All Books
-
Sale! Add to cartचित्तो जेथा भोयोशून्यो या आपल्या अजरामर कवितेत विश्वकवी रवींद्रनाथांनी अशा एका भयमुक्त जगाचे स्वप्न पाहिले, जेथे ज्ञानग्रहण आणि ज्ञानसंवर्धन मुक्तपणे होऊ शकेल. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न म्हणजे ओपन सोर्स' चळवळ आणि त्यातून उभी राहिलेली सॉफ्टवेअर निर्मितीची समांतर व्यवस्था. ओपन सोर्स सॉफ्टवेअरची सर्वात जास्त गरज भारतासारख्या देशाला आहे. वेगाने विस्तारणाया या लोकचळवळीच्या ऐतिहासिक, व्यवस्थापकीय, आर्थिक, मानसशास्त्रीय,सामाजिक आणि तात्त्विक अशा विविध पैलूंचा परामर्श घेणारी मनोज्ञ सफर !
All BooksMahajalache Muktayan | महाजालाचे मुक्तायन
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartअडीच हजार वर्षांपूर्वी या भूतलावर एक महापुरुष जन्मला. प्रज्ञा अन् परिश्रम यांच्या संगमातून त्याने सम्यक ज्ञानाची प्राप्ती केली. अखिल विश्वासाठी तो वंदनीय झाला. सिद्धार्थ गौतमाचा बुद्ध' बनला. मानवी आयुष्यातील दु:खाचा परिहार करण्यासाठी बुद्धाने चार आर्यसत्ये, अष्टांगमार्ग, प्रतीत्यसमुत्पाद यांच्या आधारे धम्मतत्त्वांचा प्रसार केला. ज्ञान, करुणा, दया, अहिंसा, शांती यांचा संदेश देणारा दीप प्रत्येकाने अंतर्मनात लावावा, ही शिकवण साऱ्या मानवजातीसाठी सांगितली. आज अडीच हजार वर्षांनंतरही बुद्धविचारांचा नंदादीप तेजाने तेवतोच आहे. राजपुत्र सिद्धार्थ ते तथागत बुद्ध या जीवनप्रवाहाचा मागोवा घेणारे - आजच्या अस्थिर, अनिश्चित परिस्थितीत; व्यक्तिगत अन् सामूहिक जीवनसंघर्षात अढळ ध्रुवासारखे मार्ग दाखवणारे चरित्र.
All BooksMahakarunik | महाकारुणिक
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartगेल्या शंभरेक वर्षांत महानुभावांच्या साहित्यावर सांप्रदायिक आणि संप्रदायिकेतर संशोधक-अभ्यासकांकडून विपुल लेखन झाले असले, तरी महानुभावीय सांप्रदायिक व्याख्यानपद्धती आणि आधुनिक महानुभावीय व्याख्यानपद्धती या उभय पद्धतींचे सविस्तर अध्ययन- अध्यापन झालेले नाही. प्रा. बापट यांचा प्रस्तुत दोन भागांचा ग्रंथ त्याच्या नावाप्रमाणे महानुभाव वाङ्मयाच्या व्याख्यानपद्धतीचे चिकित्सक समालोचन आहे. महानुभाव संप्रदायाचे साहित्य आणि तत्त्वज्ञान यांची इतकी सांगोपांग चर्चा करणारा दुसरा ग्रंथ माझ्या अवलोकनात नाही. व्याख्यानपद्धतीचे चिकित्सक समालोचन करताना व्याख्यानांची म्हणजेच साहित्याची आणि तत्त्वज्ञानाची चर्चा आपोआपच होऊन गेली. म्हणजेच या ग्रंथाची फलश्रुती दुहेरी आहे. संप्रदायाच्या विशाल साहित्याचा व सखोल तत्त्वज्ञानाचा परिचय होणे आणि या परिचयातून व्याख्यानपद्धतीचेही आकलन होणे - हे दोन्ही प्रवाह ग्रंथामध्ये एकवटले आहेत इतके म्हणण्याइतपत परस्परांत मिसळले आहेत, ती गुंफण हेच एक या ग्रंथाचे स्वतंत्र वैशिष्ट्य होऊन बसले आहे. डॉ. बापट यांचा ग्रंथ म्हणजे महानुभावांच्या व्याख्यानवाङ्मयाचे एक महाव्याख्यानच ! डॉ. सदानंद मोरे
