चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
Sale! Add to cartसंघर्ष आणि झगडा यांनी भरलेल्या जगात माझं स्थान काय ? दैनंदिन ताणतणावांना कसं सामोरं जाऊ ? माझं आयुष्य आनंदी आणि अर्थपूर्ण कसं होऊ शकेल ? हे आणि असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि युवक राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना सातत्यानं विचारत असतात. त्यांना उत्तर म्हणून, हे पुस्तक जीवनाकडे पाहण्याचा आध्यात्मिक दृष्टीकोन अधोरेखित करतं. जागतिकीकरण म्हणजे सुखाचा जल्लोष आणि जग म्हणजे केवळ संघर्षाची रंगभूमी या दोन टोकांच्या युक्तिवादांच्या मधला मानवतावादी मार्ग सुचवणारे, आत्मपरिक्षणाला उद्युक्त करणारे हे जीवनाच्या प्रयोजनविषयीचे संवाद !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDeepstambh | दीपस्तंभ
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'बाळासाहेब विखे पाटील या आत्मकथनात केवळ स्व ची कहाणी सांगत नाहीत; तर आपल्याबरोबर आपला समाज, आपले लोक व त्यांच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीचेही मार्मिक विवेचन ते करतात. किंबहुना त्यांच्या आत्मचरित्राला भव्य अवगुंठन आहे, ते आधुनिक भांडवलशाही व अर्थकारण यांच्या झपाट्यात सापडलेल्या भारतीय कृषक समाजाच्या अस्तित्वाच्या लढाईचे. म्हणूनच हे पुस्तक मराठी आत्मकथनात विशेष असे उठून दिसू शकते. लेखकाने आयुष्याच्या वाटचालीत पाहिलेले विशाल जग, विविध विषय, त्यांची हाताळणी, निवेदनाच्या शैलीचा मोकळा, सडेतोड, थोडासा ग्रामीण ढंगाने येणारा बाज हे सगळे वेगळेच रसायन आहे. अरुण साधू
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDeh Vechava Karni | देह वेचावा कारणी
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Read more -
Sale! Add to cartपोथीनिष्ठ समाजवाद ना देशाचे दैन्य दूर करू शकत, ना देशबांधवांचे दारिद्र्य नाहीसे करू शकत. हवे आहे ते निखळ व्यवहारज्ञान. मांजर काळे की गोरे यावर काथ्याकूट करीत बसण्यापेक्षा ते उंदीर फस्त करते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ! असा दृष्टिकोन ठेवून आधुनिक चीनची भक्कम उभारणी करणाऱ्या नेत्याचे - देंग झियाओपिंग यांचे हे चरित्र. साम्यवादी पक्षातली त्यांची जडणघडण, त्यांनी पार पाडलेल्या विविध जबाबदाऱ्या, त्यांना वैयक्तिक जीवनात आणि सार्वजनिक कारकिर्दीत सोसाव्या लागलेल्या व्यथावेदना, त्यांनी देशहित समोर ठेवून घेतलेले निर्णय व केलेल्या तडजोडी आणि अखेरीस समृद्ध, समर्थ चीनच्या रूपात त्यांनी मागे ठेवलेला वारसा... या साऱ्यांचे हे माहितीपूर्ण चित्रण.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDeng Xioping – Adhunik Chincha Shilpakar | देंग झियाओपिंग – आधुनिक चीनचा शिल्पकार
₹320.00Original price was: ₹320.00.₹240.00Current price is: ₹240.00. Save ₹80 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreपन्नास वर्षांहूनही अधिक काळ अडवाणीजी माझे मित्र आणि निकटवर्ती सहकारी राहिले आहेत. राष्ट्रवादावरील अतूट श्रध्देशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही आणि तरीही वेळोवेळी उदभवणा-या परिस्थितीच्या गरजेनुसार राजकीय प्रतिसाद देताना आवश्यक ती लवचीकतासुध्दा त्यांनी दाखवली आहे. माझी अशी खात्री आहे की, देश माझा, मी देशाचा या त्यांच्या पुस्तकाला मोठया संख्येने वाचक मिळतील; कारण त्यात एका संवेदनशील माणसाच्या लक्षवेधी जीवनप्रवासाचे प्रतिबिंब पडले आहे... आणि अशा एका लोकविलक्षण नेत्याचेही की, ज्याच्या कारकिर्दीचा सर्वोत्तम टप्पा माझ्या अपेक्षेप्रमाणे अजूनही यायचा आहे. तो लवकरच यावा, अशी माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे ! - भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDesh Maza, Mi Deshacha | देश माझा, मी देशाचा
₹700.00Original price was: ₹700.00.₹525.00Current price is: ₹525.00. Save ₹175 Read more -
Sale! Add to cart'ज्यांना आपण श्रध्दांजली वाहतो, त्या व्यक्ती केवळ सर्वगुणसंपन्न होत्या, असा आदर्श मागे झाला नाही, पुढे होणं शक्य नाही - अशासारखं लिहिणं शक्य आहे; पण मला ही केवळ व्यक्तिपूजा वाटते... कदाचित ऐन तिशीमध्ये मी तसं लिहू शकलो असतो किंवा तशा प्रकारचं लिहिलंही असेल. आता या वयाला केवळ भावप्रचुर लिहिणं मानवत नाही आणि उपयुक्तही वाटत नाही. काहीतरी पूर्णांशानं खरं असलेलं आपण लिहू या, त्यामध्ये कार्याची हानी होणार नाही अशी अवश्य काळजी घेऊ या. पण तरीसुध्दा शक्य तितकं यथातथ्य लिहू या, केवळ भावनाप्रधान लिहायला नको, असं मला वाटतं. - आप्पा पेंडसे (एका पत्रातून)
