All Books
-
Sale! Add to cartनैतिकता अन् सामाजिक विषमता, धर्मभावना आणि आध्यात्मिकता, प्रेम अन् लैंगिकता, आक्रमकता अन् भय, अनुपालन, धर्म-जात भेदाभेद, कल्पनाविश्व अन् साहित्य-कला-क्रीडा... माणसाच्या वर्तनाचे असे अनेकविध पैलू. उत्क्रांतिशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, जेनेटिक्स, मेंदूविज्ञान, मानसविज्ञान, प्राणीवर्तनविज्ञान अशा विविध ज्ञानशाखांच्या मिलाफातून माणसाच्या वर्तनाचा अभ्यास चालू आहे. स्वत:चे सांस्कृतिक पर्यावरण घडवण्याची क्षमता असलेला एकमेव प्राणी म्हणजे माणूस. सहकार्य, परोपकार, साहचर्य हे गुण माणसाच्या उत्क्रांतीत महत्त्वाचे ठरले आहेत. माणसांना एकमेकांशी बांधणारी तत्वं माणसाच्या वर्तनात उत्क्रांतीनेच पेरली आहेत का ? मानवी वर्तनाला विधायक वळण देण्याची अंगभूत क्षमता माणसातच आहे का ? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेणारे - आजच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक परिस्थितीशी नानाविध ज्ञानशाखांच्या एकात्मिक अभ्यासाचा संबंध जोडत माणसाच्या व्यक्तिगत अन् सामूहिक वर्तनाचा वैज्ञानिक वेध घेणारे माणूस असा का वागतो ?
All BooksManoos ‘Asa’ Ka Vagato ? | माणूस असा का वागतो?
₹650.00Original price was: ₹650.00.₹488.00Current price is: ₹488.00. Save ₹162 Add to cart -
Sale! Add to cartपूर्वी हिरवेगार असलेले वडगाव हळूहळू उजाड झाले. पाण्याच्या टंचाईने बेजार झाले. एक वर्ष पाऊस वेळेवर आला नाही. गावात आलेल्या एका साधुबुवांना काही गावक-यांनी साकडे घातले.. त्याचा काही परिणाम झाला का ? आजीबाईंनी कोणता उपाय सांगितला ? चला, वाचूया... मंत्र निसर्गाचा
All BooksMantra Nisargacha | मंत्र निसर्गाचा
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Sale! Add to cartलेकराचा जन्म होतो आणि नाळ कापली जाते. लेकराचं अस्तित्व आईपासून स्वतंत्र होतं; पण शेवटपर्यंत नाभीची खूण देहाला सोडत नाही आणि मनातला आईचा दरवळ थांबत नाही. आई असताना-नसतानाचे भावविभोर काळाचे तुकडे गुंफून हा मातृसूक्ताचा लोभस कोलाज तयार झाला आहे. आई गंऽऽ या सहजोद्गाराचा मनस्वी विस्तार या कवितांतून जाणवत राहतो. पानोपानी, ओळीओळीत नि शब्दाशब्दात आई भरून आहे. बापू दासरींच्या या कवितेत भारावून टाकणारी विलक्षण मातृलय आहे. ही नाभीतून उगवलेली कविता वाचकांच्या मनात आईची ऊब उजागर करते. दासू वैद्य
All BooksMatrusookta | मातृसूक्त
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartएके काळी फक्त आयक्यू महत्त्वाचा मानला जात होता. आज त्याच्या बरोबरीने किंबहुना काकणभर जास्तच महत्त्व आले आहे ईक्यू ला - इमोशनल कोशंट वा भावनिक निर्देशांकाला! आयुष्यात हा ईक्यू जपायचा असेल, तर शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यही सुदृढ हवे. आजच्या वेगवान जीवनात जगण्याच्या धावपळीत माणसाची दमछाक होत आहे. व्यक्तिगत जीवनापासून कौटुंबिक / सामाजिक / व्यावसायिक / सांस्कृतिक जीवनापर्यंत प्रत्येक पातळीवर विविध ताणतणावांना सामोरे जाणे व्यक्तीला भाग पडत आहे. अशावेळी आधार लाभतो कौन्सेलरचा आणि कौन्सेलिंगचा, मानसिक आरोग्याबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांचा. जवळजवळ साडेतीन तपांचा काळ या क्षेत्रात काम केलेल्या अनुभवी कौन्सेलरनी आपल्या अनुभवांवर आधारित कथनातून मानसिक आरोग्याचा, समस्यांचा आणि उत्तरांचा घेतलेला वेध.
