-
Sale! Add to cartयेशू ख्रिस्त म्हणजे सा-या जगाला दयेचा, शांतीचा संदेश देणारी करूणामूर्ती. पण त्या प्रेषिताची जन्मभूमी आणि कर्मभूमी असणारा पॅलेस्टाइनचा प्रदेश सध्या ज्यू विरूद्ध अरब अशा संघर्षाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. त्या रक्तबंबाळ ख्रिस्तभूमीची व्यथा समजून घेण्याच्या इराद्याने वारंवार त्या प्रदेशाची यात्रा करून आलेल्या एका मानवतावादी ख्रिस्ती भाविकाची साक्षेपी निरीक्षणे नोंदवणारे हे पुस्तक. विसावे शतक व्यापणा-या ज्यू-अरब संघर्षाचा ऐतिहासिक वेध घेता घेता तीन धर्मांच्या श्रद्धांशी निगडीत असणा-या त्या प्रदेशाची आगळी सफरही घडवून आणणारे हे शैलीदार पुस्तक धुमसत्या पश्चिम आशियाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी बहाल करते.
समाजकारण / राजकारणSangharshayatra Khristabhumichi | संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची
₹290.00Original price was: ₹290.00.₹218.00Current price is: ₹218.00. Save ₹72 Add to cart -
Sale! Add to cart' आपल्या समाजबांधवांच्या उत्कर्षाला साहाय्यभूत व्हा. हा होता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश. बाबासाहेबांच्या विचारांच्या मुशीत घडलेल्या एका तरुणाने हा संदेश आपले जीवनध्येय बनवला. त्याला जाणवले - गरिबांना, शोषितांना अन् वंचितांना न्याय देण्यासाठी गरज असते कायद्याच्या कर्तव्यकठोर कारवाईची. अशा कारवाईची जागरूकपणे अंमलबजावणी करण्यासाठी उन्मत्त धनदांडगे, मुजोर राजकारणी, जातीयवादी अधिकारी यांच्या अत्याचारांच्या विरोधात तो ठामपणे उभा ठाकला ! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या घटनेच्या चौकटीचाच भक्कम आधार घेत न्याय्य तत्त्वासाठी लढा देणाऱ्या आणि आपल्या हाती सोपवलेल्या प्रत्येक विभागावर कुशल व्यवस्थापनाचा ठसा उमटवणाऱ्या निग्रही अन् कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या कारकिर्दीचा पट मांडणारे संघर्षयात्री '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSangharshayatri | संघर्षयात्री : उत्तम खोब्रागडे
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartरा. स्व. संघाच्या शाखांतून तयार झालेल्या स्वयंसेवकांनी आवडीची कार्यक्षेत्रे निवडली. त्यात संघाच्या संस्कारबळावर विविध संस्थात्मक, संघटनात्मक कार्ये उभी केली. शिक्षण, संस्कार, कामगार, विद्यार्थी, उद्योग, आरोग्य, राजनीती अशा क्षेत्रांत आणि विविध सेवाकार्यांत संघस्वयंसेवकांनी कार्य केले आणि हाच शक्तिसाठा संघपरिवार म्हणून ख्यातनाम झाला. मंत्र छोटा, तंत्र सोपे । परि यशस्वी ठरले ते ।। रीत साधी, शिस्त बांधी । कार्य व्यापक उभवी ते ।। या संघगीताचा साक्षात्कार आज सार् या विश्वाला होत आहे. तरीही संघ समग्रपणे समजला, असे म्हणता येईल का ? कारण रोज माझ्या अवतीभवती वावरणारा, माझ्यासारखाच हा सामान्य माणूस, आश्चर्याने तोंडात बोट घालावे असे उत्तम कार्य कसा करू शकला बुवा, हे मनात येतेच. या आश्चर्यावर मात करून संघातील मानवी व्यवस्थापन बारकाईने न्याहाळले तर सामान्य माणसातल्या असामान्य क्षमता फुलवून मोठाली कामे करणारी संघटना म्हणजे रा. स्व. संघ हा बोध आपल्याला होतो.
