-
Sale! Add to cartभारतीय राजकारणात एखाद्या धूमकेतूसारखं उगवलेलं व्यक्तिमत्त्व. केजरीवालांची वैचारिक आणि पक्षीय वाटचालही नागमोडी. त्यांचं मूल्यमापन करताना भलेभले बुचकळ्यात पडतात. तरुणांची प्रतिक्रिया : या माणसाची टोटल लागत नाही! केजरीवालांच्या आप नं दिल्ली जिंकली, पंजाब सर केला. आताही त्यांनी गुजरात, हिमाचल प्रदेश अन् दिल्ली महापालिका या ठिकाणच्या निवडणुका लढवल्या. गुजरातमध्ये हरले, पण आप ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. हिमालयामध्ये पूर्ण निष्प्रभ, तर दिल्ली महापालिकेत सत्ता हस्तगत. केजरीवालांचा राजकीय आलेख कधी चढतो, कधी घसरतो. ते जिंकतात, हरतात,जिंकतात... अशा कार्यक्षम पण वादग्रस्त, महत्त्वाकांक्षी पण अनाकलनीय राजकीय नेत्याच्या वळणावळणाच्या प्रवासाचा साक्षेपी वेध.
All BooksArvind Kejriwal | अरविंद केजरीवाल
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more476 साली भारतात आर्यभट नावाचा महाबुध्दिमान खगोलशास्त्रज्ञ जन्माला आला. 'आर्यभटीय' हा त्याचा ग्रंथ प्राचीन भारतीय खगोलशास्त्राचा अमूल्य ठेवा आहे. भारताच्या परमोत्कर्षाच्या काळात लिहिलेला हा ग्रंथ आहे. अत्यंत अचूक खगोलीय स्थिरांक हे या ग्रंथाचे खास वैशिष्टय आहे. केवळ 121 श्लोकांत आर्यभटाने खगोलशास्त्राची प्रचंड माहिती एकत्रित केली आहे. फक्त 4 ओळींत आर्यभटाने दिलेले कोनांच्या साईन्सचे कोष्टक अवर्णनीय आहे. 'सत्य आणि असत्य ज्ञानसागरातून जे जे सत्य, तेच मी स्वत:च्या बुध्दीने शोधले,' असे खुद्द आर्यभट म्हणतो. अनेक पाश्चात्त्य संशोधकांनी आर्यभटाबद्दल आदर व्यक्त केला आहे. प्राचीन भारतीय विज्ञानाबद्दल आस्था असणाऱ्या वाचकाने हा ग्रंथ अवश्य वाचायला हवा.
विज्ञानAryabhatiya | आर्यभटीय
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Read more -
Sale! Add to cartलोकमान्य टिळकांच्या कानी त्याचा स्वर पडला आणि 'नारायण राजहंस'चा 'बालगंधर्व' झाला. त्याच्या गात्या गळयानं महाराष्ट्रातल्या दोन-तीन पिढयांना रिझवलं, खुलवलं, फुलवलं. संगीत नाटक हा त्याच्या जीवनाचा ध्यास झाला, आणि त्याचं जीवन म्हणजे शोकांत संगीत नाटक झालं. हे सारं कसं घडत गेलं, ते सांगणारी चरित्र कादंबरी
कादंबरीAsa Balgandharva | असा बालगंधर्व
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartएका मराठी तरुणानं जी गगनभरारी घेतली आहे, तो आदर्श सर्व मराठी तरुणांनी लक्षात ठेवायला हवा. शोधक वृत्ती, समाज व देशाबद्दलची कटिबध्दता, सतत नवनवीन उपक्रम करण्याचा उत्साह, सकारात्मकता, सृजनशीलता हा त्यांचा स्वभाव आहे. नोकरी मागणारा नव्हे तर अनेकांना नोकरी देणारा तरुण उद्योजक म्हणून हणमंतराव अनेकांचा आदर्श, अनेकांचे आयकॉन' बनले आहेत. त्यांच्यावरील अंजली ठाकूर यांचं हे पुस्तक सर्व मराठी तरुणांना प्रेरणा देईल, याचा मला विश्वास वाटतो. नितीन गडकरी केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग खाते हणमंतरावांचे मुख्य ध्येय आहे की, जितके शक्य आहे, तितके समाजाचे हित करण्याचा प्रयत्न करायचा. ते नेहमी म्हणतात की, त्यांना दहा कोटी लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचा आहे; आणि ते ज्या पद्धतीने काम करीत आहेत, त्यातून लवकरच आपले ध्येय गाठतील. नुसते उपदेश देऊन नव्हे तर त्यांनी त्यांच्या स्वत:च्या वागणुकीतून अनेकांना काम करण्याची प्रेरणा दिली आहे. अनेक तरुणांना त्यांचे ध्येय गाठण्यास मदत केली आहे. शरद बोबडे पूर्व सरन्यायाधीश
All BooksAsahi Ek Kimayagar | असा ही एक किमयागार
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart -
Sale! Add to cartप्रियाने कवितेपासून कादंबरी-लेखनापर्यंत सर्व प्रकार हाताळले. यात वृत्तपत्रातले हुकमे हुकुम सदर लेखनही होते. अनुभव घेण्याच्या व त्यांवर संवेदनशील चिंतन करण्याच्या तिच्या सवयीमुळे सदर-लेखनातही तिला रस लागला होता आणि तिच्या इतर व्यापातही ती असे लेखन अंगावर घेऊन ते नियमीतपणे करीत असे. तिच्या निवडक सदर-लेखनाचा हा संग्रह. आणखी बरेच सदर-लेखन तिने केले ते सुंग्रहित नाही. या संग्रहातील काही लेखनात कथेच्या शक्यता जाणवतील. कथा माध्यमाची तिची आवड आणि या माध्यमावरील तिची पकड लक्षात घेता हे साहजिक होते. परंतू हे लेखन केवळ ललित नाही. त्यात सामाजिकतचे गंभीर भान आहे. यामुळे ते नेहमीच्या ललित सदर-लेखनापुढे अजूम एक पाऊल गेले आहे.
