-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreप्राप्तिकराविषयी पॅन असला, तर दरवर्षी रिटर्न भरावेच लागते का ? मित्राकडून घेतलेल्या गृहकर्जाच्या व्याजाची वजावट मिळते का ? वैयक्तिक वापरातील वस्तू विकताना होणारा नफा करमुक्त असतो का ? रिटर्न नेमके कुणाला भरावे लागतात ? रिटर्न भरलेच नाही, तर काय होते ? किरकोळ व्यापा-यालाही आपल्या हिशोबाचे ऑडिट करून घ्यावे लागते का ? व्यवसायातील तोटा पगाराच्या उत्पन्नातून वजा मिळतो का ? फ्लॅट विकताना बाजारभावापेक्षा कमी किमतीने विकला, तर काय होते ? २० हजारांवर रोखीत कर्ज घेतले, तर कर्जाच्या रकमेइतका दंड होतो का ? ज्येष्ठ नागरिकाला दरमहा २४ हजार रुपये उत्पन्न मिळूनही प्राप्तिकर कसा भरावा लागत नाही ? जमीन/घर विकून झालेला नफा गुंतवणूक करून वाचवता येतो का ? या आणि अशाच इतरही असंख्य किचकट प्रश्नांना सुबोध उत्तरे देणारे हे पुस्तक आहे. प्रामाणिक करदात्यांप्रमाणेच अनुभवी सल्लागारांनाही ते उपयुक्त ठरू शकेल.
कायदाविषयक - अर्थव्यवहारPraptikaravishayi | प्राप्तिकराविषयी
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Read more -
Sale! Add to cart'मन म्हणजे काय? कुठे असते ते ? कसे घडते ते ? काय असते मनात ? काय चालते मनात ? मनाचे आरोग्य म्हणजे नेमके काय ? कसे राखायचे हे आरोग्य ? कसे रोखायचे औदासीन्य वा स्किझोफ्रीनियासारखे मनोविकार ? काय असतात मनोविकारांवरचे उपचार ? मनाचा अन् व्यक्तीच्या स्वभावाचा काय संबंध ? कसा जडतो संबंध व्यक्तीच्या मनाचा अन् समाजमानसाचा ? समाजातल्या रूढी अन् अंधश्रद्धांचा आणि मनाचा एकमेकांवर काय परिणाम होतो ? अशा आपल्याही मनात उठणा-या अनेक प्रश्नांची एक मनोविकारतज्ज्ञ आणि एक हाडाचा सामाजिक कार्यकर्ता अशा दोघांनी मिळून केलेली उकल
समाजकारण / राजकारणPrashna Manache | प्रश्न मनाचे
₹190.00Original price was: ₹190.00.₹143.00Current price is: ₹143.00. Save ₹47 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमहाराष्ट्रातल्या सागरकिना-यापासून हिमालयीन हिलस्टेशनपर्यंत आणि दक्षिणेतल्या मंदिरांपासून पूर्वांचलातल्या अभयारण्यापर्यंत कुठेही जायचं असलं तरी जवळ बाळगलाच पाहिजे, असा विश्वासार्ह मित्र म्हणजे, प्रवास : तंत्र आणि मंत्र या लोकप्रिय पुस्तकाची सुधारून वाढवलेली ही नवी आवृत्ती... विविध राज्यांच्या पर्यटन-विभागांचे पत्ते, वेबसाइटस् आणि काही नमुनेदार सहलींच्या आराखडयांसह...
