पंकज जोशींनी उत्तर दिले, कौनसी टांगें, मन्नू? टांगें तो अब हैंही नहीं!' त्यांच्या पोटात, मूत्रपिंडात आणि यकृतात एकूण नऊ गोळ्या घुसल्या होत्या. माणेकशा यातून केवळ जगलेच नाहीत, तर स्वतंत्र भारताचे पहिले फील्डमार्शलही झाले...! ले. जनरल एसपीपी थोरात, अॅृडमिरल भास्करराव सोमण, फील्डमार्शल सॅम माणेकशा, ले. जनरल प्रेम भगत, ले. जनरल सगतसिंग आणि ले. जनरल पंकज जोशी. भारतीय सैन्यदलातील पराक्रमाची सहा उत्तुंग शिखरे! त्यांच्या अमर कर्तृत्वाच्या या स्फूर्तिदायक कहाण्या...
All BooksDurdamya : Bharatiya Sainya Netruttvaache Uttung Shikhare | दुर्दम्य
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cart'मूर्ख कुठली ! आजी माझ्यावर खेकसली आणि झटकन तिनं चिकनची तंगडी माझ्या भावाच्या ताटात वाढली. तंगडी नेहमी मुलांसाठी राखून ठेवलेली असते; मुलींनी उरलेले तुकडे खावेत - आजी सांगत होती. "तिच्या अंघोळीसाठी पाणी गरम करायची काही गरज नाही - " आजी माझ्याच अंघोळीविषयी बोलत होती. "पण आज गारठा जास्त आहे -" बानोताई माझी कड घेत होती. "गारठयाची सवय करायला हवी तिला. गरम पाण्याची सवय लावून मुलीला बिघडवू नकोस -" आजीनं बानोला तंबी दिली. त्या क्षणी मला जाणवलं, की मी मुलगी आहे म्हणून आजीची नावडती आहे. लौकिकार्थानं मातृसत्ताक पद्धती असूनही नागा समाजातील मुलींच्या नशिबी दुस्वासच येतो. छोटया मुलीच्याच कथनातून हे विशद करणारी, ईस्टरिन किरे या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नागा लेखिकेची कादंबरी आता मराठीत. 'दुस्वास'च्या निमित्तानं नागालँडचं साहित्य प्रथमच मराठीत येत आहे.
कादंबरीDuswas | दुस्वास
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cartहा एक अगदी वेगळ्या वाटेनं जाणारा चित्रसंग्रह. तो पाहायचा आणि वाचायचाही. वाचायच्या आहेत त्या कविता. चित्रांना जुगलबंदीप्रमाणे शब्दांची त्या साथ देत असतात. प्रत्येक चित्र सरळ पाहायचं. नंतर त्या चित्रानं शीर्षासन केलं की त्यातून दुसरंच एक चित्र दिसूं लागतं. असा अफलातून संग्रह प्रथमच माझ्या पाहण्यात आला... ...पुस्तकातील काही चित्रं गूढ, गंभीर, उदास, गमतीची अगर प्रक्षोभकही वाटतील. पाहणा-याच्या दृष्टीवर ते सोपवावं. प्रत्येक चित्र एका फिरत्या रंगमंचावर प्रवेश करतं. एक कोडं घालतं. मंच फिरल्यावर त्याचं सचित्र उत्तर दिसतं. असा हा दृश्यकलेचा खेळ. वाचकांना एक वेगळा अनुभव व आनंद देणारा. चित्रकार अरविंद नारळे आणि सहभागी कवींचं मन:पूर्वक अभिनंदन! - शि. द. फडणीस, पुणे
कवितासंग्रहDwaichitrya | द्वैचित्र्य
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartआयफेल टॉवर म्हणजे केवळ पॅरीसची नव्हे तर सार् या फ्रान्सची ओळख ! इंजिनीयिंरग मार्व्हल मानला जाणारा हा हजार फुटी उंच मनोरा आधी कल्पनेत पाहणारा अन् नंतर प्रत्यक्षात साकारणारा प्रतिभावान अभियंता : आयफेल गुस्ताव. अनेक चढउतारांनी भरलेले, यशोमालिकांनी रंगलेले अन् लोकापवादांनी माखलेले आयुष्य जगलेला हा अभियंता. त्याच्या या विलक्षण आयुष्याचा वेध घेणारे चरित्र !
All BooksEiffel | आयफेल
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartऑल्बर्ट आइन्ष्टाइन म्हणजे विसाव्या शतकावर आपला आणि आपल्या वैज्ञानिक सिद्धांतांचा अमिट ठसा उमटवणारा जगावेगळा महापुरुष. त्याने मांडलेल्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचे महत्त्व वादातीत असले, तरी प्रत्यक्ष त्या सिद्धांताबद्दल सामान्य वाचकांमध्ये गैरसमज पुष्कळ आढळतात. विनाकारण उदभवलेल्या त्या गैरसमजांचे धुके बाजूस सारून स्वच्छ सूर्यप्रकाशात त्या सिद्धांताचा सुबोध परिचय करून देणारे हे पुस्तक. अत्यंत क्लिष्ट मानला जाणारा सापेक्षतावाद आपल्यालाही सहज समजला, अशी अनुभूती मिळवून देणारे लक्षवेधी पुस्तक...