कथासंग्रहAsahi | असंही
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
स्थापत्य आणि नगररचना
Asavi Shahare Apuli Chan | असावी शहरे आपुली छान
₹1,500.00Original price was: ₹1,500.00.₹1,125.00Current price is: ₹1,125.00. Save ₹375 Add to cart -
भाषाविचार
Ashi Hi Engraji Part 3 | अशी ही इंग्रजी (भाग ३रा)
₹130.00Original price was: ₹130.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹32 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreज्यांची मातृभाषा इंग्रजी नाही त्यांना इंग्रजीत बोलणे अवघड का वाटते? कारण त्यांना मराठीतून विचार करण्याची सवय तात्पुरती बाजूला ठेवून त्यावेळी इंग्रजी भाषेच्या माध्यमातून विचार करावा लागतो. असे दुस-या भाषेशी जुळवून घएणे सर्वांना जमतेच असे नाही. कोणत्याही प्रसंगाबद्दलचा विचार `उत्तम इंग्रजी’ भाषेत मनात आला; तर त्याचे प्रकटीकरणही सुंदरच होणार. चांगले इंग्रजी येण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? पहिली गोष्ट म्हणजे त्या भाषेची आवड हवी. ती समजण्याची विशेष पात्रता – a flair for the language असेल तर काय दुधात साखरच! दुसरी गोष्ट म्हणजे इंग्रजी व्याकरणातील प्रमुख नियमांचे, इंग्रजी भाषेच्या अंगाचे, त्या भाषेतील बारकाव्यांचे ज्ञान असायलाच हवे. तिसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी शब्दसंग्रह समृद्ध असायला हवा. तो नसेल तर वाढवायला या क्षणापासून सुरुवात करा. एका अमेरिकन शिक्षणतज्ज्ञाने म्हटलेच आहे – `Thought is impossoble without words.’’ तुमचा इंग्रजी शब्दसंग्रह वाढवण्यास मदत करणे हेच या पुस्तकाचे प्रयोजन.
भाषाविचारAshi Hi Engraji Part 4 | अशी ही इंग्रजी (भाग ४था)
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreइंग्रजी चांगल्या पध्दतीने लिहायला-बोलायला येण्यासाठी मोठा शब्दसंग्रह अवगत हवा आणि अपेक्षित भाव समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचावा म्हणून कोणता शब्द कोठे व कसा वापरावा, हेही समजायला हवे. नेमके असेच मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे. ‘साप्ताहिक सकाळ’ या नियतकालिकतून सतत गेली कित्येक वर्षे प्रकाशित होत असलेल्या अत्यंत लोकप्रिय सदरातील लेखांचे हे वाचकांच्या आग्रहास्तव प्रसिध्द होणारे संकलन आहे. यापूर्वी प्रकाशित झालेल्या चार भागांप्रमाणेच हा पाचवा भागही तरूण विद्यार्थ्याप्रमाणे जिज्ञासू वाचकांनासुध्दा अत्यंत उपयुक्त वाटेल, यात शंका नाही. हे पुस्तक घ्या, वाचा आणि शब्दांची ‘इंग्रजी श्रीमंती’ साध्य करा...
भाषाविचारAshi Hi Engraji Part 5 | अशी ही इंग्रजी (भाग ५वा)
₹130.00Original price was: ₹130.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹32 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreजगाची संपर्कभाषा किंवा ज्ञानविज्ञानाची माध्यमभाषा म्हणून इंग्रजीचे स्थानमाहात्म्य सर्वांनाच माहीत आहे. त्या भाषेतील शब्दसंपत्ती जवळ असेल, तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याचा मार्ग सुकर होतो, असा अनेकांचा अनुभव आहे. आपल्या अवतीभवती घडणा-या विविध घटनांची माहिती देता देता इंग्रजीतील शब्दांचा अर्थासह परिचय करून देणारे रंजक शैलीतले, ‘साप्ताहिक सकाळ’मधील वाचकप्रिय सदरातले ताजे पन्नास लेख संकलित स्वरूपात जिज्ञासूंच्या हाती देणारे हे पुस्तक... आधीचे पाच भाग घेतलेल्या वाचकांनाही हा सहावा भाग वाचावासा वाटेल आणि हाच भाग प्रथम घेणा-या वाचकांना आधीचे पाचही भाग विकत घेऊन संग्रही ठेवावेसे वाटतील... कारण प्रत्येक भागात दडली आहे अस्सल यशाची एक गुरुकिल्ली!
भाषाविचारAshi Hi Engraji Part 6 | अशी ही इंग्रजी (भाग ६वा)
₹130.00Original price was: ₹130.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹32 Read more
Skip to content
