-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreआपल्या सामाजिक विचाराला आणि आचाराला आपल्या समग्र कर्तृत्वाचा गाभा मानणारे सावरकर म्हणजे काही शास्त्राधार पाहून- दाखवून समाज बदलायला निघालेले समाजसुधारक नव्हते तर धर्मग्रंथावर समाजसंस्था उभी करण्याचे दिवस संपले, अशी घोषणा करणारे बुद्धिप्रामाण्यवादी कर्ते विचारवंत होते. हिंदू समाजाला जखडून टाकणा-या सप्तबंदीच्या बेड्या आपल्या घणाघाती युक्तिवादाने खळाखळा तोडून टाकणारे ते क्रांतिकारक होते. त्यांनी रत्नागिरीत जसे पतितपावन मंदिर उभारले, तशी पूर्वास्पृश्यांना अनेक जुनी मंदिरे खुली करून देण्यासाठी यशस्वी आंदोलनेसुद्धा केली. सावरकरांचे क्रांतिकारक समाजकार्य पाहून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, भाई माधवराव बागल, सत्यवादीकार बाळासाहेब पाटील प्रभृती ब्राह्मणेतर सुधारकही प्रभावित झाले होते. ते क्रांतिकार्य पूर्ण करण्यासाठी आपले उरलेले आयुष्य परमेश्वराने सावरकरांना द्यावे, अशी प्रार्थना महर्षी शिंदे यांनी केली होती. सावरकरांच्या त्या समाजक्रांतीच्या यशाचे रहस्य कशात होते, याची साधार उकल करून दाखवणारा हा विचारप्रवर्तक ग्रंथ सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुद्दाम वाचला पाहिजे, अभ्यासला पाहिजे.
समाजकारण / राजकारणSawarkaranchya Samajkrantiche Antrang | सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Read more -
Sale! Add to cart'हे आत्मकथन आहे जगातल्या अनेक गोष्टींना एखाद्या उत्साही मुलीच्या अवखळ कुतुहलाने सामोरे जाणाऱ्या एका प्रतिभावंत मनस्विनीचे ! आकाशवाणीपासून दूरचित्रवाणीपर्यंत बालनाटय अन् प्रायोगिक रंगभूमीपासून जास्वंदी, सख्खे शेजारी अशा गाजलेल्या नाटकांपर्यंत अनोख्या डॉक्युमेंट्रींपासून चष्मेबद्दूर, कथा, दिशा, स्पर्श, साज अशा अनवट चित्रपटांपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये स्वत:ची अमिट छाप उमटवणारी ही बहुआयामी प्रतिभावान कलाकार : सई परांजपे मिस्कील आणि मनस्वी प्रेमळ आणि फटकळ नर्मविनोदी आणि स्पष्टवक्ती. आग्रही आणि पारदर्शी. सईंच्या व्यक्तिमत्त्वाचे असे विविध पैलू उलगडणारे आत्मकथन सय
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSay – Maza Kalapravas | सय – माझा कलाप्रवास
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Sale! Add to cartनिसर्गातील कोणत्याही जातीला वाचविण्याचा खात्रीलायक मार्ग माणसाला सापडणं ही जागतिक महत्वाची गोष्ट् आहे. कारण निसर्गातले जीव माणूस नेहमीच नष्ट करीत असतो. एखादा नवीन जीव निर्माण करणं मात्र त्याला शक्य होत नाही. तेव्हा आहेत ते सर्व जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणं एवढंच त्याच्या हाती उरतं. सायबेरिया ते भरतपूर असा लांब पल्याचा परतीचा प्रवास करणा-या देखण्या क्रौंच पक्षांना वाचवण्यासाठी त्यांचा मागोवा घेत भारत, अमेरिका आणि रशियातील पक्षीतज्ञांनी केलेल्या अथक प्रयत्नांची एका निसर्गप्रेमी, संवेदनाशील मनाने केलेली टिपणे.
