All Books
-
Sale! Add to cartत्यानं निर्माण केले मातीतून मोती वनस्पती-पानं-फुलं फळातून शोधल्या हजारभर वस्तू पालटून टाकली शेती नि शेतक-यांची स्थिती म्हणून तर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर ठरले किमयागार कार्व्हर जीनियस कृष्णवर्णीय अमेरिकन शास्त्रज्ञाची जीवनकहाणी. खास किशोर-कुमार वाचकांसाठी वीणा गवाणकर यांनी लिहिलीय साध्या सोप्या रसाळ मराठीत मोजक्या शब्दात तरी समग्र
All BooksKimayagar Carver | किमयागार कार्व्हर (मराठी )
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartत्याने आख्खे जग वेठीला धरले होते. जगभरच्या सगळ्या मानवजातीचे आयुष्य उलथेपालथे केले होते. त्याने 'आपल्याआधी' आणि 'आपल्यानंतर' असा समग्र इतिहास दुभंगून टाकला. रोजरोजच्या चाकोरीबद्ध दिनक्रमापासून दीर्घकाळच्या जीवनशैलीपर्यंत मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याने आमूलाग्र भलेबुरे बदल घडवले. हो, हे सगळे घडवून - बिघडवून तो अदृश्य राहिला, त्याचे नाव कोरोना. या अदृश्य वैऱ्याबरोबर दोन हात करणाऱ्या अनेकांपैकी हाही एक. व्यवसायाने डॉक्टर, त्यामुळे सारे अधिक जवळून पाहणारा. वृत्तीने संवेदनशील, त्यामुळे खूप अस्वस्थ होणारा. त्या कठीण कठोर काळातले कित्येक कोविड क्षण आपल्या मनावर गोंदवत डॉ. राजेंद्र मलोसे यांनी सांगितलेल्या कोविडच्या खऱ्याखुऱ्या कहाण्या -
All BooksKoronayan | कोरोनायन
₹650.00Original price was: ₹650.00.₹488.00Current price is: ₹488.00. Save ₹162 Add to cart -
Sale! Add to cartबुद्धिमत्ता असूनही केवळ मुलगी म्हणून विज्ञान संस्थांमध्ये प्रवेश नाकारला जाण्याचा तो काळ होता. अशा परिस्थितीत माघार न घेता, अनेक अडचणींना तोंड देत, लढवय्या वृत्तीने पुढे जाणार् या कमला सोहोनी यांनी जैवरसायनशास्त्राच्या क्षेत्रात मूलभूत संशोधन केले. वाचू या, आजही प्रेरक असणारे त्यांचे चरित्र- लढाऊ वृत्तीच्या वैज्ञानिक कमला सोहोनी
All BooksLadhau Vrutteechya Vaidnyanik Kamala Sohonee | लढाऊ वृत्तीच्या वैज्ञानिक कमला सोहोनी
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartपाचवीमधली मनू नव्या शाळेत गेली. भली मोठी इमारत, उत्तम ग्रंथालय, प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक असलेल्या शाळेत मनू रमली का ? वर्गात उंचीने सर्वात छोट्या असलेल्या मनूने शाळेत काय काय कामगिरी केली, जाणून घेऊ या - या पुस्तकात लहान माझी बाहुली
All BooksLahan Majhee Bahulee | लहान माझी बाहुली
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Sale! Add to cartया पुस्तकात लंडननिवासी लेखक अरविंद रे लंडनचा एक वेगळाच, लपलेला कोपरा आपल्याला दाखवतात. इथं आहेत भारत, पाकिस्तान, पोलंड, ग्रीस, इस्टोनिया, इटली, बल्गेरिया, आफ्रिका अशा देशांतून लंडनमध्ये स्थलांतरित झालेली माणसं. मुकुंद दीक्षित या समंजस, सहृदयी इंग्रजी शिक्षकाच्या वर्गात ती माणसं दाखल होतात आणि आपल्यासमोर लंडन जीवनशैलीचे एकेक अनोखे पदर उलगडू लागतात. रक्तात भिनलेले स्वत:च्या मातीतले संस्कार विसरू शकतात का ही माणसं? वेळ आणि पैसा' ही ब्रिटिश संस्कृती कितपत आत्मसात करू शकतात ही माणसं? लंडनमध्ये स्थायिक होण्यासाठी राबराब राबणं.... पासपोर्ट्स जाळणं.... कागदी लग्न जुळवणं.... काय काय वाटा पळवाटा शोधतात ही माणसं ! लंडनमधील खाजगी इंग्रजी शाळा, त्यांचे लबाड संस्थाचालक ! शेअरींग हाऊसमध्ये दाटीवाटीनं राहणारे टेनंट्स, त्यांच्या व्यथा आणि कथा ! अरविंद रे ही सारी पात्रं, प्रसंग इतक्या चित्रमय, संवेदनशील, खेळकर शैलीत मांडतात की, हे पुस्तक उघडल्यावर पूर्ण केल्याशिवाय मिटणं अशक्य ! अ-निवासी भारतीयाची आपल्याला अंतर्मुख करणारी कहाणी.
