चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
Sale! Add to cart'काही स्त्रिया सावलीसारख्या जगतात, तर काही स्वयंप्रकाशी. सावल्यांच्या वाटयाला नेहमी सन्मानच येतो, असे नाही. कधी उपेक्षा, कधी गैरसमज, कधी झांटिपीचा शिक्का असेही पदरात पडते. तर स्वयंप्रकाशी ज्योतींनाही तेजाबरोबर दाहकता, नवी वाट दाखवणा-या प्रकाशासवे विरोधाची अन् टीकेची काजळी सोसावी लागते. समर्पित, प्रेरणादायी जीवन आणि कर्तृत्वाने काळाच्या ओघावर ठळक ठसा उमटवणा-या वेचक स्त्रियांच्या चरितकथा छाया आणि ज्योती
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेChaya Ani Jyoti | छाया आणि ज्योती
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartमहाराष्ट्रात मान्यता पावलेल्या एका व्यंगचित्रकाराने गेल्या वर्षी एका दिवाळी अंकातल्या मुलाखतीत तर असे म्हटले होते, दलालांनी आपली कला सतत प्रवाहिनी ठेवली, तेच तेच करण्याच्या डबक्यात रुतली नाही. त्यांच्या इतक्या बदलत्या पद्धती (स्टाईल्स) निर्माण केलेल्या कलाकृती पाहिल्या की मनात येते, महाराष्ट्रातच काय, जगात कोणी अशा व इतक्या विविध पद्धतींनी चित्रे काढली नसावीत! हे वाचून खरे म्हणजे मीही विस्मयचकित झालो होतो. आपल्या कलाकृतीची अशा तर् हेची कौतुकाची प्रतिक्रिया जेव्हा जेव्हा मी अनुभवतो, तेव्हा मला अपार आनंद व्हायला हवा होता. काहीतरी या कलाविषयात माझ्याकडून भरीव घडले आहे, असे वाटून मूठभर मास वाढले आहे असे भासायला हवे होते... पण... कुठेतरी खोल मनात दडलेली अतृप्तता- इच्छा मला नेहमीच अस्वस्थ करत असते. जनसामान्यांपासून ती तथाकथित प्रतिष्ठित आणि सुशिक्षित वर्गातील रसिकांकडून दाद घेत असलेल्या माझ्या कलेला तशीच मनमोकळी साद विद्वान, कलारसिक किंवा प्रौढ व प्रगल्भ विचारवंत चित्रकारांकडून मिळाली नाही. क्षणभर स्तिमित करील, त्यांच्या सुजाण बुद्धिमत्तेला आव्हान देईल अशी काहीतरी भरीव सृजनशील कलानिर्मिती माझ्याकडून व्हायला हवी होती. व्यावहारिक फापटपसार् यात मनात असूनही हे अत्यंत महत्त्वाचे कार्य माझ्याकडून घडू शकले नाही, याची खंत मला नेहमीच अस्वस्थ करीत असते. या अस्वस्थतेची जाणीव जोपर्यंत माझ्या मनात जागृत आहे; तोपर्यंत त्या प्रतिभेचा महान स्पर्श मला निश्चित लाभेल आणि माझ्या हातून काही अविस्मरणीय आणि सृजनशील कलानिर्मिती निर्माण होईल, असे मनोमन वाटते तसा आत्मविश्वास वाटतो! होय, आत्मविश्वास! कलावंत या विश्वासावरच जगत असतो! पुस्तकाची वैशिष्ट्ये १. ४०८ पृष्ठसंख्या २. ३२ बहुरंगी चित्रांची पृष्ठसंख्या ३. अनेक कृष्णधवल चित्रे ४. दलालांवरील लिहिलेले लेख ५. दलालांवरील मान्यवरांचे लेख ६. दलाल व समकालीन चित्रकार ७. दलाल यांनी काढलेली चित्रे कालक्रमानुसार
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेChitrakar Deenanath Dalal: Chitra Ani Charitra | चित्र आणि चरित्र
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cart'चित्रकार गोपाळ देऊसकर ही कहाणी आहे त्यांच्या चित्रनिर्मितीची. बालपणीच त्यांच्यातले चित्रगुण प्रकटले. उत्तरोत्तर ते बहरत गेले. या कलेच्या जोरावर ते इंग्लंडला जाऊन रॉयल अॅकॅडमीत शिकले. भारतीय संस्थानिकांच्या राजवाडयातून वावरले. पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरातील लोकमान्य टिळक जीवनदर्शन आणि बालगंधर्व रंगमंदिरातील बालगंधर्व त्यांच्या कुंचल्यातून साकार झाले. त्यांच्या कॅनव्हासवर कोटयवधींचे दागिने ल्यालेली राणी उमटली, तशीच दूध विकणारी खेडूत स्त्रीही ! अशी त्यांची कित्येक चित्रे ! ही कहाणी आहे देऊसकरांच्या व्यक्तिगत जीवनाची. लहानपणीच आईवडलांचे छत्र हरपले. त्यांचे जीवन एकाकी तरीही रंगीन, अफलातून तरीही काटेकोर हिशोबी ! त्यांनी हौशीने संसार उभारला आणि व्यवहारीपणे तो तोडलाही ! ते जगले जन्मभर चित्रकलेच्या साथसंगतीतच ! स्वत:च्याच मस्तीत ! सुप्रसिध्द चित्रकार सुहास बहुळकर यांच्या शब्दांतून रंगलेले हे देऊसकर दर्शन.