-
Out of stock
Read moreमहाराष्ट्र देशाने प्राचीन काळापासून आपले स्वत्व जपले, प्रादेशिकतेचा अतिरेक न करता राष्ट्रधर्म वाढवला. संपूर्ण हिंदुस्तान यवनांच्या तावडीत सापडलेला असताना महाराष्ट्राने मराठी धर्म, संस्कृती टिकवण्याचा यशस्वी प्रयोग केला. मराठी समाजाने देशाला अनेक लोकविलक्षण व्यक्ती आणि संस्थांचे योगदान केले. ब्रिटिश राजवटीत राजकारण, समाजकारण व सांस्कृतिक क्षेत्रात झपाट्याने अध:पतन चालू असताना महाराष्ट्राने स्वत:ला सावरले आणि परकीय राजवटीच्या बुद्धीभेदाला बळी न पडता आपले प्रबोधन व आधुनिकीकरण घडवून आणले. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक, रोमहर्षक घडामोडी झाल्या. राष्ट्रवादा, सामाजिक सुधारणा, पाश्चात्य विचारसरणीतील उदारमतवाद, सशस्त्र क्रांती, राष्ट्रीय चळवळ - एक ना दोन शेकडो घडामोडी. अन त्यात गुंतलेल्या, त्यांच्या कर्त्या करवित्या कैक मराठी वा अमराठी व्यक्ती. एकोणिसाव्या शतकातील राजकारण, धर्म, संस्कृती, शिक्षण पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमधील महाराष्ट्राच्या स्तिमित करणा-या कर्तृत्वाचा वेधक आलेख.
-
Sale! Add to cartएकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध म्हणजे अर्वाचीन महाराष्ट्राचे चैतन्यपर्व ! या काळात महाराष्ट्रामध्ये अनेक रथी-महारथी अवतरले. प्रचंड वैचारिक रणधुमाळी माजली. अनेक प्रयोग झाले. त्यांपैकी काही यशस्वी झाले, काही अपयशी ठरले. दीडशे वर्षांपूर्वीच्या त्या चळवळी आज एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीही आपल्या जीवनाला स्पर्श करीत आहेत. त्यांचा अन्वयार्थ लावण्याचे काम सोपे करणारे हे पुस्तक.
इतिहासMaharashtra Gatha Part 2 | महाराष्ट्रगाथा (भाग २)
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartमहाराष्ट्र होता कसा शेकडो, हजारो वर्षांपूर्वी ? कोणाची वस्ती होती तेव्हा या भूमीवर ? कसे जगत होते, कसे राहात होते ते लोक ? काय होती त्यांची जीवनपद्धती, त्यांच्या चालीरीती ? महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या उत्खननांमधून मिऴालेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे सुप्रसिद्ध पुरातत्त्वशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ.ढवळीकर यांनी सांगितलेली महाराष्ट्राची कुळकथा.
इतिहासMaharashtrachi Kulkatha | महाराष्ट्राची कुळकथा
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart -
Sale! Add to cartमाणसाचं निसर्गाशी एक अतूट, अलौकिक, अगम्य आणि अनादी नातं आहे. तरीही मनुष्य हा निसर्गप्रेमी प्राणी आहे, हे विधान मात्र आज अ-वास्तव' ठरलं आहे. संगणकीय संवादाच्या या युगात माणसाला निसर्गाशी संवाद साधायला वेळ नाही. आपल्या आलिशान अन् प्रशस्त घराच्या छताला त्याने चंद्रतारे लटकवले आहेत. आख्खं आभाळ आपल्या खिडकीच्या चौकटीत बंदिस्त केलंय अन् वृक्षांचं बोनसाय करून पर्वतावरील दूरची रम्यता' जवळ केलीय. कलावंताचं हृदय असणारा अत्यंत सामान्य माणूस मात्र एखाद्या टेकडीच्या टोकावर थिजलेलं, आकाशातून पडलेलं रक्तबीज बुब्बुळात साठवतो. सोनेरी कणांच्या गालिच्यावर अलगद पावलं टाकत निरव शांततेत क्षितिजासह स्वत:ला डुबवतो. तर कोणी दऱ्याखोऱ्यात, रानावनात भणंग भटकंती करतो मनमुराद! कोणी त्याला छंद म्हणतो, कोणी वेडेपणा! हाच वेडेपणा सामान्याला असामान्य बनवतो. त्याला स्वत:ची ओळख मिळते, स्वत:चा शोध लागतो. तो सामान्यांच्या समाजरंगात रंगूनही वेगळा राहतो. असाच