All BooksLaplela London | लपलेलं लंडन
₹480.00Original price was: ₹480.00.₹360.00Current price is: ₹360.00. Save ₹120 Add to cart -
Sale! Add to cartआदरणीय नरेंद्रजी चपळगावकर यांचा आपल्या सर्वांचे प्रबोधन करणारा एक ग्रंथ आपल्या भेटीसाठी येत आहे. ते लोकशाही समाजवाद व गांधीवादाचे पुरस्कर्ते व अभ्यासक आहेत. विचारस्वातंत्र्यासाठी आपल्या लेखणीने व वाणीने त्यांनी लढा दिला आहे. साहित्यसंमेलनातील विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे त्यांचे भाषण अविस्मरणीय होते. अनेकांना हे भाषण ऐकून कै. दुर्गाबाई भागवतांच्या प्रसिद्ध भाषणाची आठवण झाली. चपळगावकर यांचे लेखन व त्यांची भाषणे अतिशय संयत व समतोल असतात. ते विचार स्पष्टपणे मांडतात, पण त्यात अभिनिवेश नसतो. ते कधीही दुसर् याच्या मताचा अनादर करीत नाहीत. सध्याचा काळ हा आक्रस्ताळेपणाने विचार व्यक्त करण्याचा व न पटणार् या विचारांचा अवमान करण्याचा काळ आहे, असे कधीतरी वाटते. या काळात चपळगावकरांचे लेखन व त्यांची भाषणे फार आशादायक वाटतात. लोकशाही समाजवाद व गांधीवादाचे ते नुसतेच पुरस्कर्ते नाहीत, तर ते विचार ते प्रत्यक्षपणे आचरणात आणतात. लोकशाही संस्कृतीचा पुरस्कार करणार् यांना त्यांचे लेखन आशेच्या किरणासारखे वाटते. न्या. अभय ओक, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकशाही आणि हुकुमशाही
All BooksLokshashi Ani Hukumshashi | लोकशाही आणि हुकुमशाही
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cart'परेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्या लाखो श्रमिकांचे हुंदके अन् उसासे... संपाच्या सुलतानीनं गिरणगावाला प्रथम चिरडलं, पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैय्या दाखवून गिरणबाबूंची हाडं नि फासोळया उखडल्या. चोरांची आणि थोरांचीही स्वप्नं एकजीव झाली. मुंबईत अंडरवर्ल्ड आणि ओव्हरवर्ल्डच्या सटिंगनं नंगा नाच ओढवला. शांघाय-सिंगापूरचं कुक्कू लावून चौदा हजार कोटी रुपयांच्या एफएसआयचा बाजार गरम केला गेला ! तुमच्या-आमच्या डोळयांसमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्या सार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा...
