चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमिकी माउस, डॉनल्ड डक या आणि अशाच इतरही असंख्य पात्रांची निर्मिती करून जगभरातल्या आबालवृद्धांना कल्पनारम्य जगातली सुहानी सफर घडवून आणणा-या एका अफलातून माणसाची निखळ चरित्रकथा.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेWalt Disnye | वॉल्ट डिस्ने
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Read more -
Sale! Add to cartश्री. एन. बी. धुमाळ यांचे यशस्वितेचा सुवर्णमंत्र हे पुस्तक वाचून मनस्वी आनंद झाला. श्री. धुमाळ यांची कौटुंबिक पाश्र्वभूमी ही शेतकरी, वारकरी अशा स्वरूपाची. मात्र त्यांच्या यशोगाथेचा प्रवास थक्क करून सोडणारा वाटला. पुस्तकातील भाषा अतिशय ओघवती असून त्यामध्ये भावना आणि आशय यांचा सुंदर मिलाफ दिसतो. स्टेट बँकेची नोकरी सोडून एक मोठे स्वप्न घेऊन जगणारा व यशोशिखराकडे जाण्यासाठी धडपडणारा तरुण उद्योजक या पुस्तकातून वाचावयास मिळाला. या पुस्तकातून स्वानुभवावर आधारित सांगितलेल्या यशस्वितेच्या गोष्टी आजच्या तरुणाईसाठी उद्योगाची नवनवीन क्षितिजे निर्माण करतील, असा मला विश्वास वाटतो. पद्मभूषण डॉ. विजय भटकर - यशस्वितेचा सुवर्णमंत्र हे पुस्तक म्हणजे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी कसे व्हावे, याचा सोन्यासारखाच मंत्र श्री. एन. बी. धुमाळ यांनी तरुणांना दिला आहे. आधी केले, मग सांगितले , या उक्तीप्रमाणे वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत सात किलोमीटरच्या परिघाबाहेर न पडलेल्या पण उच्च महत्त्वाकांक्षा, सातत्य व अफाट कष्टाने स्वत: समृद्ध होऊन हजारोंना समृद्ध करणारे श्री. धुमाळ आतापर्यंत अर्धे जग फिरून आले. स्वत: यशस्वी उद्योजक बनून इतरांना उद्योजक करणारे श्री. धुमाळ यांचा जीवनपट एखाद्या सिनेमासारखा स्वप्नवत वाटतो. व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रांत मोठे यश मिळूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत, ही त्यांच्यावर झालेल्या संस्कारांची किमया आहे. यशस्वी जीवनासाठी लागणाऱ्या अनेक क्लृप्त्या त्यांनी या पुस्तकात सांगितल्या आहेत. त्यांचा ज्ञानदानाचा व अन्नछत्राच्या माध्यमातून अन्नदानाचा वसा एक आदर्शवत आहे. एकविसाव्या शतकात शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग- व्यवसाय कसा करावा, याचा यशोमार्गच त्यांनी या पुस्तकातून दाखवला आहे. हे पुस्तक वाचून त्यांनी सांगितल्याप्रमाणे मार्गक्रमण केल्यास अनेक उद्योजक घडतील, असा मला विश्वास वाटतो व हीच काळाची गरज आहे. त्यांच्या या यशस्वितेच्या सुवर्णमंत्रास माझ्या हार्दिक शुभेच्छा ! पद्मश्री पोपटराव पवार
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेYashasvitecha Suvarnamantra | यशस्वितेचा सुवर्णमंत्र
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'सरदार कुलवंतसिंग कोहली. मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अन् राजकीय क्षेत्रांत मोलाचं योगदान दिलेलं हे व्यक्तिमत्त्व. योगायोगानं मुंबईच्या मोहक मयसभेशी - चित्रपटसृष्टीशी कुलवंतजींचा घनिष्ठ संबंध आला. कपूर कुटुंब, दिलीपकुमार - राजेंद्रकुमार - धर्मेंद्रपासून राजकुमार - संजीवकुमार - जितेंद्रपर्यंतचे नायक, मीनाकुमारी - मधुबालापासून माला सिन्हापर्यंतच्या नायिका, व्ही. शांताराम - असीफ - मेहबूबसारखे दिग्दर्शक, नौशादपासून रवीपर्यंतचे संगीतकार, प्राणसारखे दिलेर खलनायक - किती किती नावं सांगायची ? अशा दिग्गज कलाकारांबरोबर कुलवंतजींच्या तारा जुळल्या. सामान्य माणसासाठी आकाशीची नक्षत्रं असणारे हे चित्रपटसृष्टीतील तारे-तारका कुलवंतजींना हाडामांसाची माणसं म्हणून न्याहाळता आली. अटलबिहारी वाजपेयी - बाळासाहेब ठाकरे - सुशीलकुमार शिंदे किंवा प्रमोद महाजन - झैलसिंग - बुटासिंग यांच्यासारखे राजकारणीदेखील या चित्राची चौकट बनून भेटतात. ही सारी माणसं अन् त्यांच्याबरोबर जगलेला अवघा काळ कुलवंतसिंग यांनी आपल्यापुढे जिवंत केला आहे ! '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेYe Hai Mumbai Meri Jaan | ये है मुंबई मेरी जान
