-
Sale! Add to cartजीवनातले सत्य अन् मिथ्य, सौंदर्य अन् कुरूपता, शाश्वतता अन् क्षणभंगुरता, निष्ठा अन् द्रोह, प्रेम अन् वैर, विचार, विकार, वासना,कल्पना अन् भावना या साऱ्यांचे आपल्या प्रतिभेच्या मुशीतून त्याने अद्भुत रसायन बनवले आणि निर्माण केली एक विस्मयचकित करणारी प्रतिसृष्टी. जगभरातल्या अनेक प्रज्ञावंतांना, कलावंतांना, साहित्यिकांना, रंगकर्मींना, समीक्षकांना अन् विचक्षक वाचक-प्रेक्षकांना चार शतकांहून अधिक काळ त्याने भारून टाकले आहे आणि तरीही त्याची मोहिनी तसूभरही कमी झालेली नाही. अशा अलौकिक प्रतिभावंताच्या प्रत्यक्ष भेटीचा आनंद देणारा संग्राह्य ठेवा -
रसग्रहण / समीक्षाWilliam Shakespeare – Jeevan Ani Sahitya | विल्यम शेक्सपिअर – जीवन आणि साहित्य
₹330.00Original price was: ₹330.00.₹248.00Current price is: ₹248.00. Save ₹82 Add to cart -
Sale! Add to cartविम्बल्डन टेनिसच्या जगतातील महायोध्दयांची रणभूमी. जगज्जेतेपदासाठी त्यांची चाललेली झुंज. विम्बल्डनच्या तृणांगणावर नुसते सामने रंगत नाहीत तर एक बेभान, भन्नाट विश्वच साकारतं. त्या तृणांगणावरच्या ओलसर हिरवाईची जादू भारावून टाकते. विम्बल्डनचा रोमहर्षक इतिहास, विजेत्यांच्या हर्षखेदाचे उदयास्त सांगता सांगता लेखक तुम्हाला नकळत नेऊन सोडतो विम्बल्डनच्या सेंटर कोर्टावर. एक टवटवीत टेनिसानुभव विम्बडनच्या तृणांगणावर
क्रीडाविषयकWimbeldonchya Trunanganavar | विम्बल्डनच्या तृणांगणावर
₹40.00Original price was: ₹40.00.₹30.00Current price is: ₹30.00. Save ₹10 Add to cart -
Sale! Add to cartअभय बंग यांच्या ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ पुस्तकाने महाराष्ट्राच्या हृदयाला व जीवनशैलीला हात घातला. ‘कोवळी पानगळ’ अहवालाने महाराष्ट्राच्या सामाजिक संवेदनशीलतेला हलवले. ‘निर्माण’ या उपक्रमाने युवा पिढीसमोर नवी क्षितिजे उभी केली. आता ते महाराष्ट्राशी संवाद करत आहेत, एका खास प्रश्नावर. या जीवनाचे काय करू? माणसासमोर उभा असलेला एक सनातन प्रश्न! आपल्या जन्मासोबतच हा प्रश्नही जन्माला येतो. त्याचे उत्तर शोधल्याशिवाय समाधान नाही!! ...पण हा शोध सोपाही नाही. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात मदत व्हावी, या हेतूने घेऊन येत आहोत... अभय बंग यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या लेखांचा व दिलेल्या भाषणांचा निवडक संग्रह. या जीवनाचे काय करू? ...आणि निवडक
All BooksYa Jeevanache Kay Karu?…Aani Nivadak | या जीवनाचे काय करू?… आणि निवडक
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cart'मराठ्यांच्या इतिहासात युगप्रवर्तक शिवछत्रपतींचा खराखुरा वारसदार शोभणारा अजिंक्य रणधुरंधर म्हणजे दुसरा पेशवा थोरला बाजीराव. ऐन विशीच्या उंबरठ्यावर वडलांच्या मृत्यूमुळे पेशवेपदाची जबाबदारी त्याच्या अंगावर येऊन पडली. त्याच्या क्षमतेबद्दल शंका बाळगणाऱ्या अनेक ज्येष्ठ सरदारांच्या मनांतली असूया आणि द्वेष दूर सारण्यासाठी हवे होते ते लक्षणीय यश बाजीरावाने अवघ्या चार वर्षांतच मिळवले. मराठा सैन्याजवळ प्रचंड तोफखाना नव्हता. तथापि ती उणीव खिजगणतीतही न घेता त्याने वेगवान घोडदळ कल्पकतेने वापरले. रणांगणाची नेमकी निवड करण्यात, भौगोलिक वैशिष्ट्यांचा लष्करी फायदा उठवण्यात आणि कमीत कमी शक्ती वापरून शत्रूला शरण आणण्यात तो कमालीचा यशस्वी होत गेला. ज्याच्या अश्वारोही युद्धनेतृत्वाची फील्डमार्शल माँटगोमेरीसारख्या सुप्रसिद्ध पाश्चिमात्य सेनानीनेसुद्धा गौरवपूर्ण दखल घेतली, तो हा स्वराज्यविस्तारक अजिंक्य वीर ! बाजीरावाच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीतील विविध मोहिमांचा, त्याच्या अद्वितीय अश्वारोहणकौशल्याचा, अभिजात व्यूहरचनांचा, सरदारांपासून बारगीरांपर्यंत सर्वांनाच बरोबर घेऊन विजय खेचून आणणाऱ्या अलौकिक स्वभाववैशिष्ट्यांचा तपशीलवार वेध घेणारा हा ग्रंथ.'
