चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
Sale! Add to cartप्रा. स. ह. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सरत असताना त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह ऐवज विचारांचा' प्रकाशित होत आहे. प्राध्यापक देशपांडे यांनी पाच दशकांहूनही अधिक काळ विपुल लेखन केले व महाराष्ट्राच्या विचार-विश्वावर स्वत:चा एक विशिष्ट ठसा उमटवला. राष्ट्रवाद' या विषयाचे त्यांचे लिखाण हे अनेक मान्यवरांकडून व व्यासपीठांवरून चर्चिले गेले. प्रस्तुत पुस्तकात स.हं.च्या लेखांची विभागणी राष्ट्रवाद', सामाजिक आणि आर्थिक', व्यक्तिचित्रे' आणि संकीर्ण' या चार प्रकारांत केली आहे. या सर्व लेखांतून श्री. देशपांडे यांची स्वतंत्र लेखन-शैली, विचारांतील सखोलता व सूक्ष्मता, तसेच तर्कशुद्ध व चिरेबंद मांडणी या बाबी वाचकाला सातत्याने जाणवत राहतील. आजही ताजे वाटणारे त्यांचे विचारगर्भ लेखन पुढील पिढ्यांनाही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो.
All BooksAiwaj Vicharancha | ऐवज विचारांचा
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreबेरडांनी चोरी करावी प्रतिष्ठितांची चाकरी करावी. पोलिसांच्या लाथा खाव्यात. हेच त्यांचे जीवन लाचार दरिद्री ! देवीला सोडलं म्हणून या देवदासी-वेश्या. पण त्यांच्यामुळेच समाजातील अनेकींचे पतिव्रतापण शावूत राहते. उपेक्षित बेरड समाज आणि देवदासींच्या व्यथा वेशीवर टांगणा-या जागत्या चळवळीची सत्यकथा.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAkrosh | आक्रोश
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Read more -
Sale! Add to cartवि. ग. कानिटकर ख्यातनाम मराठी साहित्यिक, व्यासंगी वाचक, जागतिक राजकारणाचे अभ्यासक, बदलत्या समाजकारणाचे भाष्यकार, संतसाहित्याचे आस्वादक, कादंबरीकार, कथाकार, विनोदी, मार्मिक सदरलेखक. त्यांच्या अर्धशतकी साहित्यिक कारकिर्दीमधले हे काही महत्त्वाचे टप्पे. साक्षेपाने निवडलेले, संदर्भासह मांडलेले. लेखक काळाच्या पडद्याआड जातात. खूप सारं लेखन मागे ठेवून जातात. त्यांच्या पुनर्भेटीचा आनंद आणि त्यांच्या काळाचा पुनःप्रत्यय घेण्यासाठी अशा अक्षरछायेत काही काळ विसावायला हवंच
All BooksAksharchhaya | अक्षरछाया
₹750.00Original price was: ₹750.00.₹563.00Current price is: ₹563.00. Save ₹187 Add to cart -
Sale! Add to cartही आमची, तुमची, आपल्या सर्वांची कहाणी आहे. आपण आपल्या भूमिका, आपले व्यवसाय, आपल्या विचारसरणी वेगळ्या असू शकतील, पण एक समाज म्हणून आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा आपल्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट, सकारात्मक आणि नकारात्मक कामाचा परिणाम संपूर्ण समाजावर होत असतो. त्यामुळे आपली कहाणी ही जेवढी आपली असते, तेवढी सगळ्या समाजाचीही असते.. मग ती छोटीशी, बिनमहत्त्वाची, किरकोळ असेल किंवा मोठी, महत्त्वपूर्ण अन् थोर असेल; पण ती समाजाच्या रचनेवर आणि धारणेवर कुठे ना कुठे परिणाम करत असते, हे मात्र नक्की ! विशिष्ट मूल्यं उराशी कवटाळून चालणाऱ्या एका सनदी अधिकाऱ्याची आणि त्याच्या कुटुंबाची वाटचाल. ही वाटचाल बाहेरून जेवढी चमकदार, ग्लॅमरस तेवढीच ती ठेचकाळवून पायांना आणि मनांना जखमी करणारीही. या वाटचालीची कहाणी म्हणजेच आमची कहाणी..आमची कहाणी...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAmchi Kahani..Aapli Kahani | आमची कहाणी..आपली कहाणी
₹170.00Original price was: ₹170.00.₹128.00Current price is: ₹128.00. Save ₹42 Add to cart -
Sale! Add to cartपत्नीला केंद्रस्थानी ठेवून एका पुरुषाने लिहिलेले हे आत्मचरित्र पुरुषोत्तम बाळकृष्ण काळे जुन्या जमान्यातले उद्योगपती. १९१६ मध्ये झालेल्या प्रेमविवाहाच्या सहजीवनाची ही हकिगत. पतीच्या प्रेरणेने अनसूयाबाई सार्वजनिक जीवनात उतरल्या. त्या जुन्या मध्यप्रांतात कायदे मंडळाच्या सदस्य. अन स्वतंत्र भारतात लोकसभेच्या सदस्य झाल्या. संघर्षमय तरीही विश्वासाचे, असे त्यांचे आगळेवेगळे सहजीवन चित्रित करणारे पुस्तक !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAnasuyabai Ani Mi | अनसूयाबाई आणि मी
