चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
Out of stock
Out of stock
Sale! Read more'भगतसिंगच्या खटल्यातील काळी बाजू फारशी कुणाला माहीत नाही. त्या बाजूवर प्रकाश पाडणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. हे पुस्तक म्हणजे या विषयावरचा अखेरचा शब्द नाही. ज्या बाबींकडे आजवर पुरेसे लक्ष पुरवले गेले नाही, अशा काही बाबी ते नजरेस आणू इच्छिते. हा खटला म्हणजे एक फार्सच होता, या मुद्द्याची सखोल चिकित्सा आजवर झालेली नाही. कदाचित साँडर्सच्या हत्येत भगतसिंगचा नि:संशय सहभाग होता, म्हणून अशी चिकित्सा झाली नसेल. पण लाहोर कटा च्या खटल्याचा तपशीलवार अभ्यास गरजेचा आहे. आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी न्यायप्रक्रियेचा गैरवापर कसा केला गेला, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा खटला, १ मे १९३० रोजी गव्हर्नर जनरलनी वटहुकमाद्वारे हा खटला चालवण्यासाठी एका खास न्यायाधिकरणाची स्थापना केली. खटल्यातील आरोपींना उच्च न्यायालयात अपील करण्याची संधीच मिळू नये आणि त्यांची फाशीची शिक्षा कायम राहावी हाच या वटहुकमाचा हेतू होता. ए. जी. नूराणी
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेBhagatsingcha Khatla | भगतसिंगचा खटला
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Read more -
Sale! Add to cartपाण्याच्या थेंबाशी इमान असणारा हा माणूस पाण्याच्या थेंबासारखा नितळ होता... विलासराव जे म्हणत, ते आज नाही, तरी नजीकच्या भविष्यात तुम्हांला ऐकावंच लागेल. पाणी मोजूनच द्यावं लागेल!...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेBhagirathache Varas | भगीरथाचे वारस
₹260.00Original price was: ₹260.00.₹195.00Current price is: ₹195.00. Save ₹65 Add to cart -
Sale! Add to cartएक सच्चा, सत्वशील सूर भीमसेन भारतीय जनसंस्कृतीच्या महासागरात विरघळून गेलेला एक सुरेल प्रवाह. त्यांची गायकी जेवढी अदभुत तितकीच त्यांची जीवनकथाही अकल्पित. अशा या नाटयपूर्ण जीवनाची आणि अविश्वसनीय वाटेल अशा गानकर्तृत्वाची ही चरित्र मैफल.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेBhimsen | भीमसेन
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartकॅनव्हासवर शब्दांनी रंगवायला घेतलेली चित्रं पुस्तकाच्या पानांवर रंगांनी लिहिली गेली तर? - अशक्य असं जे घडतं, ते म्हणजे हे पुस्तक! रंगांनी भिजलेल्या ओल्या बोटांमधून शब्द वाहते राहतात, तेव्हाच त्वचेखाली धावणारया रक्तवाहिन्यांच्या रेषा उकलून 'आत'ल्या आयुष्याचे लखलखते तुकडे असे अलगद शब्दांत बांधता येतात! ही चित्रंच आहेत. शब्दांनी रंगवलेली. पोलिस लायनीतल्या खाकी बालपणाच्या हाती रंगांची पेटी देणार्या जन्मदात्याची, वेडयावाकडया तरुण रेषांना वळण देणार्याद गुरूजनांची, भणाण डोक्यातल्या धस्कटाचा ध्यास लागलेल्या रंगीत तारूण्याची, मोकाट उनाडलेल्या जिगरी दोस्तीची, धावत्या रेषेच्या वाटेत आलेल्या काही अर्धविरामांची, काही दुखर्याा पूर्णविरामांची ...ही शब्द 'चित्रं'! - अपर्णा वेलणकर
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेBitwin Da Lines | बिटवीन द लाइन्स