प्रवासPravas Tantra Aani Mantra | प्रवास तंत्र आणि मंत्र
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Read more -
Sale! Add to cartहा प्रवास आहे जगभराचा. अनेक स्थळं प्रसिध्द-अप्रसिध्द. पर्वत अन् सागर. अरण्यं अन् उद्यानं. नद्या, तळी, दरीखोरी. शहरं, गावं, खेडी. घरं, नाटयगृहं, अगदी स्नानगृहं अन् स्वच्छतागृहंसुध्दा ! आणि ही सारी ठिकाणं आपल्याला नुसती दिसत नाहीत, तर ती आपल्याला भेटतात, आपल्याशी बोलतात. कारण या ठिकाणांकडे जाताना आपल्यासवे आहे. एक संवेदनशील, रसिक मन, एक विवेकी जागरूक व्यक्तिमत्त्व. भेटलेल्या प्रत्येक स्थळाला एक अंगभूत व्यक्तिमत्त्व बहाल करणारी समृध्द ललितकृती -
प्रवासPravas | प्रवास
₹110.00Original price was: ₹110.00.₹83.00Current price is: ₹83.00. Save ₹27 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreशाळेमध्ये विज्ञान हा विषय अभ्यासाचा असतो. या पुस्तकात हाच विषय छंद म्हणून येतो. निरनिराळया प्रयोगातून वेधक पध्दतीनं विज्ञानाच्या अभ्यासासाठी हे पुस्तक मानसिक शिस्त निर्माण करतं. मुलांना विज्ञानशिक्षित करताना त्याच्या चांगल्या बाजूंचाच उपयोग करायला हे पुस्तक शिकवतं. विज्ञानाच्या चुकीच्या वापराबाबतीतही हे पुस्तक सजगता निर्माण करतं. आणि तरीही हे सहज रंजक, माहितीपूर्ण पुस्तक केवळ शालेय विद्यार्थ्यांसाठी नाही, तर पालकांमधल्या शिक्षकांसाठी आणि शिक्षकांमधल्या पालकांसाठीही आहे.
विज्ञानPrayogatun Vidnyan | प्रयोगातून विज्ञान
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Read more -
Sale! Add to cart'आपली नाटकं लोकांना आवडावी, या करताच केवळ आपण नाटकं लिहिली; तर आपल्याला खूपच खोटं सांगावं लागतं. सर्वसाधारणपणे म्हणायचं तर जिथं सुरक्षित वाटतं, अशी रंगभूमी लोकांना आवडते. म्हणजे गोष्टी सहज-सोप्या असाव्या आणि फार अस्वस्थ करणाऱ्या नसाव्या अशी रंगभूमी. दुसर् या शब्दात सांगायचं तर लोकांना नाटक पाहायला जाऊन त्यांचा वेळ वाया घालवायचा असतो. जे घडणार आहे ते त्याच्या पद्धतीनं घडू देण्याच्या मार्गात आपण काहीही आणू शकत नाही. बापरे! हे प्रेक्षकांच्या दृष्टीनं फार अवघड होणार आहे असं मी स्वत:ला सांगायला सुरुवात केली, तर मी माझ्या निसर्गदत्त शक्तीचा आणि कौशल्याचा नाश करीन. एडवर्ड अल्बी अपयशाचा धोका पत्करणं हा प्रायोगिकतेतला महत्त्वाचा भाग. हा धोका पत्करून आपली निसर्गदत्त शक्ती अन् कौशल्य जिवंत आणि सुस्थितीत राखणारी मुंबईची प्रायोगिक रंगभूमी. तिच्या तीन दशकांच्या इतिहासाचा दस्तऐवज - प्रायोगिक रंगभूमी : तीन अंक
नाटक / नाट्यविषयकPrayogik Rangabhumi: Tin Anka | प्रायोगिक रंगभूमी : तीन अंक
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart -
Sale! Add to cartउत्साह देणाऱ्या दिवसाला पाहून अंधाराला काय वाटतं ? वर्षानुवर्षं एकाच जागी साचून असलेल्या तळ्याचं आयुष्य कसं आहे ? जंगलं, झाडी कमी झाल्यामुळे घर हरवलेल्या प्राण्यांना काय वाटतं ? पशू-पक्षी संपावर गेले तर काय होईल ? या पुस्तकातल्या कविता वाचू या आणि अशा सगळ्या प्रश्नांची काय उत्तरं मिळतायत पाहू या-
All BooksPrem Karoo Ya Pruthvivar | प्रेम करू या पृथ्वीवर
