चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreअंधत्वाची प्रमुख कारणं समजली. अनेकदा अंधत्वापासून व्यक्तीला वाचवता येत नाही, ही असहायता जाणवली. समाजात जागृती झाली तर अंधत्वाचा वारसा देण्याच्या चुकीपासून समाजाला सावरता येईल, हेही उमगलं. अंधश्रद्धा आणि अंधविश्वास यांपासून अंध व्यक्तींना मुक्त करून त्यांना मानवाधिकार मिळवून द्यायचा निश्चय केला. या ‘निवांत’च्या व माझ्या धर्माच्या लेकी आहेत. आईचं मुलांच्या हक्कांसाठी लढण्याचं बळ अपार असतं - मी त्याला अपवाद नाही. या काही प्रातिनिधिक कथा आहेत. या कथा वाचून आपण एखाद्या अंध लेकराला शिक्षणाच्या प्रवाहात आणू शकलात, तर तेच या पुस्तकाचं खर्याा अर्थानं यश असेल. आपली मीरा आई
All BooksTya Vishesh Drushtichya | त्या विशेष दृष्टीच्या
₹650.00Original price was: ₹650.00.₹488.00Current price is: ₹488.00. Save ₹162 Read more -
Sale! Add to cart'स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व करणारी आणि स्वतंत्र भारताचा पाया घालणारी माणसे कर्तृत्वाने जशी मोठी होती, तशी ती मनानेही मोठी होती. त्यांच्यात मतभेद असणे स्वाभाविक होते; पण आपले मतभेद बाजूला सारून देशहितासाठी एकमनाने काम करावे लागेल, याचेही त्यांना भान होते. काळ जसा समजून घ्यावा लागतो, तसेच त्या काळाला कलाटणी देणारी सामर्थ्यशाली माणसेही समजून घ्यावी लागतात. ही एक बौद्धिक आनंद देणारी प्रक्रिया आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेTyanna Samajun Ghetana | त्यांना समजून घेताना
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'गवंडीकाम करणा-या गृहस्थाची ती मुलगी. सुदृढ, हसरी, खेळकर! हौशीनं शाळेत जाणारी ! दोनदा दहावी अनुत्तीर्ण झाली, तसं घरच्यांनी लग्न उरकलं. काहीच न कमावणारा एडसग्रस्थ नवरा. धाकात ठेवणारं सासर. पाच वर्षांत नव-याचा मृत्यू. हिला एडसची बाधा झालेली आणि पदरात छोटा मुलगा. मग डॉक्टर ... समुपदेशक...! सगळीकडे अंधारच ! मृत्यूच्या कल्पनेनं हादरली. पार खचली. पण भेट झाली अँडव्होकेट रामचंद्र परदेशी यांची. त्यांनी दाखविलेल्या पणतीच्या मिणमिणत्या प्रकाशात ही धीरानं पुढे झाली. शिक्षण घेतलं. नोकरी मिळवली. पाय घट्ट रोवून उभी राहिली. इतरांना पणतीचा प्रकाश दाखवू लागली. या पुस्तकात ती सांगते आहे, तिचं हे अवघं ३५ वर्षांचं आयुष्य...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेUbhi Rahilech | उभी राहिलेच
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Read more -
Sale! Add to cartसाहित्यापासून संगीतापर्यंत, छायाचित्रणापासून अभिनयदर्शनापर्यंत, समाजकारणापासून राजकारणापर्यंत, कलाक्षेत्रापासून क्रीडांगणापर्यंत, इतिहाससंशोधनापासून भविष्यवेधापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये अजोड कर्तृत्व गाजवलेल्या नामवंतांना आपल्या भेटीला घेऊन येत आहेत सुप्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ. या नामवंतांशी भरभरून मारलेल्या गप्पांमधून उलगडत जाणारं त्यांचं जीवन अन् कार्य म्हणजे उत्तुंग भाग १ व २
All BooksUttunga : Part 1 | उत्तुंग भाग १
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart‘काळ्यानिळ्या रेषा' हे केवळ एका चित्रकाराचे आत्मकथन नाही, तर हा समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार आहे. राजू बाविस्करांनी आधी आपल्या अभिव्यक्तीसाठी रेषा वापरली, रंग वापरले आणि आता आपल्या अनुभवांना शब्दांमधून वाट करून दिली आहे. आपल्या वाट्याला आलेले गावकुसाबाहेरचे उपेक्षेचे जगणे आणि झगडणे समंजसपणे उलगडत ते वाचकांना आपल्या चित्रांच्या दुखऱ्या मुळांपर्यंत घेऊन जातात. एका सर्जनाची मुळे दुसऱ्या माध्यमातील सर्जनप्रक्रियेत गवसणे हा अत्यंत विरळा असा अनुभव त्यांना आला. व्यक्तिचित्रणाच्या अंगाने जाणाऱ्या या आत्मकथनातून आपल्यालाही त्यामुळे अंतर्मुख करणारा अस्सल वाचनानुभव मिळतो. प्रफुल्ल शिलेदार
All BooksUttunga : Part 2 | उत्तुंग भाग २