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेChitrakar Gopal Deuskar Kalavant Aani Manus | चित्रकार गोपाळ देऊसकर कलावंत आणि माणूस
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartपदवी अभियांत्रिकीची, अभ्यास गणितातील पीएच.डी.साठी आणि लक्ष स्वातंत्र्यचळवळीवर. अशा तिठ्यावर उभा असलेला एक अवलिया योगायोगाने चक्क सर्कल या चित्रपटगृहाचा मालक बनतो. ... आणि सुरू होते उद्यमशीलतेची, प्रयोगशीलतेची अखंड मालिका. त्याला जोड मिळते या अवलियाच्या स्वभावातील अदम्य ज्ञानलालसेची, कुतुहलाची आणि विज्ञानप्रेमाची. उपजत बुद्धिमत्ता, उच्च शिक्षण, सेवादलाच्या संस्कारातून मिळालेली सचोटी, व्यवहारकुशलता आणि समृद्धीचा वापर समाजासाठी करण्याचे औदार्य.... दुर्मीळ गुणांचे वरदान लाभलेल्या रावसाहेब ओकांनी एका सर्कल सिनेमातून आलेल्या समृद्धीतून नासिक शहरात अनेक औद्योगिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वर्तुळे निर्माण केली आणि या शहरास सर्वार्थाने समृद्ध केले. त्यांच्या उद्यमशील जीवनाची ही कहाणी. जेवढी अचंबित करणारी, तेवढीच उत्साहवर्धक, रोचक आणि रंजक.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेCircle’ Chi Vartule | सर्कलची वर्तुळे
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart' क्लोज एनकाउंटर्स मध्ये दिसणारा कामाठीपुरा हा सत्तर आणि ऐंशीच्या दशकातला आहे. यातल्या चोवीस भागांतून पुरुषोत्तम बेर्डे आपलं बालपण, पौगंड आणि तारुण्य यांच्या साक्षीने अनेक माणसांच्या आयुष्यांच्या आत डोकावतो. मराठी साहित्यातली व्यक्तिचित्रांची दोन तालेवार पुस्तकं मला चटकन आठवतात. एक अर्थातच पुलंचं व्यक्ती आणि वल्ली आणि दुसरं जयवंत दळवींचं सारे प्रवासी घडीचे . दोन्ही पुस्तकांची साहित्यिक गुणवत्ता मोठी आहे. क्लोज एनकाउंटर्स मध्ये या दोन्ही पुस्तकांपेक्षा एक गोष्ट अधिक आहे. ती म्हणजे भौगोलिक सलगता. कामाठीपुऱ्याच्या सोळा गल्ल्या. त्यातली अखंड चालणारी राडेबाजी. सिनेमा आणि गल्ली क्रिकेट. पुरुषोत्तमने स्वत: मोकळं होण्याची जी प्रक्रिया अनुभवली त्याचं फलस्वरूप म्हणजे हे पुस्तक. जयंत पवार'
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेClose Encounter | क्लोज एनकाउंटर्स
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cartदिलीपकुमार म्हणजे शहजादा सलीम . दिलीपकुमार म्हणजे राम और शाम . दिलीपकुमार म्हणजे गंगा . दिलीपकुमार म्हणजे देवदास आणि आझाद ही. दिलीपकुमार म्हणजे असे अनेक नायक, अशा अनेक व्यक्तिरेखा. अभिनयाचा मानदंड प्रस्थापित करणारा हा अभिनेता केवळ त्याच्या चित्रपटांपुरता अन् त्याच्या भूमिकांपुरता उरला नाही. त्याच्या प्रत्येक भूमिकेत लसलसत होते भविष्यातल्या अभिनयाचे कोंब. गेल्या सत्तर-ऐंशी वर्षांत हिंदी सिनेमात वावरणाऱ्या कैक कलावंतांच्या अभिनयाला जीवनरस पुरवणारा जिवंत झरा म्हणजे दिलीपकुमार. स्वातंत्र्योत्तर आधुनिक भारताचं प्रतिनिधित्व करणारं सर्वांगसमृद्ध सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणजे दिलीपकुमार. अभिनयाच्या क्षेत्रात दिलीपकुमारपूर्वी आणि दिलीपकुमारनंतर असे कालखंड प्रस्थापित करणाऱ्या या प्रतिभावान कलावंताची नवरसांनी भरलेली चरितकहाणी.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDaastan – E – Dileepkumar | दास्तान-ए-दिलीप कुमार
