-
Sale! Add to cartगणित म्हणजे किचकट आकडेमोड ! छे, गणित म्हणजे तर्कशुध्द विचारांचा खेळ ! गणित म्हणजे डोके गरगरवणाऱ्या समस्या ! छे छे, गणित म्हणजे बुध्दीला धारधार बनवणारे चाक ! गणित म्हणजे परीक्षेतली हमखास डोकेदुखी ! अजिबात नाही ! गणित म्हणजे हमखास शंभर टक्के गुण ! गणित अजिबात आवडत नसणाऱ्या अन् गणिताशिवाय इतर आवड नसणाऱ्या गणितात रमणाऱ्या अन् गणितापासून लांब पळणाऱ्या साऱ्यांनाच गणिताची गोडी लावणाऱ्या - विद्यार्थी- पालक- शिक्षक या साऱ्यांना गणितातील सार अन् तत्त्वं सोपं करून सांगणाऱ्या - गणितगप्पा भाग १
मुलांसाठीGanit Gappa (Part-1) | गणित गप्पा (भाग-१)
₹130.00Original price was: ₹130.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹32 Add to cart -
Sale! Add to cart'गणित म्हणजे किचकट आकडेमोड ! छे, गणित म्हणजे तर्कशुध्द विचारांचा खेळ ! गणित म्हणजे डोके गरगरवणाऱ्या समस्या ! छे छे, गणित म्हणजे बुध्दीला धारधार बनवणारे चाक ! गणित म्हणजे परीक्षेतली हमखास डोकेदुखी ! अजिबात नाही ! गणित म्हणजे हमखास शंभर टक्के गुण ! गणित अजिबात आवडत नसणाऱ्या अन् गणिताशिवाय इतर आवड नसणाऱ्या गणितात रमणाऱ्या अन् गणितापासून लांब पळणाऱ्या साऱ्यांनाच गणिताची गोडी लावणाऱ्या - विद्यार्थी- पालक- शिक्षक या साऱ्यांना गणितातील सार अन् तत्त्वं सोपं करून सांगणाऱ्या - गणितगप्पा भाग २
मुलांसाठीGanit Gappa (Part-2) | गणित गप्पा (भाग-२)
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'हे एका अवलियाचं चरित्र आहे. मध्य प्रदेशात स्थायिक झालेल्या कोकणी कुटुंबात जन्मलेला एक पोरगा... शिक्षणानिमित्त मुंबई, लंडन, हार्वर्ड अशी शहरं फिरलेला विद्यार्थी... गूढ प्रमेयं सोडवण्यात आनंद मानणारा एक कल्पक गणिती... पर्डूसारख्या जागतिक ख्यातीच्या विद्यापीठात नावारूपाला आलेला, एक विद्यार्थिप्रिय प्राध्यापक... मराठीवरचं प्रेम परदेशांतही कायम ठेवणारा एक भाषाभिमानी... जनसामान्यांत गणिताबद्दलची आस्था वाढीस लागावी, म्हणून पुण्यात भास्कराचार्य प्रतिष्ठानची स्थापना करणारा एक संशोधक... रशियन गणितसंशोधकांना ज्याच्याभोवती योगिक तेजोवलय दिसलं, असा भारतीय योगशास्त्राचा एक गाढा अभ्यासक... अशा विविध रूपांत वावरलेल्या डॉ. श्रीराम शंकर अभ्यंकर नावाच्या एका जगप्रसिध्द मराठी अवलियाचं हे आगळंवेगळं चरित्र. '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेGanityogi Dr. Shriram Abhyankar | गणितयोगी डॉ. श्रीराम अभ्यंकर
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartछोटया मुलामुलींना भोवतालच्या गोष्टी वेगळयाच दिसतात. त्यांच्याशी त्यांचं नातंसुध्दा काहीसं वेगळं असतं - असू शकतं, अशी माझी समजूत आहे. त्या गोष्टींचं वर्णन करताना, त्यांच्याबद्दल काहीबाही बोलताना, मोठयांना दिसणार-सुचणार नाहीत अशा चित्रविचित्र कल्पना आणि मोठयांच्या नीटनेटक्या, पोशाखी भाषेपेक्षा निराळीच नागडी, रंगीत, नादिष्ट, कधी अगदी कोवळी, तर कधी अत्यंत अर्बटचर्बटसुध्दा भाषा ती उधळतात. मुलांचं हे मूलपण माझ्या कविता-गाण्यांतून खेळवण्याचा खटाटोप आधीच्या ५ संग्रहांप्रमाणे याही संग्रहात मी केला आहे. हा एक ब-यापैकी उपक्रम आहे अशी पावती मुलांच्या शाळांतून आणि खुल्या मेळाव्यांतून मी केलेल्या गप्पा-गोष्टी-गाण्यांच्या कार्यक्रमांतून मला वेळोवेळी मिळते आहे. नव्या वाचकांनी त्यांना काय वाटतं ते जरूर सांगावं.
