WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Nisargayan : 40 | निसर्गायण : 40

लेखक: Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी

Original price was: ₹150.00.Current price is: ₹113.00. Save ₹37

Availability: 25 in stock

‘निसर्गायण’ हे पुस्तक १९८६मध्ये प्रकाशित झालं : त्यानंतरच्या ४० वर्षांचा आढावा घेणारं हे पुस्तक. ह्यात प्रारंभी, ४० वर्षांत ‘निसर्गायणा’तल्या विचारांचं नेमकं काय झालं ह्याचं सिंहावलोकन आणि विश्लेषण आहे. नंतर, ह्या ४० वर्षांत विकासाची जी चुकीची, घातक संकल्पना सार्‍या जगानं अधिक जोमानं राबवली, त्यामुळे सद्य:स्थितीत भेडसावणार्‍या समस्यांची चिकित्सा आहे. मग, ‘निसर्गायणा’शी

मिळत्या-जुळत्या अशा पश्चिमेकडील नव्या विचारांची स्वागतशील मांडणी आहे; आणि अखेरीस, ज्या ‘सहाव्या महाविनाशा’ची चर्चा ह्या ४० वर्षांत सातत्यानं वाढत्या प्रमाणावर होऊ लागली आहे, तो टाळण्यासाठी ‘निसर्गायण’ आज काय सांगेल, असं एक भविष्यवेधी चिंतन आणि दिशादर्शन आहे. चाळीस वर्षांपूर्वी ‘निसर्गायणा’त मांडलेले विचार, त्यानं दाखवलेली दिशा, ही शत प्रतिशत योग्य आहे हे ठामपणे सांगणारं; आणि ‘निसर्गायण’ जुनं झालेलं नाही—किंबहुना, कधीही होणार नाही— ह्याची खात्री पटवून देणारं हे विचारमंथन.

तपशील
ISBN : 978-93-48736-23-9
परिमाण : 21.25 × 13.75 × 1.50 cm
प्रकाशन तारीख : 23 Sept. 2026
बुक कोड : I-02-2026
वजन : 117 g
पाने : -
आर्टिस्ट : Ameya Kulkarni
बाईंडिंग : सेंटर पिनिंग
आवृत्ती : Sept. 2026

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top