-
Sale! Add to cart'हा विलक्षण प्रवास सुरू झाला एका मध्यमवर्गीय मराठी घरातून. रंग, रेषा, कविता, गाणं यांच्यासह अनुभवांच्या अन् जीवनाच्या विविध रंगांत न्हाऊन निघालेलं त्याचं लोभस रूप आता एका प्रशांत पडावावर विसावलं आहे. सुखदु:खांच्या घटना, हर्षामर्षाचे प्रसंग, कृतार्थतेचे अन् वैफल्याचे क्षण, एका पारड्यात तर्क तर दुसऱ्यात अध्यात्म अशा विविधरंगी वाटचालीत सोबत चालणाऱ्या कितीक व्यक्ती. जीवनाच्या स्वप्नवास्तवाला वेढणाऱ्या आभाळाएवढ्या चैतन्याचं एका संवेदनशील मनात उमटलेलं नितळ प्रतिबिंब म्हणजेच शिंपेतले आकाश
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेShimpetle Aakash | शिंपेतले आकाश
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartखूप शिकायचंय, चांगल्या शिक्षणसंस्थेत प्रवेश घ्यायचाय, पुढे संशोधन करायचंय, पण या संस्थेत प्रवेश मिळेल काय ? प्रवेश मिळाला, तर खर्च झेपेल काय ? असे प्रश्न गुणवंत मुलांना आणि पालकांना पडत असतात. पण आता विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनांनी महत्त्वाकांक्षी तरुण- तरुणींना त्यांचं भविष्य अधिक उज्ज्वल करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. अशा अनेक शिष्यवृत्ती योजनांची माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Shishyavrutti Havi Aahe | शिष्यवृत्ती हवी आहे?
₹110.00Original price was: ₹110.00.₹83.00Current price is: ₹83.00. Save ₹27 Add to cart -
Sale! Add to cartशिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा मानदंड ! त्यांच्या पराक्रमाची गाथा अनेक चरित्रकारांनी आजवर गायिलेली आहे आणि पुढेही गातील. न्यायमूर्ती रानडे यांनी 'मराठी राष्ट्राची' निर्मिती ही शिवाजीराजाची थोर देशसेवा असा सिद्धांत मांडला. डॉ. सुरेंद्रनाथ सेन यांनी त्यांच्या प्रशासनाचे आणि लष्करी पद्धतीचे विवेचन केले. परंतु 'मराठी राज्य' आर्थिकदृष्ट्या कसे सबल होईल यासाठी शिवरायांनी जे प्रयत्न केले त्याचा आजवर साकल्याने फारसा विचार झाला नाही. 'शिवकालीन महाराष्ट्र' या ग्रंथात, समकालीन साधनांच्या साहाय्याने १७ व्या शतकातील आर्थिक जीवनाचा विचार प्रथमच इतक्या विस्तृतपणे मांडला आहे. मराठ्यांचे राज्य म्हणजे लुटारूंचे राज्य अथवा लष्करी राजवट अथवा सरंजामशाही नसून ते 'बहुत जनांसी आधारू' असे लोकांचे राज्य होते, त्या राज्याच्या राजमुद्रेत 'भद्राय' राजते अशी अक्षरे होता, आणि 'धाकुटपणा'पासून माणसाचे माणस वळखतात असे अभिमानाने म्हणणा-या 'स्वामी'ने निर्माण केलेले ते 'कल्याणकारी' राज्य होते त्याचा विस्तार छोटासा असला तरी 'आर्थिकदृष्ट्या' त्याला स्थैर्य येण्यासाठी शिवरायांनी केलेल्या प्रयत्नांचे येथे विवेचन केले आहे आणि हेच या ग्रंथाचे आगळे-वेगळेपण आहे.
