Samyak Vikas | सम्यक विकास
₹250.00 Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62
Availability: 25 in stock
विकास ही संकल्पना सध्या केवळ भौतिकवाढीत अडकून बसली आहे - संकुचित झाली आहे. दरडोई उपभोग वा दरडोई जी.एन्.पी. वाढवणं ह्या झापडबंद रीतीनं विकासाचा आलेख चढता ठेवण्याचा सध्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्या मनांवरचं ह्या संकल्पनांचं गारूड इतकं बळकट आहे की, त्यांचे व्यक्ती, समाज आणि पर्यावरण ह्यांच्यावर होणारे भयंकर दुष्परिणाम जाणीवपूर्वक दुर्लक्षून
आपण वेगानं त्याच दिशेत पुढे जात आहोत. तिकडे अर्थशास्त्राच्या मोजपट्टया विकास होत असल्याचं दाखवतात; पण प्रत्यक्ष अनुभव येत आहे तो सार्वत्रिक अध:पतनाचा - सर्वांगीण विनाशाचा. अशा ह्या अशाश्वत, विनाशक विकासाची कारणमीमांसा करून ख-याखु-या विकासाची दिशा शोधण्याचा हा प्रयत्न. व्यक्ती, समाज आणि पर्यावरण ह्या तिन्हींची धारणा करणारा; भौतिक वाढीला असणा-या निसर्गाच्या अपरिहार्य मर्यादेचं भान ठेवून त्या मर्यादेचा आदर करणारा; जाणिवेच्या अनंत विस्ताराचा विकास अभिप्रेत असणारा असा हा सम्यक् विकास आहे. संकल्पना आणि व्यवहार ह्यांची सांगड घालत त्याचा ऊहापोह करणारं हे पुस्तक.
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content