₹380.00Original price was: ₹380.00.₹285.00Current price is: ₹285.00. Save ₹95 Read more -
Sale! Add to cartस्वामी विवेकानंद - एक झंझावात त्यांच्या सव्यासाची व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू. हिंदू रूढी व अंधविश्वासांवर त्यांनी केलेले प्रहार. धर्म, विज्ञान, संगीत, इतिहास अशा अनेक विषयांवरील स्वामीजींचे प्रभुत्व. या सा-याचे रसरशीत, जोशपूर्ण दर्शन घडविणारे चरित्र.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेYoddha Sanyasi | योध्दा संन्यासी
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartदेशाला गौरव मिळवून देणारा खेळाडू असो वा विरोधी पक्षनेता, तुटक वृत्तीचा शेजारी असो वा धडधडत्या मनानं मुलाखत घेणारा पत्रकार-वेगवेगळ्या निमित्तांनी नेल्सन मंडेलांशी थेट संर्पकात आलेल्या सर्वांचा अनुभव एकच- मंडेलांच्या नेतृत्वाला शब्दांपलीकडच्या महानतेचं कोंदण आहे ! भेटणा-या प्रत्येकाचं मन निखळ, निर्व्याज वृत्तीनं जिंकणं आणि अनायासच त्याला जन्मभर पुरणा-या स्फूर्तीनं भारून टाकणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं सहजसुंदर वैशिष्टय! मंडेलांचे स्वभावगुण आणि त्यांच्या बावनकशी नेतृत्वशैलीतून खूप काही शिकण्यासारखं आहे, यांत्रिकपणे जगताना माणूसपणाचा विसर पडलेल्या तुम्हा-आम्हा सर्वांना सहजगत्या जागं करणारं हे पुस्तक ज्याला कुठल्याही क्षेत्रात अनुयायांचं परिवर्तन मनुष्य बळात करायचं आहे अशा नेत्याला मार्ग दाखवणारं आहे. आदर्श नेतेपणाचं मूर्तिमंत उदाहरण असलेल्या नेल्सन मंडेलांचे गुण असामान्य असूनही अनुकरणीयतेच्या कक्षांपलीकडचे नाहीत. माणूस म्हणून अंगी असलेल्या गुणांनीच मंडेलांना जागतिक पातळीवरच्या नेतृत्वात सर्वोच्च स्थान कसं मिळवून दिलं आहे हे विविधांगानं दाखवून देणा-या या गोष्टी मनाला नक्कीच भावणा-या आहेत. प्रथमदर्शनी साध्या-सरळ वाटणा-या या गोष्टींमध्ये लहानथोर वाचकांना उदात्ततेकडे नेण्याची अमोघ शक्ति आहे. यू.आर. अनंतमूर्ति
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेYugpurushi Netrutva : Nelsan Mandela | युगपुरुषी नेतृत्व : नेल्सन मंडेला
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartफाळणीच्या वणव्यात होरपळलेलं एक निराधार सिंधी कुटुंब. त्या कुटुंबातला कोवळ्या वयाचा एक किशोर समुद्रापार सफरीवर निघाला - दुबई नावाच्या दूरदेशी. त्यानं हाल सोसले, कष्ट उपसले, व्यावसायिक जोखिमा पत्करल्या. आणि स्वत:चं समृद्ध उद्योगविश्व उभारलं. जिद्द, चिकाटी, उद्योगधंद्यानंमधलं चातुर्य अन् वागण्या-बोलण्यातलं माधुर्य यांचं जणू बाळकडूच प्यालेल्या सिंधी समाजाच्या अन् सिंधी व्यक्तिमत्त्वाच्या बहुविध पैलूंचं दर्शन घडवणारी आत्मकथा.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेZhep Ghe … | झेप घे…
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartएक सिद्धहस्त अभिनेत्रीचा सफरनामा... एका प्रतिभासंपन्न दिग्दर्शिकेचा बहुआयामी आत्मशोध ! मराठी रंगभूमीला नवतेचं भान मिळालं, अनेक नवे नाटककार / कलावंत घडले, मराठी नाटकाच्या कक्षा विस्तारल्या; हे सारं घडलं, ते बाईंमुळे. वाचकाला विश्र्वासात घेऊन बाई सांगताहेत गोष्ट... स्वत:ची आणि मराठी रंगभूमीची, आपल्या दिलखुलास, प्रसन्न शैलीत. आठवणींच्या धाग्यांचं हे मुलायम विणकाम वाचकांना बांधून ठेवेल हे नि:संशय !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेZimma: Athvanincha Gof | झिम्मा : आठवणींचा गोफ
₹650.00Original price was: ₹650.00.₹488.00Current price is: ₹488.00. Save ₹162 Add to cart
Skip to content