बालसाहित्य
-
Sale! Add to cart'या नुसत्याच विज्ञानकथा नाहीत. या आहेत विज्ञान प्रयोगकथा. आजूबाजूला सहज उपलब्ध असणा-या गोष्टीतून केलेले प्रयोग मांडणा-या आणि या प्रयोगामागील विज्ञान सोप्या भाषेत समजावून देणा-या कथा. मुलांची सुप्त सर्जनशीलता शोधणारी शाळा घरात अन् घर शाळेत नेणारी ही आहे
बालसाहित्यGammatshala Part 2 | गंमतशाळा भाग-२
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartमहात्मा गांधी जन्मशताब्दी महोत्सवाच्या प्रसंगी केवळ भारतातच नव्हे, तर सा-या जगभर त्यांचे पुण्यस्मरण होत आहे. केवळ राजकारणी पुढारीच नव्हेत; तर गायक, नर्तक, चित्रकार, शिल्पकार सारेच जण शब्द, स्वर, रंग, रेखा, अभिनय ह्यांतून आपली कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. गांधीजींचे आपणावर तर मोठे ॠण आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण चालू शकलो नाही, हा त्यांचा दोष नव्हे. गांधीजींच्या चरित्राचे हे लेखन ही त्यांच्या चरणी वाहिलेली माझी लहानशी फुलाची पाकळी आहे. ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही, अशा मराठी वाचकांसाठी मी हे चिमुकले पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक वाचल्यावर गांधीजींच्याविषयी अधिकारी लेखकांनी लिहिलेली चरित्रे वाचण्याची आणि त्यांचे तत्त्वज्ञान अधिक बारकाईने समजून घेण्याची इच्छा झाली, तर माझ्या ह्या लेखनकामाचे चीज झाले, असे मला वाटेल. पु. ल. देशपांडे
बालसाहित्यGandhiji | गांधीजी
₹170.00Original price was: ₹170.00.₹128.00Current price is: ₹128.00. Save ₹42 Add to cart -
Sale! Add to cartगणित म्हणजे किचकट आकडेमोड ! छे, गणित म्हणजे तर्कशुध्द विचारांचा खेळ ! गणित म्हणजे डोके गरगरवणाऱ्या समस्या ! छे छे, गणित म्हणजे बुध्दीला धारधार बनवणारे चाक ! गणित म्हणजे परीक्षेतली हमखास डोकेदुखी ! अजिबात नाही ! गणित म्हणजे हमखास शंभर टक्के गुण ! गणित अजिबात आवडत नसणाऱ्या अन् गणिताशिवाय इतर आवड नसणाऱ्या गणितात रमणाऱ्या अन् गणितापासून लांब पळणाऱ्या साऱ्यांनाच गणिताची गोडी लावणाऱ्या - विद्यार्थी- पालक- शिक्षक या साऱ्यांना गणितातील सार अन् तत्त्वं सोपं करून सांगणाऱ्या - गणितगप्पा भाग १
बालसाहित्यGanit Gappa (Part-1) | गणित गप्पा (भाग-१)
₹130.00Original price was: ₹130.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹32 Add to cart -
Sale! Add to cart'गणित म्हणजे किचकट आकडेमोड ! छे, गणित म्हणजे तर्कशुध्द विचारांचा खेळ ! गणित म्हणजे डोके गरगरवणाऱ्या समस्या ! छे छे, गणित म्हणजे बुध्दीला धारधार बनवणारे चाक ! गणित म्हणजे परीक्षेतली हमखास डोकेदुखी ! अजिबात नाही ! गणित म्हणजे हमखास शंभर टक्के गुण ! गणित अजिबात आवडत नसणाऱ्या अन् गणिताशिवाय इतर आवड नसणाऱ्या गणितात रमणाऱ्या अन् गणितापासून लांब पळणाऱ्या साऱ्यांनाच गणिताची गोडी लावणाऱ्या - विद्यार्थी- पालक- शिक्षक या साऱ्यांना गणितातील सार अन् तत्त्वं सोपं करून सांगणाऱ्या - गणितगप्पा भाग २
बालसाहित्यGanit Gappa (Part-2) | गणित गप्पा (भाग-२)
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartछोटया मुलामुलींना भोवतालच्या गोष्टी वेगळयाच दिसतात. त्यांच्याशी त्यांचं नातंसुध्दा काहीसं वेगळं असतं - असू शकतं, अशी माझी समजूत आहे. त्या गोष्टींचं वर्णन करताना, त्यांच्याबद्दल काहीबाही बोलताना, मोठयांना दिसणार-सुचणार नाहीत अशा चित्रविचित्र कल्पना आणि मोठयांच्या नीटनेटक्या, पोशाखी भाषेपेक्षा निराळीच नागडी, रंगीत, नादिष्ट, कधी अगदी कोवळी, तर कधी अत्यंत अर्बटचर्बटसुध्दा भाषा ती उधळतात. मुलांचं हे मूलपण माझ्या कविता-गाण्यांतून खेळवण्याचा खटाटोप आधीच्या ५ संग्रहांप्रमाणे याही संग्रहात मी केला आहे. हा एक ब-यापैकी उपक्रम आहे अशी पावती मुलांच्या शाळांतून आणि खुल्या मेळाव्यांतून मी केलेल्या गप्पा-गोष्टी-गाण्यांच्या कार्यक्रमांतून मला वेळोवेळी मिळते आहे. नव्या वाचकांनी त्यांना काय वाटतं ते जरूर सांगावं.