संकीर्णSayberiyatil Shodh | सायबेरियातील शोध
₹45.00Original price was: ₹45.00.₹34.00Current price is: ₹34.00. Save ₹11 Add to cart -
Sale! Add to cartहे पुस्तक म्हणजे एक ‘कोलाज' आहे. त्याला कॅन्व्हास लाभला आहे एका प्रतिभावान बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा. आकाशवाणीपासून प्रकाशवाणीपर्यंत, रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या लेखणीचा अन् कॅमेर्यारचा अमिट ठसा उमटवणारे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे सई परांजपे. सईंनी आपल्या भ्रमंतीच्या अन् स्वप्नरंजनाच्या विविध आविष्कारांना शब्दबद्ध करून साकारलेलं हे कोलाज म्हणजे -
All BooksSaysangat | सयसंगत
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartराज्यघटनेत 'सेक्युलर' शब्द कधी आला?'सेक्युलॅरिझम' व 'धर्म' यांचा घटनेला अभिप्रेत असणारा अर्थ कोणता आहे ?घटनेने लौकिक अर्थाच्या धर्माचे स्वातंत्र्य दिले आहे तरी किती? 'समान नागरी कायद्या'ला विरोध का होतो?उत्तराखंड राज्याने केलेला 'समान नागरी कायदा' काय आहे? 'वक्फ कायदा' आहे तरी काय?सेक्युलर न्यायालयांनी धार्मिक न्यायालयांसारखे निवाडे द्यावेत काय ? या व यांसारख्या प्रश्नांची मूलभूत चिकित्सा करणारा, विचारांना नवी दिशा देणारा, काहीसा धक्कादायक पण चिंतन करायला लावणारा, विशेषतः तरुणांनी व विद्यार्थ्यांनी वाचलाच पाहिजे असा विचारप्रवर्तक ग्रंथ.
All BooksSecularism, Dharmaswatantrya Ani Samaan Nagari Kayda | सेक्युलॅरिझम, धर्मस्वातंत्र्य आणि समान नागरी कायदा
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cartसीमाला तिच्या मित्रमंडळींनी पुस्तक भेट द्यायचे ठरवले. प्रत्येकाने आणलेल्या पैशांची बेरीज करून त्यांनी ही खरेदी कशी केली? चला, वाचूया.
All BooksSeemacha Vadhdivas | सीमाचा वाढदिवस
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartसीतामाते, एक खचलेली, दीनवाणी अबला भेटेल, अशा भ्रमात मी होतो. मला भेटली एक कणखर करारी स्त्री!' ही हनुमंताला दिसलेली सीता... आणि लक्ष्मण मूर्च्छित पडल्यावर - या सा-या महायुद्धाला आपला सुवर्णमृगाचा मोह कारणीभूत ठरला, असं वाटून पार्वतीमाते, एक वेळ मला श्रीरामाच्या आयुष्यातून वजा कर, पण लक्ष्मणाचे प्राण वाचव...' असा विलाप करणारी सीता... खरंच, कशी होती सीता? विचारी आणि खंबीर? की हतबल आणि भावुक? नियतीची बळी ही सीतेबद्दलची धारणा खरी, की रामरक्षेतलं तिचं सीताशक्ति:' हे रूप खरं? महर्षी वाल्मिकींनी चितारलेल्या सीतेच्या विविध प्रतिमांचा समृद्ध वेध घेणारी अभिराम भडकमकर यांची कादंबरी
All BooksSeeta | सीता