इतिहासShivakalin Maharashtra | शिवकालीन महाराष्ट्र
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartमुंबई महाराष्ट्रात आहे, पण मुंबईमध्ये महाराष्ट्र नाही - ही विदारक वस्तुस्थिती आहे. ही स्थिती बदलण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली समर्पित भावनेने कार्य करणार् या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची कामगिरी अतुलनीय अशीच आहे. मुंबईत महाराष्ट्र वाढीस लावणार् या व मराठीकरणाचे तेजस्वी कार्य करणार् या लोकाधिकारच्या कार्याचा जेवढा गौरव करावा तेवढा कमीच आहे. -- वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज
All BooksShivsena, Lokadhikar Ani Mee | शिवसेना, लोकाधिकार आणि मी
₹340.00Original price was: ₹340.00.₹255.00Current price is: ₹255.00. Save ₹85 Add to cart -
Sale! Add to cartआपल्या जीवनात अनेक माणसं सामील होत असतात. त्यांचे आपल्याशी होणारे वेगवेगळ्या पातळीवरचे खुले व मूक संवाद रुजवतात अनेक दृश्य आणि अदृश्य नाती. आणि माणसंच कशाला? झाडं, फुलं, पानं, रानं, पक्षी, प्राणी, एवढंच नव्हे, तर गाणी, घरं आणि रस्तेसुद्धा एकेका समृद्ध व्यक्तिमत्त्वाची धनी असतात! ह्यातील सार् या व्यक्तींशी (वल्लींशी!) आणि वृक्ष-वल्लींशी एकरूप होताना त्यांच्या चांदणस्पर्शानं लेखिकेच्या जगण्याला नवा आयाम मिळाला आणि तिच्या लेखणीला शब्दांची पालवी फुटली. त्या पालवीचे अन् मोहोराचे रंग ल्यालेल्या अम्लान, नितळ व्यक्तिचित्रांनी आणि निसर्गचित्रांनी सजलेलं एक नितांतसुंदर दालन :
All BooksShodh Aaraspani | शोध आरस्पानी
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartशेती आणि पशुपालन हे माणसाचे अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात असलेले व्यवसाय. शेतीसंबंधीची निरीक्षणे आणि प्रयोग माणूस प्राचीन काळापासून करत आला आहे. भारतातही वैदिक कालखंडापासून अनेक ऋषिमुनींनी शेतीविषयक विविध विषयांना गवसणी घालणारी ग्रंथरचना केली. कृषिपराशर, वृक्षायुर्वेद, उपवनविनोद अशा अनेक बहुमोल ग्रंथांचा धांडोळा घेऊन शेतीविषयक तंत्र आणि विज्ञानाचा शोध, वाचन, अभ्यास, प्रयोग या चतु:सूत्रीच्या निकषांवर आधुनिक दृष्टिकोनातून वेध घेणारा ग्रंथ.
All BooksShodh Ani Bodh | शोध आणि बोध
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartरोगांवरचे अत्याधुनिक उपचार सोडाच, पण जिथे रोगाबाबत पुरेशी माहितीही नसते; अशा ग्रामीण भागालाच डॉ. हिम्मतराव बावस्करांनी आपलं कार्यक्षेत्रं मानलं. ग्रामीण भागात जन्मलेल्या अन् वाढलेल्या डॉ. बावस्करांनी अज्ञान, गरिबी फार जवळून अनुभवली. साप-विंचवाचा दंश अन् त्याने होणारे मृत्यू, कुपोषण, प्रदूषणामुळे होणारे आजार यांच्या जोडीला मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग यांसारखे पूर्वी श्रीमंतांचेच मानले जाणारे विकारही ग्रामीण भागात शिरकाव करत आहेत. या सा-या व्याधींबद्दलची सजगता अन् उपचारांमधील तप्तरता सा-यांच्या मनावर ठसवणारे शोध ग्रामीण आरोग्याचा
वैद्यकीयShodh Gramin Aarogyacha | शोध ग्रामीण आरोग्याचा
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'मराठी लोकांना आपल्या इतिहासाचा खूप अभिमान वाटतो. महाराष्ट्राला इतिहास आहे, इतर प्रांतांना फक्त भूगोल आहे, असे अभिनिवेशाने म्हणण्यापर्यंत कधीकधी आपली मजल जाते. तथापि आपले इतिहासाबद्दलचे ज्ञान मात्र मध्ययुगापर्यंत - शिवपूर्वकालापर्यंत - जाऊन थबकते. त्यापूर्वीचा समृध्द इतिहास, सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीपर्यंत विस्तारता येणारी त्याची मर्यादा, त्या प्रदीर्घ कालखंडातील विविध स्थित्यंतरे आणि चढउतार याबाबत मात्र आपल्याला पुरेशी माहिती नसते. हा ग्रंथ ती तशी माहिती करून देणारा वैशिष्टयपूर्ण ग्रंथ आहे. सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव इ. राज्यकर्त्या घराण्यांच्या इतिहासाची दखल घेत पुढे जाणारा हा ग्रंथ शिवशाहीला आणि पेशवाईलाही आपल्या कवेत घेतो आणि इतिहासाचा तो धागा संयुक्त महाराष्ट्राच्या यशस्वी आंदोलनापर्यंत - अगदी आजच्या महाराष्ट्रापर्यंत - आणून सोडतो. जवळजवळ दोन हजार वर्षांच्या इतिहासातील अनेक स्थित्यंतरांचा साकल्याने वेध घेणारा हा ग्रंथ महाराष्ट्राच्या वर्तमानाकडे व भविष्याकडेही वेगळया नजरेने पाहण्याची दृष्टी आपल्याला देतो... इतिहासाची गती चक्राकार असते, असे डॉ. राम मनोहर लोहिया यांचे मत होते. उत्पत्ती, स्थिती आणि विनाश या अवस्थांच्या फेऱ्यांतून वरखाली होणारे इतिहासचक्र नीट न्याहाळले, तर आपल्याला अनेक बोचऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. सर्व महाराष्ट्रप्रेमींनी आवर्जून वाचावा व संग्रही बाळगावा, असा साधार, साक्षेपी इतिहासग्रंथ... '
इतिहासShodh Maharashtracha | शोध महाराष्ट्राचा
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cartश्वास रोखून धरायला लावणारं रहस्य... उत्कंठेचं टोक गाठायला लावणारा वेगवान घटनाक्रम... बुध्दिमत्ता कूटनीती आणि धाडस यांच्या जोरावर बहात्तर तास चाललेला रोमांचक अद्भुत थरार ! ही गोष्ट सुरू होते १६७० साली शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली, तेव्हा. पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना या लुटीतला प्रचंड ऐवज हरपला ! कुठे गडप झाला हा खजिना ? काय रहस्य दडलं होतं त्या खजिन्यात ? शिवकालातील अस्सल संदर्भ. वर्तमानातील वास्तव प्रवृत्ती. अन् या पार्श्वभूमीवर विणलेलं ऑथेंटिक, अनबिलीव्हेबल आणि अनपुटडाउनेबल अस्सल मराठी थ्रिलर !