All BooksLust For Mumbai | लस्ट फॉर मुंबई
₹850.00Original price was: ₹850.00.₹638.00Current price is: ₹638.00. Save ₹212 Add to cart -
Sale! Add to cartआपला शेजार आपल्याला बदलता येत नाही. गेली अनेक शतकं आपला शेजारी असलेल्या चीनबरोबरचे आपले संबंध विलक्षण गुंतागुंतीचे. विशेषत: माओंच्या कारकिर्दीत झालेल्या १९६२ च्या युद्धानंतर हे संबंध चांगलेच ताणले गेले. वास्तविक आजचा चीन आणि माओंचा चीन यात जमीन - अस्मानाचा फरक. साम्यवादाचं नाव लावणाऱ्या चीनमध्ये आज प्रत्यक्षात प्रारूप आहे नियंत्रित-भांडवलशाही चं. चीन जितका आधुनिक, तितकाच ऐतिहासिकही. आधुनिकतेच्या महामार्गावर वेगाने पुढे जाताना एखाद्या वळणावर आपली प्राचीनता सोडून द्यावी, असं चीनच्या कोणत्याही सत्ताधीशाला वाटलेलं नाही, मग ते माओ असोत, डेंग असोत वा आजचे क्षी जिनपिंग. हे असे विसंवाद वागवत वागवत पुढे जाणं हे चीनच्या रक्तातच असावं. आजही भारताबरोबरचा संघर्ष असेल वा अमेरिकेशी स्पर्धा- चिनी सत्ताधीश आपली धोरणं ठरवताना इतिहासात दडलेल्या सूत्रांचा आधार घेत असतात. हे चकित करणारं विलक्षण चिनी प्रारूप समजावून देणारं-
All BooksMade In China | मेड इन चायना
₹550.00Original price was: ₹550.00.₹413.00Current price is: ₹413.00. Save ₹137 Add to cart -
All Books
Madhyamayan | मध्यमायन
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreप्रमाणलेखन' हा भाषेचा पायाभूत घटक असला, तरी त्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत आलेले आहे. अशा पार्श्वभूमीवर डॉ. नागेश अंकुश यांचा 'मागोवा : प्रमाण मराठी भाषेच्या प्रमाणलेखनाचा इतिहास' हा ग्रंथ विशेष महत्त्वपूर्ण ठरतो. या अभ्यासपूर्ण संशोधनपर ग्रंथात ते मराठी भाषेच्या विकासाची नोंद घेताना निर्दोष लेखनाच्या चारशे वर्षांच्या जडणघडणीचा साक्षेपी आढावा घेतात. प्रमाणलेखनाचे नियम सांगून थांबण्याऐवजी ते भाषिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचे समतोल विवेचन करतात. निर्दोष लेखनपरंपरेचा उगम, प्रवास आणि तिच्यामागील भाषिक विचार यांची सुबोध मांडणी यातून दिसते. प्रमाणलेखनाला आकार देणाऱ्या विविध घटकांची समग्र ओळख करून देणाऱ्या या ग्रंथातून मराठी लेखनाच्या शिस्तबद्धतेची सहज ओळख होते. डॉ. अंकुश प्रमाणलेखनाकडे केवळ व्याकरणाच्या चौकटीतून नव्हे, तर भाषेच्या सांस्कृतिक जबाबदारीचा एक भाग म्हणून पाहतात. त्यांच्या आधीच्या ग्रंथांतील भाषाजागृती 'मागोवा' मध्ये संशोधन आणि चिंतनाच्या रूपाने प्रकर्षाने जाणवते. विविध संस्थात्मक कार्यांची बारकाईने नोंद घेत त्यांनी प्रमाणलेखनाशी निगडित अनेक दुर्लक्षित संदर्भ उलगडले आहेत. मराठीच्या प्रमाणलेखनाचा प्रवास समजावणारा आणि भाषेच्या उत्कर्षासाठी पायाभूत ठरणारा हा ग्रंथ एक उत्तम असा संदर्भग्रंथ आणि माहितीकोश ठरतो. 'मागोवा' हा मराठी प्रमाणलेखनाचा परामर्श घेणारा मराठीतील बहुधा पहिलाच ग्रंथ असावा. प्रमाणलेखनाची जडणघडण आणि वाटचाल समजून घेण्यासाठी अभ्यासकांपासून ते भाषेवर नितांत प्रेम करणाऱ्या वाचकांपर्यंत सर्वांनाच तो अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी मला खात्री वाटते. सुधीर रसाळ
All BooksMagova | मागोवा
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Read more
Skip to content