All BooksSanghatil Manavi Vyavasthapan Eka Swayamsevakachya Najaretun | संघातील मानवी व्यवस्थापन
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartएक सशस्त्र क्रांतिकारक वधस्तंभावर चढून आपल्या जिवाचे बलिदान करतो, तेव्हाच शंभर नि:शस्त्र प्रतिकारकांचा जन्म होऊ शकतो ! क्रांतिकारकांच्या प्राणत्यागाचे मर्म हे होते ! स्वातंत्र्य-देवतेला स्वत:च्या रक्ताचा नैवेद्य त्यांनी दाखवला. ते अग्निसंप्रदायाचे उपासक होते. 'तुमच्याविरुध्द या देशात हजारो बंडे उभी राहतील' असे उमाजी नाईक यांनी १८२७ सालीच कंपनी सरकारला बजावले होते. त्यांचे बोल खरे ठरले ! मंगल पांडे, वासुदेव बळवंत, स्वातंत्र्यवीर सावरकर, गदर पार्टी, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग अशी ही क्रांतिकारकांची परंपरा फार, दीर्घ, प्रखर आणि तेजस्वी आहे. 'इन्कलाब जिंदाबाद ! हे त्यांचे प्राणतत्त्व होते. हा होता मातृभूमीच्या मुक्ततेसाठी चाललेला संग्राम. वि. स. वाळिंबे यांच्या सत्तावन्न ते सत्तेचाळीस या ग्रंथातली सशस्त्र क्रांतीची गाथा एकत्र करून सिध्द झालेले हे पुस्तक. (संग्राम)
मुलांसाठीSangram | संग्राम
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Sale! Add to cart...मग ते आई-बाप म्हणतात मुलीला सिनेमा लाईनची हौस आहे, तिला सिनेमात टाकायचंय. त्या मुलीकडे बघून मला कळवळून येतं. मी सांगते शहाणे असाल, मुलीचं हित करायचं असेल तर तिला या लाईनकडे चुकूनही फिरकूसुद्धा देऊ नका. माझा अनुभव आहे त्या मागे. '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSangte Aika | सांगत्ये ऐका
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cart'आजमितीस भारत हा तरुणांचा देश म्हणून मिरवतो आहे, पण आणखी तीस-पस्तीस वर्षांनी तो वृद्धांचा देश होऊ लागेल. त्या वेळी त्या वृद्धांचे संगोपन करायला देशाने काही व्यवस्था आधीपासूनच विकसित करायला हव्यात, की नकोत? या व्यवस्था विकसित करायच्या, तर त्यासाठी लागणारा पैसा आजच्या तरुणांकडून कररूपात घ्यायला हवा. पण आजचे खूपसे तरुण बेरोजगार असतील, तर ते स्वत:च्या आणि इतरांच्याही वृद्धसंगोपनाची तरतूद कशी करणार? प्रश्न जटिल आहे. शिवाय तो फक्त भावनिक, कौटुंबिक नाही, तर राष्ट्रीय आणि आर्थिकही आहे. या जटिल प्रश्नावर एक उतारा म्हणजे आजचे वृद्धच आजच्या तरुणांसाठी रोजगार निर्मितीचे निमित्त होऊ शकतात. त्यासाठी गरज आहे वृद्धसंगोपनाकडे केवळ भावनिक आणि मानवतावादी दृष्टिकोनातून नाही, तर आर्थिक दृष्टिकोनातूनही बघण्याची. कसे, ते समजावून सांगणारे आगळेवेगळे पुस्तक.'