कादंबरीShodh | शोध
₹675.00Original price was: ₹675.00.₹506.00Current price is: ₹506.00. Save ₹169 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreडॉ. स. रा. गाडगीळ यांचा शोकात्म विश्वरूप दर्शन हा ग्रंथ त्यांच्या वैचारिक यात्रेतील एक उत्तुंग दीपस्तंभच आहे. त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या अशा या प्रकल्पाचा आवाका छाती दपडून टाकणारा आहे. इस्किलस, सॉफक्लिस, युरिपिडीज यांची अमर अशी ग्रीक शोकनाटये, इंग्लंडमधील शेक्सपीअरची सा-या जगात गाजलेली शोकनाटये, आधुनिक युगातील इब्सेनची सामाजिक समस्याप्रधान शोकनाटये (नॉर्वे), आणि शेवटी भारतातील युगान्त शब्दांकित करणारे व्यासांचे महाभारत हे शोकात्म महाकाव्य हा जागतिक साहित्यातील अमर ठेवा डॉ. गाडगीळांच्या ग्रंथातील अभ्यासाचा विषय आहे. डॉ. गाडगीळांनी आपल्या या ग्रंथात या चारही भूप्रदेशांतील शोकात्म साहित्याचे अतिशय प्रभावी भाषाशैलीत रसग्रहणपूर्वक विश्लेषण केले आहे. इस्किलसचे सप्लायंट विमेन, महानाटय प्रॉमिथ्यूस बाउंड, ऑरेस्टिआ हे त्रिनाटय, सॉफक्लिसचे अँटिगनी आणि जगातील सर्वश्रेष्ठ शोकनाटय ईडिपस, युरिपिडीजचे काव्यसौंदर्याने बहरलेले हिप्पॉलिटस, इब्सेनचे अ डॉल्स हाउस, व्हेन वुइ डेड अवेकन आणि शोकात्म घटनांनी युगान्त घडविणारे महाभारत या वैभवसंपन्न अशा ज्या कलाकृतींचा डॉ. गाडगीळांनी आपल्या या ग्रंथात रसग्रहणपूर्वक परिचय करून दिला आहे ती जागतिक वाड्.मयातील अत्युच्च शिखरेच आहेत. अशा अभिजात साहित्याची समीक्षा, रसज्ञता आणि जीवनविषयक तत्त्वचिंतन या पायावरच उभारली जाऊ शकते. प्रा. गो. वि. करंदीकरांनी केलेले अॅरिस्टॉटलच्या पोएटिक्स या मौलिक ग्रंथाचे अप्रतिम भाषांतर आणि त्यावरील विद्वत्तापूर्ण भाष्य या ग्रंथानंतर मराठीत या विषयासंबंधी डॉ. गाडगीळांनी केलेली सखोल आणि परिपूर्ण चर्चा इतरत्र क्वचितच आढळेल. ईडिपसच्या शापकथेचा सांस्कृतिक मानववंशशास्त्राच्या आधारे डॉ. गाडगीळांनी लावलेला अर्थ अगदी स्वतंत्र आणि नव्याने प्रकाशात आला आहे. त्याचप्रमाणे पांडवांचे आणि ईडिपसचे झालेले स्वर्गारोहण या घटनेचा गाडगीळांनी नव्याने लावलेला अर्थ असाच अभिनव आहे. शोकात्म नाटयाचा शेवट शोकाचे विरेचन करणारा (कॅथार्सिस) असला पाहिजे या वैश्विक संकल्पनेतून ही स्वर्गारोहणाची कल्पना उदयाला आली असली पाहिजे, ही डॉ. गाडगीळांची कल्पना मार्मिक आहे. डॉ. गाडगीळांचा शोकात्म विश्वरूप दर्शन हा ग्रंथ शोकात्म साहित्यसमीक्षेत बीजग्रंथ ठरणार आहे. रसिक वाचक-अभ्यासकांना गाडगीळांचा हा ग्रंथ काहीशी नवी दिशा दाखविणारा वाटेल !
रसग्रहण / समीक्षाShokatma Vishwarup Darshan | शोकात्म विश्वरूप दर्शन
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Read more
Skip to content