-
Sale! Add to cart'नेल्सन मंडेला म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाचा शेवट. नेल्सन मंडेला म्हणजे प्रदीर्घ कारावासानंतरही सतेज राहिलेली दुर्दम्य ध्येयनिष्ठा. नेल्सन मंडेला म्हणजे सा-या मानवजातीसाठी, साऱ्या जगासाठी प्रकाशाची दिशा दाखवणारा महान दीपस्तंभ. इतिहासाच्या अर्धशतकाच्या पानावर आपली अमिट मुद्रा उमटवणा-या या महामानवाचे प्रेरणादायी चरित्र
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMandela | मंडेला
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartही आहे एका कर्तबगार पत्रकार स्त्रीची खरीखुरी जीवनकथा. सबिता गोस्वामी यांची आत्मकथा, दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचा पती, पदरात दोन छोटया मुली, दुरावलेलं माहेर अन् दुखावणारं सासर. अस्तित्वाच्या झगडयासाठी कुटुंबाला सावरण्यासाठी ही एकटी बाई कणखरपणे उभी राहिली, पत्रकारितेच्या क्षेत्रात उतरली. त्यावेळी सभोवतीचा आसाम पेटलेला होता. आंदोलनं, उल्फा अन् गणपरिषदेच्या चळवळी, दहशतवाद्यांच्या हिंसक कारवाया यांच्या ज्वाला भोवती धडधडत होत्या. हा सारा वणवा, त्याचं विवेचन, त्याचे संभाव्य परिणाम यासंबंधी बीबीसी, ब्लिट्झ, द वीक अशा नामवंत वृत्तसंस्थांसाठी सबिता गोस्वामींनी केलेलं लिखाण म्हणजे आसामची चार दशकांची बखरच. समस्यांनी भरलेलं व्यक्तिगत आयुष्य आणि राजकीय, सामाजिक उलथापालथींनी भरलेला आसाम यांच्या दुहेरी पेडांनी विणलेली आत्मकथा.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMangangechya Kathavar | मनगंगेच्या काठावर
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartमाणिक वर्मा' असे नाव उच्चारले की, कानामनात रुणझुणू लागतात असंख्य भावगीते, भक्तिगीते अन् नाट्यगीते. शास्त्रीय संगीतातही आपले वेगळे वैशिष्ट्यपूर्ण स्थान त्यांनी निर्माण केले होते. संगीतक्षेत्रात त्यांनी जशी लखलखती कारकीर्द साकारली, तसाच स्वतंत्र ठसा वर्मा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या कार्यक्षेत्रात उमटवला. माणिकताईंचे पती अमर वर्मा हिंदी आणि उर्दूचे ख्यातकीर्त शायर. दोन कन्या - भारती आचरेकर अन् वंदना गुप्ते सुप्रसिद्ध अभिनेत्री, तर तिसरी कन्या राणी वर्मा नामवंत गायिका. चौथी कन्या अरुणा जयप्रकाश नामांकित फिजिओथेरपिस्ट. संपूर्ण वर्मा परिवार म्हणजे जणू विविध कलाक्षेत्रांमध्ये लाखो रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवणारी अनमोल रत्ने. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त या समग्र परिवाराच्या कलाकर्तृत्वाचा वेध घेणार् या स्मृतिचित्रांचा वेधक शब्दपट -
All BooksManik Moti – Mani Varma Ani Parivar | माणिक मोती
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartहे लखलखतं माणिक...मराठीत प्रथमच सगळंच भव्य-दिव्य आणि चमत्कारिक ! साता-यातल्या ताम्हणखो-यातली शिलेदार मंडळी गायकवाडांबरोबर बडोद्याला आली. त्यांनी तलवार गाजवली. म्हणून समस्त ताम्हाणे माणिक ह्या किताबानं गौरविले गेले. त्यातला एक कुलदिपक : गजानन यशवंत माणिक. ह्या मल्लविद्याविशारदाला बडोदेकर संस्थानिकांनी सांभाळलं. माणिकनं संस्थानात ऐतिहासिक शस्त्रागार निर्माण केलं. गुरू जुम्मादादांच्या स्मरणार्थ जुम्मादादा व्यायाम मंदिर स्थापन करून ते भरभराटीला आणलं. हकीम अब्दुल रहीमकडून युनानी वैद्यक आत्मसात केलं. अस्थिसंधान विद्या संपादन करून अनेकांना व्याधिमुक्त केलं. म.गांधींना शरीरमर्दनाची दीक्षा दिली. प्रतापशस्त्रागार हा त्या क्षेत्रातला पहिला ग्रंथ रचला. अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळ कार्यरत केलं. कुस्तीगीर तयार केले. मलखांब- पथकं उभारली. गायकवाडीला ललामभूत झालेलं हे लखलखतं माणिक , म्हणजेच लो.टिळकांनी गौरविलेले प्रोफेसर माणिकराव. त्यांचा हा शैलीसंपन्न परिचय मराठीत प्रथमच...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेManikravanchi Charitrakatha | माणिकरावांची चरित्रकथा