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cart'एका हातात पिस्तुलाची जळती आग दुस-या हातात स्फोटक निखारा. वेदनांच्या अन् यातनांच्या, जळत्या लाव्हातून हे अग्निपुत्र सशस्त्र क्रांतीची वाट चालले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केल. अवघ्या अडीच वर्षांत ब्रिटीश साम्राज्याला विजचा तडाखा देणा-या हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा तेजस्वी इतिहास. '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDadasabeh Bidkar Vasa Adivasi Sevecha | दादासाहेब बिडकर वसा अदिवासी सेवेचा
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartही आहे एक छान जुळलेली सुरेल मैफील. क्वचित कुणाच्या वाट्याला येणारी जन्मजात समृद्धी त्यांना लाभली, पण ते उतले-मातले नाहीत. नेकीने उद्योग सांभाळत, त्यांनी समृद्धीचे चीज केले. कापड उद्योगाच्या उभ्याआडव्या धाग्यांनी विणलेल्या त्यांच्या जीवनात रंग भरला क्रिकेटने. हौस म्हणून ते खेळाच्या प्रांगणात उतरले, पण मग हा क्रिकेटचा खेळच त्यांचा ध्यास बनला. संसार, व्यवसाय, छंद, सा-यांचा सुरेल नाद उमटवणारी छान जुळून आलेली जीवनमैफील दैवायत्तम्
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDaivayattam | दैवायत्तम्
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cart'नाटकाचं चित्रीकरण केलं, की सिनेमा होऊ शकेल, असं वाटण्याच्या काळात त्यांनी मूव्ही कॅमेरा बनवला, बोलका मराठी चित्रपट बनवला, तो सातासमुद्रापार नेऊन गौरवला, महाराष्ट्र्राचा मानबिंदू उभा केला... 'प्रभात फिल्म कंपनी'. 'प्रभात'चे चित्रपट सर्वदूर माहीत आहेत, पण दामलेमामांचा चरित्रपट ? त्यातलीच ही काही सोनेरी पानं...'
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDamlemama | दामलेमामा
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'जगातलं सगळं विज्ञान, कला अन् शास्त्रं अखेरीस माणूसशास्त्रापुढे विनम्र असतात. शेवटी हातचा एक उरतो तो माणूसच. हे पुस्तक माणसांचं आहे. तऱ्हेवाईक, प्रामाणिक माणसं. मानी, दिलदार, लहरी...अन् तालेवार, गुणी माणसं. माणुसकीपर्यंत पोहोचण्यासाठी नित्य धडपडणारी माणसं. प्रत्येकाच्या जगण्याला आत्मभानाचा उग्रमधुर सुवास... माणसं एकाच मापा-आकाराची नसतात. इथंही तशी ती नाहीत. महात्मा गांधी, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, विख्यात पत्रकार-संपादक रुसी करंजिया, फिअरलेस नादिया, कथाकार इस्मत चुगताई, गीतकार-कवी शैलेंद्र, संगीतकार मदनमोहन, सर लॉरेंस ओलिव्हिए-विवियन ली यांसारखे मनस्वी प्रतिभावान इथं आहेत. त्याचप्रमाणे काही साधी माणसंदेखील आहेत. गवताच्या पात्याप्रमाणे लवलवणारी. अज्ञात, अयाचित, आनंदी अन् अवध्य. या माणसांचा अंतर्वेध घेताना, त्यांच्या जगण्यातलं सत्त्व-तत्त्व मनें मौआलें वेचताना लेखकाची वृत्ती तटस्थ अन् संवेदनशील आहे. लिखाणातला मैत्रीचा सूर सच्चा अन् संथखोल आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDarawale Ithe Suvas | दरवळे इथे सुवास
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart
Skip to content