All BooksMaza Chetanamay Pravas | माझा चेतनामय प्रवास
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartखानदेशातील एक छोटेसे खेडे - दुसाणे. या खेड्यात जन्मलेला मुलगा - नागराज. आईबाप अशिक्षित. वडील सालदारकी करणारे. घरची परिस्थिती यथातथाच. नागराजच्या डोळ्यापुढे आदर्श होता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा. त्यांच्या जीवनचरित्रातून अन् कर्तृत्वातून स्फूर्ती घेलेल्या नागराजने सगळ्या हालअपेष्टा सोसल्या, पण शिक्षणाची कास नाही सोडली. शैक्षणिक पात्रता अन् परिस्थितीवर मात करण्याची जिद्द यांच्या जोरावर त्याने प्रशासकीय पद मिळवले. आपल्या कर्तृत्वाने आणि महत्त्वाकांक्षेने कारकिर्दीत जोमदार प्रगती केली. आजही सेवानिवृत्तीनंतर नागराज समाजकारणात आणि राजकारणात कार्यरत आहेत. गांजणा-या परिस्थितीवर मात करून जीवन यशस्वी करण्याची आकांक्षा बाळगना-या प्रत्येकाला प्रेरणा देणारे आत्मकथन.
All BooksMaza Ladha | माझा लढा
₹290.00Original price was: ₹290.00.₹218.00Current price is: ₹218.00. Save ₹72 Add to cart -
Sale! Add to cartगडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर या छोट्याशा गावातील विद्या मंदिर ही प्रयोगांची पहिली पायरी. मुलांमध्ये दडलेल्या उपजत क्षमतांचा विकास घडवणे हे या सा-या प्रयोगांचे लक्ष्य. वर्गात प्रत्यक्ष घडलेली अध्ययन-अध्यापन प्रकिया हा या प्रयोगविषयाचा गाभा. शिकणे आनंददायी व्हावे, शिक्षणातील साचलेपण जाऊन ते निर्झरासारखे प्रवाही व्हावे, या उद्दिष्टाने झपाटलेल्या एका शिक्षणतज्ज्ञाने रेखाटलेला हा अनोखा प्रवास. विद्यार्थी, पालक, सहयोगी शिक्षक आणि या क्षेत्रात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे गुंतलेल्या अनेक व्यक्ती यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून साकारलेले - प्राथमिक शाळेतील शिक्षिका ते शिक्षणप्रशासनात सहभागी झालेल्या शिक्षणाधिकारी अशा विविध भूमिकांमधून भरीव योगदान देणा-या हाडाच्या शिक्षणतज्ज्ञाने शब्दबद्ध केलेले - माझे शाळेतले प्रयोग
All BooksMaze Shaletale Prayog | माझे शाळेतले प्रयोग
₹240.00Original price was: ₹240.00.₹180.00Current price is: ₹180.00. Save ₹60 Add to cart -
Sale! Add to cartतो मुलगा धडपड्या आहे. चौकस आहे, पण भोचक नाही. त्याचं घर, त्याचं कुटुंब, शेजारीपाजारी, त्याची शाळा, त्याचे शिक्षक-शिक्षिका, त्याचे वर्गातले अन् सोसायटीतले मित्रमैत्रिणी या सगळ्यांनी भरलेलं त्याचं जग. त्याच्या या छोट्याशा जगात घडणाऱ्या अफलातून घटना. सुप्रसिद्ध अभिनेते आणि साहित्यिक दिलीप प्रभावळकरांनी खास त्यांच्या मिष्कील शैलीत उलगडलेल्या आपल्या बालपणीच्या आठवणी...
All BooksMazya Dhamaal Goshti | माझ्या धम्माल गोष्टी
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartकविकुलगुरू कालिदासाचे मेघदूत हे खंडकाव्य म्हणजे अभिजात गीर्वाणभाषेचा एक अनुपम अलंकार! पत्नीच्या विरहाने व्याकुळलेल्या यक्षाने आपला संदेश घेऊन एका मेघालाच रामगिरीहून अलकानगरीकडे जाण्याची विनवणी केली. यक्षाने या आपल्या दूताला त्याच्या प्रस्तावित प्रवासपथाचे वाटेतल्या सार् या खाणाखुणांसकट मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे हा मेघदूत अलकानगरीला पोहोचला का? त्याला ती यक्षपत्नी भेटली का? तिने या दूताकडे आपल्या पतीसाठी-यक्षासाठी काही सांगावा धाडला का? या सार् यांची उत्तरे सांगत आहेत हर्षदा पंडित. कालिदासाच्या मेघदूता चा जणू सिक्वेल म्हणजे मी सखा मेघदूत
All BooksMee Sakha Meghdoot | मी सखा मेघदूत
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartMeenu has a buddy. She was waiting for him for many days. How did Meenu get to know he was on his way? Did he finally meet her? Come, let's read in this book. Meenu s Buddy
All BooksMeenu’s Buddy | Meenu’s Buddy
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartमीनूचा एक दोस्त आहे. ती किती तरी दिवस त्याची वाट पाहत होती. तो आला का ? त्याची चाहूल मीनूला कशी लागली ? चला, या पुस्तकात वाचू या.
All BooksMeenucha Dost | मिनूचा दोस्त
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart
Skip to content