-
Sale! Add to cart'कोर्टाची पायरी चढणं नको, असंच बहुसंख्य महिलांना वाटत असतं. पण आता काळ बदललाय. जिथं कधीकाळी सतीबंदीचा कायदाही बिचकत करावा लागला होता, तिथंच आज लिव्ह-इन रिलेशनशिप ला कायद्याची मान्यता द्या, असा दबाव येतोय. जिथं स्वत: जन्माला घातलेल्या मुलावरसुद्धा बाईचा कायदेशीर अधिकार नव्हता, तिथंच आज सरोगसी द्वारे मूल मिळवण्याचा अधिकार हवासा वाटतो आहे. स्त्रीचा, तिच्या आणि समाजाच्याही मानसिकतेचा हा लांबलचक प्रवास समजून घेण्यासाठी आणि कायद्याबद्दलची किमान साक्षरता मिळवण्यासाठी सर्व महिलांनी हे पुस्तक वाचायलाच हवं.
समाजकारण / राजकारणSati Te Sarogasi | सती ते सरोगसी
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
इतिहास
Sattavanna Te Sattechalis (Lokavrutti) | सत्तावन्न ते सत्तेचाळीस (लोकआवृत्ती)
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Read more -
Sale! Add to cart'यशवंतराव चव्हाण अन् नरसिंह राव अशा दिग्गज राजकीय नेत्यांचे निजी सचिव म्हणून चार तपांची शासकीय सेवेतील कारकीर्द व्यतीत केलेले राम खांडेकर. सत्तास्थानाच्या अगदी निकट राहताना खांडेकरांनी कितीतरी उलथापालथी जवळून पाहिल्या. राजकारणातले ताणेबाणे विणताना, उसवताना पाहिले. मात्र दिल्लीच्या सत्ताधुमाळीतही आपली ऋजुता खांडेकरांनी हरवू दिली नाही, ना आपला नि:स्वार्थीपणा हरपू दिला. यशवंतरावांचा, नरसिंह रावांचा विश्वास खांडेकरांनी जिंकला तो आपल्या सचोटीच्या बळावर. निजी सचिव असूनही ते होयबा झाले नाहीत, प्रसंगी ठाम नकारही देऊ शकले ते प्रामाणिकतेच्या जोरावर. ऐतिहासिक घटनांनी भरलेला अन् भारलेला अर्धशतकाचा काळ जवळून निरखलेल्या सरळ अन् सात्त्विक राम खांडेकर यांनी रसाळ शैलीत रेखाटलेले त्या काळाचे शब्दचित्र. सत्तेच्या पडछायेत '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSattechya Padachhayet | सत्तेच्या पडछायेत
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartसाल १९९१. २१ मे ची रात्र. घडयाळात १० वाजून २० मिनिटं झालेली. ती तरूणी आदरानं झुकली. तिचा हात त्यांच्या पावलांच्या दिशेनं गेला... आणि अचानक कानठळया बसवणारा स्फोट झाला. धुराचे ढग विरले आणि समोर आला छिन्नविछिन्न मृतदेहांचा रक्तामांसाचा चिखल... ही आहे मन गोठवणारी कहाणी. थरारक पण उदास करणारी. राजीव गांधींना कोणी व का मारलं ? हे गूढ उकलण्यासाठी मग भारत सरकारनं पाचारण केलं, ते डी.आर. कार्तिकेयन यांना. त्यांच्या अथक परिश्रमाची आणि तपासाची ही कथा...
इतिहासSatyameva Jayate: Shodh Rajeev Hatyecha | सत्यमेव जयते : शोध राजीव हत्येचा
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart'कितीही वाटले, तरी आपले शेजारी बदलता येत नाहीत. पाकिस्तान आणि चीन... हे आपले दोन सख्खे शेजारी देश. अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला पाण्यात पाहणारे, आपल्याशी लढून हरवायची खुमखुमी बाळगणारे आणि भल्याबुऱ्या मार्गांनी सतत आपल्या कुरापती काढणारेदेखील ! जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर वेगाने झेपावणारा चीन आणि भारतद्वेषापायी कोणत्याही थराला जाऊ शकणारा पाकिस्तान हे दोन देश संगनमताने आपल्याला आव्हान देऊ पाहात आहेत. त्या दोघांच्या व्यूहरचनेचा दीर्घकालीन आढावा घेणारे हे पुस्तक प्रत्येक देशप्रेमी नागरिकाला सावधानतेचा अगदी समयोचित इशाराही देत आहे...
