-
Sale! Add to cart'ही कथा सांगते, आपल्या ग्रामीण समाजाची व्यथा! गावपातळीवरचा एक साधासुधा कार्यकर्ता़ आपलं गाव हागंदारीमुक्त करून, गावाला शासकीय सन्मान मिळवून द्यावा ही त्याची उत्कट इच्छा़ हाच एक ध्यास! त्याने गावात बैठकी घेतल्या़. घरोघरी जाऊन संडास बांधा विनंती केली़. त्यासाठी पैशांची मदत उभी केली़. मग त्याला कोणकोणते प्रश्न सामोरे आले? तो आधी हरला कसा? शेवटी जिद्दीने जिंकला कसा? ग्रामीण भागातील विघातक आणि विधायक अशा दोन्ही वृत्तीची ही कहाणी! '
कादंबरीGavkala | गावकळा
₹260.00Original price was: ₹260.00.₹195.00Current price is: ₹195.00. Save ₹65 Add to cart -
Sale! Add to cart'त्रिंबक नारायण आत्रे यांनी १९१५ साली लिहिलेल्या गावगाडा या बहुचर्चित ग्रंथाची ही शताब्दी आवृत्ती. त्यांनी स्वत: या ग्रंथाचे वर्णन Notes on Rural Sociology and Village Problems with special reference to Agriculture असे केलेले आहे. या आपल्या ग्रंथात त्यांनी गावाचे स्वायत्त स्वयंसिद्ध प्रशासन, गावाच्या आर्थिक व्यवहारातील शेतक-याचे केंद्रवर्ती स्थान, बलुतेदारी, वतनपद्धती आणि तत्कालीन गावगाडयाची कोसळू लागलेली अवस्था इत्यादींची साधार, सप्रमाण चिकित्सा केलेली आहे. या विशेष आवृत्तीमध्ये लेखक आत्रे यांच्या गावगाडा ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीची मूळ संहिता, त्यावरील महत्त्वाची अशी समकालीन समीक्षा, धनंजयराव गाडगीळ, स. ह. देशपांडे व सुमा चिटणीस या अभ्यासकांनी स्वातंत्र्योत्तर काळात केलेली सामाजिक-आर्थिक चिकित्सा आणि ग्रंथशताब्दीच्या निमित्ताने मुद्दाम लिहवून घेतलेले मिलिंद बोकील व नीरज हातेकर राजन पडवळ यांचे लेख, तसाच सदानंद मोरे यांचाही लेख समाविष्ट आहे. संपादक द. दि. पुंडे यांची सुदीर्घ विवेचक प्रस्तावना आणि परिशिष्ट यांतूनही आत्रे यांच्या ग्रंथाचे अंतरंग उलगडून घेण्यास साहाय्य होणार आहे. आत्रेरचित गावगाडाची ही शताब्दी आवृत्ती ग्रामीण अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कृषिविज्ञान इत्यादी क्षेत्रांतील अभ्यासकांना तर उपयुक्त आहेच; पण त्याशिवाय गावप्रशासनात गुंतलेल्या सर्व प्रशासकीय अधिका-यांना तसेच जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांमधील जबाबदार कार्यकर्त्यांनाही विशेष मार्गदर्शक ठरणारी आहे.