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartप्रेषितांनी निर्माण केलेले हे (इस्लामचे) जागतिक आंदोलन त्यांच्या अनुयायांनी विजयी मोहिमांच्या लाटांवर स्वार होऊन, जगाच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत नेले. शतकानुशतके परस्परांत लढाया व रक्तपात करणा-या टोळ्यांची मायभूमी असलेला अरबस्थान अचानक चेतना निर्माण होऊन समान उद्देशाने पेटून उठला... जगाच्या कानांकोप-यात नेण्यासाठी त्यांनी इस्लामचा ध्वज हातात धरला... तीस वर्षांच्या आत - आदर्श खलिफांच्या काळात - त्यांनी प्रचंड साम्राज्य उभे केले, जे तेराशे वर्षे सातत्याने प्रयत्न करूनही रोमनांनी उभारलेल्या प्रचंड साम्राज्यापेक्षाही विशाल होते. - न्या. अमीर अली "हे ऐकून कोणीही अगदी चकित होऊन जाईल की, अरबस्थानच्या वाळवंटातून निघालेल्या व नव्या धर्मोत्साहाने पेटून उठलेल्या काही भटक्या टोळ्यांनी, विश्वास बसणार नाही इतक्या द्रुतगतीने, प्राचीन काळातील दोन महाबलाढ्य साम्राज्यांना जमीनदोस्त केले... केवळ तीस वर्षांच्या आत प्रेषित मुहंमद यांच्या अनुयायांनी इस्लामचा विजयी ध्वज एका टोकाला भारताच्या वेशीवर, तर दुस-या टोकाला अटलांटिकाच्या किना-यावर नेऊन उभा केला... (त्यांच्याकडून) दहा वर्षांच्या आत पराभूत होण्यासाठीच जणू सुमारे एक हजार वर्षे रोमनांच्या सैन्याला यशस्वी टक्कर देत पर्शियन साम्राज्य (तोवर) जिवंत राहिले होते. - मानवेंद्रनाथ रॉय इस्लामला मिळालेला हा विजय (जगातील) सर्व चमत्कारांतील महत्तम चमत्कार होय. प्रा. मसुदुल हसन / मानवेंद्रनाथ रॉय
समाजकारण / राजकारणPreshitannatrache Pahile Char Aadarsh Khalifa | प्रेषितांनंतरचे पहिले चार आदर्श खलिफा
₹850.00Original price was: ₹850.00.₹638.00Current price is: ₹638.00. Save ₹212 Add to cart -
Sale! Add to cart'डोरोथी नॉर्मन... लोकशाहीबद्दल आस्था बाळगणारी एक अमेरिकन तरुणी. इंदिरा गांधी... जवाहरलाल नेहरूंची लाडकी कन्या. ऑक्टोबर १९४९ मध्ये दोघींची अमेरिकेत पहिली भेट झाली आणि सुरू झाला दोघींमधला पत्रव्यवहार. त्या एकमेकींच्या व्यथावेदना पत्रांतून जाणून घेत, परस्परांना रोखठोक सल्लेही देत. फार मोठा भावनिक आधार वाटे एकमेकींना ! इंदिराजींच्या दु:खद निधनानंतर तो पत्रव्यवहार थांबला. डोरोथी नॉर्मन यांनी आपल्याजवळ जपून ठेवलेल्या निवडक पत्रांचा एक संग्रह १९८५ साली आपल्या जिवलग मैत्रिणीला श्रद्धांजली म्हणून प्रसिद्ध केला. त्या जुन्या, गाजलेल्या दुर्मीळ पत्रसंग्रहाचा हा अनुवाद... इंदिराजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या एका हळव्या पैलूवर टाकलेला प्रकाश! '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेPriy Dorothi | प्रिय डोरोथी
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartमुलांचं अडनिडं वय, हा पालकांचा परीक्षेचा काळ ! मुलांना स्वत:ची मतं फुटतात, आणि ती समजून घेताना, पालकांना घाम फुटतो. पालकांना वाटणारी आस्था, ही मुलांच्या दृष्टीनं लुडबूड ! पालकांनी केलेल्या सूचना, ही मुलांच्या नजरेत हुकुमशाही ! संवादासाठी सुरु केलेलं बोलणं, हमखास विसंवादाचं वळण घेतं. हा तिढा सोडवायचा कसा ? प्रक्रिया सोपी नाहीच, पण प्रयत्नसाध्य नक्की आहे. त्यासाठी सादर आहे, प्रिय पालक एका बालरोगतज्ज्ञ समुपदेशिकेचे अनुभवाचे बोल...
All BooksPriya Palak | प्रिय पालक
₹340.00Original price was: ₹340.00.₹255.00Current price is: ₹255.00. Save ₹85 Add to cart
Skip to content