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'देशातील सगळयात महत्त्वाचा रसायनशास्त्रज्ञ असा सार्थ लौकिक असणारे वैज्ञानिक म्हणजे सी. एन. आर. राव. परदेशातल्या ख्यातनाम विद्यापीठांतून ज्ञानाचा ठेवा पाठीशी घेऊन राव भारतात परतले, ते मायदेशात रसायनशास्त्रातलं संशोधन समृद्ध करण्याच्या निर्धारानेच. आपल्या विषयातील नवी नवी क्षितिजे धुंडाळताना त्यांनी स्वतःला झोकून दिले ते नॅनोतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात. विविध नॅनोमटेरिअलचे संशोधन करताना त्याचे व्यावहारिक फायदे भारताला मिळायला हवेत, यासाठी राव अत्यंत जागरूक असतात. अशा या नॅनोतंत्रज्ञान आणि रसायनशास्त्रातील जागतिक कीर्तीच्या देशभक्त वैज्ञानिकाची स्फूर्तिदायक चरित्रगाथा
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेC. N. R. Rao Anokhya Rasayanane Banlela Manus | सी.एन.आर.राव. अनोख्या रसायनाने बनलेला माणूस
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cartसोन्या-चांदीहून मोलाची असतात आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी माणसं. ही माणसं निवडण्यासाठी कुठल्या सराफाच्या दुकानात नाही जावं लागत. कधी ती आयुष्यात प्रत्यक्ष प्रवेश करतात, तर कधी अप्रत्यक्ष सोबत चालत राहतात. या गुणवंत माणसांच्या परीसस्पर्शानं आपल्या आयुष्याचं ख-या अर्थानं सोनं होतं ! स्वत:च्या झळाळत्या तेजानं बरोबरच्या आयुष्यांनाही लखलखवणा-या व्यक्तिमत्त्वांची तेजाळ शब्दचित्रं :
All BooksChanderi-Soneri | चंदेरी सोनेरी
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartकवीनं असावं अल्पाक्षरी, आणि नाटककारानं मितभाषी. अभिनेत्यानं करावा संहितेतील अव्यक्त आशय व्यक्त. तंत्रज्ञानं साधावा शब्देविण संवाद. ध्वनी, प्रकाश, रंग, रेषा यांनी टाकावा अवकाश भारून. प्रेक्षकांनी सगळं अनुभवावं, मूक राहून आणि एकाग्र होऊन. समीक्षकांनी करावं नाट्यानुभवाचं विश्लेषण अचूक. पण मग,... दिग्दर्शकानं काय करावं? आरंभापासून अंतापर्यंत, प्रत्येक क्षण उजळून टाकण्याचं कसब शिकवावं. मंचावरील आणि मंचामागील प्रत्येकाचा मित्र, तत्त्वज्ञ आणि दिशादर्शक व्हावं. हे का आणि कसं करावं? सांगत आहेत, मराठी नाट्यसृष्टीतील अग्रणी दिग्दर्शक आणि अभिनेते- चंद्रकांत कुलकर्णी.
All BooksChandrakant Kulkarni Saadar Karait Ahe …! | चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे
₹800.00Original price was: ₹800.00.₹600.00Current price is: ₹600.00. Save ₹200 Add to cart -
Sale! Add to cartएका सच्च्या समाजवाद्याचं चिंतनशील स्वगत इंग्रजी पेपरवाल्यांनी चंद्रशेखरांना Rugged हे विशेषण बहाल केलं होतं... रांगडा. गडी रांगडा होता, पण मन सुसंस्कृत नि आधुनिक विचारांनी भारलेलं होतं. तरुणपणी कविता केल्या, काही काळ पीएसपीच्या पत्रिकेचे संपादक होते. चंद्रशेखर ग्रामीण होते, गावंढळ नव्हते. त्यांचा देवीलाल झाला नाही. ग्रामीण भागातले असले, तरीही त्यांनी शेतक-यांचा विक्टिम कार्ड म्हणून वापर केला नाही. ग्रामीण विकासासाठी व्यापक देशहित आणि समताधिष्ठित, परिवर्तनशील विचारांची बैठक हवी; हे गांधीजींचं सूत्र धरून त्यांनी आपलं राजकारण केलं. अनेक अंतर्विरोधांनी ग्रासलेलं भारताचं बहुआयामी समाजजीवन चंद्रशेखरांनी पुस्तकात सजीव केलंय. जागतिकीकरणाच्या वावटळीत लोकसंस्कृतीची फार मोठी पडझड झाली. असं ते म्हणतात. पुस्तकात चंद्रशेखर म्हणतात, राजकारण सत्यावर चालत नाही हेच खरं.' अंबरीश मिश्र