इतिहासSavadh Aika… | सावध ऐका…
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartकधी उगवेल असा सूर्य माझा माझ्यासाठी सारा सरेल अंधार होई प्रकाशाची दिठी नदी वाहील वाहील कधी माझ्या प्रवाहाने पाणी असेलच माझे आणि माझेच वाहणे असे असेल असेल सारे फक्त माझे माझे माती असेलच माझी आणि माझेच रुजणे भय अवघे संपेल आणि होईल जगणे एक आनंदाचे झाड एक सावलीचे गाणे
All BooksSavaliche Gane | सावलीचे गाणे
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartस्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे गैरसमज आणि विपर्यास असा दुहेरी शाप मिळालेले महापुरुष. अनुयायांनी त्यांना नीट जाणून घेतले नाही आणि विरोधकांनीही त्यांच्याबद्दलचे पूर्वग्रह कधी दूर सारले नाहीत. त्यांच्याबद्दलच्या मतमतांतराच्या गदारोळात त्यांचे खरे विचार समजून घेऊन त्यांचे मूल्यमापन करणे भल्याभल्या विचारवंतांनाही जमले नाही. या पार्श्वभूमीवर सावरकरी विचारांबद्दलच्या अनेक मूलभूत प्रश्नांची वस्तुनिष्ठ उत्तरे देणारा, खरे बुद्धिवादी सावरकर समजावून देणारा आणि गैरसमज व विपर्यास या दुहेरी शापातून त्या महापुरुषाची सुटका करणारा हा ग्रंथ... सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे आहे तरी काय ? त्यांनी हिंदुराष्ट्राचा वा तथाकथित द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार केला होता म्हणजे नक्की कशाचा पुरस्कार केला होता ? त्यांना अभिप्रेत असणा-या राज्यघटनेचा पाया कोणता होता धर्मग्रंथ की अद्ययावत बुद्धिप्रामाण्य ? त्या घटनेनुसार अहिंदूंना कोणकोणते हक्क मिळणार होते ? या व अशाच इतर असंख्य प्रश्नांची साधार, मूलगामी उत्तरे देणारा हा विचारप्रवर्तक ग्रंथ भारतीय राजकारणाचे धागेदोरे समजून घेऊ इच्छिणा-या सर्वांनी आवर्जून वाचलाच पाहिजे.
समाजकारण / राजकारणSavarkarancha Buddhivad Ani Hindutvavad | सावरकरांचा बुध्दिवाद आणि हिंदुत्ववाद
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreलाकडी नक्षीकामानं सजलेल्या, पण आता जीर्ण झालेल्या ऐसपैस दरवाजात, त्या वाड्याच्या उंब-यात पाऊल घोटाळतंय. इथल्या घरधनिणीनं सालंकृत पावलांनी इथेच माप ओलांडलं असेल का ? अंगणानं ओंजळीत रांगोळीची नक्षी घेऊन वाट पाहिली असेल का त्या मंगल क्षणाची...? आता तो सगळा दिमाख ओसरलाय... कोनाड्यातलं देवघर... आत डोकावलं तर मिणमिणत्या उजेडात आश्वस्त करणारी पितळी मूर्त कुणाची ? अंधा-या जिन्यातून जाताना वाटलं, कितीतरी पैंजण आपल्या स्वारींची वाट पाहत अगतिक थांबले असतील का ? मोठ्ठा चौक. त्यात एक तोंडापर्यंत पुरलेला रांजण. त्यातल्या अंधाराच्या पोटात हरवलेत का या वाड्यातले चैतन्यस्वर ? का ? काय घडलं असं ? मनाला साखळदंडासारखे लोंबकळत असलेले अनुत्तरित प्रश्न. त्यांचं ओझं घेऊन मला निघावं लागतंय. कधी होईल का या रहस्यांचा उलगडा ? माझ्या प्रश्नांची कालकुपीत दडलेली उत्तरं, इतिहासपुरुषा, तुला माहीत असतील का रे ?
All BooksSavashna | सवाष्ण
₹380.00Original price was: ₹380.00.₹285.00Current price is: ₹285.00. Save ₹95 Read more -
Sale! Add to cartलग्न म्हणजे काय? संस्कार की करार ? की आंधळा जुगार ? आणि लग्न कशासाठी ? स्त्री-पुरुषांच्या शरीरसंबंधांना समाजमान्यता देण्यासाठी ? की एकमेकांना समजून घेण्यासाठी ? विश्वास देण्यासाठी ? प्रेम, भावनिक गुंतणूक आणि शारीरिक ओढ, वासना यांच्यात काही सीमारेषा असतात की हे सगळंच एकमेकात मिसळलेलं असतं ? स्त्री-पुरुषांमधलं आकर्षण कोणत्या कोणत्या छटा दाखवतं ? नवराबायको, मित्रमैत्रीण या सा-यांच्या पार्श्वभूमीला नर-मादी हेच नातं वेगवेगळ्या वेशात वावरत असतं का ? विलक्षण वेगानं बदलणा-या काळाचा वेध घेत कुटुंबव्यवस्था, लग्नसंस्था, स्त्री-पुरुष संबंध अशा अनेक गोष्टींचा शोध घेणारं हसवता हसवता आपल्यासमोरही आरसा धरणारं नाटक
नाटक / नाट्यविषयकSavdhan! Shubhamangal | सावधान! शुभमंगल
₹70.00Original price was: ₹70.00.₹53.00Current price is: ₹53.00. Save ₹17 Add to cart -
Sale! Add to cartसंघाची हिंदुत्व-संकल्पना व सावरकर-आंबेडकर यांचा समाजविचार ह्यांची जोड जमली आणि संघाच्या हिंदु संस्कृती चा आशय पूर्णपणे धर्ममुक्त झाला; तर आपल्याकडच्या राष्ट्रवादाची वैचारिक कोंडी फुटेल, अशी शक्यता आहे. ह्या प्रक्रियेला हातभार लावणे हा ह्या पुस्तकाचा विनम्र उद्देश आहे.
समाजकारण / राजकारणSawarkar Te Bha.Ja.Pa : Hindutvavicharacha Chikitsak Aalekh | सावरकर ते भा.ज.प. : हिंदुत्वविचाराचा चिकित्सक आलेख
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart
Skip to content