रसग्रहण / समीक्षाGawgada : Shatabdi Aavrutti | गावगाडा : शताब्दी आवृत्ती
₹750.00Original price was: ₹750.00.₹563.00Current price is: ₹563.00. Save ₹187 Add to cart -
Sale! Add to cartपौर्णिमेच्या रात्रीचं निरभ्र आकाश... ग्रह-तारे-नक्षत्रांचा सडा घातलाय वरती अन् हिरवागार गालिचा पसरलाय धरतीवरती ! असाच अपलक आभास नि आनंद होत राहतो, मदन मोहनची गीतसंपदा अनुभवताना ! मदन मोहन यांची गाणी दुःखी असतात? कोण म्हणतं? धैर्य लागतं दर्द आणि मदन मोहन समजायला. दुबळ्या माणसाचं काम नाही ते... इतक्या साऱ्या संगीतकारांच्या मेळ्यात, गज़लने प्रेमात पडण्यासाठी निवड केली ती मदन मोहनचीच, हा एक शुभयोगच... मदन मोहन अन् लताच्या गज़ल म्हणजे प्राजक्ताचे टप्पोरे अश्रूच ! मदन मोहनबरोबर फार चित्रपट करू शकलो नाही, याबद्दल गुलजार यांनी खेद प्रकट केला. अहो, आम्ही रसिक तर रोज हळहळत असतो ! मदन मोहन गेले पन्नाशीतच. पण गाणी टिकून राहिली. सच्ची कला काळाच्या भक्ष्यस्थानी कधीच पडत नाही... मदन मोहनच्या अमर संगीताचा, रसिक लेखक अंबरीश मिश्र यांनी घेतलेला ललितसुंदर शोध...
All BooksGazalgandharva Madan Mohan | गज़लगंधर्व मदन मोहन
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartमराठी गझलेच्या प्रदेशात मध्यरात्रीही तळपळणारा सूर्य म्हणजे सुरेश भट! त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन नंतर अनेक कवी गझलांकडे वळले. अशा भटांनंतरच्या पिढीतील एक सुप्रसिद्ध गझलकार दीपक करंदीकर म्हणजे जणू सुरेश भटांचे गंडाबंध शागिर्दच. तीक्ष्ण तीरासारखा घुसलास तू ! शूर योद्ध्यासारखा लढलास तू ! घे सलामी आमुची गझलेतुनी गझलसम्राटा, अमर झालास तू !' असे आपल्या गुरूचे वर्णन करणार् या दीपक करंदीकरांना अनेक प्रसंगांमधून सुरेश भटांचा सोनेरी सहवास लाभला. त्या अविस्मरणीय क्षणचित्रांची साठवण
All BooksGazalsamratachya Sahawasat | गझलसम्राटाच्या सहवासात
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cart'विनायकरावांची मैफील रंगली नाही, असे कधीच होत नाही. त्यात मैत्रीचा तानपुरा सतत वाजत राहतो. कधी स्वत:ची फजिती सांगणारा, कधी इतर कोणाची मस्त फिरकी घेणारा, कधी एखाद्या गुगलीने ऐकणा-याचीच विकेट काढणारा नर्म विनोदाचा ताल मध्यलयीत चाललेला. आणि मग विनायकराव किस्से, प्रसंग, घटना आणि त्यातून कितीतरी माणसे, केवढा तरी काळ तुमच्यापुढे जिवंत करतात. - दिलीप माजगावकर
ललित लेखनGele Lihayache Rahun | गेले लिहायचे राहून
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cartHe invented colours from soil, ink-coffee- soap-paper-chicken from peanuts and auto parts from soyabean! This son of the soil changed the face of American agriculture... Great scientist, he could also sing and paint! A down to earth Dr. George Washington Carver... This is the story of his magical touch, specially written for age group 8 to 18... George Carver The Magician
All BooksGeorge Carver The Magician | George Carver The Magician