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDevache Ladke | देवाचे लाडके
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartगायनाचार्य भास्करबुवा बखले (१८६९–१९२२) * उन्नीसवीं शताब्दी में अपनी कला एवं तपस्या से अखिल भारत में (सिंध-पंजाब तक) ख्यातिप्राप्त गायक। * विद्यासाधना के अत्यंत कठिनतम उस कालखंड में अपने अपूर्व त्याग और सेवा के बल पर गायन कला में सफलकाम शिष्योत्तम। * विद्यादान एवं शिष्यनिष्पादन में औघ़डदानी आदर्श गुरु। * मास्टर कृष्णराव और बालगंधर्व जैसे देदीप्यमान शिष्यों के द्वारा कालपट पर अपनी मुद्रा अंकित करनेवाले आचार्य। * मराठी नाट्यसंगीत को नवसंजीवन देकर मराठी नाट्यसंगीत में युगांतर लानेवाले संगीतकार। * शील, शालीनता, सद्भाव तथा अपरिग्रह से मंडित अध्यात्मप्रवण व्यक्तित्व। * मात्र ५२ वर्ष की आयु में ही अपने अभूतपूर्व कर्तृत्व से अद्यावधि कीर्तिमान कलाकार। * स्वरों की जीवंतता, रागों का सच्चा रूप और ताल-लय का लालित्य जिनके गायन में मुखर हो उठता था ऐसे श्रेष्ठ गानपंडित। * ‘देवगंधर्व’ जीवन गाथा में उपर्युक्त समूचे पहलू औपन्यासिक ललित शेली में रसरंजक बनते हुए रेखांकित हुए हैं।
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDevagandharva (Hindi) | देवगंधर्व (हिंदी)
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartभास्कररावांच्या ऐन उमेदीत, निरनिराळ्या प्रसिध्द घराण्यातील अनेक गवई उत्तरेकडून दक्षिणेस आले होते. त्या प्रत्येकामध्ये काही विशेष गुण होते यात संशय नाही. कोणामध्ये तानेची, कल्पनातीत तयारी, कोणामध्ये गळ्याची मनस्वी माधुरी, कोणामध्ये आलापाचे सौंदर्य, तर कोणामध्ये तालाचा अजस्त्र खटाटोप दिसून येई. परंतु स्वराचा जिवंतपणा, रागाचा सच्चेपणा व तालाचे लालित्य हे तिन्ही गुण सारख्या उत्कर्षाला पोहोचलेले गुरूवर्य भास्कररावांप्रमाणे क्वचित् कोणा गायकाच्या अंगी दिसून येत असत. सबंध शतकात असा एकच पुरूष निर्माण होतो, असे त्यांच्याविषयी कोणाही म्हणावे एवढी त्यांची थोरवी होती. गोविंदराव टेंबे पंजाबात अजूनही ऐकायला मिळतं की, भास्करबुवांचं गाणं झालं की असं वाटायचं की, दुसरं गाणं ऐकू नये, हेच ऐकावं. हे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटण्यासारखं आहे.... त्यांनी रंगभूमीच्या माध्यामातून शास्त्रोक्त संगीताचा खूप प्रचार केला. अजूनही पुष्कळ लोकांना यमन राग ओळखता येत नाही. पण यमन म्हटलं की हे नाथ हा माझा सारखं आहे, हे त्यांना ओळखता येतं. पं.भीमसेन जोशी अशी ही देवगंधर्वांची चरित्र मैफल.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDevgandharva | देवगंधर्व
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartस्वप्नं पाहायला कुणी शिकवावं लागत नाही. तरुणाई स्वप्नाळू असतेच मुळी. पण स्वप्नं सहजासहजी साकार होत नाहीत. ती कठोर परीक्षा घेतात आणि कोणतीही दयामाया न दाखवता अनेकांना अपयशाचे रट्टे देतात. साहजिकच पदरी निराशा येते. पुढची वाट दिसेनाशी होते. काय करावं, कुठे जावं... काही कळत नाही. मार्गदर्शक मित्र भेटत नाही... अशा असंख्य तरुणांना थोरल्या भावाच्या नात्यानं धीर देणा-या, उठून उभं राहण्यासाठी हात देणा-या आणि स्वप्नं साकार करण्यासाठी नेमकी कोणती साधना कशी नि केव्हा करायची, हेही समजावून सांगणा-या एका तरुणाचं हे बावनकशी लखलखतं आत्मकथन... एकेकाळी रस्त्यावरचं शेण वेचून गोवऱ्या रचणारा तो गरीब ग्रामीण युवक आज एक यशस्वी उच्चपदस्थ सनदी अधिकारी आहे. पण स्वत:च्या यशाच्या धुंदीत तो बांधवांना विसरलेला नाही. भेटतील त्या सा-यांना प्रेरणेचे दिवे आंदण देत तो सांगतोय - नवं ताजं अनुभवामृत. आजच्या अन् उद्याच्या तरुणाईसाठी... '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेDhadpadnarya Tarunaisathi | धडपडणा-या तरुणाईसाठी
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartत्याच्याजवळ ना पैसा होता, ना कुणाचे पाठबळ. हातावरचे पोट असलेले आईवडील अन् गरिबीच्या उन्हात उभे राहिलेले घर. पण तो फक्त नावापुरता 'ज्ञानेश्वर' नव्हता. आपल्या बुद्धिमत्तेला त्याने चिकाटीची धार चढवली. विलक्षण जिद्द अन् अभ्यासाच्या सातत्यातून तो प्रख्यात शल्यविशारद झाला. हा अवघड वळणाचा प्रवास सांगणारी एका समर्पित सर्जनची संघर्षकहाणी...
All BooksDhulakshare Te Shalyakaushalya | धुळाक्षरे ते शल्यकौशल्य
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart
Skip to content