इतिहासYa Sama Ha | या सम हा
₹460.00Original price was: ₹460.00.₹345.00Current price is: ₹345.00. Save ₹115 Add to cart -
Sale! Add to cartपृथ्वी हा जलग्रह खरा, पण त्याच्यावर पेय जल फार थोडे आणि मर्यादित. फुगणारी लोकसंख्या अन् विषारी प्रदूषण यांमुळे पाण्याचा तुटवडा वाढतच जाणार. भविष्यात युद्धे होतील ती पाण्यासाठी. प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वाचा, प्रत्येक जनसमूहाच्या आयुष्यक्रमाचा अन् प्रत्येक संस्कृतीच्या वाटचालीचा आधार असणा-या या पाण्याच्या विविध पैलूंचा मागोवा
पर्यावरणYala Jivan Aise Nav | याला ‘जीवन’ ऐसे नाव!
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartश्री. एन. बी. धुमाळ यांचे यशस्वितेचा सुवर्णमंत्र हे पुस्तक वाचून मनस्वी आनंद झाला. श्री. धुमाळ यांची कौटुंबिक पाश्र्वभूमी ही शेतकरी, वारकरी अशा स्वरूपाची. मात्र त्यांच्या यशोगाथेचा प्रवास थक्क करून सोडणारा वाटला. पुस्तकातील भाषा अतिशय ओघवती असून त्यामध्ये भावना आणि आशय यांचा सुंदर मिलाफ दिसतो. स्टेट बँकेची नोकरी सोडून एक मोठे स्वप्न घेऊन जगणारा व यशोशिखराकडे जाण्यासाठी धडपडणारा तरुण उद्योजक या पुस्तकातून वाचावयास मिळाला. या पुस्तकातून स्वानुभवावर आधारित सांगितलेल्या यशस्वितेच्या गोष्टी आजच्या तरुणाईसाठी उद्योगाची नवनवीन क्षितिजे निर्माण करतील, असा मला विश्वास वाटतो. पद्मभूषण डॉ. विजय भटकर - यशस्वितेचा सुवर्णमंत्र हे पुस्तक म्हणजे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी कसे व्हावे, याचा सोन्यासारखाच मंत्र श्री. एन. बी. धुमाळ यांनी तरुणांना दिला आहे. आधी केले, मग सांगितले , या उक्तीप्रमाणे वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत सात किलोमीटरच्या परिघाबाहेर न पडलेल्या पण उच्च महत्त्वाकांक्षा, सातत्य व अफाट कष्टाने स्वत: समृद्ध होऊन हजारोंना समृद्ध करणारे श्री. धुमाळ आतापर्यंत अर्धे जग फिरून आले. स्वत: यशस्वी उद्योजक बनून इतरांना उद्योजक करणारे श्री. धुमाळ यांचा जीवनपट एखाद्या सिनेमासारखा स्वप्नवत वाटतो. व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रांत मोठे यश मिळूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत, ही त्यांच्यावर झालेल्या संस्कारांची किमया आहे. यशस्वी जीवनासाठी लागणाऱ्या अनेक क्लृप्त्या त्यांनी या पुस्तकात सांगितल्या आहेत. त्यांचा ज्ञानदानाचा व अन्नछत्राच्या माध्यमातून अन्नदानाचा वसा एक आदर्शवत आहे. एकविसाव्या शतकात शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग- व्यवसाय कसा करावा, याचा यशोमार्गच त्यांनी या पुस्तकातून दाखवला आहे. हे पुस्तक वाचून त्यांनी सांगितल्याप्रमाणे मार्गक्रमण केल्यास अनेक उद्योजक घडतील, असा मला विश्वास वाटतो व हीच काळाची गरज आहे. त्यांच्या या यशस्वितेच्या सुवर्णमंत्रास माझ्या हार्दिक शुभेच्छा ! पद्मश्री पोपटराव पवार
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेYashasvitecha Suvarnamantra | यशस्वितेचा सुवर्णमंत्र
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartयशवंतराव चव्हाण खाजगी १ रेस कोर्स रोड, नवी दिल्ली ११००११ १ सप्टेंबर १९८४ प्रिय विनायकराव, यांसी स. न. वि. वि. पत्र अकारण लांबले. पण कुठे तरी मन मोकळे केले पाहिजे म्हणूनच हे सर्व लिहिले. आहे. तुम्ही कुशल असाल असा विश्वास आहे. आपला यशवंतराव चव्हाण