मुलांसाठीGaragara Garagara | गरागरा गरागरा
₹25.00Original price was: ₹25.00.₹19.00Current price is: ₹19.00. Save ₹6 Add to cart -
Sale! Add to cartसा-या ब्रह्मवृंदासमोर याज्ञवल्क्याच्या बुद्धिमत्तेला आव्हान देणारे, त्याला हैराण करणारे प्रश्न विचारीत अखेर त्याला सर्वश्रेष्ठत्वाचं प्रशस्तिपत्रक देणा-या गार्गीचा काळ खूप मागे पडला. पण गार्गी अजून जिवंत आहे. एकोणीसशे चौदाच्या आसपास उत्तर प्रदेशमधल्या एका छोट्याशा खेडेगावात जन्मलेली गुलाब ! वयाच्या अकराव्या वर्षी तिनं तत्कालीन ब्राह्मणवर्गाला प्रश्न केला, अंत्यविधीचे कार्य करण्याचा अधिकार स्त्रीला का नाही ? नुसता प्रश्न विचारून गुलाब थांबली नाही, तर सा-या विरोधाला मोडून काढून गंगेच्या किनारी तिनं स्वतःचा घाट बांधला. रसुलाबाद घाट ! तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा सा-या घाटावर दरारा आहे. भले भले ज्ञानी पंडित तिच्यासमोर नतमस्तक आहे. तिच्याकडे पाहताना गार्गीचा भास होतो. आणि मनात येतं, कोण म्हणतं गार्गी भूतकाळात जमा झाली ? गार्गी अजून जिवंत आहे...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेGargi Ajun Jivant Ahe | गार्गी अजून जिवंत आहे
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartसंगीत आपण का ऐकतो? वेळ कसा घालवावा, हा प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच नाही. जाणते-अजाणतेपणी संगीत जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहे. जावेद अख्तर यांच्या शब्दात सांगायचे झाले, तर - धडकन ताल है, सांस है सूर, जीवन है एक गीत'. संगीत जुने असो वा नवे, आपले' असो वा त्यांचे' शास्त्रीय-उपशास्त्रीय असो वा चित्रपटसंगीत, त्यातले बारकावे जाणून घेण्याच्या मधुकर वृत्तीने वारंवार ऐकत राहिलो, तर सुरुवात होते कानसेन रसिक होण्यास! नवी-जुनी गाणी ऐकताना त्यामधील उमजलेल्या बारकाव्यांची आस्वादकाच्या भूमिकेतून केलेली मांडणी म्हणजे चित्रपटसंगीताची अन् वाद्यसंगीताची सुरीली मैफील -
All BooksGata Rahe… | गाता रहे…
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreपर्यावरण म्हणजे नेमकं काय? त्याचं तुमच्याशी काय नातं? हवा – पाणी, नद्या – नाले, समुद्र – डोंगर, गवत – वनस्पती, प्राणी – पक्षी, कीटक – मुंगी, सूक्ष्म जीव अन् वन्य जीव या सा-यांची या सृष्टीचक्रात नेमकी काय भूमिका? शहरं, वाहनं, कारखाने, शेती, धरणं यांचे नेमके काय परिणाम? प्रदूषण, कचरा, ग्लोबल वॅार्मिंग, प्लास्टिक- अशा समस्यांचा का पडतोय विळखा? या सा-यावर काय उतारा? उचलता येईल का आपला खारीचा वाटा? अशा सर्व प्रश्नांची सुबोधपणे उकल करणारी
पर्यावरणGatha Paryavarnachi | गाथा पर्यावरणाची
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cart...भिंतीवर बसवलेला मोठा कर्णा आणि ते विचित्र यंत्र तिनं पाहिलं. तिला गंमत वाटली. मी याच्यात गायचं, गैसबर्ग ? तिनं विचारलं. होय, बाईसाहेब. गैसबर्ग उत्तरला. ध्वनिमुद्रणाची तयारी करण्यात तो गुंतला होता. सगळी यंत्रसामग्री आपापल्या जागी बसल्यानंतर तो तिच्याकडे आला आणि म्हणाला, आम्ही तयार आहोत, तुम्ही ? ती हसली, तिनं होकारार्थी मान हलवली आणि कर्ण्यापाशी गेली. तिचा तो जादूभरा, वरच्या पट्टीचा अन् मधुर आवाज कर्ण्यात घुमताच भारतीय शास्त्रोक्त संगीतानं फारच मोठी मजल मारली होती. तवायफांच्या कोठ्यांतून आणि श्रीमंतांपुरत्या मर्यादित बैठकांतून हे संगीत सामान्यांच्या घराघरात पोचलं होतं. गौहर जान भारताची पहिली ग्रामोफोन गायिका ठरली होती !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेGauharjan Mhantat Mala | गौहरजान म्हणतात मला!
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartमहेश आपल्या मित्रांना आपले गाव दाखवायला घेऊन गेला. या सगळ्या मित्रांनी गावाकडे खूप धमाल केली आणि अनेक नव्या गोष्टी पाहिल्या. त्यांच्यासोबत आपणही करूया गावाचा फेरफटका आणि लुटू या गावाकडची मजा
All BooksGavakadchee Majja | गावाकडची मज्जा
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Add to cartपरदेशी भाषेतील कथाकारांच्या कथा वाचताना
अशा काही कथा काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आल्या ज्या वाचल्यावर काहीतरी अद्भुत असं गवसल्याचा मला आनंद झाला.
या कथा माझ्या देशाच्या भूमीपासून हजारो मैल दूर असलेल्या भूमीत घडतात. यातील बर्याचशा माझ्या काळाच्या शंभर वर्षांपूर्वीच्या काळात घडतात. पण त्या मला माझ्या, आपल्या, सगळ्या जगाच्या वाटल्या. काल, आज आणि उद्याच्याही वाटल्या.
मला गवसलेल्या या कथा माझी भाषा बोलणार्यांपर्यंत पोहोचवणं मला आवश्यक आणि आनंददायी वाटणं हा असं वाटण्याचाच परिपाक...
Skip to content