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartगाढवू.. मांजरू.. कोंबडू.. वासरू.. बछडा.. मगरू.. पालू.. मोरू.. ही आणि अशी भन्नाट बाळं या पाच सुंदर पुस्तकात मस्त मोकाट सुटली आहेत आणि त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत. आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या पण आपल्याहून वेगळया असणा-या आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी आई आणि बाळ पाच धम्माल पुस्तकं
मुलांसाठीManjru Aani Itar Katha | मांजरु आणि इतर कथा
₹90.00Original price was: ₹90.00.₹68.00Current price is: ₹68.00. Save ₹22 Add to cart -
Sale! Add to cartमणिपूर... प्राचीन काळापासून सुवर्णभूमी म्हणून नावाजला गेलेला ईशान्य भारतातील रमणीय, निसर्गसुंदर प्रदेश. समृध्द संस्कृतीचा वारसदार असणारा हा प्रदेश स्वातंत्र्यानंतर काहीसा उपेक्षित, दुर्लक्षित राहिला. त्या प्रदेशातील असंख्य पर्यटनस्थळांची तपशीलवार माहिती देणारे, तिकडे जायला प्रवृत्त करणारे पुस्तक...
प्रवासManobhave Deshdarshan – Manipur | मनोभावे देशदर्शन – मणिपूर
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'मिझोरम. ईशान्य भारतातले एक महत्त्वाचे राज्य. एके काळी बंडखोरीने ग्रासलेले, पण आता शांततेच्या मार्गाने विकास साधू पाहणारे... त्या सीमावर्ती राज्यातील असंख्य पर्यटनस्थळांची त्यांच्या वैशिष्ट्यांसह तपशीलवार माहिती देणारे हे संकलन हौशी पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
प्रवासManobhave Deshdarshan – Mizoram | मनोभावे देशदर्शन – मिझोरम
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cart'नागालॅण्ड. ईशान्य भारतातील एक महत्वाचे राज्य. फुटीरतावादी हिंसक चळवळीमुळे सतत चर्चेत राहिलेले. आता मात्र शांततेची वाटचाल करू लागलेले... स्थानिक लोकांच्या वेगळया चेहरेपट्टीमुळे निर्माण होणारे गैरसमज दूर करून त्या राज्याची आणि तेथील पर्यटनस्थळांची सारी वैशिष्टये समजावून सांगणारे पुस्तक.
प्रवासManobhave Deshdarshan – Nagaland | मनोभावे देशदर्शन – नागालॅण्ड
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartअरुणाचल प्रदेश म्हणजे आपणा भारतीयांच्या दृष्टीने उगवत्या सूर्याचा प्रदेश. निसर्गसौंदर्याने नटलेल्या पण दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या या सीमावर्ती राज्याचा हौशी पर्यटकांना करून दिलेला मार्गदर्शक परिचय
प्रवासManobhave Deshdarshan : Arunachal | मनोभावे देशदर्शन : अरुणाचल
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartअसम. ईशान्य भारतातला महत्त्वाचा प्रांत. वैभवशाली इतिहास व परंपरा लाभलेला; निसर्गसौंदर्याने नटलेला आणि तरीही बराचसा उपेक्षित. अलीकडे तर दहशतवादामुळेही चर्चेत असलेला. त्या प्रांतातील असंख्य पर्यटनस्थळांची व्यावहारिक माहिती देणारे उपयुक्त संकलन.
प्रवासManobhave Deshdarshan : Asam | मनोभावे देशदर्शन : असम
₹130.00Original price was: ₹130.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹32 Add to cart
Skip to content