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart'गुणगुणणारे छोटे छोटे कीटक असोत वा रंगबिरंगी पक्ष्यांचे थवे, समुद्राचे गहिरे तरंग असोत वा आकाशाची मुग्ध निळाई, निसर्गाच्या सा-याच रूपांवर रेचेलनं मनापासून प्रेम केलं... आणि म्हणूनच मानवानं केलेला कीटकनाशकांचा मनमानी वापर तिला सहन झाला नाही. निसर्गाचं प्रेम, ध्यास अन् रेचेलची तळमळ, अभ्यास याची परिणीती म्हणजेच सायलंट स्प्रिंग हे केवळ पुस्तक नव्हतं, तो होता पर्यावरणासाठीचा लढा. त्यानंच जन्म दिला, जागतिक पर्यावरण चळवळीला. सा-यांना पर्यावरणासंदर्भात खडबडून जागं करणा-या रेचेलची ही चरितकहाणी...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAni Vasant Punha Baharala | आणि वसंत पुन्हा बहरला
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Add to cart -
Sale! Add to cartअण्णा भाऊ साठे... गरीब, दलित, शोषित, या सर्वांच्या वेदनेचा उद्गार अन् पिळवणूक झालेल्या स्त्रियांच्या आक्रोशाचा हुंकार... आयुष्यभर काटे-निखारे तुडवत वंचितांच्या जागृतीची मशाल चेतवणारे खंदे लेखक... मायमराठीसाठी डफावर थाप मारून संयुक्त महाराष्ट्राची रणलावणी गात दिल्लीपर्यंत धडक मारणारे शाहीर... डॉ. होमी भाभा, नर्गिस, बलराज सहानी, शैलेंद्र, आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे अशा राष्ट्रीय दिग्गजांना प्रभावित करणारे कलावंत... अण्णा भाऊंच्या कार्यकर्तृत्वाच्या दशदिशा धुंडाळून, दुर्मीळ कागदपत्रं शोधून, अण्णांचं जीवन व साहित्य समृद्ध करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा खास शोध घेऊन; कादंबरीकार विश्वास पाटील यांनी लिहिलेली वाङ्मयीन चरित्रगाथा अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAnna Bhaunchi Dardbhari Dastaan | अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान
₹480.00Original price was: ₹480.00.₹360.00Current price is: ₹360.00. Save ₹120 Add to cart -
Sale! Add to cartआई-वडील, सगेसोयरे, आप्तेष्ट अन् मित्रमंडळी, काही निव्वळ दृष्टिभेटीचे, हाय हॅलो वाले - किती किती लोक भेटतात आपल्याला रोज. पण त्यातल्या किती जणांना आपण ओळखतो? खरोखर? थोडेफार तरी? तशी ओळख पटायची असेल, तर पाहणाऱ्याजवळ हवी पारखी नजर, संवेदनशीलता, प्रगल्भता आणि सहृदयता. या गोष्टी केवळ चर्मचक्षूंनी नाही साधत. भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव' अशा कोवळिकीने आपल्या सुहृदांची शब्दचित्रे रेखाटण्यासाठी लेखणीला लाभावे लागतात...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAntashchakshu | अंतचक्षु
₹260.00Original price was: ₹260.00.₹195.00Current price is: ₹195.00. Save ₹65 Add to cart -
Sale! Add to cart'जलपरीच्या राज्यातच शोभावं, असं प्रवेशद्वार ! चर्चमधील वास्तुरचनेतून फुललेलं वसंतवैभव ! प्रकाशाची फुले उधळणारे रस्त्यावरचे कलात्मक दिवे अनेक रंगांतून नटणाऱ्या निसर्गाला वास्तुशिल्पात अंकित करणारा अंतोनी गौडी. पंख उभारलेला राजहंसच - असा आर्ट म्युझियमचा डौल ! ऑपेरा हाऊस म्हणजे जणू सामुराई योद्धा ! परग्रहावरलं यान वाटावं, असं सायन्स सेंटर ! आधुनिकतेचा कलात्मक गोफ विणणारा कल्पक रचनाकार सँटियागो कॅलट्राव्हा. दोघात अंतर शतकाचं, पण दोघंही स्पेनमधले. दोघंही स्थापत्यातले महाकवी. वास्तू, अवकाश, निसर्ग, भवताल आणि मानवी जीवन यांच्या गुंफणीतून अजरामर कलाकृती साकारणा-या या प्रतिभावान वास्तुरचनाकारांचा सचित्र, मनोवेधक कार्यालेख - श्रीनिवास नी. माटे या विख्यात आणि रसिक वास्तुरचनाकाराच्या शैलीदार लेखणीतून... अंतोनी गौडी आणि सँटियागो कॅलट्राव्हा '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAntoni Gaudi Ani Santiyago Caltrava | अंतोनी गौडी आणि सँटियागो कॅलट्राव्हा
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart'समलैंगिकता ही माझी अगदी व्यक्तिगत, वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षापासून प्रत्येक क्षणी अनुभवलेली जाणीव. तिला समाजमान्यता नसल्याने, तिची सतत विचित्र म्हणून हेटाळणी होत असल्याने ती अनुभवताना अनेक विचारचक्रे माझ्या डोक्यात कायम चालू असायचाr, अजूनही असतात. माझे हे अनुभव आणि त्यावरचे विचारमंथन कधी मला खूप समृध्द करून गेले, तर कधी पराकोटीचे अस्वस्थ ! 'समाजमान्यता हा शिक्का बरेचदा निष्ठूर, दुराग्रही आणि अज्ञानमूलक असतो हे अनुभवून झाले़. मी समलैंगिक आहे हे सांगण्याचा निर्णय अंमलात आणायला पंचवीस वर्षे लागली आणि त्यातून साकार झाले आपुले आपण '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेApule Apan | आपुले आपण
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart
Skip to content