-
Sale! Add to cartHere is a fighter forever with mighty moral character. With a childhood ambition to become an engineer. A strong will-power to reject compromises with ethical principles. An unbreakable self-respect that refused to bend before temptations or pressures. He kept fighting battles against corrupt practices and the mindset behind corruption. This is the story of a true crusader. Awakening a belief in us that corrupt mentality will one day disappear, like the Sunlight withers the darkness.
All BooksDarkness To Sunshine | Darkness to Sunshine
₹260.00Original price was: ₹260.00.₹195.00Current price is: ₹195.00. Save ₹65 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreहा ग्रंथ संक्षेपामध्ये नृत्याशी निगडित असलेल्या अभिनयाचा विचार करतो, विवेचन असे नाही. जणू काही एखाद्या ग्रंथाचा विस्ताराने खोलवर जाऊन अभ्यास केलेला असावा आणि मग त्यातली तथ्ये केवळ सांगायची झाल्यास त्यातले महत्त्वाचे मुद्दे नोंदलेले असावेत, तसा हा प्रकार आहे. त्यामुळे या ग्रंथात प्रकरणे नाहीत, पण ४८/ ५० मुद्दे आहेत, ज्यांची थोडी विचक्षणा करता पुरा विषय आपल्या मन:चक्षूंसमोर तरळून जाऊ शकतो. थोडक्यात हे पुस्तक म्हणजे एक परिभाषा किंवा व्याख्याकोश आहे. त्यात कोणत्याही प्रक्रियेचे विवेचन, स्पष्टीकरण असे दिलेले नाही, काही गोष्टी व्याख्या आणि विनियोग यांचा एकत्र विचार केल्यास सहज समजून जातात; किंवा जणू मुद्दे काढून ठेवलेले आहेत आणि त्यांकडे वेळोवेळी निर्देशही केलेले आहेत. थोडक्यात हा एक संज्ञा संग्रह आहे.
वैद्यकीयDarpani Pahata | दर्पणी पहाता
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Read more -
Sale! Add to cartमाझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही आईबाबा, ताईदादा, आजीआजोबा, मित्रमैत्रिणी अन् इतर कितीतरी मोठ्या माणसांशी दिवसरात्र गप्पा मारता. पण आपल्याच घरात न बोलणारे कितीतरी जण आपल्या अवतीभोवती वावरत असतात. ह्या आहेत घरातल्याच अशा न बोलणा ऱ्यांच्या बोलक्या गोष्टी ! या गोष्टी वाचता वाचता तुम्हाला अबोल वस्तूंच्या धमाल गोष्टी ऐकू येऊ लागतील...
मुलांसाठीDas Nambari Phon Ani Itar Katha | दस नंबरी फोन आणि इतर कथा
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Sale! Add to cart'लहान मूल म्हणजे एक स्वतंत्र संवेदनशील अस्तित्व- मग ते दत्तक असो वा पोटचं. तरीही दत्तक हा विषय आजही थोडा परकाच का वाटतो? माणसाच्या घडण्यात जन्मदात्यांच्या जनुकांचा प्रभाव किती अन् भोवतीच्या परिस्थितीचा वाटा किती ? दिल्या घरी दत्तक जाणाऱ्या बाळाचा अनोळखी भूतकाळ अस्वस्थ का करतो ? त्या बाळाचा स्वीकार अनेकांना अवघड का वाटतो ? दत्तकप्रक्रियेत अनेकदा शेवटच्या टप्प्यावर चर्चा होते, तो टप्पा कसा आणि का गाठला गेला ? त्यात दत्तक व्यक्तींबरोबरच आजूबाजूची माणसं अन् परिस्थिती वेगळी असती, तर परिणाम वेगळा झाला असता का ? अशा प्रश्नांची उकल करणारे - दत्तक या संकल्पनेकडे शास्त्रीय दृष्टीने पाहणारे - टेस्ट-टयूब बेबी अन् सरोगेट मदरच्या जमान्यात दत्तकाविषयीच्या जनमानसाचा कानोसा घेणारे - दत्तक मूल वाढताना, वाढवताना
वैद्यकीयDattak Mul Vadhtana, Vadhavtana | दत्तक मूल वाढताना, वाढवताना
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartउंटाचे सौंदर्य समजायला वाळवंटाचे डोळे लागतात... वाळवंटावर प्रेम करायला उंटाचा जन्म लाभावा लागतो... स्तालिन माझ्या स्वप्नात आला तो माझ्या स्वप्नात आलाय की मी त्याच्या स्वप्नात गेलोय, यावर मी चर्चा सुरू केली तेव्हा मिशीमध्ये अडकलेला चहा फुर्र फुर्र करत उडवत चक्क हसला आणि म्हणाला पेरेस्त्रोइका... पेरेस्त्रोइका... अनोळख्या देशातून आलेले अनोळखी पक्षी अगदी बिनधास्त न चुकता का येतात असे ? कोठून येतात ? कोठे जातात ? कोणता निरोप ते ठेवतात बरोबर आणि कोणती गाणी ? दत्तप्रसाद दाभोळकरांच्या कवितांमधील काही ओळी...