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartजॉर्ज ऑर्वेल १९८४ आणि अ ॅनिमल फार्म या कलाकृतींनी जागतिक साहित्यात मोहर उमटवणारा निर्भीड कादंबरीकार. धारदार, तर्कशुद्ध आणि स्फटिकशुभ्र भाषेत लिहिणारा निबंधकार. हुकूमशाही आणि साम्राज्यशाहीचा कट्टर विरोधक. अनुभवांच्या शोधात बेघर फिरस्त्यांसोबत राहणारा मानवतावादी. जिवावर उदार होऊन लढणारा शूर सैनिक. हळव्या मनाचा बाप. हा मनस्वी लेखक कसा जगला ? त्याचे सार्वकालिक ठरलेले विचार कोणत्या विलक्षण अनुभवांच्या मुशीतून घडले ? कोणत्या विचारांचं बीज पेरत होता तो ? त्याच्या आयुष्याची आणि साहित्याची ही कहाणी जॉर्ज ऑर्वेल
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेGeorge Orwell | जॉर्ज ऑर्वेल
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartसरधोपटता वजा केली, की तुम्हाला थोडं अधिक चांगलं लिहिता येऊ शकतं, हे नोरा एफ्रॉन या विदुषीचं तत्त्वज्ञान कविता महाजन यांनी त्यांच्या कथात्म लेखनकाळातच ओळखलं होतं. अकथनात्मक लेखन, अनुवादासाठी देशाच्या कानाकोपर् यातील लेखक-लेखिकांचं वाचन, संपादन या सर्व बाबींमुळे त्यांच्या लेखणीला धार आलेली दिसते. रा. भि. जोशींच्या प्रवासलेखनकुळाशी बरंचसं जवळचं नातं सांगणार् या घुमक्कडी' या पुस्तकामध्येही आहे प्रवासाच्या गोष्टी आणि गोष्टींचा प्रवास. तो किती खोलवर आहे, याचा अंदाज यातील कोणताही लेख वाचल्यानंतर उमजून येईल. पृथ्वीची उत्पत्ती, सूर्याची, अग्नीची, पावसाची इतकंच नाही, तर मिठाची उत्पत्ती याबद्दलच्या लोककथांचा प्रवास कविता महाजनांच्या प्रवासाशी एकरूप होऊन रूढार्थानं प्रवासवर्णन नसलेलं एक अचंबित करणारं पुस्तक तयार झालंय. ब्लॉगसाठी लिहिल्या गेलेल्या या प्रवासनोंदी, पण अत्यंत गंभीर आणि अनंत तपशिलांना कवेत घेणार् या.
All BooksGhumakkadi | घुमक्कडी
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमानवजातीपुढचे आजच्या काळातील एक प्रमुख आव्हान- ग्लोबल वॅार्मिंग रोज आपल्यापर्यंत धडकतात त्याबद्दलची उलटसुलट मते आपला गोंधळ अधिकच वाढवणारी. या समस्येमागील मूलभूत विज्ञान, त्याबाबतचे अद्ययावत संशोधन, या समस्येत अडकलेले राजकारण अन् अर्थकारण या सा-यांची आजची स्थिती उलगडून दाखवणारे
पर्यावरणGlobal Warming | ग्लोबल वॉर्मिंग
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Read more -
Sale! Add to cart'निसर्ग फक्त असतो. तो दुष्ट नाही आणि सुष्टही नाही. तो सुंदर नाही, कुरूप नाही; कनवाळू नाही आणि क्रूरही नाही. तो फक्त त्याच्या स्वयंभू स्वरूपात, अंगभूत नियमांनुसार वागत असतो. निसर्गाच्या नियमांमधूनच उत्क्रांती जन्म घेते आणि उत्क्रांतीच्या नियमांमधून माणूस जन्माला येतो. केवळ माणूसच नाही, तर सर्वच जीवसृष्टी. उत्क्रांतीच्या अभ्यासातून उमगते माणूस आणि त्याचा भोवताल यांमधील नाते. अदभुत, उत्कंठावर्धक आणि अविश्वसनीय वाटावे, असे नाते ! मात्र कितीही अविश्वसनीय वाटले, तरी विज्ञानाच्या नियमांनुसारच आकार घेणारे !! माणूस असा का झाला आणि असा का वागतो, याचा उत्क्रांतीच्या नजरेने घेतलेला हा चित्तथरारक वेध.
वैद्यकीयGof Janmantariche | गोफ जन्मांतरीचे
₹380.00Original price was: ₹380.00.₹285.00Current price is: ₹285.00. Save ₹95 Add to cart
Skip to content