All BooksMahanubhav Part 1 Ani 2 | महानुभाव वाड.मय भाग १ व भाग २
₹3,000.00Original price was: ₹3,000.00.₹2,250.00Current price is: ₹2,250.00. Save ₹750 Add to cart -
Sale! Add to cartमाणसाचं निसर्गाशी एक अतूट, अलौकिक, अगम्य आणि अनादी नातं आहे. तरीही मनुष्य हा निसर्गप्रेमी प्राणी आहे, हे विधान मात्र आज अ-वास्तव' ठरलं आहे. संगणकीय संवादाच्या या युगात माणसाला निसर्गाशी संवाद साधायला वेळ नाही. आपल्या आलिशान अन् प्रशस्त घराच्या छताला त्याने चंद्रतारे लटकवले आहेत. आख्खं आभाळ आपल्या खिडकीच्या चौकटीत बंदिस्त केलंय अन् वृक्षांचं बोनसाय करून पर्वतावरील दूरची रम्यता' जवळ केलीय. कलावंताचं हृदय असणारा अत्यंत सामान्य माणूस मात्र एखाद्या टेकडीच्या टोकावर थिजलेलं, आकाशातून पडलेलं रक्तबीज बुब्बुळात साठवतो. सोनेरी कणांच्या गालिच्यावर अलगद पावलं टाकत निरव शांततेत क्षितिजासह स्वत:ला डुबवतो. तर कोणी दऱ्याखोऱ्यात, रानावनात भणंग भटकंती करतो मनमुराद! कोणी त्याला छंद म्हणतो, कोणी वेडेपणा! हाच वेडेपणा सामान्याला असामान्य बनवतो. त्याला स्वत:ची ओळख मिळते, स्वत:चा शोध लागतो. तो सामान्यांच्या समाजरंगात रंगूनही वेगळा राहतो. असाच वेडेपणा श्री. रमेश देसाई यांनी केलाय. जे दिसलं ते टिपलं, असं हे छायाचित्रण नव्हे. विषय-वस्तूशी तादात्म्य साधून जो विशिष्ट क्षण छायाचित्रकार टिपतो, त्या क्षणाच्या प्रतीक्षेसाठी त्याला खूप संयम आणि धीर धरावा लागतो. श्री. देसाई धबधब्याचं रासवट सौंदर्य अन् घनगंभीर स्वर आपल्या डोळ्यात, कानात, साठवतात; जमिनीकडे झेपावणाऱ्या प्रत्येक धबधब्याची अदाकारी अनुभवतात. धबधब्यात भिजण्याचा आनंद तेही घेतात. परंतु ते तिथे जातात ते त्या धबधब्याला भेटण्यासाठी. अनुभवतात ते कलात्मक झिंग, भव्य सौंदर्य आपल्या फ्रेममध्ये भरून ! महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश अशा भौगौलिक विविधतेतील काही अज्ञात पावसाळी सौंदर्यस्थळं श्री. देसाई यांनी टिपली आहेत. हे छायाचित्रण करताना त्यांचं कवि-कलावंत मन निसर्गाच्या विद्रूपीकरणानं विदीर्ण झालंय, त्यांनी पावसाळी सहलप्रेमींना अनेक दालनं उघडी केली आहेत; त्यांचं आवाहनही सहलप्रेमींनी लक्षात ठेवायला हवंय. सुधीर शालिनी ब्रह्मे
All BooksMaharashtratil Dhabdhabe | महाराष्ट्रातील धबधबे
₹700.00Original price was: ₹700.00.₹525.00Current price is: ₹525.00. Save ₹175 Add to cart -
Sale! Add to cartपं. भीमसेनजी आणि लतादीदी : आवाज वेगळे, गायकी वेगळी आणि शैलीही वेगवेगळ्या. एक अभिजात संगीतातलं दैवत तर दुसऱ्या सुगम संगीतातल्या देवता ! पंडितजींचा आवाज भारदस्त तर लतादीदींचा आवाज कोमल. पण दोघांमध्ये श्रोत्यांची मनं वाचता येणं आणि भावपूर्णता हे दोन समान गुण होते.