संवादYashodhan | यशोधन
₹75.00Original price was: ₹75.00.₹56.00Current price is: ₹56.00. Save ₹19 Add to cart -
Sale! Add to cart'...मुलांना यशवंत करण्यासाठी आपल्याला त्यांचा अभ्यासक्रम यावाच लागतो असं नाही. ...आपल्याला त्यांना अभ्यास शिकवायचा नसतो, अभ्यास करायला शिकवायचं असतं.... ..सामाजिक स्तर, सांपत्तिक स्थिती ...काहीच यशाच्या आड येत नाही. ... वालचंदनगरच्या बदललेल्या शैक्षणिक वातावरणाने १९८९ ते ९८ पर्यंत अडतीस मुलांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. झपाटलेपण हाच त्यांच्या यशाचा राजमार्ग! मार्च ९१च्या दहावी आणि बारावी परीक्षेत आनंद आणि विनया हतवळणे हे बहीण-भाऊ पहिले आहे. विनया दोन वर्षापूर्वी दहावीच्या परीक्षेतही सर्वप्रथम आलेली होती. या दोघांच्या उत्तुंग यशामागे त्यांचे, आई-वडीलांचे आणि मार्गदर्शकांचे नियोजनबध्द परिश्रम आहेत. जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांचे ते हमखास फळ आहे, ही गोष्ट त्यांचे वडील डॉ. अरुण हतवळणे यांनी या पुस्तकात उकलून दाखविली आहे.
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Yashwant Wha ! | यशवंत व्हा!
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'सरदार कुलवंतसिंग कोहली. मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अन् राजकीय क्षेत्रांत मोलाचं योगदान दिलेलं हे व्यक्तिमत्त्व. योगायोगानं मुंबईच्या मोहक मयसभेशी - चित्रपटसृष्टीशी कुलवंतजींचा घनिष्ठ संबंध आला. कपूर कुटुंब, दिलीपकुमार - राजेंद्रकुमार - धर्मेंद्रपासून राजकुमार - संजीवकुमार - जितेंद्रपर्यंतचे नायक, मीनाकुमारी - मधुबालापासून माला सिन्हापर्यंतच्या नायिका, व्ही. शांताराम - असीफ - मेहबूबसारखे दिग्दर्शक, नौशादपासून रवीपर्यंतचे संगीतकार, प्राणसारखे दिलेर खलनायक - किती किती नावं सांगायची ? अशा दिग्गज कलाकारांबरोबर कुलवंतजींच्या तारा जुळल्या. सामान्य माणसासाठी आकाशीची नक्षत्रं असणारे हे चित्रपटसृष्टीतील तारे-तारका कुलवंतजींना हाडामांसाची माणसं म्हणून न्याहाळता आली. अटलबिहारी वाजपेयी - बाळासाहेब ठाकरे - सुशीलकुमार शिंदे किंवा प्रमोद महाजन - झैलसिंग - बुटासिंग यांच्यासारखे राजकारणीदेखील या चित्राची चौकट बनून भेटतात. ही सारी माणसं अन् त्यांच्याबरोबर जगलेला अवघा काळ कुलवंतसिंग यांनी आपल्यापुढे जिवंत केला आहे ! '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेYe Hai Mumbai Meri Jaan | ये है मुंबई मेरी जान
₹380.00Original price was: ₹380.00.₹285.00Current price is: ₹285.00. Save ₹95 Read more -
Sale! Add to cartस्वामी विवेकानंद - एक झंझावात त्यांच्या सव्यासाची व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू. हिंदू रूढी व अंधविश्वासांवर त्यांनी केलेले प्रहार. धर्म, विज्ञान, संगीत, इतिहास अशा अनेक विषयांवरील स्वामीजींचे प्रभुत्व. या सा-याचे रसरशीत, जोशपूर्ण दर्शन घडविणारे चरित्र.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेYoddha Sanyasi | योध्दा संन्यासी
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart
Skip to content