Kashmir : Ek Shapit Nandanwan (Sankshipt Awrutti) | काश्मीर :एक शापित नंदनवन (संक्षिप्त आवृती)
₹350.00 Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87
Availability: 25 in stock
काश्मीर :एक शापित नंदनवन याच नावाच्या १९९५ साली प्रसिद्घ झालेल्या ग्रंथाची ही संक्षिप्त आवृती. ग्रंथ संक्षिप्त केलेला असला तरी काश्मीर-समस्या मात्र वाढलेली आहे; अधिकच गंभीर, स्फोटक बनलेली आहे ! या ग्रंथाचा हेतू काश्मीर-प्रश्न मुळात काय आहे व तो का सुटत नाही, याचे सत्यकथन हा आहे. तेथील महाराजांना भारतात विलीन व्हावयाचे
नव्हते, हा प्रवाद खरा आहे काय ? त्यांना पाकिस्तानात विलीन होण्याचा सल्ला भारताने का दिला होता ? संस्थानांच्या विलीकरणाचे भारताचे धोरण कोणते होते ? विलीन करून घेताना सार्वमताचे लेखी आश्वासन का देण्यात आले ? तरीही नंतर सार्वमत का घेतले गेले नाही ? घटनेत ३७० कलम कसे व कशासाठी आले ? पं. नेहरूंनी पंतप्रधान शेख अब्दुल्लांना कारागृहात का टाकले ? तेथे अराजकाची व दहशतवादाची सुरूवात केव्हा झाली ? या व अशा अनेक प्रश्नांची खरी उत्तरे या ग्रंथात सापडतील. भरभक्कम पुराव्यांनिशी यात मांडलेले दाहक सत्य कितीही अप्रिय वाटले तरी राष्ट्रासाठी ते समजून घ्यावेच लागेल. कोणत्याही राष्ट्रीय प्रश्नाच्या ख-या स्वरूपाचे अज्ञान हाच मूलत: एक राष्ट्रीय शाप आहे. म्हणूनच काश्मीर हे शापित नंदनवन ठरले आहे !
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content