All BooksMaifal Bhaktirasachi | मैफल भक्तिरसाची
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartतेजसला नकाशा म्हणजे काय हे माहीत नव्हते. आजोबा, बाबा आणि शिरुकाकाने तेजसची नकाशाशी मैत्री करून दिली. तेजसने नकाशाचे काय काय उपयोग माहीत करून घेतले. चला, आपणही ते बघू या आणि करू या- मैत्री नकाशाशी
All BooksMaitri Nakashashi | मैत्री नकाशाशी
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Sale! Add to cartतुम्ही कधी बोट पाहिली आहे का ? या पुस्तकातल्या मुलाकडे बोट आहे, बरं का ! पण त्याच्या आई-बाबांना हे माहीत नाही. मग काय काय गमती झाल्या, ते वाचूया... माझी बोट
All BooksMajhee Boat | माझी बोट
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartपुळूजसारख्या छोट्याशा गावात बालपण अन् शिक्षण. अनेक अडचणींवर मात करून इंजिनीअर बनण्यापर्यंत मजल. आपल्या गुणवत्तेच्या बळावर शासकीय सेवेत प्रथम वर्गातील अधिकारपदावर निवड. त्यानंतर महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागा'त मोलाचे योगदान अन् बहुआयामी कर्तृत्व. या व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे सुरेश सोडळ. महाराष्ट्रातील जलसंपत्तीचा समतोल व शाश्वत विकास जागतिक संघटनेने निर्धारित केलेल्या सूत्राप्रमाणे होण्यासाठी, पुढच्या पिढीचे जीवनमान सुसह्य होण्यासाठी, राज्यातील जलक्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सुरेश सोडळ सतत प्रयत्नशील राहिले. नावीन्य आणि परिश्रम या दोन्ही काठांमधून वाहणारा - गुणवत्तेने अन् कौशल्याने समृद्ध असलेला - सुरेश सोडळ यांच्या आयुष्याचा प्रवाह म्हणजे त्यांची आत्मकथा : माझी जीवनधारा
All BooksMajhi Jeevandhara | माझी जीवनधारा
₹270.00Original price was: ₹270.00.₹203.00Current price is: ₹203.00. Save ₹67 Add to cart -
Sale! Add to cartनदी, प्राणी, शेते, शाळा आणि अगदी काँप्युटरसुद्धा... मामाच्या गावातल्या अशा अनेक गोष्टींविषयीच्या या कविता ! त्या तुम्हाला मामाच्या गावाची भन्नाट सफर घडवून आणतील. चला... मामाच्या गावाला
All BooksMamachya Gavala | मामाच्या गावाला
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartमाणिक वर्मा' असे नाव उच्चारले की, कानामनात रुणझुणू लागतात असंख्य भावगीते, भक्तिगीते अन् नाट्यगीते. शास्त्रीय संगीतातही आपले वेगळे वैशिष्ट्यपूर्ण स्थान त्यांनी निर्माण केले होते. संगीतक्षेत्रात त्यांनी जशी लखलखती कारकीर्द साकारली, तसाच स्वतंत्र ठसा वर्मा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या कार्यक्षेत्रात उमटवला. माणिकताईंचे पती अमर वर्मा हिंदी आणि उर्दूचे ख्यातकीर्त शायर. दोन कन्या - भारती आचरेकर अन् वंदना गुप्ते सुप्रसिद्ध अभिनेत्री, तर तिसरी कन्या राणी वर्मा नामवंत गायिका. चौथी कन्या अरुणा जयप्रकाश नामांकित फिजिओथेरपिस्ट. संपूर्ण वर्मा परिवार म्हणजे जणू विविध कलाक्षेत्रांमध्ये लाखो रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवणारी अनमोल रत्ने. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त या समग्र परिवाराच्या कलाकर्तृत्वाचा वेध घेणार् या स्मृतिचित्रांचा वेधक शब्दपट -
All BooksManik Moti – Mani Varma Ani Parivar | माणिक मोती
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart
Skip to content