विज्ञानEinstinecha Sapekshatawad | आइन्ष्टाइनचा सापेक्षतावाद
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Sale! Add to cartमानवी नात्यांतले हरवलेले, शोधलेले आणि सापडलेले अर्थ विषयांच्या कॅलिडोस्कोपिक विविधतेतून उलगडत नेणा-या कथा-
कथासंग्रहEk Aani Don Aani… | एक आणि दोन आणि…
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartप्रसिध्द इतिहासकार ॲर्नाल्ड टॉयनबी म्हणतो, की हिंदू (भारतीय) संस्कृती ही आजच्या जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. भारतीय उपखंडाएवढया मोठया प्रदेशात, अडीच हजार वर्षांपूर्वी ती पसरली होती. अशी गोष्टही जगाच्या इतिहासात प्रथमच घडली. नद्यांची सुपीक खोरी, मोठी लोकसंख्या आणि साधनसामुग्री असलेला हा भूप्रदेश आणि शौर्याचा, ज्ञानाचा वारसा असलेली संस्कृती हे, हेवा वाटावा असे देणे आपल्याला लाभले. इतिहासाकडे मागे वळून पाहताना जे दिसते ते असे : चाणक्य आणि चंद्रगुप्त यांनी २४०० वर्षांपूर्वी ग्रीक आक्रमण परतवून या उपखंडात सीमा सुरक्षित असलेले एक सुनियंत्रित साम्राज्य निर्माण केले. टॉयनबी याला भारतातील पहिली युनिव्हर्सल स्टेट असे म्हणतो. त्यानंतर जी राजकीय, धार्मिक आक्रमणे झाली त्याला विरोध झाला तरी असे पूर्ण यश पुन: हाती लागले नाही. भारतात मोगल साम्राज्य स्थापणारा बाबर अवघ्या पंधरा हजार सैन्यानिशी आला होता. रजपुतान्याकडे यापेक्षा कितीतरी जास्त शक्ती निश्चित होती. इंग्रज मूठभर होते. त्यांनी मराठयांना पराभूत करून दीडशे वर्षे राज्य केले. रजपूत, जाट, विजयनगर, मराठे, शीख एकएकटे लढले आणि पराभूत झाले. अशा शक्ती योग्य वेळी एकत्र आल्या असत्या, तर भारताचा इतिहास वेगळा घडला असता. हिंदू समाजातील ज्या त्रुटींमुळे पूर्वेतिहास असा घडला, तेच दोष आजही आपल्या प्रगतीच्या आड येत आहेत का ? हिंदू समाजाला परिवर्तनाची गरज आहे का? आणि त्या परिवर्तनाची दिशा कोणती, असे हे अस्वस्थ करणारे प्रश्न. या अस्वस्थतेचा प्रत्यय वाचकांपर्यंत पोहचावा ही 'एक अस्वस्थ हिंदू मन' या लेखनामागची भूमिका.
समाजकारण / राजकारणEk Aswastha Hindu Man | एक अस्वस्थ हिंदु मन
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartया आत्मकथनाचे लेखक समीर भिडे यांच्या आयुष्यात एक दिवस अचानक अत्यंत अकल्पित अशी घटना घडली. त्या घटनेने त्यांचे आयुष्य मुळापासून उन्मळून पडले. लाखात एकाच्या वाट्याला येणाऱ्या पक्षाघाताच्या झटक्याने त्यांचे आयुष्य कायमचे बदलून गेले. कधीही कल्पना केली नव्हती एवढे परावलंबित्व वाट्याला आले, नोकरी गमवावी लागली आणि पाठोपाठ घटस्फोटालाही सामोरे जावे लागले. पण एक दिवस अचानक ही त्यांच्या व्याधीची नाही, तर व्याधीतून पुनश्च उभे राहण्यासाठी निकराने दिलेल्या लढ्याची कथा आहे. या लढ्यासाठी त्यांना वेगवेगळ्या समाजांतील मित्रपरिवार आणि मदतनीसांची साथ मिळाली. हे आव्हान पेलताना पाश्चात्य वैद्यक आणि पौर्वात्य स्वास्थ्योपचारांचे साहाय्य लाभले. या प्रवासात समीर यांचा दृष्टिकोन कायम सकारात्मक आणि कृतज्ञ राहिला. त्यातूनच त्यांना वास्तव जसे आहे, तसे स्वीकारण्याचे बळ मिळाले. त्यांची ही कहाणी वाचताना वाचकालाही अकस्मात उद्भवलेल्या संकटाला धीराने सामोरे जाण्याचे बळ लाभेल याची खात्री वाटते.
All BooksEk Divas Achanak | एक दिवस अचानक
₹289.00Original price was: ₹289.00.₹217.00Current price is: ₹217.00. Save ₹72 Add to cart
Skip to content
