WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Sanskrutirang | संस्कृतीरंग

लेखक: Vaishali Karmarkar | वैशाली करमरकर

Original price was: ₹450.00.Current price is: ₹338.00. Save ₹112

Availability: 25 in stock

व्यक्ती तितक्या प्रकृती आणि देश तितक्या संस्कृती. देशोदेशींच्या संस्कृतींचे रंग किती आगळेवेगळे ! आजच्या जागतिकिकरणाच्या जमान्यात देशादेशांमधील चलनवलन वाढतंय. आज इथे तर उद्या तिथे, या वेगानं जगाला कवेत घेऊ पाहणा-या ग्लोबल नोमॅड्स ची- जागतिक भटक्याविमुक्तांची- संख्या दिवसेंदिवस वाढतेय. वेगवेगळ्या देशांशी संपर्क ठेवताना साहजिकच तिथल्या स्थानिक संस्कृतीशी संबंध येतोय. हा संबंध

परस्परांना टोचणारा-बोचणारा ठरू नये, उभयपक्षी लाभदायक अन् सुखकारक ठरावा म्हणून आंतरसांस्कृतिक साक्षरतेची गरज जाणवतेय. अशी साक्षरता मिळवायची म्हणजे अनोळखी परक्याला समजून घ्यायला शिकायचं, एक दोन वैयक्तिक अनुभवांवरून सार्वत्रिक निष्कर्ष काढण्याची घाई न करता थोडा समजूतदारपणा दाखवायचा, परक्या संस्कृतीचा तसा स्वभावरंग का तयार झाला, हे जाणून घ्यायचं .... अ शी आंतरसांस्कतिक साक्षरता पसरवण्याचं काम करणारी विद्याशाखा म्हणजे इंटरकल्चरल कम्युनिकेशन . या विद्याशाखेत मनापासून रमलेल्या वैशाली करमरकर यांनी या वेगळ्या क्षेत्राची करून दिलेला ही ओळख... एका नव्या जगाची कवाडं खोलणारी... विश्वबंधुत्वाचं मूल्य मनामनात जागवणारी...

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : जुलै 2011
बुक कोड : G-04-2011
वजन : 385 g
पाने : 324
आर्टिस्ट : रवि मुकुल
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : एप्रिल 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top