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartप्रिं. वासुदेवराव पटवर्धन यांच्या निधनाने जशी महाराष्ट्र-वाड्.मयाची, तशीच मनोरंजना चीही मोठी हानी झाली आहे. मनोरंजना च्या लेखक-वर्गापैकी ते एक होते, एवढेच नव्हे, तर त्याला लेखनसहाय्य करावयाला ते नेहमी तयार असत. मनोरंजना वर त्यांचे फार प्रेम होते, व प. वा. काशीनाथपंत मित्र यांच्या निधनानंतर पाठविलेल्या सहानुभूतीच्या पत्रात त्यांनी मनोरंजन संस्था नेटाने चालविण्याविषयी कळकळीचे प्रोत्साहन देऊन, या कामी शक्य ती मदत करण्यास आपण तयार आहो, असे अभिवचन दिले होते. मनोरंजना त त्यांचे लहान-मोठे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. सारेच विलक्षण ही कादंबरी त्यांनी मनोरंजना करिताच लिहावयास घेतली होती. वाचकांस त्या कादंबरीने चटका लावला होता. ती संपूर्ण झाली असती, तर मराठीत एका उत्तम कादंबरीची भर पडली असती. फर्ग्युसन कॉलेजच्या मंडळीने त्यांचे स्मारक करण्याचे योजिले आहे. त्यांच्या योजनेस लवकरच मूर्त स्वरूप प्राप्त होवो, असे आम्ही इच्छितो. पटवर्धनांच्या सर्व लहान-मोठ्या लेखांचा व कवितांचा संग्रह त्यांच्या विस्तृत चरित्रासह प्रसिद्ध झाल्यास, महाराष्ट्र ग्रंथभांडारातील ते एक बहुमोल रत्न होईल. वासुदेवरावांचा साधा, प्रेमळ व विनोदी स्वभाव, त्यांच्याशी ज्यांचा ज्यांचा परिचय झाला, त्यांच्या आठवणीतून कधी जाणार नाही. नेहमी विनोदपूर्ण भाषणाची त-हा, हसतमुख चेहरा, व जग हे एक प्रचंड काव्य आहे, म्हणूनच ते आनंदाचे वसतिस्थान होय, ही दृढ भावना त्यांच्या मनात बाणल्यामुळे त्यांच्या विनोदी स्वभावात कधीही बदल झाला नाही. आपल्या कर्तव्यात कधी त्यांनी खंडही पडू दिला नाही. अर्थातच सुख काय किंवा दु:ख काय, त्यांच्या बाबतीत समान ठरून गेले होते. अशा त-हेने पवित्र कर्तव्य बजावीत असता त्यांना मृत्यूने गाठले. त्यांच्या वियोगाने महाराष्ट्रातील एक उत्तम टीकाकार नाहीसा झाला. त्यांच्या मृत्यूने डे.ए.सोसायटीची अपरिमित हानी झाली आहे. एवढेच नव्हे तर, सर्व महाराष्ट्राची हानी झाली आहे, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. त्यांच्या संगतीत विद्यानंदाचा थोडाबहुत अनुभव जो काही माझ्या वाट्याला आला, त्याबद्दल कृतज्ञतापूर्वक व मन:पूर्वक त्यांच्या जीवात्म्यास हे स्मृतिलेखरूप पुष्प अर्पण करतो. ( मासिक मनोरंजन (इ.स.१८९५-१९३५) या तत्कालीन अग्रगण्य मासिकात वासुदेव बळवंत पटवर्धन यांना संपादकांनी वाहिलेली श्रद्धांजली)
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेVasudev Balwant Patwardhan | वासुदेव बळवंत पटवर्धन
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' ही अठरा अक्षरे म्हणजे राष्ट्रभक्तीची अठरा अध्यायांची गीताच ! अटलबिहारी वाजपेयींच्या शब्दांत : सावरकर म्हणजे तेज ! सावरकर म्हणजे त्याग ! सावरकर म्हणजे तप ! सावरकर म्हणजे तत्त्व ! सावरकर म्हणजे तर्क ! सावरकर म्हणजे तळमळ ! सावरकर म्हणजे कविता अन् सावरकर म्हणजे क्रांती !' सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक दुर्लक्षित पैलू विश्वासार्ह कागदपत्रांच्या साहाय्याने उजेडात आणणारा आणि सावरकरांवरील अनेक टीकांचे सज्जड प्रमाणांच्या आधारे निराकरण करणारा मौलिक दस्तऐवज. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला मारिल रिपु जगिंत असा कवण जन्मला
All BooksVeer Savarkar : Phalani Rokhnyachi Kshmata Aslela Mahapurush | वीर सावरकर
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cart'चंदनाची चोरी अन् हस्तिदंताची तस्करी. एकशे चोवीस जणांच्या पाशवी हत्या. अनेक धाडसी अपहरणं. तीन राज्यांच्या पोलीसदलांना सतत वीस वर्षं दिलेली झुकांडी. अशी कैक भीषण कृत्यं खात्यावर असणाऱ्या क्रुरकर्म्याचा चिकाटीनं पाठलाग करून अखेर त्याला यमसदनाला धाडणाऱ्या के. विजय कुमार या आयपीएस अधिकाऱ्यानं सांगितलेली सत्यकथा. कल्पनेहूनही भयंकर अन् रहस्यपटाहूनही थरारक असं खिळवून ठेवणारं वास्तव ! वीरप्पन विरुद्ध विजय कुमार '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेVeerappan Viruddha Vijay Kumar | वीरप्पन विरुद्ध विजय कुमार
₹380.00Original price was: ₹380.00.₹285.00Current price is: ₹285.00. Save ₹95 Add to cart
Skip to content