मार्गदर्शनपरSanjavat | सांजवात
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartमाणसांचं सारं जीवन संख्यांशी निगडीत असतं. रात्रंदिवस आपणा सर्वांना संख्यांशीच खेळावं लागतं. पण बहुतेकांना त्यांच्याशी जवळीक साधू नये, असं वाटतं. संख्यांनाही व्यक्तित्व असतं, हे अनेकांना माहीतही नसतं. आपल्या हाताशी असतात फक्त दहा अंक. त्यांच्यापासून निर्माण होणा-या संख्या असतात अनंत. त्यांचेच गुणधर्म असतात आश्र्चर्यकारक आणि असंख्य. बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार. या चारच क्रिया संख्यांना देतात अद्भुत आकार. संख्यांचे गहिरे रंग, हा आहे, संख्यांच्या गूढत्वाचा एक शोध. संख्यांच्या गहन सागरातील आश्र्चर्यांचा वेध. संख्यांच्या सागरात जो कुणी खोल खोल बुड्या मारील, त्याला संख्याच आपलंसं करतील, आणि आपल्या खजिन्यातील अमूल्य रत्नं दाखवतील.
विज्ञानSankhyanche Gahire Rang | संख्यांचे गहिरे रंग
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartव्यक्ती तितक्या प्रकृती आणि देश तितक्या संस्कृती. देशोदेशींच्या संस्कृतींचे रंग किती आगळेवेगळे ! आजच्या जागतिकिकरणाच्या जमान्यात देशादेशांमधील चलनवलन वाढतंय. आज इथे तर उद्या तिथे, या वेगानं जगाला कवेत घेऊ पाहणा-या ग्लोबल नोमॅड्स ची- जागतिक भटक्याविमुक्तांची- संख्या दिवसेंदिवस वाढतेय. वेगवेगळ्या देशांशी संपर्क ठेवताना साहजिकच तिथल्या स्थानिक संस्कृतीशी संबंध येतोय. हा संबंध परस्परांना टोचणारा-बोचणारा ठरू नये, उभयपक्षी लाभदायक अन् सुखकारक ठरावा म्हणून आंतरसांस्कृतिक साक्षरतेची गरज जाणवतेय. अशी साक्षरता मिळवायची म्हणजे अनोळखी परक्याला समजून घ्यायला शिकायचं, एक दोन वैयक्तिक अनुभवांवरून सार्वत्रिक निष्कर्ष काढण्याची घाई न करता थोडा समजूतदारपणा दाखवायचा, परक्या संस्कृतीचा तसा स्वभावरंग का तयार झाला, हे जाणून घ्यायचं .... अ शी आंतरसांस्कतिक साक्षरता पसरवण्याचं काम करणारी विद्याशाखा म्हणजे इंटरकल्चरल कम्युनिकेशन . या विद्याशाखेत मनापासून रमलेल्या वैशाली करमरकर यांनी या वेगळ्या क्षेत्राची करून दिलेला ही ओळख... एका नव्या जगाची कवाडं खोलणारी... विश्वबंधुत्वाचं मूल्य मनामनात जागवणारी...
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Sanskrutirang | संस्कृतीरंग
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartअथ संवादकौशल्यम् संवादाने मते मांडावीत संवादातून मने सांधावीत संवादाने आश्वस्त करावे संवादातून विकल्प मिटवावे संवाद सकारात्मक, हेच यशाचे गमक संवादकौशल्य, उत्तम व्यक्तिमत्त्वाचे सूचक हेच सारे सविस्तर मांडणारे पुस्तक. भाषण, संभाषण, वाद, संवाद, नॅरेशन, प्रेझेंटेशन अशा सर्व ठिकाणी खात्रीने उपयोगी पडणारे. संवाद मार्गदर्शकच जणू !
All BooksSanvaadatun Vyaktimattvakade | संवादातून व्यक्तिमत्वाकडे
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartअथ संवादकौशल्यम् संवादाने मते मांडावीत संवादातून मने सांधावीत संवादाने आश्वस्त करावे संवादातून विकल्प मिटवावे संवाद सकारात्मक, हेच यशाचे गमक संवादकौशल्य, उत्तम व्यक्तिमत्त्वाचे सूचक हेच सारे सविस्तर मांडणारे पुस्तक. भाषण, संभाषण, वाद, संवाद, नॅरेशन, प्रेझेंटेशन अशा सर्व ठिकाणी खात्रीने उपयोगी पडणारे. संवाद मार्गदर्शकच जणू !
All BooksSanvaadatun Vyaktimattvakade | संवादातून व्यक्तिमत्वाकडे
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart
Skip to content