बालसाहित्यGaragara Garagara | गरागरा गरागरा
₹25.00Original price was: ₹25.00.₹19.00Current price is: ₹19.00. Save ₹6 Add to cart -
Sale! Add to cartमहेश आपल्या मित्रांना आपले गाव दाखवायला घेऊन गेला. या सगळ्या मित्रांनी गावाकडे खूप धमाल केली आणि अनेक नव्या गोष्टी पाहिल्या. त्यांच्यासोबत आपणही करूया गावाचा फेरफटका आणि लुटू या गावाकडची मजा
All BooksGavakadchee Majja | गावाकडची मज्जा
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Sale! Add to cartशारदा सहनिवास' म्हणजे सतत काही ना काही उलथापालथ चालू असणारं जग. त्यात सगळ्यात भाव खाणार् या गोष्टी म्हणजे बॅडमिंटनचा खेळ अन् गणेशोत्सवाचं नाटक. आंतर सहनिवास बॅडमिंटन करंडक' शारदा सहनिवासने कसा जिंकला ? तो करंडक हरवला कसा ? अन् त्याचा शोध कसा लागला ? या सार् याचा गणेशोत्सवाच्या नाटकाशी काय संबंध ? दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या खुसखुशीत, खमंग शैलीत उलगडलेल्या धमाल अन् कमाल आठवणी !
All BooksHaravlelee Trophy Aani Itar Katha | हरवलेली ट्रॉफी आणि इतर कथा
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartमुलाला एखादा विषय आवडणे, न आवडणे हे तो विषय शिकवण्याच्या पध्दतीवर अवलंबून असते. शिकवण्याच्या गंभीर, रूक्ष पध्दतीने मुले त्या विषयाला कंटाळतात. उलट तोच विषय हसत-खेळत, गमतीदार पध्दतीने मांडला, तर मुले त्यात रंगून जातात. गणित हा शालेय अभ्यासक्रमातील अत्यंत महत्त्वाचा विषय. पण बहुतेक मुलांना हा विषय म्हणजे फक्त कंटाळवाणी किचकट आकडेमोड वाटते. हीच 'कंटाळवाणी किचकट आकडेमोड' वेगळ्या रूपात, वेगळ्या वेशात मुलांपुढे आली तर ? आपण एक गमतीदार नवीन खेळच खेळत आहोत, असे म्हणता म्हणता गणितातील काही महत्त्वाची सूत्रे त्यांच्या मनात ठसलेली असतात. दहा ते अकरा वर्षे वयोगटातील इयत्ता पाचवी-सहावीच्या मुलांसाठी भागाकार, गुणाकार, लसावि आणि मसावि या संकल्पनांची अशीच हसतखेळत ओळख करून देणारे हे पुस्तक मुलांप्रमाणेच हा विषय शिकवणाऱ्या गणित शिक्षकांनाही उपयोगी पडेल.
बालसाहित्यHasat Khelat Ganit | हसत खेळत गणित
₹70.00Original price was: ₹70.00.₹53.00Current price is: ₹53.00. Save ₹17 Add to cart -
Sale! Add to cartअन्नाच्या वाढदिवसाला तिच्या घरच्यांनी हिऱ्याचे कानातले भेट दिले. पण तिला ते मुळीच आवडले नाही. तिला एकच भेट हवी होती - पुस्तकांची ! अन्ना पुढे मोठी हवामानशास्त्रज्ञ झाली. तिला कुठल्या अडचणींना तोंड द्यावे लागले, तिने काय काय कष्ट सोसले आणि तिने कोणते शोध लावले ? चला, या पुस्तकात वाचू या.
All BooksHavamanshastradnya Anna Mani | हवामानशास्त्रज्ञ अन्ना मणी
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartकोकणात आजोबांकडे राहणारी हिरा एक दिवस मुंबईला पोचली, रुपालीला सोबत करण्यासाठी. रुपालीची आणि तिची गट्टी जमली खरी, पण मुंबईतल्या बंदिस्त वातावरणात हिराचे मन रमेना. ती कोकणात परतली. पुढे काय झाले ? वाचूया - हिराची गोष्ट
All BooksHirachee Goshta | हिराची गोष्ट
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart
Skip to content