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cart'भारताच्या परंपरागत शेतीच्या अभ्यासातून कळते, जगातील सर्वश्रेष्ठ शेतीप्रणाली भारतामध्येच आहे. त्या ज्ञानाचा शोध घेत, प्रत्यक्ष प्रयोगातून पडताळा पाहात गोव्याचे शेतीतज्ज्ञ डॉ. क्लॉड अल्वारिस यांनी एक संघटना उभी केली - ऑरगॅनिक फार्मिंग असोसिएशन ऑफ इंडिया . या संघटनेचे चार हजार स्वयंप्रेरित सभासद आहेत. सेंद्रिय शेतीचे विविध पैलू, रसायनमुक्त शेतीचे फायदे जिज्ञासूंना आणि सामान्यजनांनाही कळावे, म्हणून क्लॉड यांनी एक पुस्तक तयार केले - ऑरगॅनिक फार्मिंग सोर्सबुक . महाराष्ट्रातील पुढारलेल्या, जागरूक, प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला अरुण डिके आणि अरविंद दाभोळकर या तज्ज्ञांनी. कृषिक्षेत्राबद्दल आस्था असणाऱ्या प्रत्येकाने संग्रही ठेवावा, असा मौल्यवान संदर्भग्रंथ
कृषिविचारSendriya Sheti | सेंद्रिय शेती
₹800.00Original price was: ₹800.00.₹600.00Current price is: ₹600.00. Save ₹200 Add to cart -
Sale! Add to cartसेतु बांधियला सागरी छत्रपती शिवाजी टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया ही बांधकामं आजवर मुंबई शहराची ओळख मानली जात होती. आता त्यांत वांद्रे-वरळी सागरी सेतूची महत्त्वाची भर पडली आहे. या पुलानं उपलब्ध करून दिलेली सोय तर महत्त्वाची आहेच, पण त्याचं दर्शनी रूपही अत्यंत आकर्षक आहे. सर्वांत आकर्षक आहे तो मध्यभागीचा रज्जुसेतू. १२६ मीटर उंचीच्या मनो-यावरून दोन्ही बाजूंना तिरप्या उतरत जाणा-या दोरखंडांनी हा ६०० मीटर लांबीचा पूल तोलून धरला आहे. पुलाला उचलून धरणा-या या मजबूत दोरखंडांनी जणू पूर्व दिशेला नमस्कार केला आहे, अशी काहीशी भावना बघणा-याच्या मनात येते. ब्रिटिश काळातील बांधकामांच्या नंतर आपल्या देशात काही भव्यदिव्य बांधलं गेलंच नाही, अशी टीका करणा-यांना भारतीय अभियंते, कंत्राटदार, मजूर यांनी दिलेलं हे निःशब्द पण बिनतोड उत्तर आहे... कुणाही भारतीयाला अभिमान वाटावा, असं ! त्या देखण्या सागरी सेतूच्या उभारणीची ही सचित्र सुरस कथा.
स्थापत्य आणि नगररचनाSetu Bandhiyala Sagari | सेतु बांधियला सागरी
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartआज परिवर्तनाच्या चळवळी कुंठित झाल्याचे चित्र दिसते. हे कशामुळे घडले, याची मीमांसा विविध अंगांनी केली जात आहे. अशाच शोधयात्रेत राजीव साने यांना प्रकर्षाने जाणवले की, कोणत्याच नीतिशास्त्राचा धड आधार न घेतल्याने ही स्थिती ओढवली आहे. केवळ चिकित्सा करून ते थांबले नाहीत, तर स्वतंत्र नीतिशास्त्राच्या उभारणीची गरज त्यांनी ओळखली. त्यांचा हा प्रयत्न म्हणजे अभिनव नीतिशास्त्राच्या उभारणीची पूर्वतयारीच ठरू शकेल. भविष्यातील आवश्यक अशा विचारमंथनाची एक नवी पायवाटच साने यांनी घालून दिली आहे. त्या दिशेने जाणाऱ्यांना त्यात अनेक नवी विचारक्षितिजे खुणावतील.
All BooksSfoortivadi Neetishashtra | स्फूर्तिवादी नीतिशास्त्र
₹270.00Original price was: ₹270.00.₹203.00Current price is: ₹203.00. Save ₹67 Add to cart
Skip to content