All BooksChandrashekhar – Jase Jagalo Tasa | चंद्रशेखर – जसं जगलो तसं
₹380.00Original price was: ₹380.00.₹285.00Current price is: ₹285.00. Save ₹95 Add to cart -
Sale! Add to cartभारतात जन्मलेल्या आणि इंग्लंड-अमेरिकेत कर्तृत्व गाजवलेल्या एका नोबेल पारितोषिकविजेत्या शास्त्रज्ञाचे - डॉ. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांचे - हे चरित्र आहे. भारतातल्या प्रारंभिक शिक्षणापासून अमेरिकेतल्या प्रगत संशोधनापर्यंत त्यांचा जीवनप्रवाह कसा वाहत गेला, त्याने कोणकोणती वळणे घेतली, याचा हा वेधक वृत्तांत आहे. श्वेतबटू किंवा कृष्णविवर यांच्यासारख्या क्लिष्ट, अगम्य वाटणा-या विषयांमध्ये त्यांनी केलेले संशोधन, त्या संशोधनाला खूप विलंबाने मिळालेली मान्यता आणि त्या विलंबामुळे निराश न होता त्यांनी प्राध्यापकीपासून ग्रंथलेखनापर्यंत विविध क्षेत्रांत केलेले मौलिक कार्य, मायदेशी परतण्याऐवजी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारण्याचा त्यांनी जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय, शेक्सपीयर- बिथोव्हन-न्यूटन या दिग्गजांच्या सृजनशीलतेची वैज्ञानिक दृष्टीने त्यांनी केलेली आस्वादक चिकित्सा...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेChandrashekhar | चंद्रशेखर
₹175.00Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44 Add to cart -
Sale! Add to cart'उर्दू. हिरव्या पानांवरचं लोभस नक्षीकाम. वासंतिक वाऱ्याचा सुगंधी श्वास. भारतमातेच्या गळ्यातला मौल्यवान चंद्रहार. एका ऐतिहासिक युगाचा आर्त विलाप. उर्दू. जीवनाचं समग्र, उग्र-मधुर भान. अनेक भाषा-भगिनींच्या मायसावलीत वाढली अन् पाहता पाहता उर्दू शक्तिमान, सुस्वरूप झाली. आणि समजूतदारही. तिचा विचारव्यूह व्यापक आणि बहुआयामी होता. एकाच वेळी ती फारसी भाषेशी गुफ्तगू, भारतीय तत्त्वज्ञानाशी विचारविनिमय आणि टोपीकर ब्रिटिशांशी फिरंगी खलबतं करत होती. काय ते पदलालित्य काय ते समेवर येणं ! मोगल सल्तनतीच्या उदास सांध्य-उन्हात उर्दू उजळून निघाली, भारताच्या लोकगंगेत मिसळून गेली. भले सरंजामी काळात जन्माला आली असेल; पण माणुसकी, बंधुता आणि स्वातंत्र्य ही आधुनिक मूल्यं तिने अम्लान निष्ठेने जोपासली. काव्य हा उर्दूचा प्राणदिवा. अनेक श्रेष्ठ कवी तिच्या निळ्या ज्योतीवर पुन्हा पुन्हा झेप घेत होते नि लिहीत होते. त्यांची कहाणी म्हणजे हे पुस्तक. शायर आणि शायरीची मनभावन मैफल. मीर तक़ी मीर , सौदा , ज़ौक़ , मिर्झा ग़ालिब, मोमिन , दाग़ देहलवी, नज़ीर अकबराबादी, अकबर इलाहाबादी, जिगर मुरादाबादी आणि मजाज़ अशा निवडक कवींच्या काव्यप्रवासाची ही सुरस आणि संवेदनशील सनद. सौम्य रंगांतली ही शब्दचित्रं लेखणीच्या पाच-सहा फटकाऱ्यांनी सिद्ध झालीयेत. ती वाचून वाचकांना उर्दू काव्याचा अंदाज येईल आणि मूळ लिखाणाची ओढ लागेल.'
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेChaukat Udhalale Moti | चौकात उधळले मोती
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart
Skip to content