वेडेपणा श्री. रमेश देसाई यांनी केलाय. जे दिसलं ते टिपलं, असं हे छायाचित्रण नव्हे. विषय-वस्तूशी तादात्म्य साधून जो विशिष्ट क्षण छायाचित्रकार टिपतो, त्या क्षणाच्या प्रतीक्षेसाठी त्याला खूप संयम आणि धीर धरावा लागतो. श्री. देसाई धबधब्याचं रासवट सौंदर्य अन् घनगंभीर स्वर आपल्या डोळ्यात, कानात, साठवतात; जमिनीकडे झेपावणाऱ्या प्रत्येक धबधब्याची अदाकारी अनुभवतात. धबधब्यात भिजण्याचा आनंद तेही घेतात. परंतु ते तिथे जातात ते त्या धबधब्याला भेटण्यासाठी. अनुभवतात ते कलात्मक झिंग, भव्य सौंदर्य आपल्या फ्रेममध्ये भरून ! महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश अशा भौगौलिक विविधतेतील काही अज्ञात पावसाळी सौंदर्यस्थळं श्री. देसाई यांनी टिपली आहेत. हे छायाचित्रण करताना त्यांचं कवि-कलावंत मन निसर्गाच्या विद्रूपीकरणानं विदीर्ण झालंय, त्यांनी पावसाळी सहलप्रेमींना अनेक दालनं उघडी केली आहेत; त्यांचं आवाहनही सहलप्रेमींनी लक्षात ठेवायला हवंय. सुधीर शालिनी ब्रह्मे
All BooksMaharashtratil Dhabdhabe | महाराष्ट्रातील धबधबे
₹700.00Original price was: ₹700.00.₹525.00Current price is: ₹525.00. Save ₹175 Add to cart -
Sale! Add to cartसमाजानं घालून दिलेल्या रूढ-परंपरांच्या चौकटीच्या धाकाला न बधलेलं कर्वे घराणं. शिक्षणानं स्त्री स्वावलंबी बनेल या विश्र्वासानं स्त्री शिक्षणाचा आग्रह धरणारे आणि त्यासाठी आपलं सारं आयुष्य वेचणारे महर्षी कर्वे ! संतती नियमन आणि समागम स्वातंत्र्य या दोन गोष्टींनीच स्त्रीला मानसिक, शारीरिक आरोग्य लाभेल हे आपलं मत तर्कशुध्दपणे मांडताना समाजाशी एकाकी झुंज देणारे र. धों. कर्वे ! आणि सत्तेच्या खेळाला मान्यता न देता व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या गौरी देशपांडे ! या तीन नावांनी कर्वे घराण्याच्या तीन पिढया स्त्री-स्वातंत्र्याच्या प्रश्नांशी जोडल्या गेल्या. त्यांच्या रक्तातून वारसाहक्कानं प्रवाही झाले केवळ पुरोगामी विचार. स्त्री आज थोडंफार मोकळेपणानं जगत असेल तर त्या श्रेयात कर्वे घराण्याचा वाटा मोठा आहे. स्त्री-स्वातंत्र्याच्या इतिहासातील काही पाने कर्वे घराण्यातील या तीन व्यक्तिंचा इतिहासच आहेत.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMaharshi Te Gauri | महर्षी ते गौरी
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्यलढयाचे नेतृत्व तर केलेच; पण स्वतंत्र भारताची राज्यघटना कशी असावी, याबद्दलही वेळोवेळी ते मार्गदर्शन करीत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये संमत झालेल्या अनेक ठरावांमध्ये गांधीजींच्या विचारांचे स्वच्छ प्रतिबिंब पडलेले आढळते. प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली जी राज्यघटना तयार करण्यात आली, ती मात्र गांधीवादी विचारसरणीशी फारशी सुसंगत आहे, असे म्हणता येत नाही. असे का झाले असावे ? महात्मा गांधी आणि त्यांचे वारसदार असणारे पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांमध्येच मूलभूत मतभेद का होते ? ती मतभिन्नता कशा बाबतीत होती ? अशा विविध प्रश्नांची उत्तरे देता देता भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा इतिहासही उलगडून दाखवणारे एका ज्येष्ठ न्यायविदाचे हे पुस्तक... गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या एका आगळया पैलूवर अधिक प्रकाशझोत तर टाकतेच; पण काही मूलभूत राष्ट्रीय प्रश्नांचा पुनर्विचार करण्यास वाचकांना प्रवृत्तही करते.