All BooksDattaprasad Dabholkaranchya Kavita | दत्तप्रसाद दाभोळकरांच्या कविता
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'विराज अन् त्याचे खट्याळ सवंगडी - या साऱ्यांना भेटतो दौलतबंकी. हा आहे शिवाजीराजांच्या काळाशी एकरूप झालेला अवलिया. विराजला अन् त्याच्या मित्रांना अनेक कोडी पडतात या दौलतबंकीबद्दल. हा नेमका कोण ? तो नेहमी जंगलात का राहतो ? तो राखण करतोय तो खजिना कसला ? दौलतबंकीबरोबर ते निघतात एका अद्भुत मोहिमेवर. काय घडलं या मोहिमेत ? दौलतबंकीचा गनिमी कावा आजही कामी आला का ? दौलतबंकीचा खजिना कुठे दडलेला होता ? विराज अन् त्याच्या दोस्तांना तो मिळाला का ? अनेक रहस्यांचा उलगडा करणारी सतत उत्कंठा वाढवणारी साहसकथा ! '
कादंबरीDaulatbanki Ani Tyacha Khajina | दौलतबंकी आणि त्याचा खजिना
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartफुलांनी बहरलेली नाजूक डहाळी वा-याच्या झुळकीने चांदण्यात थरथरावी, तसेच काहीसे श्री. हिमांशु कुलकर्णी यांची कविता वाचताना मला सतत जाणवत राहिले. अतिशय संवेदनशील मनाचा तो उत्कृष्ट आणि कोमल आविष्कार आहे. स्वत:कडे लक्ष आकर्षून घेण्यासाठी या कवितेला कसलीही नवी टूम लपेटून घेण्याची जरुरी वाटत नाही. आवाज मोठा करून ती कानावर आदळण्याचा सोस बाळगीत नाही. तिला स्वत:चीच सोबत पुरते. ती आयुष्याकडे उघड्या डोळ्यांनी पहाते. भोवतीच्या वास्तवाचे प्रखर भान तिला आहे. पण असे असूनही तिचा प्रकृतिधर्मच असा आहे की, स्वत:शीच हळुवारपणे गुणगुणल्यासारखी ती व्यक्त होते. हा प्रकृतिधर्म म्हणजे तिचे खानदान आहे. या प्रकृतिधर्माशी सुसंगत अशी सूचकता श्री. हिमांशु कुलकर्णी यांच्या कवितेत अगदी स्वाभाविकपणे आली आहे. मंगेश पाडगावकर
All BooksDavbhijaleee Vahee | दवं भिजली वही
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartसंघर्ष आणि झगडा यांनी भरलेल्या जगात माझं स्थान काय ? दैनंदिन ताणतणावांना कसं सामोरं जाऊ ? माझं आयुष्य आनंदी आणि अर्थपूर्ण कसं होऊ शकेल ? हे आणि असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि युवक राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना सातत्यानं विचारत असतात. त्यांना उत्तर म्हणून, हे पुस्तक जीवनाकडे पाहण्याचा आध्यात्मिक दृष्टीकोन अधोरेखित करतं. जागतिकीकरण म्हणजे सुखाचा जल्लोष आणि जग म्हणजे केवळ संघर्षाची रंगभूमी या दोन टोकांच्या युक्तिवादांच्या मधला मानवतावादी मार्ग सुचवणारे, आत्मपरिक्षणाला उद्युक्त करणारे हे जीवनाच्या प्रयोजनविषयीचे संवाद !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDeepstambh | दीपस्तंभ
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'बाळासाहेब विखे पाटील या आत्मकथनात केवळ स्व ची कहाणी सांगत नाहीत; तर आपल्याबरोबर आपला समाज, आपले लोक व त्यांच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीचेही मार्मिक विवेचन ते करतात. किंबहुना त्यांच्या आत्मचरित्राला भव्य अवगुंठन आहे, ते आधुनिक भांडवलशाही व अर्थकारण यांच्या झपाट्यात सापडलेल्या भारतीय कृषक समाजाच्या अस्तित्वाच्या लढाईचे. म्हणूनच हे पुस्तक मराठी आत्मकथनात विशेष असे उठून दिसू शकते. लेखकाने आयुष्याच्या वाटचालीत पाहिलेले विशाल जग, विविध विषय, त्यांची हाताळणी, निवेदनाच्या शैलीचा मोकळा, सडेतोड, थोडासा ग्रामीण ढंगाने येणारा बाज हे सगळे वेगळेच रसायन आहे. अरुण साधू
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDeh Vechava Karni | देह वेचावा कारणी
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Read more -
Sale! Add to cartमानवी नात्यांमधला लैंगिकता हा मूलभूत पैलू. आजची तरुणाई त्याकडे कशी बरं बघते? उत्तम सहजीवनासाठी नेमकं काय करायला हवं? विवाहपूर्व लैंगिक समुपदेशन का हवं? सुखी संसाराचं गुपित काय? बदलत्या जीवनशैलीमुळे लैंगिकतेवर परिणाम झाले आहेत का? ते कोणते? त्या समस्यांना कसं तोंड द्यायचं? ज्येष्ठांचं सहजीवन हा दुर्लक्षित राहिलेला विषय. त्याचं महत्त्व काय? हे आणि असे अनेक प्रश्न... सर्व वयोगटाला पडणारे... ते कोणाला विचारायचे? या प्रश्नांची शास्त्रीय पद्धतीनं उत्तरं देणारं हे पुस्तक. या विषयातले वैद्यकीय तज्ज्ञ, समुपदेशक, स्वयंसेवी संस्थांमधले कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून, संशोधनांचा अभ्यास करून लिहिलेलं,
All BooksDehabhan | देहभान
₹270.00Original price was: ₹270.00.₹203.00Current price is: ₹203.00. Save ₹67 Add to cart
Skip to content