समाजकारण / राजकारणMahatma Gandhi Ani Bharatiya Rajyaghatana | महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Read more -
Sale! Add to cart'महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे हे दोन लोकोत्तर नेते. प्रत्यक्ष जीवनात जरी ते दोघे अनेकदा समोरासमोर उभे ठाकले, तरीही आता नव्या संदर्भात त्या दोघांच्या विचारांचा समन्वय घालून प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करणे गरजेचे आहे. हे दोन्ही महापुरुष दोन ध्रुवांसारखे लांब आहेत, असे वाटते; तथापि त्यांचे शाश्वत संदेश लक्षात घेऊन त्यांमध्ये सुसंवाद कसा साधता येईल, याचा हा प्रामाणिक प्रयत्न. '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMahatma Gandhi Ani Dr. Ambedkar: Sangharsha Ani Samanvay | महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cart'आज भारतात सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रिया आघाडीवर आहेत. परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुली बाजी मारताना दिसत आहेत. एका बाजूला ही उत्साहवर्धक स्थिती, तर दुसऱ्या बाजूला बहुसंख्य स्त्रियांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी अजूनही झगडावे लागते आहे, तारेवरची कसरत करावी लागते आहे. कधीकधी तर ही कसरत खुद्द न्यायसंस्थेलाच करावी लागते आहे की काय, अशी परिस्थितीसुद्धा उद्भवते. या परिस्थितीतून मार्ग काढू इच्छिणाऱ्या सर्वांना हवी असते कायद्यांबद्दलची नेमकी माहिती. स्त्रीचे हक्क अबाधित राहावेत, तिला जगण्याचे बळ लाभावे या हेतूने राज्यघटनेपासून भारतीय दंड विधानापर्यंत आणि केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत अनेकांनी भरपूर तरतुदी केल्या आहेत, योजना आखल्या आहेत. त्या सर्वांची तपशीलवार माहिती देणारे अत्यंत उपयुक्त पुस्तक.
कायदाविषयक - अर्थव्यवहारMahilanvishayiche Kayde | महिलांविषयीचे कायदे
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart'माहिती अधिकार कायदा म्हणजे सरकारी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला मिळालेले साधन आहे. पण ते प्रभावी ठरवण्यासाठी अंगी चिकाटी हवी आणि लोकहिताची कळकळही हवी. आपण या कायद्यानुसार - कोणकोणती माहिती मागू शकतो ? अशी माहिती मागवताना अर्ज कसा करायचा असतो ? तो अर्ज कुणाकडे पाठवायचा असतो ? यांसारख्या प्रश्नांपासून ... शासकीय कर्मचाऱ्यांबद्दलचा गोपनीय अहवाल मागता येतो का ? विद्यापीठाने तपासलेल्या उत्तरपत्रिकांची पुन्हा पाहणी करता येते का ? एफ.आय.आर.ची नक्कल मागता येते का ? हॉस्पिटलमधील रुग्णावर केलेल्या उपचाराची माहिती मागता येते का ? शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दलची नेमकी माहिती कुठे मिळेल ? यांसारख्या प्रश्नांपर्यंत ... असंख्य प्रश्नांची उत्तरे समजावून सांगणारे पुस्तक ! सामान्य नागरिकांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी आवर्जून वाचावे,असे पुस्तक ...
कायदाविषयक - अर्थव्यवहारMahiti Adhikar Kayda | माहिती अधिकार कायदा
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'हे पुस्तक कोणासाठी ? सामान्यांसाठी आणि अधिका-यांसाठीही. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) आणि राजहंस प्रकाशन यांचा संयुक्त उपक्रम '
कायदाविषयक - अर्थव्यवहारMahiticha Adhikar Adhiniyam, 2005 | माहितीचा अधिकार अधिनियम, २००५
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart
Skip to content